Ritbhatmarathi

Search
Close this search box.

मुग्धा चिडून परत निघून गेली याची खबर जशी रमेशरावांना लागते तसे रमेशराव मुग्धाला शोधू लागतात…सगळं गाव शोधू लागायला माधवही तयार राहतो….माधव आपल्या बाईकवर बसून निघतो…मुग्धा आपल्या गावामधल्या गणपतीच्या मंदिरात जाऊन बसते….मंदिरातल्या एका कोपऱ्यात मुग्धा रडत बसलेली असते…माधवला काही मुग्धा सापडत नाही…पूर्ण रात्र माधव मुग्धाला शोधत फिरतो…शेवटी दमून त्याच मंदिरात माधव थांबतो पण मुग्धा रडून रडून केव्हाच झोपी गेलेली असते म्हणून मुग्धाला कुणी आल्याचीही चाहूल लागत नाही विशेष म्हणजे माधवलाही मुग्धा दिसत नाही याच कारण असं की मुग्धा एक भलीमोठी जी अडगळीची खोली प्रत्येक देवळात असते त्याच खोलीत मुग्धा झोपलेली असते..खोलीमध्ये असतं ते फक्त सतरंज्या…पखवाज…टाळ यांचं वास्तव्य…आणि विशेष म्हणजे डासांचं साम्राज्य तरीही मुग्धा गाढ झोपलेली असते…माधवही जोपर्यंत मुग्धा सापडत नाही तोपर्यंत घरी न जाण्याचा चंग बांधतो…जवळ-जवळ अर्धा तास होतो तरीही माधव देवळातच बसून राहतो…आणि स्वतःशीच पुटपुटतो…

माधव – देवा…आजपर्यंत मी तुला काहीच मागितलं नाही…आज तुला माहिती असेलच…मी इथं कशासाठी आलोय ते…देवा तुला जाणून घ्यायचं नसेल तरीही मी सांगतो आणि तू ऐक…’ माझं मुग्धावर खूप प्रेम आहे…खरंच…आज मी देवा तुझ्यासमोर माझ्या प्रेमाची कबुली देतोय …तीच जर काही बार वाईट झालं तर मी आयुष्यात स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार…मला मुग्धाला परत मिळवण्यासाठी ताकत दे…शक्ती दे..

माधव देवासमोर आपलं गाऱ्हाणं मांडत असतो इतक्यात अडगळीतल्या खोलीत एका डासाने मुग्धाची झोप उडवली…मुग्धा खाडकन जागी झाली…आणि म्हणाली …

मुग्धा – काय पण इथं पण शांतपणे झोपून देत नाही…

तेवढ्यात मुग्धाला बाहेर देवळाच्या सभामंडपात कुणीतरी असल्याची जाणीव झाली…नाही तसा मुग्धाच्या कानावर कुणीतरी बोलण्याचा आवाज येऊ लागला…मुग्धा खूप शांतपणे सगळं ऐकत होती…

माधव – आत्तापर्यंत मुग्धाविषयी माझ्या मनात एक तिरस्कार होता….तो तेव्हापासून जेव्हा मुग्धा माझ्या गाडीसमोर येऊन धडकली आणि मला पाहताच क्षणी तिने अपशब्दांचा भडीमार सुरु केला…चूक तिची असताना ती मला बोलू लागली मग आला मला राग…तेव्हापासून जेव्हा जेव्हा ती मला दिसली त्या त्या वेळेला आमच्यात जास्त वादच झाला…मला काही तिच्याशी वाद घालायचा नव्हता पण ती माझ्याबरोबर अशी काही वागायची की तिला मी एक श्रीमंत घरातला बिघडलेला मुलगा वाटायचो म्हणून मला खूप मनाला लागून जायचं…पण कशीही असली तरीही मला तिची म्हणजेच मुग्धाची सोबत हवीय…आणि तीही आयुष्यभर…

मुग्धा – अरे…एवढा बदल कसा काय झाला…नावालाच आहे की काय हा बदल…

खोलीतून मुग्धा हळूच पुटपुटत होती…माधवाचेही देवापुढे गाऱ्हाणे घालणं सुरूच होतं…काही वेळातच पहाटे पाचचा टोल ऐकू आला…मंदिरामध्ये पुजाऱ्यांची वर्दळ सुरु होणारच होती…तेवढ्यात एक पुजारी अडगळीच्या खोलीमधून काहीतरी आणण्यासाठी येतंच होता…तिथेच त्या पुजाऱ्याला माधव दिसला…पुजारी म्हणाला…

पुजारी – इथं गावातली तरणी पोर काही जास्त येत नाही बाबा…तुम्ही कसे काय अचानक दिसलात इथे…मला माफ करा पण तुम्ही तर आईसाहेबांचे सुपुत्र ना…?

माधव – होय…माधव माझं नाव…

पुजारी – कालच्या पार्टीत बराच माज दाखवला म्हणे तुम्ही…गरीब घरातून तुमच्याशी लग्न करून आलेल्या पोरीला म्हणजेच मुग्धाला….

माधव – तुम्हाला कसं माहिती…?

पुजारी – सगळीकडं बोभाटा झालाय…काय समजलात…आईसाहेबांमुळं पत्रकार शांत आहेत…नाहीतर केव्हाच गाजावाजा झाला असता तुमचा…

माधव – काहीही करून मुग्धा सापडली पाहिजे…नाहीतर माझ्या आईला मी माझं तोंड नाही दाखवू शकणार…

पुजारी – तुम्हाला उपरती झालीय हे खूप आहे…आज तुमच्या हाताने देवाला अभिषेक घाला म्हणजे तुमची मुग्धा तुम्हाला मिळेल…

माधव – पण मी तर अंघोळ पण नाही केलीय…

पुजारी – थांबा…मी तुमच्यासाठी कपड्यांची व्यवस्था करतो…तुम्ही नदीतीरावर जाऊन अंघोळ उरकून घ्या…

पुजारी काका कपड्यांची तजवीज करण्यासाठी म्हणून अडगळीच्या खोलीपाशी जातात….मुग्धाला कुणीतरी येतंय याची चाहूल लागते तोच मुग्धा पटकन एक मोठ्या पोत्याच्या आड लपून बसते…पुजारी काकांनाही याची कुणकुण लागते…मग चोरपावलाने पुजारी काका पोत्याच्या मागे जाऊन थांबतात…मुग्धा आपलं शरीर चोरून बसलेली असते म्हंणून तिला काही कळत नाही पण पुजारी काका मुग्धाला लहांपणीपासूनच ओळखत असल्याने पुजारी काका म्हणतात…

पुजारी – बस की आता…किती लपून बसशील…

मुग्धा – [ खूप घाबरते ] काका…तुम्ही इथे कसे…आणि माधव कुठे गेलेत…!
पुजारी – मीच अंघोळीला पाठवलाय त्यांना तेही नदीवर…तुझ्या नावाने अभिषेक करणारेय आज गणपतीला…

मुग्धा – काही करू नका म्हणावं अभिषेक वैगेरे…खूप चूक झाली माझ्याकडून लग्न करताना नाही म्हणाले असते तर फार बरं झालं असतं…पण दुसरीकडे चांगला माणूसही सापडला मला यांच्यामधला…कारण एकदा कारखान्यामध्ये कामगारांच्या पगारामध्ये अफरातफर करताना तिथल्या मॅनेजरला यांनीच रंगेहात पकडून त्याच्या मुसक्या आवळल्या…आणि दुसरं म्हणजे मला त्या दिवशी त्यांनी एकटं रानात राहू दिलं नाही तेही माझ्या काळजीपोटी शिवाय याआधी आमचं नेहमी भांडण झालंय…आणि ते विसरून यांनी माझी नेहमी मदतच केलीय…हे सगळं विसरून कसं बरं चालेन…मग मलाही यांच्याशिवाय चैन नाही पडत…आधीपासूनच मामीचा जाचंच सहन करत आलीय…आता इथून पुढेही असाच नवऱ्याचा म्हणजे आपल्या माणसांचा जाचंच सहन करायचा की काय…
आता मुग्धा हे सगळं पुजारीकाकांना सांगत असते….पण त्या अडगळीच्या खोलीबाहेर माधव अंघोळ करून केव्हाच आलेला असतो याची तसूभरही कल्पना मुग्धाला आणि पुजार्यांना नसते…एवढं सगळं ऐकून माधवला जाणीव होते की आपली बायको आपला तिरस्कार करत असली तरीही मनातून आपल्यावर खूप प्रेम करतेय…त्याच वेळी माधव आतमध्ये येतो आणि म्हणतो…

माधव – होय…इथून पुढेही तुला माझा जाचंच सहन करायचाय…

मुग्धा – माधव…तुम्ही केव्हा आलात…?

माधव – जसं काय तुला काहीच माहिती नाहीय असं दाखवतेय…

मुग्धा – एवढा जर माझा विचार करता मग माझ्याशी का बरं सारखं सारखं वाद घालत असता…हे चांगलं नाहीय…

माधव – आम्ही करतो ते सगळं वाईट आणि तू जरासं काही खट्ट झालं की घर सोडून निघून जायचं हे चांगलंय नाही का…मी हक्काच्या माणसांनाच फक्त सांगत असतो तेही चांगल्यासाठीच…चल इथून निघालेलं बरं आता…नाहीतर घरचे पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतील…वरून तुझ्या मामी आहेतच तिखट मीठ लावून सांगायला…

माधव मुग्धाच्या हाताला पकडून तिथून घेऊन जाऊ लागतो…तेवढ्यात पुजारी काका म्हणतात…” अहो माधव साहेब…गणपतीला आज तुमच्या हातून अभिषेक घालायचा होता…राहिलं का मग ते…ते म्हणतात ना अंगाला भरला ताप…देवा तू माझा बाप…अंगाचा गेला ताप..आता मी तुझ्या बापाचा बाप..” तेवढ्यात माधव म्हणतो…” देबाप्पा…आज सहकुटुंब सहपरिवार येणार अभिषेक घालायला…मग तर झालं…” पुजारी काका म्हणतात…” ठीक आहे…ठीक आहे…या या…अवश्य या…मी सगळी तयारी करून ठेवतो…मग तर झालं…” एवढं ऐकून माधव मुग्धाला घेऊन आपल्या दुचाकीवर बसवतो…आणि मुग्धा म्हणते…

मुग्धा – अहो….चेहरा साडीच्या पदराने लपेटून घेऊ का…?

माधव – आता कशासाठी…तू माझी ऑफिशिअली लग्नाची बायको आहे…काहीही विचारू नकोस …

मुग्धा – आता….परत कशासाठी चिडताय…?

मुग्धाची जशी बडबड सुरु होईल तसं माधव तिला गप्प करण्यासाठी गाडीचा ब्रेक खच्चकन दाबत आणि मुग्धा आपोआपच घाबरून माधवच्या खांद्याला पकडत असे…कधीही न झालेला तो स्पर्श हळू हळू का होईना पण मुग्धाला सुखावत होता…असे भांडत भांडत दोघेही एकदाचे घरी पोहोचले…घरी मुग्धाचे मामा मामी आणि रेश्मा निंबाळकरांच्या बंगल्यावर केव्हाच येऊन थांबले होते…माधव गेल्या गेल्या सगळ्यांच्या समोर आपल्या आईला म्हणाला…

माधव – आईसाहेब….सर्वांनी आपापल्या आंघोळ्या आटोपून गणपतीच्या मंदिरात जाऊन तयार राहा…कारण आज आपल्या हातून गणपतीला अभिषेक आहे….

आईसाहेब – अरे पण असं अचानक काहीच सांगितलं नाही गुरुजींनी मला…याबद्दल…तू कधी गेलास मंदिरात…?

माधव – तुमच्या लाडक्या सुनबाईंना विचारा…

आईसाहेबांना मुग्धा घडलेलं सगळं जसच्या तसं सविस्तर सांगते…अभिषेक खास मुग्धा सापडावी म्हणून माधवनेच घालण्याचं पुजारी काकांसमोर कबूल केलं होतं हे समजताच आईसाहेब मुग्धाला आणि माधवला समजावून सांगतात….

आईसाहेब – मुग्धा…बाळा तुझ्याबद्दल यत्किंचितही माझ्या मनात किल्मिष नाहीत…तरी तू निघून जाण्यापूर्वी जरा माझा विचार नाही करावासा वाटला तुला…कुठल्या नवरा बायकोमध्ये वाद नसतात गं…घरोघरी मातीच्या चुली असं म्हणतातच ना…मग एवढा का डोक्यात राग घालून घ्यायचा…?

माधव – कसंही वागायचं लायसनच मिळाय आम्हाला नाही का…मुग्धा…?

आईसाहेब – मी फक्त तिलाच नाही सांगत आहे…तुला हि सक्त बजावलाच पाहिजे आता…आपल्या बायकोला चारचौघात असं अपमानास्पद बोलू नये…इथून पुढे हि खूणगाठ बांधून ठेव तू

माधव…उकिरड्यावर राहणारी असं तू काल मुग्धाला म्हणालास…याचा अर्थ काय होतो ठाऊक आहे ना तुला…हे तुला शोभलेलं नाहीय….याची शिक्षा तुला भोगावीच लागणार…
माधव – आता कसली शिक्षा देणार तू मला…

आईसाहेब – पडलास का कोड्यात…! अरे…दोघांनी जोडीनं आज गणपतीला अभिषेक घालायचाय…मुग्धा जा यावरून घे पटकन कालच्याच अवतारात दिसतीय…आम्हीही आवरून येतो….आणि तिथे मागणं मागा देवाला वर्षभरात पाळणा हळू देत घरात…

तेवढ्यात मुग्धा लाजून घरात जाते…आणि काही वेळातच जरतारी साडी नेसून तयार होऊन येते…काही मिनिटातच सगळे जण गणपतीच्या मंदिरात अभिषेकासाठी येऊन तयार राहतात… ..अभिषेक करून झाल्यावरती सगळे जण जेवणासाठी एका आलिशान हॉटेल मध्ये जातात तिथे…मनसोक्त काहून झाल्यावर…आईसाहेब मुद्दाम माधव आणि मुग्धाला आपलं रान आणि जमिनी माहिती करून देण्यासाठी शेतात नेतात…तोपर्यंत संध्याकाळ होऊन जाते…निंबाळकरांच्या घरी….मात्र सजलेला पलंग…हार्ट शेपच्या बलून ने सजलेली रूम मुग्धा आणि माधवची वाट पाहत असते…मुग्धाला हा हि एक सुखद धक्काच असतो …म्हणून मुग्धा आपली बेडरूम नव्याने न्याहाळत असते…इतक्यात माधव चोरपावलाने मागून येऊन मुग्धाला आपल्या घट्ट मिठीत घेतो…आणि हळूच तिच्या ब्लाउजचे नॉड्स काढू लागतो…मुग्धाही त्या रात्री अगदी तनमन सर्व माधवला सोपवते आणि माधवच्या त्या मिठीत स्वतःला झोकून देते…माधव आपल्या बायकोला जवळ घेऊन विचारतो…

माधव – वळकटी देऊ आणून आता…खाली झोपायला…

मुग्धा – माधव….[ माधवच्या मिठीमधून स्वतःला सोडवू पाहते पण माधव मुग्धाला सोडत नाही ] सोडा ना…मी खालीच बरीय…जाऊ देत नको मला तुमच्या बरोबर हा बेड शेअर करायला…

माधव – अगं मी मस्करी करत होतो…

मुग्धा – हा कळली तुमची मस्करी…
असं म्हणून मुग्धा आपसूकच लाजेने माधवच्या कुशीत आपला चेहरा लपवून घेते…