Ritbhatmarathi

Search
Close this search box.

वसंत पुरुषोत्तम काळे (व.पु. काळे) – मराठी वाचकांच्या मनात अधिराज्य गाजवणाऱ्या या लेखकाची पुस्तके वाचणे म्हणजे आयुष्य सोपे करुन घेणेच……

vasant purushottam kale information in marathi : मित्रांनो आपल्या सर्वांचे आयुष्य खूप धकाधकीच आणि ताणतणावयुक्त आहे. पण या सगळ्यातून जरा मोकळीक मिळावी म्हणून, रिलॅक्स वाटावं म्हणून प्रत्येकजण आपले छंद जोपासत असतो. त्यासाठीच कोणी फिरायला जाते, ट्रेकिंग करते, जप करते, गाणी ऐकत, फिल्म्स बघत कोणी गप्पा मारत तर कोणी मित्र मैत्रीणीना भेटून येत. ज्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळतो अशी प्रत्येक गोष्ट करून ताण कमी करण्याचा किंवा स्वतःला वेळ देण्याचा प्रयत्न करत असतो व्यक्ती.

बऱ्याच लोकांना वाचनाची खूपच आवड असते. पुस्तक हाच आपला खरा मित्र आहे आणि त्याची अनुभूती करोडो लोकांनी घेतली असेलच. मन शांत करण्यासाठी, विचारांची सकारात्मकता टिकवून ठेवण्यासाठी, ज्ञान मिळवण्यासाठी सगळ्यात उत्तम पर्याय म्हणजे वाचन. चांगले लिखाण वाचनात येण्यासाठी उत्तम लेखक माहीत असणे खूपच आवश्यक असते. लेखक दर्जेदार असेल तर वाचण्याची रंगत काही वेगळीच असते.

आज अशाच एका लेखका विषयी जाणून घेणार आहोत ज्यांनी त्यांच्या उत्तम लेखन कौशल्याने करोडो लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले नाही तर त्यांचे लिखाण, कोट अजरामर ठरले. सोपे आणि सहज लिखाण पद्धती मधून जगण्याचे मार्गदर्शन करणाऱ्या या लेखकाला ” वपु ” या नावाने ओळखतात.

वपु या दोन शब्दांनी सगळ्यांच्या मनावर राज्य करणारे वपु म्हणजेच वसंत पुरुषोत्तम काळे. वपु या नावातच खूप आपलेपणा आहे. वपु म्हटले की, पार्टनर, ही वाट एकटीची अशी त्यांची जगभर प्रसिद्ध असलेली पुस्तके तसेच वपुर्झा हे त्यांचे विचार मांडणारे पुस्तक डोळ्यासमोर आल्यावाचून रहात नाही. पार्टनर या पुस्तकाच्या माध्यमातून जोडीदार कसा असावा याचे सुंदर वर्णन त्यांनी केले आहे. त्यांचा प्रत्येक विचार आयुष्याचा अर्थ उलगडून सांगतो अगदी सहज पद्धतीने. त्यांच्या पुस्तकाची एक एक ओळ दोनदा तीनदा वाचूनही मन भरत नाही. वाचक त्यांची पुस्तके वाचून कंटाळत नाहीच. त्यांची प्रत्येक कथा वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते. कधी कुठे कसा ट्विस्ट येईल सांगूच शकत नाही असे लेखन असणाऱ्या या वपुचे लेखन सामर्थ्य अफाट आहे.

[tablesome table_id=’18637’/]

वसंत पुरुषोत्तम काळे म्हणजेच वपु हे मराठी भाषेतील अग्रगण्य लेखक होते. त्यांनी ६० पेक्षा जास्त पुस्तके लीहली आहेत. वपु हे पेशाने वास्तुविशारद होते. सौंदर्य न्याहाळणे हा त्यांच्या कमाचाच भाग असल्याने लिखाणात ही तो सहजपणे पाहायला मिळतो. उपजतच चांगल्या गोष्टींकडे पाहण्याची सवय असल्याने त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन लिखाणात दिसून येतो. त्यामुळेच त्यांच्या पुस्तकांनी जगाकडे पाहण्याचा किंवा जगण्याचा वेगळाच दृष्टिकोन दिला आहे. त्यांच्या पुस्तकातील एका एका वाक्यावर पुस्तक लिहून काढता येईल किंवा स्टोरीची थीम लिहून काढता येईल अशी वाक्ये आहेत.

आयुष्यात थोडे हादरे बसले, म्हणून काही संपूर्ण आयुष्य वाया जात नाही – अजय पुरकर

जाणून घ्या आपल्या यशाने स्वतःचे नव्हे तर इतरांचे जीवन उत्कृष्ठ बनवणाऱ्या सुधा मूर्ती यांचे जीवनचरित्र

याची काही उदाहरणे बघता येतील. जसे की,

पाऊस सर्वांसाठी पडतो पण प्रत्येकासाठी त्याचा अर्थ वेगळा असतो

याचा कसाही अर्थ घेता येईल
पहिला रोमॅन्टीक ते दोघे स्कुटीवर फिरतायत, कटिंग, लाँग ड्राइव्ह, भरपूर पाऊस, नावाला घातलेलं विंडशिटर, गाडीत सुरु असणारी गाणी, किकू किकू आवाज करत हलणारे वायपर्स आता या पावसाचा अर्थ रोमॅन्टिक. तोच पाऊस २६ जुलैचा असला तर त्याचा अर्थ भयंकर किंवा काहीतरी आव्हानात्म होतो, तोच गावात दुष्काळानंतर पडलेला पाऊस म्हणजे आनंदवार्ताच, तोच पावसातून चालेली अंतयात्रा म्हणजे आनंदवार्ताचं दुसरं टोकं… असे बरेच अर्थ या पावसाचे काढता येतील वपु म्हणतात तसं.

=================

खर्च झाल्याच दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो..!!

हे माझ्याबरोबर रोजच होतं खऱ्याखुऱ्या आय़ुष्यात. वैचारिक लेव्हलला प्रेम, वेळ, एखाद्यात गुंतल्यानंतर केलेले प्रय़त्न या सगळ्या गोष्टी खर्च कॅटेगरीमध्ये बसवून हवा तसा अर्थ घेता येईल. अशा वाक्यांचे पर्वत करता येतील इतकी वाक्य वपुंच्या लेखणीतून पाझरली आहेत.

अनेक गोष्टी ते थेटही लिहायचे उदाहर्णार्थ

‘अंत’ आणि ‘एकांत’ ह्यापैकी माणूस एकांतालाच जास्त घाबरतो.
कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगन भरारीचं वेड रक्तातच असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.
Success is a relative term. More the success more is the number of relatives.

वपुंचं लिखाण चौफेर होतं. कथा, ललित, नाटक, वैचारिक, चरित्र, आत्मचरित्र्य असे सर्व लेखन प्रकार त्यांनी हाताळले. त्यांच्या कथा जिवंत माणसांच्या, नातेसंबंधांच्या, स्वैर वेड्या मनाचे पैलू अधोरेखित करणार्‍या असत. वपुंचा पहिला कथासंग्रह ‘लोंबकळणारी माणसं’ नोव्हेंबर १९६० ला प्रकाशित झाला होता. ध्वनी मुद्रणच्या माध्यमातून येणारे ते पहिलेच लेखक होते. त्यांनी भरपूर कथासंग्रह लिहले आहेत त्यात सखी, तप्तपदी हे लोकप्रिय आहेत. सांगायचा मुद्दा इतकाच
की २००१ साली त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांनी ४० वर्षांमध्ये ६० हून अधिक पुस्तके लिहीली. पण या पुस्तकांचे वैशिष्ट्य म्हणजे ती आजही खूप प्रसिद्ध आहेत. ‘वपुर्झा’ बद्दल तर काय बोलायचे. मुळात आपण त्या पुस्ताबद्दल बोलणारे कोण ?? असा प्रश्न पडतो. त्या पुस्तकातील प्रत्येक पानातील प्रत्येक विचार खरंच विचार करायला लावणारा आणि आयुष्यातील अडचणींची उत्तरे देणारा असाच आहे. या पुस्तकाचा कंटाळा येणे शक्यच नाही. कितीही वेळा कितीही पारायण केले तरीही पुन्हा पुन्हा वाचावे वाटेल असेच पुस्तक आहे ते. कंटाळा येईपर्यंत वपुमय व्हायला काही हरकत नाही पण इथेही अडचण आहे या माणसाच्या लेखनाचा कंटाळाही येत नाही. वपुर्झा च काय तर अशीच बरीच पुस्तके आहेत वपुंची जी खिळवून ठेवतात, हातातून सोडण्याची इच्छाच होत नाही. हेच त्यांचं लेखन कौशल्य आणि वाचकांची खरी दाद म्हणावी लागेल.

आपण सारे, अर्जुन, गुलमोहर, गोष्ट हातातली होती, घर हरवलेली माणसं, दोस्त, माझ्या माझ्यापाशी, मी माणूस शोधतोय, वन फोर द रोड, रंग मनाचे, माणूस, वपुर्झा, हुंकार असे पत्रसंग्रह, ललीतप्रकार खूपच प्रसिद्ध आहेत. तसेच तप्तपदी, ठिकरी व वाट एकटीची यासारख्या कादंबर्‍या खूपच गाजल्या.

वपुंना महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा सन्मान, ‘पु.भा.भावे’ पुरस्कार, फाय फाउंडेशनचा पुरस्कार आणि अमेरिकेत भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल केले गेले.

मैत्रीचे धागे कोळ्यापेक्षाही बारीक असतात, पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात..! तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्राघातेनेही तुटणार नाहीत..!!

संवाद दोनच माणसांचा होतो, त्याच्यात तिसरा माणूस आला की त्या गप्पा होतात..!!

कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असतं कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे ..! म्हणूनच खडक झिजतात प्रवाह रुंदावत जातो..!!

जाळायला काही नसलं तर पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझते..!!

खर्च झाल्याच दुःख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो..!!

प्रॉब्लेम्स नसतात कुणाला..? ते शेवटपर्य असतात..! पण प्रत्येक प्राॅब्लेमला उत्तर हे असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो,कधी पैसा तर कधी माणस..!या तिन्ही गोष्टी पलीकडचा प्राॅब्लेम अस्तित्वातच नसतो..!!

=================

आठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात..! वारूळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास घेता येत नाही. पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एकामागोमाग असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणींचही तसंच आहे..!!

शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो, बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो..!!

घेणाऱ्याच्या अपेक्षेपेक्षा देणाऱ्याची ऐपत नेहमीच कमी असते..!!

माणूस अपयशाला भीत नाही.अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर..? याची त्याला भीती वाटते..!!

बोलायला कुणीच नसणं यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यत न पोचणं ही शोकांतिका जास्त भयाण..!!

कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्त्व आहे.

पाण्यात राहायचे तर माश्यांशी नुसती मैत्री करून भागत नाही तर स्वतःला मासा बनावे लागते.

वादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजुन रहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघून जातात. वादळ महत्त्वाचे नसते प्रश्न असतो आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा.

कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगन भरारीचं वेड रक्तातच असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही .

आकाशात जेव्हा एखादा कृत्रीम ग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर त्याला पिटाळुन लावेपर्यतच सगळा संघर्ष असतो. त्याने एकदा स्वतः गती घेतली की उरलेला प्रवास आपोआप होतो.
समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते.

=========================

संध्याकाळच्या संधीप्रकाशातही जो टवटवीत राहीला त्याने दिवस जिंकला.

अंत’ आणि ‘एकांत’ ह्यापैकी माणूस एकांतालाच जास्त घाबरतो.

वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस!

खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते.सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.

सुरुवात कशी झाली यावरच बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.

चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो देवमाणूस!
तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरून तुमची श्रीमंती कळते.

औदार्य म्हणजे तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक देणं आणि आत्मसन्मान म्हणजे तुमच्या गरजेपेक्षा कमी घेणं.

गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले.

अत्यंत महागडी, न परवडणारी खऱ्या अर्थाने ज्याची हानी भरून येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे ह्याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे “आयुष्य”.

भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती,भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती!

आपण किती पैसा मिळवला यापेक्षा, तो खर्च करून आपण किती समाधान मिळवले, हे जो पाहतो तो खरा आनंदी व्यक्ती असतो..

वपूंचे विचार आपल्या जगण्यात थोडे जरी आमलात आणता आले तर जगण्याला अर्थ आणि दिशा दोन्ही मिळेल.

===============

प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *