Ritbhatmarathi

Search
Close this search box.
पुण्यातील अस्सल खाद्यपदार्थांच्या ठिकाणांना भेट दिलीच पाहिजे....!

पुणे जसं वेगवेगळ्या पेठांचं शहर,गल्लीबोळांचं शहर..समजलं जातं त्याचप्रमाणे पुणे हे वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थांचं शहरही समजलं जातं…अगदी ब्रिटिश राजवट स्थापन झाल्यापासून वेगवेगळ्या खाद्यपदार्थांसाठी पुणे शहर प्रसिद्ध आहे. याच खाद्यपदार्थांमुळे आपल्या महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपला जातो हे एकमेव वैशिष्टय पुण्यातील खाद्यपदार्थांचं आहे. काही अस्सल चव असलेले पदार्थ मिळण्याच्या काही  खास स्टॉलस आहेत तर अस्सल चवीचे पदार्थ मिळतात कुठे हे आपण पाहुयात….

१. वडा पाव

खरं तर वडा पावबद्दल सांगायचे झाल्यास हा पदार्थ जलद खाद्यपदार्थांच्या यादीमध्ये येतो ज्याला आपण फास्ट फूड असंही म्हणतो. काही ठिकाणी महाराष्ट्राचा बर्गर असेही नामकरण वडा पावचे केले गेले आहे.वडापाव बरोबर तळलेल्या हिरव्या मिरच्या,लसणाची चटणी किंवा कोथिंबिरीची चटणी सुद्धा आवडीने खाल्ली जाते. वडा पाव हा पदार्थ मूलतः गिरणी कामगारांची भूक भागवण्यासाठी केलेली तजवीज आहे…वडा पावचा उगम हा मुंबईमध्ये सर्वात आधी झाला…म्हणून सगळीकडे मुंबई वडापाव म्हणून हा खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहे. फक्त मुंबईमध्येच नाही तर हा वडा पाव संपूर्ण भारतभर आवडीने खाल्ला जातो…आता पुण्यातील काही प्रसिद्ध अशी खास वडापाव साठी असलेले काही स्टॉल्स आहेत याची माहिती आपण घेऊयात…

जोशी वडेवाले

जोशी वडेवाले म्हणजे वडापावची अशी एक खास चव ज्यामध्ये ग्राहकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते कारण वडापाव म्हंटल की तेल आलंच तर वडे तळताना खास असं शेंगदाणा तेल वडे तळताना वापरलं जातं…फक्त वडापाव जोशी वडेवाल्यांची खासियत नसून साबुदाणा वडाबटाटा भजीकांदा भजी अशा प्रकारचे विविध प्रकारचे पदार्थ बनवून विकले जातात. 

ठिकाण: शिवाजीनगर पुणे, एफ.सी. कॉलेज रोड, सुस रोड, बाणेर रोड बालेवाडी, वाकड पिंपरी चिंचवड 

खासियत:  बटाटा भजी,गोल कांदा भजी,साबुदाणा वडा,वडापाव 

वेळ: सकाळी ९  ते रात्री १० वाजेपर्यंत.

किंमत: २० रुपये /-

गार्डन वडापाव

हे पुण्यातील असं एकमेव ठिकाण आहे कधीही खाल्ला जाणारा वडापाव हा या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात खाण्यासाठी मिळतो जसं कि मसाला वडापावजम्बो वडापावचीज वडापाव आणि मुंबई क्लासिक वडापाव अशा विविध प्रकारचे स्वादिष्ट आणि ताज्या  वडापावच्या डिशेश या ठिकाणी मिळतात.

ठिकाण : कॅन्टोन्मेंट एरिया , एरंडवणे 

खासियत : कुरकुरीत वडापाव , जम्बो वडापाव ,चीज वडापाव,मसाला वडापाव,मुंबई क्लासिक वडापाव 

वेळ : सकाळी ९ ते रात्री १० पर्यंत

किंमत : १५० रुपये /-   दोन जणांसाठी

रोहित वडेवाले

पुण्यातील असं एकमेव ठिकाण ज्या ठिकाणी वडे पाव , साऊथ इंडियन फूड कॉफी चहा असं सगळं मिळत त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे चाटस इथे हमखास मिळतात…आपल्या महाराष्ट्रातला सर्वोत्तम खाद्यप्रकार म्हणजे पोहे आणि मिसळ या ठिकाणी मिळते…त्याचप्रमाणे उपवासाची साबुदाण्याची खिचडी आणि साबुदाणा वडा याठिकाणी मिळतो.

ठिकाण :  मुंबई बंगलोर हायवे,बाणेर ,संगमवाडी आणि वाकड पिंपरी-चिंचवड.

खासियत : वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ, पेपर डोसासाबुदाणा वडासाबुदाणा खिचडी विथ कोकोनट चटणीब्रेड पॅटिस आणि वडा पाव या खेरीज कॉफीचे अनेक प्रकार

वेळ : सकाळी ७-३० ते रात्री ११ – ०० पर्यंत

किंमत : वडापावची किंमत ३० रुपये /- दोन जणांसाठी.

२. मिसळ

 

खरं सांगायचं झालं तर मिसळ हा लोकप्रिय पदार्थ कोल्हापूर इथून आला आहे….कडधान्याच्या रसदार उसळीत कांदा,शेव,फरसाण,भज्यांचे तुकडे आणि भिजवलेले पोहे घातले आणि त्याला झणझणीत असा मसाला घातला कि चटकदार अशी मिसळ तयार होते. त्यात रसदार लिंबू पिळून घातले तर मिसळ अगदी लाजवाब होते. मिसळीचे असे बरेच प्रकार आपल्याला महाराष्ट्रात पाहायला आणि खायला मिळतात. पुणे जस शिक्षणाचं माहेरघर म्हणून प्रचलित आहे तसंच मिसळीसाठीही प्रसिद्ध आहे.मिसळ हा पदार्थ मध्यान्हाच्या वेळेला खाल्ला जाणारा पदार्थ आहे. 

कोल्हापुरी मिसळीशी तुलना केलीच तर पुणेरी मिसळ हि कोल्हापुरी मिसळीपेक्षा तिखट नसते. मिसळीला पौष्टिक असे एक मूल्य असल्याने मिसळ हा अतिशय असा लोकप्रिय पदार्थ आहे.मिसळीबरोबर मठ्ठा ही आवडीने पिला जातो. पुणे एक असं शहर आहे जिथे वैयक्तिक आवडीनुसार मिसळ तयार करून दिली जाते. अशाच काही मिसळीसाठी प्रसिद्ध असणारी ठिकाणे आपण पाहणार आहोत…

बेडेकर मिसळ
Source : Instagram

बेडेकरांची मिसळ ही गोड,आंबट आणि त्याचप्रमाणे तिखट असणारी मिसळ म्हणून प्रसिद्ध आहे….त्या सर्व मिसळीसाठी लागणार जो मसाला आहे तीच या मिसळीची खासियत आहे….या मिसळीसाठी विशिष्ट प्रकारचा असा फक्त लसणाचा मसाला वापरला जातो. आपण सामान्यपणे मिसळ खाताना पावाचा वापर करतो पण बेडेकर मिसळ ही ब्रेडबरोबर सर्व्ह केली जाते…इतर ब्रेडच्या तुलनेत बेडेकर मिसळीसाठी वापरला जाणारा ब्रेड हा जाड असतो आणि मिसळीच्या रश्यामध्ये बुडवला जरी तरी तो तोंडात घास घालेपर्यंत तुटत नाही आणि विशेष म्हणजे ब्रेड हा उत्तमरीत्या मिसळीचा रस्सा शोषून घेतला जातो. म्हणूनच बेडेकर मिसळ ही पुण्यातली प्रसिद्ध मिसळ समजली जाते.

ठिकाण : नारायण पेठ, लक्ष्मी रोड पुणे

अरिहंत मिसळ

 

अरिहंत मिसळ हि चिंचवड मधील अशी एकमेव मिसळ आहे जी झणझणीत आणि मिसळीवर तरंगलेल्या लाल भडक तऱ्हीसाठी प्रसिद्ध आहे…याठिकाणी सकाळच्या नाश्त्यापासून ते संध्याकाळच्या पाणीपुरीपर्यंत सर्व प्रकार खाण्यासाठी उपलब्ध असतात. त्यातल्या त्यात मिसळ,भेळ आणि भडंग अरिहंत मिसळची खासियत आहे. वेगवेगळे पाणीपुरीचे आणि भेळीचे प्रकार इथे मिळतात…मिसळीसाठी लागणार मसाला म्हणजे राजापुरी हळद,आल्याच्या प्रमाणापेक्षा लसणाचे प्रमाण जास्त,बारीक केलेला कढीपत्ता,तऱ्हीसाठी ब्याडगी मिरची आणि विशीष्ट अशी वापरलं जाणार कडधान्य म्हणजे खास शेलम मटकीचा वापर या मिसळीसाठी केला जातो….

इतर ऋतूंच्या तुलनेत उन्हाळ्यामध्ये या मसाल्यांचे प्रमाण कमी केले जाते. कारण उन्हाळ्यामध्ये मानवी शरीराला उष्णतेची गरज कमी असते त्या तुलनेत हिवाळ्यामध्ये उष्णतेची जास्त प्रमाणात गरज असल्याने एकूण आरोग्याची काळजी ऋतुमानाप्रमाणे अरिहंत मिसळवाले घेतात. मिसळीसाठी लागणार मसाला सांगली,कोल्हापूर आणि केरळ मधून मागवला जातो.

या ठिकाणी मिसळीचे विविध प्रकार खाण्यासाठी उपलब्ध असतात.त्यातल्या त्यात मिसळ सर्विंगची इथली पद्धत म्हणजे अरिहंत मिसळ हि दही,कांदा आणि काकडी बरोबर सर्व्ह केली जाते.

ठिकाण : चिंचवडगाव,चिंचवड पुणे.

खासियत : झणझणीत तर्ही, भेळ आणि भडंग

वेळ : सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत

किंमत : ६० रुपये /-

तिरंगा मिसळ
Source : Instagram

या मिसळीची खासियत म्हणजे मिसळीसाठी लागणारा रस्सा हा खानदेशी,कोकणी आणि कोल्हापुरी मसाला वापरला जातो म्हणून या मिसळीला तिरंगा मिसळ असे म्हणतात.ही मिसळ सर्व्ह करतानाची पद्धतही अप्रतिम अशी आहे…तीन छोट्या पेल्यांमध्ये तिन्ही प्रकारचा रस्सा…म्हणजे खानदेशी,कोकणी आणि कोल्हापुरी रस्सा असा त्यात ऍड केला जातो सोबत पापड, काकडी, दही, कांदा-कोथिंबीर, जिलबी आणि पाव अशा पद्धतीने मिसळ थाळी तयार केली जाते.

ठिकाण : रावेत,पिंपरी-चिंचवड.

खासियत : खानदेशी,कोकणी आणि कोल्हापुरी मसाला

वेळ : सकाळी ८ ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत

किंमत : ५५० रुपये /- दोन जणांसाठी

3. एग भुर्जी आणि बन मस्का

 

एग भुर्जी ही एक भारतीय लोकप्रियता असलेली स्ट्रीट फूड आणि नाश्ता,दुपारसचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाची पाककृती आहे ज्याला अंडा भुर्जी असेही नाव आहे स्क्रॅम्बल्ड अंडी डिश म्हणूनही अंडा भुर्जी ओळखली जाते.अकुरी म्हणून ओळखली जाणारी डिश अगदी याच डिशबरोबर साम्य असलेली अंडा भुर्जी ही आपलं जेवण लाजवाब बनवते.अंडा भुर्जी ही ब्रेड,पाव,चपाती किंवा भाकरीबरोबर सर्व्ह केली जाते. 

सर्वात आधी कच्ची अंडी फोडून ती पिवळ्या बलकासहित फेटली जातात…त्यानंतर तव्यावर तेल टाकून त्यात कांदा,टोमॅटो चांगला परतवला जातो नंतर फेटलेले अंडे,लाल तिखट आणि मीठ असं मिश्रण परतवले जाते  कोथिंबीर सोबत सर्व्ह केलं जात यासोबत पराठा,बन मस्का ही आवडीने खाल्ला जातो. 

गुडलक कॅफे

 

कॅफे गुडलक हे पुण्यातलं अत्यंत लोकप्रिय असलेलं कॅफे आहे…तरुण वर्गाची या कॅफेला विशेष अशी पसंती आहे. १९३५ साली या कॅफेची स्थापना झाली तेव्हापासून ते आजतागायत या कॅफेची लोकप्रियता कमी झालेली नाही.दिवसेंदिवस ती वाढत गेलीय तेही इथल्या काही विशिष्ट चव असलेल्या पदार्थांमुळे जसं की…एग भुर्जी ज्याला आपण अंडा भुर्जी असेही म्हणतो.पुण्यातलं सर्वात जुन्या इराणी ठिकाणांपैकी एक असलेलं कॅफे गुडलक हे एक ठिकाण आहे.त्याचप्रमाणे बन मस्का आणि बन ऑम्लेट साठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.

ठिकाण : वाकड, डेक्कन जिमखाना

खासियत : बन मस्का, एग भुर्जी, ऑम्लेट पाव, पनीर भुर्जी 

वेळ : सकाळी ८ : ०० ते रात्री १० : ३० वाजेपर्यंत

किंमत : बन मस्का ५० रुपये /-  

४. पोहे

पोहे हा पदार्थ धानापासून तयार करतात.पाहुणे आल्यानंतर झटपट तयार करता येण्यासारखा पदार्थ म्हणजे पोहे.पोहे तयार करण्यासाठी साळीचा धान वापरतात.जाड पोहे आणि पातळ पोहे अशा प्रकारे पोह्यांची वर्गवारी करण्यात येते.संपूर्ण भारतात पोहे हा प्रकार नाश्त्यासाठी केला जातो.पोह्यांपासून कांदे पोहे, दडपे पोहे, चिवडा, पोह्यांचे पापड, फोडणीचे पोहे, बटाटा पोहे, दही पोहे असे वेगवेगळे पदार्थ केले जातात.अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले पोहे पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी केव्हाही उपलब्ध असतात.  

सुदामाचे पोहे

पुण्यात या ठिकाणी विविध प्रकारचे पोहे बनवले जातात. मटकी पोहे, कुरकुरे पोहे, दडपे पोहे, कोकणी पोहे, इंदोरी पोहे, तर्ही पोहे असे पोह्यांचे प्रकार आपल्याला पाहायला आणि खायला मिळतात.

ठिकाण : वाकड, कसबा पेठ

खासियत : नऊ प्रकारचे पोहे,चहा आणि कॉफी

वेळ : सकाळी ६ : ०० ते रात्री ८ : ०० वाजेपर्यंत

किंमत : ५० रुपये /-  दोन जणांसाठी

इंदोरी पोहा

हा सपाट तांदळाचा प्रकार असून इंदोर भागात खास करून मिळतो म्हणून त्याला इंदोरी पोहा असे म्हणतात. इंदोरी पोहे म्हणजे फक्त पोहे म्हणजे पोहे बनवत नाही तर जिलबीकचोरी असे पदार्थही विकले जातात. इंदोर पोहा मध्ये मिळणारी जिलबी आणि कचोरी खासकरून पोह्याचीच बनवली जाते हीच या ठिकाणची खासियत आहे . 

ठिकाण : वाकड

खासियत : खास इंदोर भागातला पोहा वापरला जातो, जिलबी आणि कचोरी इथली मुख्य वैशिष्ट्य आहेत

वेळ : सकाळी ७:३० ते रात्री ८:३०

किंमत : २५ रुपये /- 

५. चहा

चहा हे संपूर्ण भारतातील एक अमृत समजलं जाणार पेय आहे. खरं सांगायचं झालं तर ब्रिटिश काळापासून चहा हे पेय भारतात प्रचलित झालंय कारण त्याआधी चहाचा संदर्भ लागण्यासाखे दुवे अजून कुणालाही सापडले नाहीत.डोंगर उतारावर चहाची लागवड केली जाते. ताज्या उकळलेल्या पाण्यात चहाच्या झाडांची कोवळी पाने आणि पानांच्या कळ्या टाकून तयार केलेले पेय कॅमेलिया सायनेन्सिस या नावाने ओळखले जाते.ब्रिटिशांनी १८३६ मध्ये भारतात आणि १८६७ मध्ये श्रीलंकेत चहाची संस्कृती आणली. चहाची चव जशी  भारतभर भारतभर वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला अनुभवायला मिळते त्याचप्रमाणे पुण्यातही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या चवीनमध्ये चहा उपलब्ध आहे.

साईबा अमृततुल्य

साईबा अमृततुल्य यांच्या शाखा पुण्यात भरपूर आहेत.महाराष्ट्र,मुंबई आणि गुजरात आणि अन्य ३०० भागात फ्रेंचायजी पुरवून पुण्यातला अग्रगण्य ब्रँड साईबा अमृततुल्य बनला आहे.आपल्या पारंपारिक चहा मध्ये आढळणाऱ्या सुगंधापेक्षा प्रत्येक चहा मध्ये ताजी पाने वापरणे हा एकमेव अट्टहास साईबा अमृततुल्यने केलेला आहे.यामुळेच साईबा अमृततुल्य ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे.

ठिकाण : हडपसर, सदाशिव पेठ पुणे.                  

खासियत : स्वच्छ आणि टापटीप असलेला स्टाफ,अनोख्या आसामी चहाचा सुगंध.

वेळ : सकाळी ५:०० ते रात्री ११:०० वाजेपर्यंत

किंमत : १० रुपये /-

माउली चहा

‘ अ कप ऑफ टी इज अ कप ऑफ पीस ‘ हे ब्रीदवाक्य माउली चहा वाले खरंखुरं प्रत्येक ग्राहकाला समाधान होईपर्यंत चहा देतात. चहा हे असं पेय आहे जे निवांत आणि शांत बसून पिलं कि आतून समाधान आणि ताजेपणा मिळतो.प्रत्येक घोटात मन तृप्त करणारा चहा म्हणजेच माउली चहा. म्हणूनच इथल्या चहाचा आस्वाद घेण्यासाठी ग्राहकांची तुडुंब गर्दी पाहायला भेटते.

ठिकाण : धनकुडे वस्ती बाणेर पुणे

खासियत : चहा करताना फक्त दुधाचा वापर,चहा वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये मिळतो. अद्रक टी, लेमन टी, ग्रीन टी, इलायची टी, ऑल स्पायसी टी इत्यादी.

वेळ : सकाळी ६:३० ते रात्री ९:३० पर्यंत

किंमत : रुपये १० पासून सुरु

कन्नु कि चाय

हा चहा पुण्यातला प्रसिद्ध चहा म्हणून ओळखला जातो. या चहाचे वैशिष्ट्य म्हणजे काळजीपूर्वक हाताने निवडलेले साहित्य इथे वापरले जाते. कन्नु की चहा मध्ये वापरली जाणारी चहापावडर म्हजेच चहाचे मळे खास उत्कृष्ट पद्धतीने वापरली जाणारी सेंद्रिय खते यावर बहरली जातात KKC मध्ये येणारी सर्व चहाची पाने,चहा,वनस्पतीजन्य पदार्थ यांचा ताजेपणा आणि सुगंध सुनिश्चित करण्यासाठी सर्व आलेल्या सामानाची गुणवत्ता तपासणी केली जाते हे कार्य कन्नु की चाई म्हणजेच KKC मधील मुख्यालयात केली जाते.

ठिकाण : कस्पटे वस्ती वाकड पुणे, BU भंडारी शोरूम बाणेर पुणे

खासियत : नैसर्गिक कच्चा माल,मालाची उत्कृष्ट तपासणी सेवा 

वेळ : सकाळी ७:०० ते ११:०० वाजेपर्यंत

किंमत : १८०/- एक जणासाठी.

६. थालीपीठ

थालीपीठ हा महाराष्ट्रातील एक आवडता आणि लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे.संपूर्ण भारतात हा पदार्थ केला जातो पण थालीपीठ हा खाद्यप्रकार वेगवेगळ्या नावाने प्रचलित आहे. पंजाब मध्ये आपण गेलो तर थालीपिठाला पराठे या नावाने संबोधले जाते.गुजरात मध्ये आपण गेलॊ तर याच खाद्यप्रकाराला ठेपला असे संबोधतात. आपल्या महाराष्ट्रातच थालीपीठ हा पदार्थ वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो….काही भागात धपाटे असं म्हणतात…काही ठिकाणी तिखट भाकरी असंही म्हणतात….सर्व भाज्या एकत्र करून त्यात चवीप्रमाणे तिखट मीठ घालून एक मस्त गव्हाचे पीठ,ज्वारी चे पीठ किंवा तांदळाचे पीठ घालून एक मस्त गोळा तयार करावा आणि तव्यावर तेलाची धार टाकून थापून घ्यावा. ताटात थालीपीठ वाढताना थालीपिठाबरोबर गूळ, लोणच्याचा रस्सा, टोमॅटो सॉस द्यावा.

शबरी थालीपीठ सेन्टर

शबरी थालीपीठ हे एक असे थालीपीठ आहे ज्यामध्ये सगळ्या कडधान्यांची चव आपल्याला अनुभवायला मिळते एक आगळीवेगळी अशी चव या थालीपिठांची आहे ज्यामुळे ग्राहकांची गर्दी इथे पाहायला मिळते. बटर थालीपीठ,पनीर थालीपीठ,चीज थालीपीठ,दही थालीपीठ,बटर चीज थालीपीठ,पनीर बटर चीज थालीपीठ अशा विविध प्रकारच्या थालीपिठांची चव आपल्याला इथे अजमावायला मिळते.

ठिकाण : निसर्ग प्लाझा, हिंजवडी रोड, वाकड पुणे

खासियत : वेगवेगळ्या कडधान्यांची चव या थालीपिठामध्ये असते

वेळ : सकाळी ७:३० ते रात्री  १०:३०

किंमत : ६० रुपये /- पासून पुढे

दुर्वांकुर

या ठिकाणी थालीपिठाबरोबरच महाराष्ट्रीयन थाळी प्रसिद्ध आहे आमरस, श्रीखंड, मसालेदार ताक, दही वडा, तांदळाचे फ्रिटर, तळलेला कोबी, कोशिंबीर आणि अर्थातच थालीपीठ हे पदार्थ ग्राहकांना परवडेल अशा किमतीत उपलब्ध असतात साध्या पण रुचकर थालीपिठासाठी दुर्वांकूरच नाव आवर्जून घेतलं जात.

ठिकाण : हत्ती गणपती चौक, साहित्य परिषदेजवळ सदाशिव पेठ पुणे

खासियत : साधं पण रुचकर थालीपीठ आणि महाराष्ट्रीयन थाळी.

वेळ : दुपारी १२ :०० ते ३:०० पर्यंत त्यानंतर संध्याकाळी ७:०० ते ११:०० वाजेपर्यंत

किंमत : २८० रुपये  /- एक थाळी

मथुरा प्युअर व्हेज

स्वादिष्ट चव,आपली पारंपरिक चव जशीच्या तशी ठेवणारं आणखी एक नाव म्हणजे मथुरा प्युअर व्हेज इथल्या थालिपीठांमधलं वैशीष्ट्य म्हणजे थालीपीठ हे मटकी बरोबर सर्व्ह केलं जात. भाजणी थालीपीठसाबुदाणा थालीपीठ आणि बेसन थालीपीठ असे प्रकार खवय्यांना चाखायला भेटतात. त्याचप्रमाणे कोथिंबीर वडीकुरडईपापड असे पदार्थही वेगवेगळ्या स्वादात मिळतात. कधी पुणे फिरणं झालंच तर खवय्ये आवर्जून मथुरा प्युअर व्हेज याठिकाणी भेट देतात.

ठिकाण : प्रेस्टिज चेंबर जंगली महाराज रोड, साई सर्व्हिस पेट्रोल पंप पुणे .

खासियत : भाजणीचे थालीपीठ, साबुदाणा थालीपीठ आणि काथिंबीर वडी

वेळ : सकाळी ११:३० ते रात्री ११:३० पर्यंत

किंमत : ६०० रुपये /- दोन जणांसाठी