Ritbhatmarathi

Search
Close this search box.

सुकन्या समृद्धी योजना (SSY) – देशातील स्त्रीयांचे कमी प्रमाण, स्त्री भ्रूण हत्या हे मुद्दे लक्षात घेऊन सरकारने सुरू केलेली योजना

sukanya samriddhi yojana in marathi : पूर्वीच्या काळी हुंडाबळी ची वाढती प्रथा, त्यामुळे महिलांवर होणारे अत्याचार तसेच मुलगी ही परक्याचे धन यासारख्या विचारसरणीच्या काळात मुलगी झाली म्हटलं की मुलीचे वडील डोक्याला हात लावून बसत असत. मुलीला वाढवायचे, शिकवायचे, भला मोठा हुंडा देऊन लग्न लावून द्यायचे, बाळंतपण करायचे आणि वरच्या वर सासरच्या लोकांच्या मागण्या पूर्ण करायच्या. यामुळे मुलगी होणे म्हणजे अपशकून किंवा वाईट घटना मानली जात होती. त्यामुळेच मुलींना शिकवून काय करायचे शेवटी त्या परक्याचे धन, आपल्याला त्याचा काय फायदा, चूल आणि मुल च तर करणार आहेत त्या. त्यामुळे त्यांचे शिक्षण बंद केले जात होते, बाल विवाह होत होते. म्हणूनच बऱ्याच प्रमाणात स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण वाढले होते.

पण काळ बदलत गेला तसे तसे लोकांच्या मनात जनजागृती करून मुलींचे महत्व पटवून देण्यात येऊ लागले आणि चित्र बदलू लागले. पण दुर्दैवाने हे सांगावं लागत आहे की, आजही स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण शंभर टक्के कमी झालेलं नाही. अजूनही बऱ्याच भागात तपासणी करून अबॉर्शन केले जाते. ही खरंच खेदाची बाब आहे.

याच मुद्द्याला हात घालत केंद्र सरकारने एक मोठी योजना सुरू केली ज्यामुळे, स्त्री भ्रूण हत्या करण्याचे कारणच मागे राहणार नाही. या योजनेत मुलीच्या शिक्षणाचा, करिअर चा आणि लग्नाचा खर्च उचलला जातो आणि मुलींचे आयुष्य सुरक्षित केले जाते, ती योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना.

सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र शासनाची मुलींसाठीची महत्वाकांक्षी योजना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या अभियानअंतर्गत ही योजना २२ जानेवारी, २०१५ रोजी देशभरात सुरू केली. ही योजना विशेष मुलींसाठी असून, केंद्र शासनाची सर्वात कमी गुंतवणूकीची बचत योजना आहे. मुलींच्या लग्नाच्या वेळी किंवा उच्च शिक्षण घेताना ही गुंतवणूक अतिशय फायदेशीर ठरते. या योजनेला ‘पंतप्रधान सुकन्या योजना’ असेही म्हणतात. केंद्र आणि राज्य शासनाद्वारे बँका आणि पोस्ट ऑफिसद्वारे ही योजना राबवली जाते. सुकन्या समृद्धी योजना ही मुलींचे लग्न, शिक्षण, आरोग्य तसेच त्यांच्या उज्वल भविष्यासाठी गुंतवणूकीची बचत योजना आहे. यामध्ये मुलींच्या पलकाकडून कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडून या योजनेचा लाभ मुलीच्या भविष्यासाठी घेऊ शकतात. अशा बँक किंवा पोस्ट खात्यास सुकन्या समृद्धी खाते असे म्हणतात.

या योजनेत दरवर्षी किमान रु. २५०/- किंवा जास्तीत जास्त १.५ लाख पर्यंत रक्कम भरून गुंतवणूक सुरू करता येते. खाते उघडल्यापासूनच्या तारखेपासून ते मुलीचे २१ वर्ष पूर्ण झाल्यावर मुलीच्या लग्नाच्यावेळी योजनेची मॅच्युरिटी होते व चांगल्या व्याजदराने ठेवी परत मिळतात.

आधी एका परिवारातील फक्त २ मुलींना सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेता येत होता परंतु आता नवीन अपडेट अनुसार एकाच परिवारातील 3 मुली सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेऊ शकतात.

१. मुलीचे शिक्षण,आरोग्य, मुलीचे लग्न तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्य सुधारण्याच्या उद्देशानं सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

२. मुलींना भविष्यात आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने या योजनेची शुरुवात करण्यात आली आहे.

३. मुलींचे भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

४. मुलींना भविष्यात सन्मानाने जगता यावे या दृष्टीने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

५. राज्यातील मुलींचा सामाजिक व आर्थिक विकास करणे
भविष्यात मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

१. सुकन्या समृद्धी योजनेमुळे मुलीचे भविष्य सुरक्षित होण्यास मदत होते.
२. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यास चांगला व्याजदर मिळतो.
३. सुकन्या समृद्धी योजना एक अत्यंत कमी गुंतवणूक बचत योजना आहे.
४. या योजनेत सरकारकडून पैशाची हमी दिली जाते.
५. या योजनेत पैसे बुडण्याची शक्यता नाही.
६. मुलीचे शिक्षण, मुलीचे आरोग्य, मुलीचे लग्न व तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही एक उत्तम बचत योजना आहे.
७. देशातील प्रत्येक मुलीला या योजनेचा लाभ घेता येतो.
८. कुटुंबातील प्रत्येक मुलीला सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेता येतो.
९. कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडून लाभ घेता येतो.
१०. जमा रकमेवर चक्रवाढ पद्धतीने व्याज दर मिळते.
११. या योजनेचा कालावधी २१ वर्षाचा असला तरी लाभार्थ्याला फक्त १५ वर्षापर्यंत पैसे भरावे लागतात पुढील १५ ते २१ वर्षे पैसे भरावे लागत नाहीत.
१२. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत आयुर्विमा महामंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या केंद्र शासनाच्या आम आदमी विमा योजनेअंतर्गत सदर मुलीच्या नावे जमा केलेल्या रकमेतून फक्त १००/- रुपये प्रतिवर्ष इतका हप्ता जमा करून सदर मुलीच्या कमावत्या पालकाचा विमा उतरवला जातो ज्यामुळे पालकाचा अपघात अथवा मृत्यू झाल्यास लाभार्थ्याच्या वारसाला किमान ३००००/- रुपये ते ७५०००/- रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते.
१४. आम आदमी विमा योजनेअंतर्गत समाविष्ट शिक्षा सहयोग योजनेअंतर्गत सदर मुलीला ६००/- रुपये शिष्यवृत्ती प्रति ६ महिने आठवी नववी दहावी अकरावी व बारावी इयत्तेत शिक्षक असताना दिली जाते.
१५. अनाथ मुलीला दत्तक घेतल्यास देखील सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत लाभ दिला जातो.

शासनाच्या बाल संगोपन योजनेअंतर्गत प्रति बालक मिळणार आता ठराविक रक्कम. जाणून घ्या सविस्तर माहिती

jan dhan yojana (PM JDY): लाभार्थ्यांना आता या खात्यांमधून थेट लाभ मिळेल. जाणून घ्या नियम व सविस्तर माहिती

मुलीच्या जन्मापासून ते १० वर्षाची होईपर्यंत या कालावधीत सुकन्या समृद्धी योजना खाते उघडणे गरजेचे आहे म्हणजेच सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ फक्त १० वर्षाखालील मुलींनाच घेता येईल.

जर एखाद्या कुटुंबात २ मुली असतील आणि दोन्ही मुलींना जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सुकन्या योजनेच्या २ खाती उघडून याचा लाभ घेता येईल.

मातेच्या दुसऱ्या प्रसूती वेळी जर जुळ्या किंवा तिळ्या मुली झाल्यास त्यांना ही सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेता येईल.

सुकन्या समृद्धी योजना खात्यात रोख रक्कम, डिमांड ड्राफ्ट, चेक किंवा कोअर बँकिंग सिस्टमच्या साह्याने पैसे भरता येतात.

मुलीचे वय २१ वर्षे पूर्ण झाल्यावर जमा रक्कम व्याजासकट पालकांच्या स्वाधीन केली जाते व सदर खाते बंद केले जाते.

मुलीचे नाव न ठेवले गेले असल्यास आईच्या नावावर सुकन्या समृद्धी योजना खाते उघडता येते ते पुढे जाऊन बदलून मुलीच्या नावावर करता येते.

फक्त मुलींना या योजनेअंतर्गत लाभ घेता येईल.

राज्यातील मुलीचे भविष्य सुरक्षित करण्याच्या उद्देशाने शासनाद्वारे सुरु करण्यात आलेली सुकन्या समृद्धी योजना एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे.

या योजनेचा कालावधी खाते उघडल्यापासून मुलीचे वय २१ वर्ष होईपर्यंत निर्धारित केला गेला आहे.

सुकन्या समृद्धी योजनेचा कालावधी मुलीचे वय २१ वर्षे होईपर्यंत केला गेला असला तरी सुरुवातीच्या फक्त १५ वर्षांपर्यंतच योजनेअंतर्गत पैसे जमा करायचे आहेत.

मुलीचे वय २१ वर्षे पूर्ण होण्याअगोदरच जर मुलीचे लग्न झाले तर त्या मुलीला सुकन्या समृद्धी योजनेतुन रद्द केले जाईल व व सदर खाते बंद केले जाईल व या योजनेचा लाभ मुलीच्या पालकांना घेता येणार नाही.

या योजनेअंतर्गत जमा रकमेवर टॅक्स भरावा लागत नाही.

मुलीचे वय २१ वर्षे होऊन गेल्यावर सुद्धा जर लाभार्थी सुकन्या समृद्धी योजनेच्या बचत खात्यातून पैसे काढत नसेल तर त्या जमा रकमेवर सुद्धा व्याज दिले जाईल.

मुलीचे वय १८वर्ष पूर्ण झाल्यावरच मुलीच्या उच्च शिक्षणासाठी तसेच तिच्या आरोग्यासाठी सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यातून फक्त ५० टक्के रक्कम काढता येईल.

सुकन्या समृद्धी योजनेत दरवर्षी किमान २५०/- रुपये भरणे आवश्यक आहे तसे न केल्यास सदर खाते बंद केले जाईल व खाते पुन्हा सुरू करण्यासाठी जितकी वर्षे खाते बंद असेल त्या प्रत्येक वर्षाला ५०/- रुपये दंड आकारून खाते पुन्हा सुरू केले जाईल.

सुकन्या समृद्धी योजना १०० टक्के सुरक्षित योजना मानली जाते.

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचा एखाद्या कारणामुळे मृत्यू झाल्यास जमा रक्कम व्याजा सकट लाभार्थ्याच्या पालकांना दिली जाते.

१. सुकन्या समृद्धी बँक खात्यात नगद, डिमांड ड्राफ्ट, चेक किंवा बँकेत कोअर बँकिंग सिस्टमने रक्कम ट्रान्सफर करता येते.

२. २१ वर्षानंतर सुकन्या समृद्धी खाते बंद होऊन पैसे पालकांच्या स्वाधीन केले जातील.

१. सुकन्या समृद्धी योजना (प्रपत्र ) फॉर्म.

२. मुलीचा जन्म दाखला.

३. पॅनकार्ड

४. आधारकार्ड

५. मतदार ओळखपत्र

६. रेशनकार्ड, वीजबिल

वरील कागदपत्रे पालकांची असावीत. पालक म्हणजे आईवडील किंवा कायदेशीररित्या मुलीचा सांभाळ करत असलेली व्यक्ती.

सुकन्या समृद्धी योजनेसाठी पोस्ट ऑफिसमधून आणि राष्ट्रीयकृत बँकेतून खाते काढता येते.

१. भारतीय डाक विभागामार्फत सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ मिळवला जाऊ शकतो. याकरिता जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन फॉर्म भरा. २. सोबत आवश्यक असलेले कागदपत्रे आणि डिपॉझीट रक्कम (कमीत कमी २५०/-) भरा.
३. कागदपत्रे आणि इतर बाबींची पडताळणी झाल्यावर सुकन्या समृद्धी खाते सुरू करता येते.
४. पोस्टामार्फत अकाउंट होल्डरला पासूबुक पुरवले जाते.

वर नमुद केल्याप्रमाणे कोणत्याही अधिकृत राष्ट्रीयकृत बँकेमध्ये सुकन्या समृद्धी खाते सहज उघडता येते.
१. समजा, सुकन्या योजनेचा लाभ तुमच्या मुलीसाठी SBI – म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमधून घ्यावयाचा असल्यास जवळच्या कोणत्याही SBI च्या शाखेत भेट द्या.
२. SBI बँकेचे अधिकारी याबत तुम्हाला अधिक मदत करतील. ३. सुकन्या समृद्धी खाते फॉर्म, आवश्यक कागदपत्रे आणि कमीतकमी रुपये २५०/- भरून योजनेचा लाभ घेता येतो. तुमचं SBI मध्ये बँक खाते नसले तरीही सुकन्या समृद्धी खाते सुरु करता येते.

सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर दरवेळी भारताच्या अर्थव्यवस्थेच्या निकषांवर कमी-जास्त होत असतो. तिमाही आधारावर भारत सरकार व्याजदर जाहीर होते. योजनेच्या सुरवातीस म्हणजे २०१५ मध्ये ९.१% एवढे व्याजदर देण्यात आले होते. सध्या सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर ७.६% एवढा आहे.

१. या योजनेअंतर्गत केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीचा कालावधी खुप मोठा म्हणजे 21 वर्षाचा असतो.
२. या योजनेअंतर्गत सध्या दिला जाणारा व्याजदर 7.6 टक्के आहे त्यामुळे खुप वर्ष गुंतवणूक करून सुद्धा कमी लाभ दिला जातो जो म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केटमधे गुंतवणूक करून मिळणाऱ्या लाभापेक्षा पेक्षा कमी आहे.
३. या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या मुलीचे लग्न तिच्या 21 वर्षाच्या आत झाल्यास मुलीला या जोजनेचा लाभ घेता येत नाही व तीला या योजनेमधून रद्द केले जाते.
४. या योजनेअंतर्गत अधिकतम गुंतवणूक 1.5 लाख आहे परंतु या पेक्षा जास्त रक्कम जमा केल्यास जास्त रकमेवर व्याज दिले जात नाही.

सुकन्या समृद्धी खाते उघडून ५ वर्षे पूर्ण झाल्यावर सदर खाते बंद करता येईल.

सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचा मृत्यू झाल्यास सदर खाते बंद करता येईल.

लाभार्थी मुलीच्या पालकाचा मृत्यू झाल्यास सदर खाते बंद करता येईल.

लाभार्थ्याला एखादा आजार झाल्यास सदर खाते बंद करता येईल.

 • इंडियन ओवसीज बँक Indian Overseas Bank
 • इंडियन बँक Indian Bank
 • आईडीबीआई बँक IDBI Bank
 • आईसीआईसीआई बँक ICICI Bank
 • देना बँक Dena Bank
 • कॉर्पोरेशन बँक Corporation Bank
 • सेंट्रल बैंक ऑफ इंडिया Central Bank of India
 • केनरा बँक Canara Bank
 • बँक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharashtra
 • बँक ऑफ इंडिया Bank of India
 • बँक ऑफ बड़ौदा Bank of Baroda
 • एक्सिस बँक Axis Bank
 • आंध्रा बँक Andhra Bank
 • इलाहाबाद बँक Allahabad Bank
 • भारतीय स्‍टेट बँक State Bank Of India
 • स्टेट बँक ऑफ मैसूर State Bank of Mysore
 • स्टेट बँक ऑफ हैदराबाद State Bank of Hyderabad
 • स्टेट बँक ऑफ त्रावणकोर State Bank of Travancore
 • स्टेट बँक ऑफ बीकानेर आणि – जयपुर State Bank of Bikaner and Jaipur
 • स्टेट बँक ऑफ पटियाला State Bank of Patiyala
 • विजया बँक Vijaya Bank
 • यूनाइटेड बँक ऑफ इंडिया United Bank of India
 • यूनियन बँक ऑफ इंडिया,
 • यूको बँक Uco Bank
 • सिंडिकेट बँक Syndicate Bank
 • पंजाब नेशनल बँक Panjab National Bank
 • पंजाब एंड सिंध बँक Panjab and Sind Bank
 • ओरियंटल बँक ऑफ कॉमर्स
  Oriental Bank of commerce.

सुकन्या समृध्दी योजनेचे खाते ऑनलाईन पद्धतीने ही उघडता येते. त्यासाठी नेटवरून माहिती घेऊन फॉर्म भरला जाऊ शकतो.

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *