Ritbhatmarathi

Search
Close this search box.

रितू आणि आनंद दोघेही बालपणापासून एकमेकांना ओळखत. कारण दोघांचेही वडील चांगले मित्र होते आणि त्यामुळे दोन्ही परिवारांचे एकमेकांसोबत घनिष्ठ नाते होते. दोन्ही परिवाराचं काही कारणानिमित्त एकमेकांकडे येणजाणं होतं असे. रितू आणि आनंद लहान होते तेव्हा त्यांना काही कळत नसे. नको त्या कारणावरून भांडायचे आणि लगेच मग दोघात रुसवा फुगवा होयचा. पण त्यांचे ते रुसणे फार काही काळ टिकायचे नाही आणि सगळं विसरून एकमेकांसोबत खेळायला लागायचे. लहानपणीचा त्यांचा आवडीचा खेळ म्हणजे बाहुला बाहुलीचं लग्न!!!!

आणि काय कुणास ठाऊक…. पण रितू आपली बाहुली आणि आनंद आपला बाहुला कधीच कुणाला देत नसत आणि कुणासोबत खेळतही नसत. ते फक्त एकमेकांसोबतच खेळत. बाहुला बाहुलीच्या खेळामध्ये एवढे रमून जात त्यांना कशाचाच भान नाही राहायचं. त्यांची हि एकमेकांसोबतची बॉण्डिंग बघून त्यांचे आई बाबा हि त्यांना चिडवायचे कि बाहुला बाहुलीच्या लग्नामध्ये आमची चिमुकलेही एकमेकांसोबत लग्न करतील कि काय!!!! 
लहानपणी तर रितू आनंदला ह्या गोष्टी काही कळायच्याही नाही आणि त्यांना काही घेणंदेणंही नसायचं. ते दोघे बस्स आपल्या खेळामध्ये मस्त रमून जात.

पण रितू आणि आनंद जसजशी मोठी होयला लागली.. तसतशी त्यांच्यात दुरावा यायला लागला होता.. कारणच तसं होतं. बारावी नंतर रितू आणि आनंद दोघांचाही मार्ग वेगळा झाला. रितूने बायोटेकला ऍडमिशन घेतली होती आणि आनंद इंजिनीरिंग करायला मुंबईला गेला.. साधारण २००४ चा काळ…. जेव्हा आपल्या भारतात स्मार्टफोन नावाचा प्रकार फारच कमी होता आणि तोही श्रीमंत लोकांकडेच असायचा. 
मला आठवतंय १५ वर्षांपूर्वी कुणालाही कॉन्टॅक्ट करायचा तर १ रुपयाचा कॉइन झिंदाबाद !! १ रुपया मध्ये ६० सेकंड्स मिळायचे आणि २-३ सेकंड्स शिल्लक असताना बोलण्याचा स्पीड वाढवून समोरच्याला बरोबर समजावून सांगायचं… ह्यात पण टॅलेंटच असायचं.. समोरच्याला समजलं तर ठीक.. नाही तर दुसरा कॉइन तयारच असायचा आणि हो मोबाईलही साधेच असायचे…. ज्यात फक्त कॉलिंग , टेक्स्ट मेसेज आणि हो तो साप वाला गेम एवढंच असायचं आणि आजकाल घराघरात सहजच ३-४ मोबाईल बघायला मिळतात.. पण त्याकाळी कॉलेजला जाणाऱ्या मुलांना देखील मोबाईल पाहायला मिळत नसे..

बरं!! असू दे!! खूप झालं १५ वर्षांपूर्वीच पुराण…. आपल्या मेन मुद्द्यावर येऊ या. हो तर रितू आणि आनंदकडेही मोबाईल नव्हताच. त्यामुळे दोघेही एकमेकांपासून दुरावली होती आणि जसजसे मोठे झाले तसे त्यांची ती घनिष्ठ मैत्री गायबच झाली होती. दोघेही आपल्या अभ्यासात व्यस्त झाली होती आणि तसेही दोघांत काही नव्हतंच. त्यामुळे कुणी कुणाला फोनही नाही करायचं. दोघांनाही आपले नवीन फ्रेंड्स मिळाले होते आणि दोघेही त्यामध्ये व्यस्त झाले होते.

आनंद सुट्टीमध्ये घरी यायचा पण रितू कडे कधीच फिरकला नव्हता आणि रितूलाही त्याचं काही घेणंदेणं नव्हतं. ती आपल्या कॉलेज मध्ये मस्त रमली होती.. रितू आनंदच काय….. तर त्यांचे आई बाबा देखील मुलं मोठी झाली… जबाबदाऱ्या वाढल्या होत्या…. त्यामुळे त्यांचंही येणंजाणं कमीच झालं होतं.

एकदा आनंद हिवाळी सुट्टीमध्ये घरी आला. ह्या सुट्टीमध्ये त्याच्या सगळ्या मित्रांचे प्लॅन्स ठरलेले होते. त्यामुळे आनंदनेही पूर्ण सुट्टी आई वडिलांसोबत घालवायची ठरवलं होतं. आनंदच्या आणि रितूच्या आई वडिलांचा आठवडाभराचा कोकणचा प्लॅन आधीच ठरलेला होता. त्यात आनंद आणि रितूला गृहीत धरलेलं नव्हतंच. कारण पोरं आता मोठी झाली असल्याकारणाने त्यांचा मित्र मैत्रिणींचा मिळून वेगळाच ग्रुप…आणि त्यात त्यांचे प्लॅन्सही आधीच ठरलेले असायचे. पण ह्या वेळी आनंदनेही हट्ट धरला होता कि तोही येणार आणि गाडी तो स्वतःच चालवणार. आनंद येणार म्हटल्यावर रितूच्याही आई वडिलांनी तिलाही सोबत येण्याचा आग्रह धरला. रितू पहिल्यांदा तयार नव्हती पण नंतर मग कशी बशी तयार झाली.

चला तर मग सगळ्यांची कोकणात जायची तयारी सुरु झाली. २ दिवसांनी सगळेजण निघणार होते.

पुढे काय होतं ? रितू आणि आनंद ची मनं जुळतात का ? त्यांना लहानपणासारखीच एकमेकांची कंपनी आवडते का ? आणि हो खरंच दोघांचं लग्न होईल का ? असे खूप सारे प्रश्न पडले असतील तुम्हाला

तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हला पार्ट २ मध्ये मिळतील. त्यासाठी थोडासा धीर धरा आणि प्रतीक्षा करा.

© RitBhatमराठी

==================

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories