Ritbhatmarathi

Search
Close this search box.

रोशनी कार मध्ये बसली, बसताच तिने मोबाइलवर जुनी हिंदी गाणी लावली. गाडी चालवताना गाणी ऐकन हा तिचा जणु छंद होय. रोशनी च म्हणणे ‘ गाणी ऐकली की माईंड फ्रेश होते. ‘ रोशनी जेव्हा पासून डॉक्टर या फील्ड मध्ये आली तशी धकाधकीचे जीवन आणि ती एकमेकांस जोडल्या गेले.

डॉक्टर म्हंटले की लोकांसोबत प्रत्यक्ष संवाद येतो, नवनवीन गोष्टी शिकावयास मिळतात. आजारी पडणे आणि त्या आजारातून एखाद्या व्यक्तीला बाहेर काढणे ही कामगिरी मोठी कौतुकास्पद आहे असे रोशनी ला वाटे.

गावी अनुभवलेल्या सुंदर क्षण रोशनी आपल्या डोळ्यांत साठवून होती. तेच तिच्या मनामध्ये घोळवत ती तिच्या हॉस्पिटल मध्ये पोहोचली.

हॉस्पिटल मध्ये पोहोचतच तिने आपली कार पार्किग मध्ये जाऊन पार्क केली. आपल्या नेहमीच्या केबिन मध्ये जाऊन तिने तिचे कपडे बदलले आणि ते निळ्या रंगाचे डॉक्टर साठी असलेले वस्त्र परिधान करून रोशनी आता तिच्या कामास प्रारंभ केला.

पेडियाट्रिक डिपार्टमेंट मध्ये जाण्या आधी तिला भुकेची जाणीव झाली. काम करण्या आधी पोट भरून असले पाहिजे म्हणजे दिवसभर उपाशी राहिले तरी हरकत नाही हा विचार करून रोशनी हॉस्पिटल च्या कॅन्टीन मध्ये गेली.

कॅन्टीन मध्ये जाऊन तिने आपल्या साठी इडली सांबार ऑर्डर केलं. काही वेळात तिने तिचा नाश्ता करून ती तिच्या डिपार्टमेंट च्या दिशेने वळली.

डिपार्टमेंट मध्ये जाताच तिला आपलेपणाची भावना मनात निर्माण झाली. हॉस्पिटल मध्ये सर्व स्टाफ सोबत आपलेपण आणि चांगले नातेसंबंध असल्यामुळे ते एक कुटुंब च होय असे तिथले वातावरण.

वॉर्ड मध्ये आत शिरताच अश्विनी सिस्टर खुश झाल्या.
” अरे वा …कोण आल पाहा…” अस त्यांनी आरोळी ठोकली. अश्विनी सिस्टर रोशनी ला स्वतः च्या मुली प्रमाणे वागवत. आपली मुलगी काही दिवसांनी पुन्हा तिच्या कामावर आली याचा त्यांना आनंद झाला.

” कश्या आहात तुम्ही??” रोशनी तिचा स्तेतेस्कॉप गळ्यात आडकवत म्हणाली.

” मी छान तुझ सांग, कश्या गेल्या सुट्ट्या तुझ्या …किती एन्जॉय केलं?? फोटो दाखवत तिकडचे …आम्ही बाई नाही पाहिलं कोकण कधी. ” अश्विनी सिस्टर त्यांची मनातील खंत बोलून त्यांच्या टेबलवर जाऊन लॅपटॉप समोर बसून गेल्या.

” एकदम मस्त …आणि जाऊ आपण फिरायला तिकडे कधीतरी ट्रीप करून.” रोशनी त्याचं मन वळवत म्हणाली.

” छान तर आज नेहमी प्रमाणे लेट केलच ना….” वृषाली ने नेहमप्रमाणेच चिडवायला सुरुवात केली.

” कुठे लेट, फक्त कॅन्टीन मध्ये नाश्ता करायला गेली बस ” रोशनी तिची चूक अमान्य करत पेशंट च्या फाईल हातात घेतल्या.

रोशनी पेशंट चे राऊंड घ्यायला जाणार तोच तिची नजर आता एका नवीन व्यक्ती कडे वेधली गेली.
ती व्यक्ती तिच्या सारखेच वस्त्र परिधान करून होती म्हणजे ती ही एक डॉक्टर असावी.

तिच्या अनुपस्थितीत कोण नवीन व्यक्ती जॉइन झाली याचा तिला नवल वाटले. तिने आपल्या बाजूला असलेल्या वृषालीला हाथ करून जवळ बोलवले.

” हे काय नवीन जॉइन आहे का” रोशनी ने प्रश्न केला.

” हो ” वृषाली उत्तरली.

” काय नाव त्याचं ” रोशनी ने पुन्हा प्रश्न केला.

” आराध्य ” वृषालीच्या तोंडून ऐकलेले ते उत्तर ऐकून रोशनी चकित झाली.

” का तुम्ही ओळखता का??” रोशनी चा चेहरा पाहून वृषालीला वाटले की रोशनी त्या नवीन जॉइन झालेले डॉक्टर आराध्य यांना ओळखत असावी.

” नाही ग, चलो अभी काम करते है.” अस म्हणत रोशनी ने तूर्तास तरी विषय टाळला.

ती ही आता पेशंट चे राऊंड घ्यायला लागली.

” तुम्ही…” रोशनी ने बोलण्यास सुरुवात केली पण तिला समोरच्या व्यक्तीने टोकले.

” ही मी इथे न्यू जॉइन झालो आहे, आराध्य आणि तुम्ही ??” आराध्य चा मनमोकळा बोलणारा स्वभाव कोणी ही सहज ओळखू शकतो.

आराध्य चे नाव ऐकुन रोशनी ने स्वतः ला समजावले की जगात आराध्य नावाची अनेक माणसे असतील. आपण जे विचार करतो तेच होते असे नाही.

” मी रोशनी, नाइस टू मीट यू .” रोशनी ने हसून त्याचं स्वागत केले.

” सेम हिअर ” अस बोलताना मात्र आराध्य चे लक्ष तिचा हातातील त्या जुनाट फ्रेंडशिप बॅंड कडे होत. जणू ते पाहून त्याला कशाची तरी आठवण झाली असावी.

अश्या प्रकारे रोशनी आणि आराध्य ची मैत्री झाली.
त्या दोघांनी पेशंट चेक केले आणि सिनियर डॉक्टर सोबत बाकीचं कामे करून घेतली.

जेवताना रोशनी आज नेहमी प्रमाणे एकटी न बसता ती आज आराध्य सोबत होती. जेवताना रोशनी आराध्य ला हॉस्पिटल विषयी माहिती देत होती. त्यासोबत त्यांच्या बऱ्याच गप्पा गोष्टी झाल्या.

रोशनी ला आराध्य सोबत बोलताना तिचा कोणी जुना मित्र भेटला असावा अशी जाणीव होत होती.

तो दिवस कसा गेला ते रोशनी ला उमजले नाही. का कोणास ठाऊक पण रोशनी ला आपला कोणीतरी हरवलेला मित्र आराध्य मध्ये भेटला अशी जाणीव तिच्या मनाला झाली.

घड्याळात नऊ वाजून गेले. रोशनी ची डुटी संपून गेली तरीही ती कामात व्यस्त होती. तिचे लक्ष घड्याळाकडे जाताच तिने तिचे सामान आवरुन जाण्याची तयारी केली.

” चलो फिर मै चलती हु. ” अस म्हणत तीने नर्सिंग स्टाफ आणि आराध्य ला टाटा करून ती हॉस्पिटल च्या बाहेर आली.

तिने पार्कींग स्लॉट मध्ये जाऊन आपली कार मध्ये बसली आणि कार थेट आपल्या अपार्टमेंट च्या दिशेने वळवली.

घरी पोहोचताच शोभा काकांचा ओरडा पडणार याची खात्री तिला होती.

” आलीस तू….तुला एक शब्दही बोलून जाता येत नाही की मी आता हॉस्पिटल ला जाणार आहे….” शोभा काकू त्यांचे भले मोठे भाषण सुरू करण्यात लागल्या होत्या.

” अग तुम्ही खूप गाढ झोपेत होते, म्हणून उठवलं नाही.” रोशनी बिचारी तिचे चांगले विचार पटवून देत होती.

” तरीपण तू उठवून जायचं ना ….आणि तू बिना नाष्टा तू आज गेली ” शोभा काकू ना उशिरा उठणे आवडत नाही आणि त्याच आज उशिरा उठल्या. आपली मुलगी आज नाश्ता न करता आणि डबा घेऊन न जाता केली याचे त्यांना वाईट वाटत होते .

” मी कॅन्टीन मध्ये खाल्ल ग ” रोशनी तिचा राग कमी करण्याचा प्रयत्न करत होती.

” मग काय झालं,आणि तुला किती वेळा सांगितल आहे बाहेर च खात जाऊ नको म्हणून.”

” कॅन्टीन काही बाहेरच नाहीये …तिथे चांगलं जेवण मिळते. “

” तरी ते बाहेरच च झालं.” शोभा काकू त्याचं गोष्टीवर अडून होत्या.

” शोभा ती आत्ताच आली आहे ….फ्रेश तरी होऊ दे तिला” शेवटी विजय काका यांना मध्यस्ती करावी लागली.

” बरं तुम्ही जेवले?? ” रोशनी ने आता विषय बदलला.

” हो बाळा आम्ही जेवलो आणि तू जाउन पटकन फ्रेश हो आणि जेवून घे. ” विजय काका वातावरण शांत करत म्हणाले.

रोशनी तिच्या रूम मध्ये जाऊन फ्रेश होऊन तिने कपडे बदलले आणि समोर येऊन बसली. जेवण करता करता शोभा काकू आणि विजय काका यांसोबत गप्पा गोष्टी केल्या.

आता अकरा वाजले होते आणि शोभा काकू, विजय काका कधीच झोपन्या साठी त्यांचा रूम मध्ये गेले.

रोशनी ही तिच्या अंगावर मऊ ब्लँकेट ओढून त्यात शिरली. आज तिला नवीन भेटलेला आराध्य तिचा नजरे समोर उभा राहिला. मनात अनेक विचार गुफेर घालत होते. ते तिने दूर सारून डोळे मिटले. बघता बघता रोशनी आता गाढ झोपी गेली होती.