Ritbhatmarathi

Search
Close this search box.

यंदा कर्तव्य आहे – भाग २

©️®️ मिथुन संकपाळ

*रविवार सकाळ**(स्थळ – पटवर्धन कुटुंब)*

“Good morning दादा, निघालास आज पण..?” – गौरी.”हो, म्हणजे काय.. आज असं काय वेगळं आहे? रोज जातोच ना मी जॉगिंग ला..” – समीर.”हो, पण जरा लवकर ये.. आज जायचंय ना वहिनीला बघायला””ए, वहिनी वहिनी काय करतेस ग, अजून बघितले पण नाही, एक तर माझा प्लॅन सर्व बिघडवला, आज बघताच डायरेक्ट न..” मध्येच तो पटकन बोलायचं थांबला कारण आईची चाहूल लागली होती.गौरी ला कळलं की त्याला काय म्हणायचं होतं, तिचं मन खट्टू झालं नकाराचा स्वर ऐकून. कारण कालपासून ती मनातच सगळं ठरवत होती, आपण लग्नात काय काय करायचं, कोणत्या मैत्रीणीना बोलवायचं, ड्रेस कोणता घ्यायचा, मेहंदी कोणाकडून काढून घ्यायची.. पण आता दादाच्या बोलण्यावरून तिला वाटू लागलं की हे सर्व लांबणीवर पडणार…समीर जॉगिंग ला निघून गेला आणि गौरी स्वतःचे आवरण्यात बिझी झाली. आई, बाबा सुध्दा उठून आवरायला लागले होते.. आईची लगबग सुरू होती किचन मध्ये, बाबांच्या चेहऱ्यावर आनंद होता.. सोयरिक जुळवण्या बरोबरच, त्यांचं मन शीरा खाण्यास जास्त उत्सुक होतं.”आई, काय बनवतेस ग? जेवायला जायचंय ना आपण तिकडे” – गौरी”हो, पण असं कसं रिकाम्या हाताने जायचं.. थोडे मेथी पराठे बनवून घेते सर्वांसाठी””मेथी.. eeeeee” गौरी ने नाक मुरडले”तू तुझं आवर जा, असलं काही खायचं म्हटलं की जीवावर येते तुझ्या””हाहाहाहा” गौरी स्वतःच हसू लागली, “जाते जाते.. तू आवर तुझे पराठे” 

*देशमुखांच्या घरी :*
घाबरत घाबरत आई ने मानसी ला आवाज दिला,”मानसी बाळा, उठतेस ना.. आवरायला पाहिजे नाहीतर नंतर गडबड होईल””उम्मम, झोपू दे ना ग.. तू त्या लोकांना फोन करून सांग ना थोडं उशिरा यायला” झोपेतच मानसी बडबडत होती. तिचा तो गोड आवाज ऐकून आईला बरं वाटलं, तिच्या मनातली भीती आता गेली होती. मानसी चा हात पकडला आणि ओढतच म्हणाली,”आता उठ नाहीतर स्वयंपाक पण तयार नाही व्हायचा”स्वयंपाकाचे नाव ऐकून पुन्हा मानसी ओठांचा चंबू करत म्हणाली,”त्यांना सांगुया का आपण, तुम्हीच सर्वांसाठी पार्सल घेवून या म्हणून”आई ने स्वतःच्या कपाळावर हात मारला, “कसं व्हायचं तुझं, उठ आता”मानसी मग डोळे चोळत उठली आणि अर्धवट झोपेतच कसेबसे पाय टाकत आवरायला निघून गेली. बाबा एव्हाना बाजारातून सामान आणण्यासाठी बाहेर गेले होते, त्यांनी आठवणीने शीरा बनवण्यासाठी घरी सूचना दिल्या होत्या.काही वेळाने ते आवश्यक सामान घेवून घरी परतले. मानसी आवरून आईला स्वयंपाकात मदत करत होती. आईने सामानाच्या पिशव्या बाबांकडून घेतल्या आणि म्हणाली,”फोन तर करून बघा किती पर्यंत पोचणार आहेत, तसे तर आमचे आवरत आलंय पण विचारून अंदाज तरी घ्या””हो हो” म्हणत बाबांनी खिशातून मोबाईल काढला आणि फोन लावला -“हॅलो श्रीकांत, अरे शीरा तयार झाला तुम्ही कुठे आहात अजुन..?” “निघतोय थोड्या वेळात, काजू टाकलेत ना शिऱ्यामध्ये?”दोघेही मनमुराद हसायला लागले..”बरं, या मग पटकन आम्ही वाट पाहतोय” असं म्हणत बाबांनी फोन कट केला आणि त्या दोघींना तसे सांगितले.”मानसी, जा तू आता तुझं आवरायला घे. छान तयार हो, ती मंडळी येतील कधीही” – आई 

इकडे पटवर्धनांच्या घरी..
“गौरी, झालीस का तयार तू?” बाबांनी आवाज दिला”हो बाबा, आलेच ५ मिनिटात” गौरी आतूनच ओरडली.”हिची ५ मिनिटं गेल्या अर्ध्या तासापासून संपत नाहीयेत” – आई.”आई, बघू काय सामान ठेवायचं आहे गाडीमध्ये” – समीर.”हो, हे बघ ही बॅग आहे फक्त आणि या २ पाण्याच्या बॉटल्स”समीर ते सामान घेवून बाहेर गेला, गाडीमध्ये सामान ठेवून पुन्हा आत आला,”गौरी, चल पटकन उशीर होतोय” समीर चा आवाज ऐकून गौरी लगबगीत बाहेर आली”चला, चला.. निघुया. बाबा मी पुढे बसणार बरं का”बाबांनी हसत हसत संमती दर्शविली “बरं बाळा, पण चल आता”गौरी थट्टेच्या स्वरात म्हणाली, “बाबा, दादाची घाई समजू शकते.. पण तुम्हाला का घाई इतकी”बाबा काही बोलण्या आधीच आई, “शीरा खायचाय ना त्यांना..”सगळे हसायला लागले आणि बाहेर पडले.साधारण ४५ मिनिटांनी देशमुखांच्या घरासमोर गाडी थांबली. गाडीचा आवाज ऐकताच सुरेशराव स्वागतासाठी बाहेर आले,”या या.. स्वागत आहे”सर्वांना घेवून ते आतमध्ये आले, सविता देशमुख सुध्दा मग आतल्या खोलीतून बाहेर आल्या तसे सुरेशरावांनी ओळख करून दिली,”ही माझी पत्नी.. सविता” “नमस्कार वहिनी .. आता आम्हा लोकांची ओळख करून देतो, मी श्रीकांत पटवर्धन, ही माझी पत्नी अलका, आमची मुलगी गौरी, आणि आमचा मुलगा समीर”सर्वांनी एकमेकाला हात जोडत नमस्कार केला आणि ओळख करून घेतली..”तुम्ही सगळे बसा ना, उभेच आहात” – सुरेश रावांनी विनंती केली आणि मग सर्वजण स्थानापन्न झाले. हलक्या फुलक्या गप्पा सुरू झाल्या. समीर शांत होता, तो ठरवून आलाच होता.. फक्त या कुटुंबाला भेटायला आलोय आपण, मुलगी पहायची पण नकार तर नक्की द्यायचाय. त्याच्या मनात अजूनही आजचा प्लॅन कॅन्सल झाल्याचं दुःख होतं.बऱ्याच गप्पा झाल्यावर श्रीकांतराव सुरेशरवांना म्हणाले,”अरे आपण मस्त गप्पा मारतोय, मानसी ला पण बोलव आता. नॉर्मल रहा म्हणावं उगाच दडपण घेवून वावरायची गरज नाही. अगदी रोजच्या सारखी ती बघायला आम्हाला आवडेल””हो हो.. अगदी उत्तम बोललास, अग सविता तू खाण्याचं बघ मी मानसी ला घेवून येतो” – सुरेशराव.”चला वहिनी, मी पण येते” असं म्हणत अलकाताई पराठ्यांचा डब्बा असलेली बॅग घेवून सविताताई सोबत किचन मध्ये निघून गेल्या.सुरेशराव मानसी च्या रूम जवळ पोचले आणि आवाज दिला,”मानसी बेटा, ये आता बाहेर.. सगळे वाट बघतायत”मानसी ने रूम चा दरवाजा उघडला.. निळ्या रंगाची साडी, टिकली, कानात डूल, साडीच्या रंगाला शोभतील अशा बांगड्या.. तिला अशा रुपात पाहताच सुरेशरावांचे डोळे भरून आले आणि ते पाहतच राहिले.. “बाबा” असं म्हणत मानसीने त्यांना मिठी मारली.. दोघांच्या मनात जे विचार सुरू होते ते सांगायला इथे शब्दांची गरज नव्हती..

बाबांना मारलेली मिठी मानसीला खूप धीर देणारी होती. बऱ्याच दिवसात ती मायेची ऊब मानसीला मिळाली नव्हती.. ‘तू काळजी करू नकोस, मी आहे’ असं सांगणारी ती मिठी मानसीला कैक पटीने समाधान देवून गेली.बाबांच्या डोळ्यातून अश्रू खाली पडणार तोच त्यांनी स्वतःला सावरलं..”चल, वाट बघतायत सगळे बाहेर” असं म्हणत बाबा मानसीला बाहेर घेऊन आले. नजर खाली ठेवून ती चालत राहिली आणि सर्वांसमोर जाऊन उभी राहिली. “श्रीकांत, आली बघ मानसी” – सुरेशराव.”ये बेटा, बस तू पण.. उभी नको राहू.. इकडे गौरी जवळ बस” असं म्हणत तिला बसायला सांगितलं, गौरी ने थोडे सरकून मानसी साठी जागा करून दिली. स्वतःच्याच घरी मानसी आज कंफर्टेबल नव्हती.सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या, तिला काही सुचत नव्हतं.किचन मधुन दोघी माय बाहेर आल्या, सर्वांसाठी मेथी पराठे आणि शिरा घेवून..गौरी बाजूलाच बसून मानसी कडे पाहत होती, मानसी ला नजर वर करवत नव्हती.. तिची होणारी घालमेल श्रीकांत रावांनी ओळखली होती आणि म्हणून तिला धीर देत ते म्हणाले,” बेटा, घाबरु नकोस आणि लाजू तर बिलकुल नको.. तुझंच घर आहे  त्यामुळे रोज असतेस तशीच रहा. आम्ही तुम्हा सर्वांना भेटायला आलोय.. इथे कोणाची काही परीक्षा नाहीये..”गौरी ने मानसी च्या हातावर आपला हात ठेवला.. “Just chill””दादा, तू पण का शांत आहेस बोल ना”समीर ची स्थिती काही वेगळी नव्हती.. मनात तर त्याने नकार देण्याचे ठरवले होते पण आताच्या प्रसंगामध्ये त्याला नॉर्मल राहायचं होतं. गौरी च्या बोलण्यावर तो उत्तरला,”हो, शांत नाही.. बोलतो ना”तसे गौरी लगेच म्हणाली, “मनातल्या मनात नाही, सर्वांशी बोल”त्यावर सगळे हसू लागले 😀😀आता समीरला गौरी चा राग आला होता, असे टोमणे मारून ती आगीत तेल ओतत होती. मधल्या टेबलवर सर्वांसाठी मेथी पराठे आणि शिरा ठेवण्यात आला..”वहिनी, तुम्ही कशाला उगाच तसदी घेतली पराठे बनवण्याची” सुरेशराव अलका ताईंना म्हणाले.”अहो त्यात कसली तसदी, उलट इथे सविता ताईंना आज इतक्या जणाचा स्वयंपाक करावा लागला..” – अलकाताई.”नाही हो.. मला आवडतं स्वयंपाक करायला आणि कोणी येणार असेल घरी तर अजूनच हुरूप येतो. शिवाय मानसी होतीच की मदतीला..” असं सविताताई सांगून रिकाम्या झाल्या.”Ohh ग्रेट, वहिनीने पण मदत केली का?” गौरी च्या वाक्यावर समीर अजूनच चिडला.. आणि इकडे मानसीला पण काही कळेना.मनातच ती पुटपुटली, ‘ही गौरी काय मला आत्ताच घेवून जायला आली की काय घरी..’ 😡“बरं, आधी आपण खावून घेवू मग बोलत बसू” – सुरेशराव.”हो ना, शीरा पटकन खाल्ला पाहिजे” श्रीकांतराव म्हणाले आणि त्यांच्या या उतावळे पणावर सगळेच हसू लागले. सर्वांनी आपली प्लेट घेवून खाण्यास सुरुवात केली.समीर अगदी मानसीच्या समोरच बसला होता, हळूच तिने नजर वर केली तर तो खाली पाहून खाण्यात व्यस्त होता.. मग ती ही हळू हळू एक एक घास खाऊ लागली.समीर विचार करत होता…अजुन हिला पाहिले नाही मग नकार देताना कारण काय सांगायचं.. म्हणून मग हळूच त्याने नजर वर केली मानसी ला पाहण्यासाठी तर तिची नजर खाली होती, ‘काय ही खात बसलीय, कधी खात नाही का.. वर बघ पटकन ‘ असं तो मनात पुटपुटत राहिला.थोड्या वेळाने सुरेशराव, “बेटा मानसी, चहा घेवून येतेस का सर्वांसाठी?”होकारार्थी मान हलवून मानसी किचन मध्ये गेली, तिथून ती डोकावून समीर कडे पाहू लागली पण नीट पाहता येत नव्हतं कारण मध्येच आई बसली होती. समीर सुध्दा तिला पाहण्याचा चोरटा प्रयत्न करत होता पण इथून किचन मधले काही दिसत नव्हतं. थोड्या वेळाने मानसी चहा घेवून बाहेर आली..”दे तूच सर्वांना” आईने मानसीला सांगितलं. एक एक कप ती सर्वांना देवू लागली, समीर साठी कप पुढे केला..”चहा” – मानसीसमीरने हात पुढे केला आणि तिच्याकडे पाहिलं.. गोरा रंग, केसांची निघालेली बट, छोटीशी टिकली, निळसर डोळे, लिपस्टिक न लावताही गुलाबी ओठ, आणि त्या ओठाजवळ असणारा तीळ.. क्षणार्धात त्याने इतकं सौंदर्य न्याहाळले होते.. मानसी सुध्दा त्याला पाहत होती.. शांत चेहरा, स्मितहास्य, नीटनेटका पेहराव, सगळं काही उत्तम..!!मानसी पुन्हा एकदा, “चहा..”समीरने चहा चा कप हातात घेतला आणि मानसी पुन्हा आपल्या जाग्यावर बसली. “काय मग दादा, पाहिलं ना नीट की फोटो घ्यायचाय सोबत” – गौरी.समीर काही न बोलता खाली पाहत होता.. दोघांचे आई वडील मात्र गौरी च्या कोपरखळी वर हसायला लागले..गप्पा चालू असताना समीर आणि मानसी एक मेकाला पाहण्याचा प्रयत्न करत होते.. समीर ला कोणतेच कारण सापडत नव्हते नकार देण्यासाठी इतकी ती सुंदर होती.. अर्थात तो ही काही कमी सुंदर नव्हता..”अरे बाप रे, माझा मोबाईल चार्ज करावा लागेल.. मला चार्जर मिळेल का?” – गौरी.”मानसी, गौरीला घेवून जा आत आणि मोबाईल लाव बरं चार्जिंग ला..” – सुरेशराव.मानसी आणि गौरी आत निघून गेल्या.. समीर थोडा रिलॅक्स झाला.”शिरा छान झाला होता बरं का वहिनी” श्रीकांतराव हसत हसत म्हणाले त्यावर सविता ताईंनी “धन्यवाद” म्हणत कौतुक स्वीकारले.”तुझ्यासाठी अजुन आहे, जाताना घेवून जा” – सुरेशराव.”वाह, वाह.. छानच” श्रीकांतराव एकदम खुष झाले.”सविता, जेवणाचे बघा आता जास्त उशीर नको” सुरेशराव सूचना करत म्हणाले.. त्यावर सर्वांनीच होकार दर्शविला. पुन्हा एकदा सविताताई आणि अलकाताई किचन मध्ये गेल्या आणि त्यांची आवरा आवर सुरू झाली.”मानसी, गौरी… या चला जेवून घेवू” सुरेशरावांनी त्यांनाही आवाज दिला. दोघीही बाहेर आल्या आणि मग सर्वांचे जेवण सुरू झाले.. गप्पा टप्पा करत जेवण उरकलं, थोड्या वेळाने पटवर्धन कुटुंब निरोप घेवून निघू लागले. सविताताईंनी आवर्जून शिऱ्याचा डब्बा त्यांना दिला होता. समीर, गौरी आणि मानसीने सर्व वडीलधाऱ्या लोकांना नमस्कार केला.. पुन्हा एकदा समीर आणि मानसी ची नजरा नजर झाली पण काहीच बोलले नाहीत.शेवटी त्यांची गाडी निघाली आणि मानसीने हुश्श करत निःश्वास टाकला, इतका वेळ तिला कैदेत असल्या सारखं वाटत होते.”आई, बाबा.. आता मी चालले आराम करायला” – मानसी.”हो बेटा, आराम कर आपण नंतर बोलू” – सुरेशराव.
इकडे गाडीमध्ये गौरी गुणगुणत होती.. “देखा है पहली बार, साजन की आंखों में प्यार..””गौरी, कळतंय मला तुझं काय चाललंय, तुला तर मी घरी पोचल्यावर बघतोच” – समीर.”नाही आवडलं का गाणं, दुसरं म्हणू का.. बरं.. ना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे, करना था इनकार मगर…””चूप.. काही बडबडते” समीर जरा खेकासलाच तिच्यावर.मागच्या सीटवर बसून आई बाबा यांची गंमत पाहत होते..बाबांनी मध्यस्थी करत गौरी ला शांत रहायला सांगितलं आणि मग स्वतःच समीरला म्हणाले, “कशी वाटली मानसी?”त्याच्या उत्तराची वाट न पाहता आई म्हणाली, “मला तर मुलगी आवडली, अगदी शोभून दिसतो जोडा””आई, बाबा.. असं लगेच नाही सांगता येणार मला. अजून आम्ही नीट बघितलं पण नाही एक मेकाला, शिवाय बोलणं पण नाही काहीच.. तिच्याशी एकदा बोलता आले असते नीट तर बरं झालं असतं, त्यात ती साडीमध्ये मला तर काकूबाई वाटत होती” – समीर.”अरे काही काय दादा, किती सुंदर आहे ती.. माझ्यासारखी 😀” मध्येच गौरी बडबडली.”हे घे..” असं म्हणत गौरी ने हात पुढे केला”हे काय आहे?” – समीर.”अरे visiting card आहे” – गौरी.”ते दिसतंय मला, पण कोणाचं आणि मला का देतेस?” – समीर.”आप आम खाओ ना भैया.. धर घे” असं म्हणत तिने ते कार्ड समीरला दिले. त्याने ते घेतले आणि पाहिले,”मानसी देशमुख? तुझ्याकडे कसं आलं तिचं कार्ड?” – समीर.”माय डिअर बेवकूफ ब्रदर, जेव्हा मोबाईल चार्ज करण्यासाठी आम्ही आत गेलो होता ना, तेव्हा तिथे टेबलवर होते तिचे कार्ड्स, त्यातलं मी एक घेतलं.. बघ त्यावर तिचा नंबर आहे, आता तू बोलू शकतो तिच्याशी.. आखिर बहन किस दिन काम आयेगी” – गौरी.आई, बाबा मागच्या सीट वर हसायला लागले…😀समीरने हे सर्व ऐकून गौरीच्या डोक्यात प्रेमाने एक टपली मारली अन् त्यालाही याचं हसू आलं..गाडी आता त्यांच्या दारात पोचली होती.. समीरने visiting card आपल्या खिशात ठेवलं आणि सर्वजण घरात गेले..

*क्रमशः*

=================

यंदा कर्तव्य आहे – भाग १

http://www.ritbhatmarathi.com/yanda-kartavya-ahe-part1/

यंदा कर्तव्य आहे – भाग 3

http://www.ritbhatmarathi.com/yanda-kartavya-ahe-part-3/

=================

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *