Ritbhatmarathi

Search
Close this search box.

माणूस सवयीचा गूलाम असतो.काही दिवसांपासून प्रसाद शी बोलण्याची एक सवयच लागली होती.
काहीही छोट्या छोट्या गोष्टीउदा: मुलांचे मार्क्स चांगले येणे,त्याच्या घरी काही विशेष घडले,बायकोशी वाद,ई.काहीही घडले तरी लगेच एकमेकांना शेअर करण्याची जणू सवयच लागून गेलेली.
पण गेल्या आठवड्या पासुन ते सर्व अचानकपणे थांबले होते.
मला सुरवातीला खूप जड गेले पण मग मी ठरवले आपल्या अस्तित्वाचा कुणाला त्रास व्हावा इतकेही स्वस्त होवु नये आपले असणे.
कोणी आपल्याला उगीचच कारणा शिवाय दुर्लक्षीत करावे ह्याहून अपमानास्पद गोष्ट काय असू शकते?
म्हणूनच ह्यापूढे स्वत:कडून सर्व संपर्क बंद केले होते मी.


आपल्या रोजच्या रूटिनमधे व्यस्त मी परिक्षा सुरू झाल्याने आता क्लासेस फक्त माझ्या विषयाच्या आदल्या दिवशीच होते.मुलांच्या अभ्यासावर च लक्ष केंद्रीत केले होते.
एकदम अचानक फोनची रिंग वाजली.मी फोन पर्यंत पोहोचेस्तोवर बंद झाला.
तसेही आता दूपारच्या वेळी फारसे कोणी फोन बीन करत नाहीत.अर्ध्या अधिक वेळा तर कंपनी कॉल्सच बेजार करत असतात.असला वैताग येतो माहितीय.
म्हणून मी पून्हा मागे फिरले.
मुलांचा पेपर सेट करत आता थोडे पडावे असा विचार करत होते.
पेपर्स बाजूला सारून तिकडेच जराशी लवंडले.
किती वेळ झाला माहित नाही पण पून्हा फोनच्याच घंटीने झोपमोड झाली.
कोण अाहे आता नेमक्या वेळी असा काहीसा चिडचीड्या सुरातच फोन घेतला.
मला विश्वास बसत नव्हता.मी पून्हा पून्हा बघितले.हो.,कारण फोन प्रसादचे नाव दाखवत होता.
दोन्ही ही वेळी त्याचेच कॉल होते.
पण मग बंद का झाला मी उचले पर्यंत?
मी परतून फोन करावा असे काही सुचवायचेय का त्याला?
पण त्यात सुचवाय सारखे काय अाहे? सरळ सरळ बोलावे ना काय असेल ते? हा कसला बालिश खेळ?
का माझी परिक्षा घेणे चाललेय?
मला तर आता राग यायला लागला होता सगळ्या वागण्याचा.
माणसे इतकी आत्मकेंद्री कशी असू शकतात.?
म्हणजे जेव्हा माझा पहिला संवाद प्रसादशी झाला तो दिवस मला आजही आठवतोय.
पहिल्या गेट टुगेदर मधे जेव्हा आमची सगळी बॅच भेटलो तेव्हा इतके नंबर्स एक्सचेंज झाले होते की घाईघाईत म्हणा किंवा माझे फोन सेटिंग आणि ऑपरेटींग चे तोकडे ज्ञान म्हणा मला ते नंबर्स नावा सहीत फिड करणे जमलेच नव्हते.
घरी आल्यावर तो विषय मी विसरून गेले.

त्या नंतर काही दिवसांनी माझ्या मैत्रिणीच्या नविन घराची वास्तुशांत आणि त्यांच्या लग्नाचा 10 वाढदिवस ह्या दोन कारणांसाठी तिचे आग्रहाचे निमंत्रण आले.
“आशू ,तू यायलाच हवे बघ.आता इतक्या वर्षांनी योगाने भेटलोय तर तू यायलाच पाहिजे.कुठलीही कारणे नकोएत हं मला.”
जराशी फुरगटूनच बोलत होती आसावरी.
कारण मी प्रयत्न करते असे म्हणले होते ना..
पण शेवटी गेले. घर तर छानच होते. पण फारसे कोणी ओळखीचे नव्हते म्हणून एका कोपऱ्याची खुर्ची पकडून दुरूनच सगळे विधी पहात होते.
सहज नजर फिरवली तर एक व्यक्ती सतत माझ्याकडे बघतीय असा भास झाला.थोडी धास्तावलेही.पण मग पाणी घ्यायचे निमित्त करून तिथून सटकले आणि पूजेच्या ठिकाणी जवळ च बसले.काही वाटले तर आसावरी तिथेच होती एवढेच समाधान.
लक्षात आले की फोन वाजतोय.
श्रीचाच असणार पण अननोन नंबर होता.
मी उचललाच नाही.दोन तिनदा येतोय म्हणल्यावर उचलला.
“हॅलो?? हू इज धिस?”

मी प्रश्न केला.
“तू आशूच ना?”
“हो बोलतीय.आपण कोण?”
ओळखले नाहीस का?
आता जाम सटकली माझी.
“अहो ,फोन मधे अजून तरी चेहरा दिसत नाही,तूम्ही कोण आहात, मला कसे ओळखता, हे बोललात तर बरे होइल..
त्यावर मगाशी दूरून एकटक मला बघणारी व्यक्ती फोनवर बोलता बोलता माझ्या दिशेने येताना मी बघितले.
मला तर इकडे आड अन् तिकडे विहीर अशी अवस्था झालेली.
तो फोन वरचाही माणूस नाव सांगत नव्हता आणि हा अगंतूक माझ्या अगदी जवळ येवून पोहोचला होता एव्हाना.
मग तो जवळ येवून बोलला.
“ओळखलेस का?”
मी अजुनही ओळखले नव्हते.

“कोण आपण?”
“अग् नॅशनल स्कूल 89 बॅच ना?”
हो.!!!
“मग मी पण त्याच वर्गात होतो. आता तरी ओळख?”
“नाही आठवत.”
“आपण गेट टुगेदर मधे होतात का?” इति मी.
“नाही मी नव्हतो आलो पण आपला क्लासमेट मनिष ने फोटो दाखवले.”
“आत्ता सहज तूला इकडे बघुन अंदाज केला की तूच असशील.”
“पण तू तर घाबरून पळूनच गेलीस.म्हणून फोन केला.”
“नाव काय !!!? आणि हा नंबर तूला.!!!??

मी किती मूर्खपणाचे भाबडे प्रश्न विचारत होते हे नंतर समजले.
माझा घाबरलेला चेहरा बघून त्याने जास्त न ताणता स्वत:ची ओळख करून दिली.
“अग् मी प्रसाद.
प्रसाद देशपांडे.”
“ओह्! तो तू आहेस होय.”
अरे नावे लक्षात फक्त.
पण आता चेहरे आणि सगळेच बदललेय की…
मी सफाई द्यायचा प्रयत्न करत होते.
आणि तो खळखळून हासत होता.
“अरे पण तू कसा इकडे?”
“आसावरीचा दिर अन् मी एकाच फर्म मधे जॉब करायचो पूर्वी.ती ओळख होती.नंतर परवा परवा आसावरी कडून कळले म्हणुन मग ह्या निमित्ताने दोघांचीही भेट होइल म्हणून आलो.मी ही इकडेच असतो ना पुण्यात.”
मग हळूच म्हणतो ,”पण तू
घाबरली होतीस ना मगाशी?”
“म्हणजे काय?” मी दुजोरा दिला.
त्यानंतर खूपवेळ आम्ही हसत होतो.
मग बऱ्याचवेळ गप्पा झाल्या.मला नंबर कसा सेव्ह करायचा हे पण येत नव्हते. त्याने लगेच ते ज्ञानही देवुन टाकले.
मग काय सगळे मित्र/मैत्रीणींचे नंबर्स व्यवस्थित त्याच्याकडून कनफर्म करून त्या त्या नावाने फिड केले.

त्या नंतर रोजच तो जेव्हा वेळ असेल तेव्हा बोलायचा.
मलाही त्याच्याशी बोलण्याने बरे वाटायचे.

मी पहिल्या पासुनच बुजरी स्वभावाने आणि घरातले बाऴबोध वळण ह्याचाच परिणाम म्हणून मला शाळा/ कॉलेजात फारसे मित्र कोणीच नव्हते.
कॉलेजचे गॅदरिंग, सी.आर. साठी इलेक्शन्स ,सायन्स एक्झिबीशन किंवा मग नोट्स हव्या म्हणून जर कोणी मुले बोललीे तर तेवढाच संबंध यायचा मुलांशी.
मी जरा मुलांपासून दूरच असायचे.
पण आता अचानक इतक्या विचित्र पद्धतीने आमची झालेली ओळख छान मैत्रीत कधी रूपांतरीत झाली कळलेच नाही.
किमान15 मिनीट तरी रोज बोलणे व्हायचेच आणि मी ही अगदी शाेडष वर्षीय मुलीला लाजवेल अशा उत्साहात सगळी कामे बाजूला सारून बोलत बसायचे.
खूप महत्त्वाचे नाही पण गप्पात वेळ कसा जायचा कळायचेच नाही.

फेसबूक वर तर फक्त श्रीने मला अकाऊंट उघडून दिले होते पण त्याला कसे वापरायचे ह्याची मला गंध कल्पना नव्हती.पोस्टवर कमेंट कशी करायची,आवडत्या पोस्टला कसे शेअर करायचे अशा किती तरी गोष्टी मला प्रसादनेच शिकवल्या होत्या.

कधी कधी स्वत:चे फॅमिली मॅटर्स पण तो माझ्याशी अगदी सहजपणे शेअर करायचा.
पुरूषांना जनरली असे बोलणे फारसे आवडत नसते.पण एक दिवस तो खूप छान बोलला,”आपले विषय कुठेही दूसरीकडे बोलले जाणार नाही अशी खात्री वाटत नाही म्हणून मी कधीच माझ्या गोष्टी कुणाला सांगणे पसंत करत नाही पण का कुणास ठाऊक तुझ्याशी मात्र बोलावेसे वाटते.”

त्याच्या त्या विश्वासानेच आमची मैत्री काही दिवसातच खूप घनिष्ट झाली होती.
पण आताचे त्याचे वागणे आणि आज पून्हा मिस्डकॉल देउन फोन बंद करणे ही कृती माझ्या समजण्या पलिकडची होती.
मी परतून फोन नाही करायचा असे ठरवून पून्हा पेपर्स सेटींग मध्ये स्वत:ला गुंतवून घेतले.
कारण आता त्याची वेळ होती.तो मीगील काही दिवसापासून जे काही वागलाय त्याची सफाई देण्याची त्याची टर्न होती आता.जर त्याला मी, माझी मैत्री, ह्या नात्याची कदर असेल तर ..
पून्हा तो फोन करेल की नाही हे मला माहित नव्हते.
पण एक मात्र होते मी ज्या लोकांना माझ्या आयुष्यात स्थान देते तेव्हा त्याला पूर्ण न्याय देते.म्हणून सहसा लोक इतक्या सहजासहजी मला विसरत नाहीत.आणि अशी तकलादू नाती मी जोडतच नाही कूणाशी.त्यातूनच असा एखाददूसरा अनुभव आलाच तर त्याला अक्कलखाती जमा करून त्यातुन शिकवण घेवून पून्हा तीच चूक करायची नाही असे ठरवून पूढे जाते.म्हणून मी शांत होते


प्रसादची मैत्री नात्यांची नवी परिभाषा शिकवते की जीवनात आणखी एक धडा देवुन जाते हेच बघणे बाकी होते.
वाट तर पहावीच लागणार होती..

(क्रमश:8)
®️©️राधिका कुलकर्णी.