Ritbhatmarathi

Search
Close this search box.

“आई ,मी अर्जुनच !”

©️®️पुष्पज्योती

“आई, मी अर्जुनच ! “कोणाचा बरं आहे हे वाक्य ? महाभारतातील अर्जुन तर नाही म्हटला असं कुंतीला…मग कोणी बर म्हटलं हे वाक्य ?

“आई, मी अर्जुनच !” हे वाक्य आहे माझा पुत्र अर्जुन याचं आणि ते त्याने म्हटलं वयाच्या चौथ्या वर्षी …?खरंच बाळाचं नाव नेहमी आईवडीलच ठेवतात किंवा मग कधी तो मान आत्यांना सुद्धा मिळतो आणि बाळ मग त्याच नावाने जनमानसात ओळखला जातो. तसं पाहिलं तर माझ्या या लहान पुत्राचे नाव त्याच्या जन्मानंतर आम्ही ठेवलं होतं’ अनुज’आणि सर्वजण त्याला प्रेमाने अनु म्हणायचे …आणि अनु नाव त्याला फार आवडायला पण लागलं होतं….

पण का कुणास ठाऊक? एके दिवशी मी श्रीमद्भगवद्गीता वाचून झाल्यावर गीतेला नमस्कार करून ती व्यवस्थित पाटावर ठेवायला लागले आणि खेळता खेळता अनुज माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला लागला,” आई ,तु हे रोज रोज काय वाचते ग?

मी म्हटलं,” बेटा ,ही श्रीमद्भगवद्गीता आहे “

अनुज म्हटला,” ही गीता मग श्रीकृष्णाची आहे का?”

मी म्हटलं,” हो बेटा, गीता श्रीकृष्ण प्रभूंचीचीच आहे “

अनुज म्हटला,” का ग आई, गीतेवर हे जे चित्र आहे ज्यात आशीर्वाद देत आहेत ते श्रीकृष्ण प्रभु आहेत आणि मग श्रीकृष्ण प्रभूंना नमस्कार करून आशीर्वाद मागत आहे तो बर कोण आहे ?”

मी म्हटलं ,”बेटा, जे आशीर्वाद देत आहेत ते श्रीकृष्ण प्रभु आणि आशीर्वाद मगतोय तो आहे अर्जुन!”

” अर्जुन, का बर आशीर्वाद मागतोय ?

मी म्हटलं, “बेटा ,अर्जुन श्रीकृष्ण प्रभूंचा परमभक्त होता .तो श्रीकृष्ण प्रभूंचा सखा होता .म्हणून ते दोघे नेहमी सोबत रहायचे आणि जेव्हा अर्जुनाला काही संकट यायचं तेव्हा श्रीकृष्ण प्रभू त्याची मदत करायचे… दोघेही छान प्रेमाने आनंदात सख्यांसारखे राहायचे .”

अनुज म्हटला,” काय ग आई ,ते दोघं सोबत करायचे का?”

मी म्हटलं,” तसं तर त्यांची नगरे वेगवेगळी होती रे बेटा… पण दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होतं.. ते दोघं एकमेकांचे चांगले सखे होते…!”

“हो का ?” अनुज म्हटला

” का ग आई, आपला दादा जर कृष्णा आहे.. तर मग मी पण अर्जुनच होतो ना ग आई ,….मग आम्ही दोघं पण एकमेकांचे सखे होऊ… “

“आम्ही पण दोघेही कृष्णा आणि अर्जुन प्रमाणे प्रेमाने सोबतच राहू ….आई, कृष्णा अर्जुन दोघेही सोबत प्रेमाने राहायचे… तर मग तुम्ही माझं नाव ‘अर्जुन’ का नाही ठेवलं ‘अनुज’ बरं ठेवलं? अर्जुनच नाव किती छान आहे ना! मी अर्जुनच ना ग आई! मला अनुज नाही व्हायचंय .. मला अर्जुनच व्हायचंय…!”

खरंच माझा अनुज इतक्या बालपणी नक्की काय बोलला? कसं बोलला? आमच्या दोघांमध्ये काय संभाषण झालं? तो प्रत्यक्ष हे असंच बोलला की नाही बोलला ते नाही आठवत मला …..पण त्याचे फक्त आई मी अर्जुनच…. होतो ना….. मला दादा सोबतच राहायचंय. मला अर्जुनच व्हायचंय !”

हे वाक्य माझ्या मनाला इतकं भावलं की मी त्याच्याकडे एकटक बघतच राहिले… इतक्या लहानपणी त्याच्या विचारातील प्रगल्भता ऐकून तर मी थक्कच झाले आणि माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले मी पटकन त्याला प्रेमाने जवळ घेतलं आणि श्रीकृष्ण प्रभूंना प्रार्थना केली,” हे प्रभू, इतक्या बालपणात माझ्या अनुजचे कृष्णा दादा वर इतक प्रेम आहे.. हे बघून माझा जन्म पावन झाला …अस हे बंधू प्रेम असेच कायम ,सदैव ,अखंड अबाधित राहू दे.. किंबहुना ते दिवसागणिक अधिकच वृद्धिंगत होऊ दे आणि माझ्या डोळ्यात आनंदाश्रू तराळले.. .

ज्या बालकाचा जन्मच नऊ नोव्हेंबर दोन हजार नऊ अशा नावीन्यपूर्ण तारखेला झाला …तो असा नाविन्यपूर्ण विचार नाही करणार तर कसा करणार ?

आज माझ्या अर्जुनाचा अकरावा वाढदिवस !!! त्यानिमित्ताने हा लेख मला त्याला भेट द्यायचा आहे.. म्हणूनच मी हा लेख लिहायला घेतला आहे..

“हे प्रभू, नुसता जन्म नाविन्यपूर्ण तारखेला होऊन काही होत नाही… तर नाविन्यपूर्ण जीवन जगण्याची शक्ती ,बुद्धी चांगले आरोग्य, तूच माझ्या दोघ पुत्रांना दे !…तुझ्या आशीर्वादाने सर्व काही नाविन्यपूर्ण, नवीन, नूतन, आनंदमय,आधुनिक ,समृद्ध,संपन्नज्ञानमय,भक्तिमय घडू दे .हीच तुला अर्जुनाच्या वाढदिवसाला प्रार्थना! “

“कृष्णा आणि अर्जुनाला महान भारत घडविण्यासाठी शक्ती दे , बुद्धी दे!”

आणि मग “आई, मी अर्जुनच ! ” या वाक्याने आम्हा दोघांना विचार करायला भाग पाडले आणि मग जर आपला पुत्र म्हणतोय की मला अर्जुनच व्हायचंय !तर मग आपण त्याचं नाव अर्जुनच ठेवूया अस आम्ही ठरवलं.

तसं बघायला गेलं तर वयाच्या चौथ्या वर्षी तो शाळेत नर्सरीत जायला पण लागला होता आणि मग त्याचं नाव शाळेत अनुजच टाकलं होतं. परंतु केवळ अनुजच्या इच्छेसाठीच आम्ही खरंच विचारपूर्वक निर्णय घेतला की जर त्याला स्वतः लाअर्जुनच व्हायचंय… मग त्याचे नाव अनुज का ठेवायचे ? मग आम्ही त्याचे नाव अर्जुन बदलून घेतलं आणि सर्वजण त्याला अर्जुन नावाने पुकारायला लागले आणि आज तो ‘अर्जुन’नावाने सर्वांमध्ये प्रचलित आहे..……………………. खरच कोणाचाही विश्वास न बसावा असाच हा प्रसंग आहे…पण इतक्या बालपणी जर आमचा पुत्र स्वतः आम्हाला म्हटला की…………..खरच या मागे श्रीकृष्ण प्रभूंचाच काहीतरी संकेत असेल म्हणूनच माझ्या अनुजला अस स्वतः नाव बदलण्याची बुद्धी पंचकृष्ण प्रभूंनी दिली…महाभारतात श्रीकृष्ण प्रभू आणि अर्जुन दोघांनी दृष्टांचा संहार केला आणि आणि महाभारत घडवले ..…………………………………..आजच्या या आधुनिक काळात माझ्या कृष्णा आणि अर्जुन ला महाभारत नाही तर महान भारत घडवायचा आहे ……… भारत भूमीच्या समृद्धतेत ……. भारत भूमीच्या महानतेत त्यांनी खारीचा वाटा जरी उचलला तरी आम्हाला त्याचे माता आणि पिता होण्याचा खचितच अभिमान वाटेल …..

मी तर एक माता म्हणून हेच म्हणेन, “श्रीकृष्ण आणि अर्जुन ने घडवले महाभारत ….

बेटा तुम्ही आहात आधुनिक श्रीकृष्ण आणि अर्जुन ..

तुम्ही घडवायचा आहे महान भारत………

तुम्ही घडवायचाय महान भारत……..

हे प्रभू, तुझ्या कृपेने झाली मला पुत्रप्राप्ती..

तुझ्या कृपेने झाले त्यांचे नामकरण कृष्णा आणि अर्जुन …

व्हावे आमचे पुत्र आधुनिक कृष्ण आणि अर्जुन ..

यावा त्यांच्या अंगी प्रत्येक सद्गुण……..

व्हावे तुझ्या कृपेने ते प्रत्येक कार्यात निपुण……..

जगावे ते प्रथम स्वतःच्या उद्धारासाठी…

जगावे ते दोघेही एकमेकांसाठी…….

जगावे ते कुटुंबाच्या एकात्मतेसाठी..

न जगावे ते फक्त स्वतःसाठी…

जगावे ते सर्व समाजासाठी..

जगावे ते आपल्या भारत भूमीसाठी …

जगावे ते हिंदुत्वासाठी…

जगावे ते मानव जातीच्या कल्याणासाठी…

जगावे ते आत्मोद्धारासाठी…

जगावे ते अध्यात्मासाठी…

जगावे ते भक्तीसाठी …

जगावे ते परमेश्वर भक्तांसाठी…

जगावे माझे पुत्र भूमातेच्या कल्याणासाठी..

मागते प्रभू हे वरदान तुला सर्वांसाठी…

प्रभू, तुम्ही फक्त म्हणावे ,”तथास्तु ! तथास्तु!”

व्हावे आमचे पुत्र आदर्श भारत भूमिपुत्र..

व्हावे आमचे पुत्र आदर्श पृथ्वीमाता पुत्र!!!

©️®️पुष्पज्योती