Ritbhatmarathi

Search
Close this search box.

म्युच्युअल फंड म्हणजे काय? | म्युच्युअल फंड गुंतवणूक कशी करावी? | types of mutual funds

म्युच्युअल फंड म्हणजे काय? | म्युच्युअल फंड गुंतवणूक कशी करावी? | types of mutual funds | Mutual Funds in Marathi

Mutual fund ही एक अशी गुंतवणुक आहे ज्यामध्ये सोयीने कित्येक गुंतवणूकदार एकत्र येऊन एका माध्यमातून गुंतवणुक करतात. अर्थात हे एक माध्यम आहे ज्यामधून प्रत्येक गुंतवणुकदार आपल्या सोयीनुसार हव्या त्या कालावधीसाठी त्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या फायद्या नुसार आपले पैसे गुंतवतो. वेग वेगळ्या कंपन्या आपली गुंतवणूक वेग वेगळ्या क्षेत्रात करतात. प्रत्येक कंपनीचा स्वतःचा असा एक सेक्टर असतो ज्यामध्ये ती मोठी सुरक्षित गुंतवणूक करते. खाली दिल्यानुसार विविध म्युच्युअल फंड गुंतवणूक पर्याय (types of mutual funds)उपलब्ध आहेत.

जाणून घेऊ या म्युच्युअल फंड म्हणजे काय? म्युच्युअल फंड गुंतवणूक कशी करावी? आणि त्याची संपूर्ण माहिती. तसेच Mutual Fund व्यतिरिक्त उपलब्ध असलेले बहू पर्याय पर्याय जाणून घेऊ या.

1. म्युच्युअल फंड म्हणजे काय?

म्युच्युअल फंड (mutual funds) हे एक माध्यम आहे ज्यामधून प्रत्येक गुंतवणुकदार आपल्या सोयीनुसार हव्या त्या कालावधीसाठी त्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या फायद्या नुसार आपले पैसे गुंतवतो. यामध्ये एकत्रित केलेल्या सगळ्या गुंतवणुकीतून सुरक्षित असे स्टॉक्स, बॉण्ड्स मध्ये मोठी गुंतवणूक केली जाते ज्यामुळे येणारा परतावा त्या प्रमाणात मोठा येतो.

जेव्हा आपण एक गुंतवणूक करताना एखादे युनिट किंवा शेअर एखाद्या म्युच्अल फंड कंपनीचे खरेदी करतो तेव्हा आपण एकप्रकारे त्या कंपनी कडून गुंतवणूक होणाऱ्या वेग वेगळ्या स्टॉक,बाँडच्या पोर्टफोलिओ चा पार्ट विकत घेतो आहोत यपद्धतीने व्यवहार होतो.

याचाच अर्थ प्रत्येक कंपनी अपल्या गुंतवणुकीचा एक पोर्टफोलिओ गुंतवणूकदार साठी उपलब्ध करून देते त्या आधारे गुंतवणूकदार आपली गुंतवणूक करायची की नाही हे त्या पोर्टफोलिओ मध्ये असलेल्या परताव्या वरून किंवा खात्रीलायक खरेदीवरून स्वतः ठरवतो आणि पुढे गुंतवणुक करतो.

स्टॉक्स मध्ये केलेली गुंतवणुक ही इकडे म्युच्युअल फंड मध्ये केलेल्या गुंतवणुकी पेक्षा वेगळी असते.इथे कुठला व्होटिंग राईट नसतो याचा अर्थ एकाच ठिकाणी गुंतवणूक केलेली नसून जास्त ठिकाणी केलेली असते त्यामुळे परतावा हा स्थिर असतो. नेट ॲसेट वेल्यु नुसार इथे प्रत्येक शेअर ची किंमत असते ज्यामध्ये गुंतवणूक केलेल्या प्रत्येक कंपनी मधील स्टॉक ची एक आधारभूत एकत्रित किंमत ठरवून व्यवहार केले जातात. साधारणतः तीन प्रकारे कंपनी परतावा देते.

१. भाग धारकांना वाढलेल्या स्टॉक प्राईस नुसार डिस्ट्रिब्युशन च्या माध्यमातून म्हणजेच दोन पर्याय देत ,एक तर डायरेक्ट परतावा किंवा आणखी जास्त गोंतवणुक करण्याचा पर्याय.
२. जर फंड ने एखादी भाग किंमत वाढली म्हणून विकला तर जो प्राथमिक (कॅपिटल गेन) फायदा समोर येतो त्यातून कित्येक कंपन्या आपल्या गुंतवणूकदारना परतावा देतात.
३.समजा जर एखादी स्टॉक किंवा बाँड ची किंमत वाढली पण फंड कंपनीने शेअर्स विकण्याऐवजी तसेच गुंतवणूक कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्यास गुंतवणूकदारांना हवे असेल तर फंड कंपनीच्या शेअर ची किंमत वाढते आणि गुंतवणूकदार हे शेअर विकून आपला परतावा मिळवू शकतात.

2. म्युच्युअल फंड गुंतवणूक पर्याय | types of mutual funds

वेग वेगळ्या कंपन्या आपली गुंतवणूक वेग वेगळ्या क्षेत्रात करतात. प्रत्येक कंपनीचा स्वतःचा असा एक सेक्टर असतो ज्यामध्ये ती मोठी सुरक्षित गुंतवणूक करते. चला तर जाणून म्युच्युअल फंड गुंतवणूक बहू पर्याय (types of mutual funds)

2.1. इक्विटी | equity funds

काही कंपन्या या स्टॉक्स खरेदी करून गुंतवणूक करतात .यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगिरी मध्ये गुंतवणूक केली जाते.जास्त रिस्क आणि जास्त परतावा, फिक्स परतावा देणाऱ्या कंपन्यांचे स्टॉक्स. नियमित वाढ होणाऱ्या कंपन्यांचे खात्रीलायक शेअर्स. कमी वेळेत जास्त परतावा देणारी गुंतवणूक.मोठ्या काळासाठी केली जाणारी गुंतवणूक अशी वेग वेगळ्या वर्गात त्याची विभागणी केलेली असते.

2.2. फिक्स्ड इन्कम फंड | fixed income mutual funds

हि एक अशी गुंतवणूक आहे ज्यामध्ये एकदम स्थिर परतावा मिळतो.यामध्ये कंपनी सरकारी बॉण्ड्स,कंपन्या,यामध्ये गुंतवणूक केली जाते ज्यामध्ये फिक्स्ड परतावा भागधारकांना दिला जातो.

2.3. इंडेक्स फंड | indexed funds

ही खूप कॉस्ट सेन्सिटिव्ह गुंतवणूक आहे यामध्ये मार्केट इंडेक्स नुसार मोठ्या प्रमाणात महाग गुंतवणूक केली जाते. पण या गुंतवणुकीसाठी जास्त एक्सपर्टचा वगैरे सल्ला लागत नसल्यामुळे परतव्यामध्ये असलेल्या भागांची संख्या कमी होते आणि जास्त परतावा मिळतो.

2.4. मनी मार्केट फंड | market money

 ही एक सुरक्षित,अल्पकाळ परतावा असलेली गुंतवणूक आहे.यात जास्तीत जास्त सरकारी ट्रेझरी बिल्स मध्ये गुंतवणूक केली जाते.जास्त रिस्क नसलेली पण त्यामुळे मोजका नफा करून देणारी ही एक सुरक्षित गुंतवणुक आहे.

2.5. आंतरराष्ट्रीय फंड | International funds

आपल्या स्वदेश बाहेर विविध ठिकाणी ही गुंतवणूक केली जाते.आता ती किती सुरक्षित आहे किंवा आपली डोमेस्टिक केलेल्या गुंतवणुकी पेक्षा केवढी फायदेशीर आहे हे आधी भाकीत करता नाही येत पण खर पाहता ही गुंतवणूक आपल्या वैविध्पूर्ण गुंतवणुकीमुळे अधिक सुरक्षितता आणते.

आणखी पण भरपूर प्रकार म्युच्युअल फंडात पाहायला मिळतील. या दशकामध्ये आधुनिक गुंतवणूक म्हणून इकडे पाहिलं जात आहे.

3. टर्म इन्शुरन्स | Term Insurance | Life Insurance

टर्म इन्शुरन्स हा एकप्रकारचा साधा लाईफ इन्शुरन्स म्हणता येईल फक्त इथे जर गुंतवणूकदराचा काही कारणामुळे इन्शुरन्स कालावधी दरम्यान मृत्यू झाला तर कंपनी नोमिनी ला म्हणजेच वारसदाराला पूर्ण भरपाई आपल्या नियमानुसार द्यायला बधील असते.

वैशिष्ट्य :

१. लाईफ इन्शुरन्स पेक्षा टर्म इन्शुरन्स बरीच स्वस्त असतात.उदा.१ करोड रुपयांच्या लाईफ कव्हर साठी अगदी ₹४४१ दरमहा प्रीमियम भरता येतो.हे फक्त उदाहरण आहे.पण साधारणतः बरीच स्वस्त असते.

२. काही कंपन्या या इन्शुरन्स मध्ये तुम्ही जिवंत असताना सुद्धा काही नियमसहित फॅमिली प्रोटेक्शन देते जिथे कॅन्सर सारखे रोग समाविष्ट केलेले आहेत .

३.घरातील एकमेव कमावता व्यक्ती असणारा भागधारक काही कारणामुळे मृत झाला तर त्याच्या पश्चात उचलेले लोन इत्यादी कव्हर करण्यासाठी टर्म इन्शुरन्स मधून मिळालेला निधी सहाय्य करत.

4. हेल्थ इन्शुरन्स | Health Insurance

हेल्थ इनशुरन्स हे हॉस्पिटल कॉस्ट, मेडिकल बिल, डॉक्टर्स फीस इत्यादी गोष्टी कव्हर करत.त्याचे सुद्धा विविध प्रकार आहेत खालीलप्रमाणे.

4.1. Mediclaim

हा अतिशय बेसिक हेल्थ इन्शुरन्स प्लॅन आहे.यामध्ये हॉस्पिटल मध्ये येणारे सगळे खर्च हे ओरिजनल पावत्या सादर करून झालेला खर्च नियमांच्या आधारे दिला जातो .यामध्ये सहसा फॅमिली सपोर्ट सुद्धा जोडलेला असतो.

4.2. क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स | critical life insurance

क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स (critical life insurance) वैशिष्टयपूर्ण इन्शुरन्स आहे.यामध्ये ठराविक रोगासाठी कव्हर देणार येत.पण यामध्ये हॉस्पिटल बिल ऐवजी रोगाचं निदान झाल्यानंतर राहणीमान बदलासाठी तसेच मेडिसिन बदलासाठी लागणारे पैसे दिले जातात ज्यामुळे जास्ती दिलेली पैसे राहणीमान बदलण्यासाठी उपयोगात आणता येतात.ही एक अतिशय फ्लेक्सीबल इन्शुरन्स प्लॅन आहे.

5. होम लोन | home loan for plot purchase | home loan for buying land

हे एक अस लोन आहे ज्यामध्ये कुठलीही व्यक्ती एका बँकेकडून किंवा कंपनीकडून आपल्या घरासाठी बांधकामासाठी काही पैसे एका ठराविक व्याजदरात दरमहा ई एम आय वर परतावा करण्याचा वायदा करून घेतो.त्यासाठी ती ठराविक प्रॉपर्टी सुरक्षितता म्हणून बँकेकडे गहाण ठेवली जाते.काही कारणास्तव ठराविक काळात परतावा देण्यात ग्राहक असमर्थ ठरल्यास त्या प्रॉपर्टी विकून आपला पैसा परत मिळवण्याचे कायदेशीर हक्क त्या बँकेला असतात.होम लोन चे सुद्धा विविध प्रकार असतात ते खालीलप्रमाणे :

१.होम पर्चेस लोन (होम लोन): हे लोन घर विकत घेण्यासाठी ग्राहक घेतात.

२.होम इम्प्रुवमेंट लोन : हे लोन राहत घर डागडुजी तसेच रीनोवेट करण्याचा खर्च कव्हर करत.

३.होम कन्स्ट्रक्शन लोन : हे लोन घर बांधकाम साठी घेण्यात येत.मोठ्या प्रमाणावर या लोन ची मागणी असते.

४. Land पर्चेस लोन (home loan for buying land) : कोणी ग्राहक आपला स्वतः च घर बांधण्यासाठी स्वतःची एखादी जागा घेऊ इच्छित असतं त्यांच्यासाठी हे लोन उपलब्ध आहे.

म्युच्युअल फंड व्यतिरिक्त काही परिचित पण मागणी असलेल्या गुंतवणुकी खालीलप्रमाणे:
6.सुवर्ण ,चांदी खरेदी

पुरातन काळापासून सोने हा धातू अलांकरासाठी प्रसिद्ध आहे. आणि काळानुसार त्याची किंमत सुद्धा वाढली.अगदी आतापर्यंत शुभकार्य असेल किंवा आणखी काही कार्य असेल तर ते सोन्याशिवय अपूर्णच! पण मागच्या काही काळापासून ते नुसत अलंकार पुरतेच मर्यादित न राहता एक गुंतवणुकीचा पर्याय म्हणून समोर आले आहे. एक अतिशय सोयीचं आणि सुरक्षित अस साधन म्हणून सोन्या चांदिमध्ये गुंतवणुकीचा पर्याय सर्व सामान्यांपासून अगदी श्रीमंत गुंतवणूकदारांना आकर्षित करत.

7. जमीन खरेदी

पुढील काळात जसे जसे जमिनी चे भाव वाढतायत ते पाहून एक सुरक्षित आणि महत्त्वपूर्ण गुंतवणूक म्हणून सुद्धा बरीच जनता जमीन खरेदी कडे वळली आहे.रिअल इस्टेट मध्ये मिळणारा ठोक पैसा फिक्स परतावा शिवाय व्यवहार स्वातंत्र्य इत्यादी गोष्टी याला कारणीभूत आहेत पण एक परफेक्ट गुंतवणूक म्हणून याच्याकडे पाहता येत.

8. एफ डी (FD), आर डी (RD)

भारत जेव्हा २००० सालात एकविसाव्या शतकात प्रवेश करत होता तेव्हा जागतिक स्थानावर पूर्ण चढा आलेख असलेली अर्थव्यवस्था जगासाठी आकर्षक ठरत होती.जसे जसे नोकऱ्या सरकारी तसेच भांडवली क्षेत्रात वाढू लागल्या तसे तसे सोने आणि जमीन वगळता काही मंडळी बँकेकडे गुंतवणुकीसाठी वळली.

बँकेने फिक्स डीपोसिट (FD) सेवा आणली. यामध्ये वार्षिक ठराविक रकमेवर काही प्रमाणात व्याज देण्याचे ही योजना यशस्वी ठरली. घरी साठवणूक करण्यापेक्षा बँकेत एफ डी (FD) मध्ये केलेली गुंतवणुक अगदी आतासुद्धा चांगलीच प्रचलित आणि लोकप्रिय आहे. कालांतराने भारतीय डाक सुद्धा या क्षेत्रात उतरलं आणि आकर्षक व्याजदर आणि परतावा देण्याने भरपुर लोकांचा कल तिकडे वाढू लागलं.

आर डी (RD) मध्ये सुद्धा गुंवणूकदारांना विशिष्ट कालावधीसाठी मासिक गुंतवणूक करता येते.. गुंतवणूकदार त्यांच्या सोयीनुसार ठेवीचा कालावधी आणि मासिक पेमेंट रक्कम निवडू शकतात. RD योजना सामान्यतः मुदत ठेव योजनांपेक्षा अधिक लवचिक असतात आणि विशेषतः ज्यांना पैसे वाचवण्यासाठी आणि पावसाळी दिवस निधी उभारण्यासाठी खाते सुरू करायचे असते त्यांना प्राधान्य दिले जाते.

9. स्टॉक्स, क्रिप्टो करन्सी

अत्याधुनिक गुंतवणुकीचे पर्याय म्हणून स्टॉक्स आणि क्रिप्टो करन्सी यांच्याकडे पाहिलं जात. वरती म्युच्युअल फंड बद्दल माहिती सांगताना स्टॉक्स बद्दल तर कल्पना आली असेल ,इथे फक्त आपण फंड कंपनी ऐवजी स्वतः वयक्तिक रित्या हवे त्या कंपनी चे शेअर्स खरेदी करून हवे तेव्हा ते विकू शकतो. एवढंच काय तो फरक. यापेक्षा वेगळे आणि आधुनिक गुंतवणूक म्हणून पुढे आलेला पर्याय म्हणजे ही क्रीप्टो.तर क्रिप्टो करन्सी ही एक डिजिटल चलन आहे. बिटकॉईन, इथर इत्यादी.

याची उदाहरण! अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण जेव्हा पैसे घेतो ते आपल्याला कोण पुरवत तर बँक, यामध्ये व्यवहार शुल्क म्हणून काही शुल्क आकारला जातो, तो शुल्क टाळण्यासाठी हा पर्याय बराच लोकप्रिय झाला आहे ,यामध्ये कुठला कॉइन किंवा नोट उपयोगात येत नाही ,सगळे देवाण घेवाण ही ऑनलाइन म्हणजेच डिजिटली होते.यामध्ये कुठलाही बँकेसारखा मधला दुवा असतं नाही. त्यामुळे हवे तेव्हढे निःशुल्क पैसे यामाध्यमातून चलनात आणतात.

तर बरीचशी मंडळी याच्याकडे गुंतवणूक म्हणून पाहतात आणि भाव वाढण्याची वाट बघत हे चलन साठवून ठेवतात.आता हे चलन साठवायचे कुठे तर डिजिटल वॉलेट मध्ये, किंवा हार्ड ड्राईव्ह मध्ये ,आपल्या डिवाईस मध्ये.पण यामध्ये एक धोका संभवतो,जर चुकून स्टोअर केलेलं हार्ड ड्राईव्ह किंवा कॉम्पुटर इत्यादी हॅक झाला किंवा काही कारणामुळे डिजिटल वॉलेट हॅक झालं तर मात्र माध्यम नसल्यामुळे कुठेच तक्रार करता येत नाही,शिवाय काही फसवणूक झाली तरी दाद मागायला इथे कोणती जबाबदार सरकार किंवा बँक नाही त्यामुळे यामध्ये थोडी रिस्क मात्र आहे.

अशाप्रकारे आपण म्युच्युअल फंड, म्युच्युअल फंड गुंतवणूक पर्याय (types of mutual funds) आणि इतर गुंतवणुकीचे उपलब्ध पर्याय बघितले. ह्या बद्दलची अजून सविस्तर माहिती हवी असल्यास आम्हाला खाली कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. लेख आवडल्यास, लेख शेयर करायला विसरू नका.

हे देखील वाचा:
IPL 2021 in marathi | आयपीएल 2021
मुखी तांबूल देते तुजला…
सौभाग्याचं लेणं…’ टिकली ‘…लावा पण जरा जपून…
Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *