Ritbhatmarathi

Search
Close this search box.

“लवकर दे गं चहा, काय करतेस तू?” नयनचा  काळाढिम्म नवरा सकाळी सकाळी आवाज चढवून बोलतो. तो एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये सेक्युरिटी गार्ड होता. रोज रात्री दारू ढोसून घरी यायचा.

“हो आले….आले” नयन लगबगीने चहा घेऊन जातच असते तेवढ्यात खाली खेळत असलेल्या २ वर्षांच्या वेदाला पाय लागून नयनचा तोल जातो आणि चहा खाली पडतो.

“वेदा!!!!!!” नयन लगबगीने वेदाला कडेवर उचलते.

“बघू बाळा कुठे चहा तर नाही ना सांडला” असे म्हणून नयन वेदांचं शरीर चाचपत असते.

तेवढ्यात नयनच्या गालावर जोरात चपराक बसते.

नयनचा नवरा, “आधीच उशीर झाला होता मला आणि त्यात चहा सांडून ठेवला….नशिबच फुटकं होतं माझं कि तू माझ्या पदरात पडली आणि पुढे जाऊन हि अवगसा तुझी लेक”

सकाळी सकाळी ताणताण करून ड्युटी वर निघून गेला नयनचा नवरा. नयन मात्र वेदाला घट्ट मिठी मारून ओक्शाबोक्शी रडू लागली आणि फ्लॅशबॅक मध्ये गेली.

नयन नावाप्रमाणेच मोठे पाणीदार डोळे, रंगाने उजळ, सतेज बांधा म्हणजे तिच्याकडे बघून असं वाटायचं कि देवाने फावल्या वेळात निवांतपणे तिला कोरलं असेल. नयन , तिचा लहान भाऊ आणि आई वडील असं छोटं कुटुंब होतं तिचं. खाऊन पिऊन सुखी होते. पण एक दिवस लहान असताना म्हणजे नयन साधारण ४ वर्षांची असेन ती किचन मध्ये आईशेजारी खेळत होती. आईने अंघोळीसाठी गॅसवर पाणी ठेवलं होतं. आईच्या हातून चुकून पाण्याचं पातेलं निसटलं आणि खळखळत्या पाण्याचे शिंतोडे नयनच्या अंगावर पडले. नयन एका बाजूने गालापासून छातीपर्यंत भाजली होती. तेव्हापासून तिच्या उजळत्या रंगावर भाजण्याचे डाग राहिले ते राहिलेच. जस जशी मोठी झाली तसे डागही फिके पडले परंतु लोकांनी लावलेले डाग काही जाईनात. कुणीही आलं गेलं कि आई वडिलांना खोदून खोदून विचारायचे कि “हिचे डाग नाही का गेले….लग्नाचं काय….साधारण मुलगा मिळणं मुश्किल आहे….दुसोटी वर बघावं लागेल”

आणि खरंच असंच होयचं. नयनला आत्तापर्यंत २५-३० स्थळं येऊन गेली पण सगळ्यांनी नकारच दिला होता. नयनची आई रोज रडायची कारण नयनचा चेहरा पण तिच्याकडूनच खराब झाला होता. पण नयन आईला समजून सांगायची कि, “आई लग्नात काय ठेवलाय तुही लग्न केलंस पण बाबा किती कडक आहेत माहित आहे तुला….शुल्लक कारणावरून तुला घालून पडून बोलत असतात आणि कधी कधी तर हात पण  उगारतात….काय फायदा गं लग्न करून जर असेच दिवस काढायचे असतील तर….”

आई – “बाळा मी शिकलेली नाही आणि तुझ्यासारखी सुंदर आणि स्वतःच्या पायावरही उभी नाही….मला ते लग्नानंतर अनुभवता नाही आलं म्हटलं कि ते तुझ्या लग्नानंतर तुझ्यामार्फत अनुभवावं ”   

नयनची आई नयनला जवळ घेऊन रडायला लागली.

नयन तशी उच्चशिक्षित होती. ती पुण्यात येरवड्याला एका बँकेत कॅशियर म्हणून नोकरीला होती.

रोज निगडी ते येरवडा असा तिचा बसचा प्रवास ठरलेला असायचा. नयन सकाळी ८ वाजताची बस पकडायची. त्यामुळे निगडी ते चिंचवड बस शक्यतो खालीच असायची. चिंचवड स्टेशनला मग बस बऱ्यापैकी फुल्ल व्हायची. पुण्यातल्या पोरींना एक सवय असते ….उन्हाळा असो कि पावसाळा तोंडाला पूर्ण स्कार्फ /स्टोल गुंडाळायचं….त्यात जर पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करताना स्टोल म्हणजे एक रक्षा कवचंच वाटायचं….नयन देखील रोज प्रवास करताना स्वतःला स्टोल मध्ये गुंडाळायची त्यात मग तिचे फक्त सुंदर मोठे पाणीदार डोळेच दिसायचे.

एक दिवस नयन रोजच्या नियमाने निगडीतून येरवड्याच्या बस मध्ये चढली. पहिलाच स्टॉप असल्याने नयनची बस मधली रोजची जागा ठरलेली असायची. त्या दिवशी चिंचवड स्टेशन ला एक धिप्पाड, गोरा आणि उंच पुरा तरुण बसमध्ये चढला आणि नयनच्या शेजारी येऊन बसला. बसमध्ये तशीही सीट छोटं असल्याने २ माणसं एका सीटवर चिटकूनच बसतात. त्यामुळे तो तरुणही नयनला चिटकून बसला आणि त्या दोघांचे खांदे एकमेकांना चिकटले. त्या तरुणाने मारलेल्या पर्फुमचा सुगंध अख्या बस मध्ये दरवळत होता.

नयनला माहित नव्हतं कि तो तरुण काय करतो?….त्याचं लग्न झालंय का?….तो स्वभावाने कसा आहे ? असे असंख्य प्रश्न तिच्या मनात भटकंती करत होते पण त्याच्या खांद्याला तिचा खांदा टच होताच तिच्या अंगात शहरे उफाळले होते. तिला त्याचा तो स्पर्श हवाहवासा वाटत होता. आज येरवडा कधी आला तिला कळलंच नाही. दुसऱ्या दिवशीही नयन बसमध्ये बसली आणि चिंचवड स्टेशन येताच त्या तरुणाला शोधू लागली. तो तरुणही लोकांच्या घोळक्यातून धावत येऊन पटकन नयनच्या शेजारी येऊन बसला. हा कार्यक्रम सतत २ महिने चालूच होता. तो तरुण न चुकता नयनच्या शेजारीच येऊन बसायचा. बसताना रोज तो तिला न्याहाळायचा. तिच्या स्टोल मधून तिचे टपोरे पाणीदार डोळे तेवढे डोकवायचे. जणू तो देखील तिचा चेहरा बघायला आसुसलेला होता. त्याने साधारण त्याच्या मनात नयनची एक छबी बसवली होती. “सुंदर पाणीदार डोळे….कपाळावर गडद रंगाच्या आयब्रोज….लाल गुलाबी होठ आणि कापसासारखा सफेद रंग”

तो देखील येरवड्यालाच उतरायचा. एक दिवस तो नयनच्या बँकेत काही कामानिमित्त आला. तो बँकेत येताच नयनने त्याला पाहिलं. तिला वाटलं कि तो तिचे कपडे बघून तिला ओळखेल म्हणून तो येताच तिने स्वतःला थोडं सावरलं आणि केसांमधून एक हात फिरवला. पण असं काहीच नाही झालं. त्याने नयन कडे ढूंकूनही नाही पहिले आणि तो त्याचं काम करून निघून गेला. नयन थोडी हिरमुसलीच होती.

दुसऱ्या दिवशीहि तो तरुण आला आणि बस मध्ये तो तिच्याच शेजारी जाऊन बसला. नयनने त्याला न बघितल्यासारखाच रिस्पॉन्स दिला.

“हाय, मी रोहन”

त्याचा आवाज ऐकून नयन अवाक झाली….तिचं मन कसं एकदम प्रफ्फुलीत झालं होतं…गेले २ महिन्यापासून ती ह्या क्षणाचीच तर वाट बघत होती कि त्याने तिच्याशी स्वतःहून काहीतरी बोलावं. त्यामुळे एका क्षणाचाही विलंब न करता कि तो अनोळखी आहे आणि त्याच्याशी कसं बोलावं….तिने त्याला प्रत्युत्तर दिलं.

“हाय, मी नयन”

रोहन – “तुम्ही रोज ह्या बसमध्ये असता….कुठे कॉलेज ला जाता का? “

नयन – “नाही मी येरवड्याला ऍक्सिस बँकेत कॅशियर आहे.”

रोहन – “काय सांगता….मी कालच बँकेत येऊन गेलो कि तुम्ही दिसला नाही मला”

नयनही काही माहित नसल्याचं आव आणते, “अच्छा, तुम्ही येरवड्याला कुठे जाता?”

रोहन – “मी येरवड्याच्या पंचशील टेक पार्क मध्ये एका कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे.” 

नयन – “सॉफ्टवेअर इंजिनियर असूनही तुम्ही बसने प्रवास करता.”

रोहन हसत – “हो ना..एवढ्या लांब बाईक वर नको वाटतं यायला….पाठ दुखते त्यापेक्षा बसचा प्रवास परवडतो.”

नयन – “हो खरं आहे”

रोहन – “आज लंच ब्रेकमध्ये भेटू या का ?तुम्हाला टाईम असेल तर? आय.बी.एम च्या पाशी एक टपरी आहे तिथे  अप्रतिम मिळतो. “

नयन – “हो नक्की भेटू या…. १ वाजता माझा लंच ब्रेक होतो”

रोहन – “त्या आधी मी तुमच्या बँकेत येणार आहे..माझं थोडं काम आहे मग  सोबतच जाऊ या..तुम्ही कुठल्या काउंटर वर असता?”

नयन – “मी ४ नंबरच्या काउंटर वर असते”

बोलता बोलता येरवडा आलं आणि दोघेही उतरले. नयन फार आतुरतेने लंच ब्रेकची वाट बघत होती.

१२ वाजता रोहन बँकेत आला. नयन आपल्या काउंटर मध्ये बसली होती. आज  गर्दी असल्याने ती कामात होती त्यामुळे रोहन आल्याचं तिच्या लक्षात नाही आलं. बँकेत येताच रोहनने अख्या बँकेत एक नजर फिरवली आणि  काउंटर ४ वर जाऊन ती थांबली. पण त्या कॉउंटरवर बसलेल्या मुलीला पाहून तो अवाकच झाला. अर्धवट भाजलेली ती मुलगी….चेहऱ्यावरचं साल सोललं गेल्याने अर्ध्या चेहऱ्यावर पांढरे डाग….अशी मुलगी रोहनच्या कल्पनेपलीकडेच होती. त्याला विश्वास बसेना कि स्टोल घातलेली पाणीदार डोळ्यावाली ती हीच का नयन? पण तिचे कपडे बघितल्यावर त्याला पक्की खात्री पटली कि ती हीच नयन आहे आणि नयनने त्याला बघण्याआधीच त्याने बँकेतून कल्टी मारली.

इकडे नयन लंच ब्रेक मध्ये आय.बी.एम ला जाऊन पोहोचली आणि रोहनची वाट पाहू लागली. पण रोहन काही आला नाही. असाच दुसरा, तिसरा, चौथा दिवस गेला पण रोहन बसमध्ये देखील नाही आला. नयनलाही कळून चुकले होते कि कदाचित रोहनने तिला त्या दिवशी बँकेत तिच्या नकळत पाहिले असेल आणि तीच खरं रूप पाहून त्याने पळ काढला असावा पण म्हणून एखाद्या देखण्या मुलाशी लग्न करणं तर दूर पण मैत्री करण्याचाही हक्क नसावा का मला? माझा चेहरा खराब झाला त्यात माझी काय चूक होती? का लोकांना मी नकोनकोशी वाटते? लोकांना एखाद्याचं बाह्यरुपच का भावतं?

असे असंख्य प्रश्न मनात घेऊन नयन घरी गेली आणि आपल्या रूम मध्ये जाऊन ओक्शाबोक्शी रडायला लागली. त्यानंतर लग्न जमत नाही म्हटल्यावर नयनचे वडीलही तिचा तिरस्कार करायला लागले.  चांगले स्थळ येणं तर बंदच झालं होतं. त्यात नातेवाईकही असतातच जखमेवर मीठ शिंपडायला. नयनच्या आत्या, काकांनी तिच्या वडिलांना दुसोटी किंवा एखादं गरीब घरच्या स्थळामध्ये अड्जस्ट करायला सांगितलं. नयनच्या वडिलांनाही तिला कसतरी वाटी लावून द्यायचं होतं  म्हणून त्यांनी नयनला आणि तिच्या आईला जीव देण्याची धमकी देऊन कसतरी पटवलं आणि नयनचं लग्न त्या सेक्युरिटी गार्ड सोबत लावून दिल.

त्याच्या घरच्यांची मागणी होती कि नोकरी सोडून द्यायची. ४ वर्षे झाली नयनच्या लग्नाला पण असा एक दिवस नाही गेला  कि तिने एक दिवस नवऱ्याचा मार नसेल खाल्ला. शिकलेली असूनही माहेरचा सपोर्ट नसल्याने ती स्वतःला असह्य समजत होती. तिचा भाऊ देखील बायका पोरांना घेऊन परदेशात सेटल झाला होता. लग्न झाल्यानंतर २ वर्षातच कोरोनाने भारतात थैमान घातला आणि त्यात तिच्या आई वडिलांचा दोघांचाही बळी गेला. ती खूप एकटी पडली होती.

पण आता नयनला मात्र नवऱ्याचा जाच सहन होईना..तिने आतापर्यंत सहन केलं होतं पण तिच्या पोरीला अवगसा म्हटलेलं ती कसं खपून घेईल. म्हणून तिने उचलली पोरीला आणि सामान बांधून सोडलं तिने नवऱ्याचं घर. पुढे कुठे जायचं? काय करायचं? असे असंख्य प्रश्न होते तिच्या मनात पण तिने हिम्मत नाही हारली आणि ती हिरनी पुन्हा एकदा तिच्या पायावर उभी राहिली. बोलतात ना अनुभव कधी वाया नाही जात..बँकेचा अनुभव पाठीशी होताच…महिन्याभरातच तिला परत जॉब मिळाला आणि हळू हळू ती पोरीसोबत सेटल झाली. पुढे जाऊन नयनला तिच्या आयुष्यात तिच्याच सारख्या मुली, बायका भेटत गेल्या आणि तिने सर्वांना एकत्र बांधून “नयन एक दिशा” नावाची संस्था स्थापित केली.

आज नयन, तिची मुलगी वेदा, जावई आणि तिच्या संस्थेतल्या बराचश्या बायका मिळून हि संस्था चालवत आहेत आणि आत्तापर्यंत त्यांनी हजारो जळलेल्या मुलींना, बायकांना मदतीचे हात दिले.

==============

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories