Ritbhatmarathi

Search
Close this search box.

रुपल…ए …रुपल…तो “eye shadow” दे बरं आणून….काल तू घेतला होतास ना माझ्याकडून…जेवढा घाण make up करता येईल तेवढा घाण मेकअप करायचाय मला…” स्वाती खूपच लगबगीने मेक अप चढवता चढवता म्हणत होती.

रुपल जांभई देत बेडरूमच्या बाहेर आली आणि आय शॅडो आपल्या आईच्या हातात देत, ”आई ….अगं घड्याळात ११ वाजून गेलेत…आणि लवकर ये गंमी आणि आजी दोघीच आहोत घरी…”

इतक्यात सुलोचना आजी व्हीलचेअर वर बसून बाहेर आल्या, ”लवकर ये गं पोरी….एक तर घरात दुसरा पुरुष माणूस नाहीय…अनिरुद्ध आहे पण त्याचीही फिरतीची नोकरी आहे म्हणून तुलाच बाहेर एकटीला आत्ता जावं लागतंय..नाहीतर तो आला असता तुला सोडवायला..तू खमकी आहेस म्हणून निभावून नेतेस सगळं ”

स्वाती आपल्या रूममधून बाहेर येते. दोघी आजी आणि नात स्वातीकडे पाहून अवाक होतात..स्वातीचा अवतारच तसा असतो…विस्फारलेले केस, आय शॅडो डोळ्यांच्या बाहेर जास्त लावलेली असते जेणेकरून समोरचा पाहून पटकन घाबरून जाईन आणि अंगाला दुर्गंधीयुक्त काहीतरी लावलेला वास. स्वाती दिसायला खूपच सुंदर शिवाय पेशाने डॉक्टर, स्वतःचं हॉस्पिटल सांभाळणारी त्यामुळे कायम emergency असेल तर स्वातीला रात्री-अपरात्री बाहेर जावं लागायचं आता विचार करा कुठल्या सुंदर  दिसणाऱ्या बाईला आपण कुरूप होऊन बाहेर जावसं वाटेल, आपण साधं नाक्यावर भाजी आणायला जरी गेलो तरी पावडरचा पफ गालावर फिरवल्याशिवाय जात नाही, आरसा नसला तरीही मोबाईलच्या कॅमेऱ्याला आरसा समजून आपला चेहरा न्याहाळत असतो मग घाणेरडा मेक अप करून बाहेर कशा पडू ..? स्वाती मात्र याला अपवाद असं का बरं…

स्वाती बाहेर आल्या-आल्या आपल्या लेकीला म्हणाली..”कशी दिसतीय मी ?”

तशी रुपल पटकन म्हणाली, ” मम्मा….यू आर लूकिंग सो डर्टी …”

सुलोचना आजी..” काही डर्टी वगैरे नाही…हे बाहेर मोकाट सुटलेले जनावर काय समजतात काय माहिती…बाईच्या जातीनं सुंदर दिसू नये, या जगाच्या नजरा खूपच वाईट आहेत..रात्री घराच्या बाहेर पडावं म्हटलं तर हि नराधम आहेच टपलेली शरीराचं लचके तोडायला…अगदी त्यासाठीच आसुसलेलीच असतात …” आज्जीचं बोलणं चालूच असतं.

स्वाती….” आई आता कितीतरी वर्ष झाले…मी हॉस्पिटल चालवतीय…१५ वर्ष झालीत कि हो…नका काळजी करू…येईल मी लवकर…आणि अनिरुद्धही येईलच कि आत्ता..” असं म्हणून दोघींचाही निरोप घेऊन..स्वाती निघाली. स्वाती अगदी काही मिनिटातच हॉस्पिटलमध्ये पोहोचली..

हॉस्पिटल मध्ये एका मुलीला ऍडमिट केलं होतं कारण का ? तर…तिच्यावर अत्यंत क्रूर पद्धतीने बलात्कार केला होता…वय साधारण १५-१६ असेल…पांढराशुभ्र ड्रेस तिचा रक्ताने माखला होता…केस पिंजारलेले …शरीराचे लचके तोडलेले अशा अवस्थेत तिला ऍडमिट केलं होत…स्वातीचं मन अगदी छिन्न विछिन्न झालं होत..

खरंच बाईने सुंदर असू नये का ? आपली सुंदरता तिला लपवावी लागते ती असं घाणेरडा मेक अप करून…कुणासाठी लपवावी तर पुरुषांच्या घाण नजरे साठी…..

म्हणूनच ज्या-ज्या पालकांना मुली आहे त्यांनी अशा पद्धतीने खमकं बनवायचं, जेव्हा मुलगी १० वर्षाची होईल त्या वयात ३० वर्षाच्या पुरुषाला धूळ चाखेल इतकं बळ तिच्या मुठीत आणलं पाहिजे..तेवढी स्ट्रॉंग बनवली पाहिजे… इंडिपेंडन्ट बनवलं पाहिजे त्यासाठी पुढील मुद्दे लक्षात घ्यावे…. 

शिक्षण 

नोकरी

स्वसंरक्षण  

वरील त्रिसूत्री जरी आपल्या मुलींना शिकवली तरी जगाशी दोन हात करण्याची धमक मुलींमध्ये निर्माण होईल.

==============

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories