Ritbhatmarathi

Search
Close this search box.

©® सौ. गीता गजानन गरुड

जन्म दिला मातेने पालन केले पित्याने
… च्या गळ्यात बांधतो डोरलं प्रेमाने

भारतात महाराष्ट्र महाराष्ट्रात पुणे
… च्या सोबतीत मला काय उणे

ukhane in marathi

हिरव्यागार रानात चरतात गाई
… चं माहेर साताऱ्यातलं वाई

ऑफीसला जाण्यास पकडतो बस नंबर सत्तर
… चे नाव घेण्यास मी नेहमीच तत्पर

लग्नाआधी पाहिल्या मी मुली अनेक
… आहे माझी लाखात एक

तहान भागवतं माठातलं गार पाणी
… झाली माझ्या आयुष्याची राणी

सोनचाफ्याच्या फुलांचा हवाहवासा सुगंध
… च्या सहवासात झालो मी धुंद

ukhane in marathi

नदीच्या काठावर चिंचेचं झाड
… वर प्रेम करतो मी जीवापाड

महिलांसाठी नवे उखाणे….

नवरीसाठी उखाणे ….

गावागावांत बत्ती असते सदानकदा गुल
… माझी नाजूक जसे गुलाबाचे फुल

उदबत्तीचा दरळतो सुवास मंद
… च्या सहवासात झालो मी धुंद

अबोलीच्या वेणीत हिरवागार दवणा

… लाडात म्हणते मला सख्यासजणा

सुवासिक फुलाभोवती फुलपाखरू घिरट्या घालतं
…..सारखी सहचारिणी मिळण्यास पुर्वजन्मीचं संचित लागतं

गाभाऱ्यात मिणमिणते दिव्याची ज्योत
… च्या माहेराचं बक्कळ गणगोत

कात टाकता रंगला विडा
… नि माझ्या संसारातली दूर जाओ इडापिडा

केतकीच्या बनाला नागाचा पहारा
… ने ओलेते केस झटकताच
सर्वांगी उठतो गोड शहारा

ukhane in marathi

निळ्याभोर आकाशात झगमगतो चांदवा
… चा चेहरा म्हणजे गुलाबांचा ताटवा

हिरव्यागार पानाआड हळदुवी चाफेकळी
दारात मी दिसताच …च्या गालाची खुलते खळी

पहाटे सुटतो गंधओला वारा
… चे बोलणे अम्रुताच्या धारा

पानात पान नागवेलीचं पान
… रांधते स्वैंपाक छान

पानाला लावला चुना त्यावर ठेवली सुपारीफोड
… म्हणते आज लग्नाचा वाढदिवस
घरीच करते तुमच्या आवडीचं गोडधोड

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *