Ritbhatmarathi

Search
Close this search box.

मोमोज हा प्रकार चीन मधून भारतात आला आणि भारतातदेखील जागोजागी तो प्रचलित झाला. जागोजागी तुम्हाला टपरीवर मोमोज विकताना दिसतील. गरम गरम मोमोज आणि त्यासोबत शेझवान चटणी. वाह्ह!!!! क्या बात है!! पण बाजारात जाल तर तुम्हाला हेल्थी ऑपशन्स कमीच मिळतात आणि त्यात भर म्हणजे हायजीनेस कमीच असतो.

मग हेच मोमोज जर तुम्ही घरी बनवलात तर? आणि तेही बाजारापेक्षा जास्त हेल्थी आणि टेस्टी. बाजारात तुम्हाला मैद्याचे मोमोज मिळतात. आज आपण सेम मोमोज गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत आणि तेही खूप चविष्ट म्हणजे कुणी म्हणणार नाही कि हे घरी बनवले आहेत म्हणून.. 
चला तर रेसिपी बघू या.

मोमोस बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

गव्हाचं पीठ – २ कप
तेल – १ टेबलस्पून
चवीपुरतं मीठ

स्टफिंग साठी लागणारे साहित्य :
कांदा – १ बारीक चिरलेला
कोबी – १/२ कोबी एकदम बारीक चिरलेला
गाजर – १/२ बारीक चिरलेले
शिमला मिर्च – १ बारीक चिरलेली
तेल – २ टेबलस्पून
मीठ चवीनुसार
सोया सौस – १ टेबलस्पून
व्हिनेगर – १ टेबलस्पून

मोमोज बनवण्याची कृती :

प्रथम गव्हाचे पीठ , मीठ आणि तेल टाकून पीठ मळून घ्यावे. लागेल तसे पाणी टाकावे. चपाती साठी मळतो तसेच मऊ पीठ मळावे. मीठ मळून झाले कि एक १५-२० मिनिटे रेस्टिंग साठी ठेवावे. म्हणजे पीठ चांगलं मऊसूत होतं.

त्यानंतर स्टफिंग बनवून घ्यावे. त्यासाठी एका कढई मध्ये तेल तापवत ठेवावे. तेल तापले कि त्यात चिरलेला कांदा टाकावा .कांदा थोडा गुलाबी परतून घ्यावा. जास्त लाल करू नये. कांदा छान परतला कि मग त्यात कोबी, गाजर आणि शिमला मिर्च टाकावी. सगळ्या भाज्या छान परतून घ्यावा. ५ मिनिटे कढई वर झाकण ठेवून भाज्या शिजवून घ्यावा. ५ मिनिटानंतर सोया सॉस आणि व्हिनेगर टाकून २ मिनिटे परतावे. स्टफिंग मिश्रण तयार आहे मिश्रण थंड होऊ द्यावे

मिश्रण थंड झाल्यावर गव्हाचे पीठ जे मळून बाजूला ठेवलं होतं त्याचे एकसारखे भाग कापून घ्यावे. जेणेकरून एकसारख्या आकाराचे मोमोज तयार होतील. त्यानंतर पुरी एवढी पोळी लाटून त्यात मिश्रण स्टफ करावे आणि हवे ते आकार द्यावे.

मोमोज तयार झाले कि अर्धा तास(मैद्याचे १५-२० मिनिटात होतात) स्टीम करून घ्यावे.

गरमा गरम मोमोज शेझवान चटणी सोबत सर्व्ह करावे. नक्की करून बघा….. मैद्याचे मोमोज आणि ह्याच्या चवीमध्ये काहीच अंतर नाही हे मोमोज देखील स्वादिष्ट लागतात..

===============

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories