Ritbhatmarathi

Search
Close this search box.

घरातली सगळी कामं करून शार्ली ने माधव ला आणि आईसाहेबांना तर आपल्या जाळ्यात ओढलं खरं…पण म्हणतात ना मांजर कितीही डोळे झाकून दूध पित असलं तरीही त्याला वाटतं कि आपल्या कडे कुणाचंच लक्ष नाहीय अगदी तसंच शार्ली च्या बाबतीत झालं…शार्ली घरातली सगळी कामं उरकून नेहमीप्रमाणे आपल्या बॉयफ्रेंडशी बोलत बसली होती –

शार्ली – अरे…रौनक…क्या कर रहा है तू गोआ मे…

रौनक – शार्ली….माय स्वीट हार्ट….गोआ मे और क्या कर रहा हू मे…मस्त एन्जॉय कर रहा हू रे…बट तेरे को बहुत मिस कर रहा हू …

शार्ली – चल आता मस्का मारणं बंद कर…पुढचा प्लॅन सांग…या चिर्कुटचे पैसे कसे उकळायचे ते…

रौनक – आबे….उसे चिर्कुट मत बोल….सोने का अंडा देणेवाली मुर्गी है मुर्गी….ध्यान से कामं कर…वोहं बुढीया को अपने बस मे किया ना तुमने…तो बात फते…पैसे ले और भाग के आणा वहा से…

शार्ली – भाग के कैसे आऊ…एक तो पैसे नही है मेरे पास…

रौनक – तू तो भोली-भाली बाते करणे मे बहुत होशियार है…तो अब यहा दिमाग लगा थोडा….दस लाख रुपये चाहिये हमे…५ तेरे और ५ मेरे…

शार्ली – तेरा मेरा क्या कर रहा है तू ….और मांगके सिर्फ १० लाख मंग रहे हो ५ करोड लेती उससे एकही टाइम…उसको लुटणा है तोह अच्छा लुटणा नही तो क्यू लुटणा…मेरे को उसके साथ शादी करके घर थोडी ना बस ना है…मेरे को तो सिर्फ उसके पैसे से मतलब है…

रौनक – अरे उसका…उसका क्या लगा रखा है… …नाम तो ले अपने होनेवाले पति का…! [ विचित्रपने हसतो ]

शार्ली – अरे यार…माधव नाम है उसका और सर नेम निंबाळकर है…

रौनक – अरे तो तुमने बहुत अच्छा आदमी चुना है…चोरी के लिये…

शार्ली – रौनक…बहुत शातीर दिमागवाला है वोह…बाकी दिखने मे अच्छा है…

रौनक – शार्ली….तुम्हे चाहनेवाला कोई मिल गया शायद…मेरी क्या किमत अब….

शार्ली – चल…ऐसा कुछ नही है…वोह फट्टू है साला…बाकी मै बाद मे कॉल करती तेरे को…चल फोन रख…

शार्ली ने कॉल झाल्यानंतर…एकदा सुस्कारा टाकला खरा पण शार्लिच हे सगळं बोलणं माधव ने दरवाजाआडून ऐकलं…दरवाजा एकदम उघडून शार्ली ला माधव ने हाताला धरून फरफटत बाहेर दिवाणखान्यात आणलं…घरातले सगळे नोकर-चाकर गप्प उभे राहून पाहत होते…आईसाहेब तर कमालच करत होत्या….एकदम आईसाहेब आपल्या माधवला विचारतात…

आईसाहेब – माधव….अरे काय झालंय तुला….का असं फरफटत आणलंय शार्ली ला अरे होणाऱ्या बायकोवर असं कुणी वागत का…?

माधव – चेटकीण आहे ही चेटकीण…मला ह्या मुलीशी नाही लग्न करायचं…आई आपली सगळी इस्टेट हडपण्याचा डाव आहे या मुलीचा आजच….नाही आत्ताच मी हिचा सगळा डाव ऐकून आलोय….हीच माझ्यावर कधीच प्रेम नव्हतं…फक्त नाटक करत होती ही…सांग तुझ्या पहिल्या प्रियकराचं नाव….आणि काय काय लंपास करायचंय या घरातून…सगळं सांग नाहीतर पोलिसांना बोलावतो म्हणजे सगळं खरं…खरं सांगशील…

शार्ली – व्हॉट….आर यू डुईंग….सोड मला….लिव्ह मी….आणि काय बडबड करतोस…फालतूची…याच्याशी माझा काहीही संबंध नाहीय जे आता तू आरोप करतोयस माझ्यावर…

माधव – सगळं पितळ उघड होतंय ना मग…कसं मान्य करशील…आईसाहेब ही मुलगी आपली सर्व संपत्ती हडप करून मला…तुला….या घराला फसवून आपल्या प्रियकरासोबत पळून जाणार होती…म्हणून ती ही सगळी कामं करण्याचं नाटक करत होती…बरं झालं वेळीच मला समजलं सगळं…नाहीतर फार मोठा अनर्थ घडला असता…आई मला माफ कर मी तुझं ऐकायला पाहिजे होत…आता तू ज्या मुलीशी लग्न करायला सांगशील त्या मुलीशी मी लग्न करेल…

आईसाहेब – बरं झालं वेळीच तुला समज आली ते कारण मी तुला आधीपासूनच बजावत होते अरे बाळा जगाचा अनुभव मला जास्त आहे तुझ्यापेक्षा…

त्याच दिवशी शार्लीला माधव ने घराबाहेर काढलं आणि आपण माणसं ओळखायला चुकलो हे आठवून स्वतःला दोष देत राहिला….शार्ली अपमानित होऊन माधवच्या घरातून आणि मनातून कायमची निघून गेली…माधव उदास होऊन बसला त्याला घर खायला उठू लागलं म्हणून आपल्या

साखरकारखान्याची कामं पाहू लागला…सकाळी नऊ वाजेपर्यंत कारखान्यात पोहोचायचं तिथली देखरेख पाहून संध्याकाळी पाच वाजल्याचा सुमारास घरी येणं हे रुटीन माधवच चालू झालं…शक्य तितक्या लवकर माधवला यातून बाहेर पडायचं होत म्हणून माधव आपल्या घरातल्या बिसनेसमध्ये लक्ष घालत होता…काही दिवसातच घरामध्ये सणाचं वातावरण होणार म्हणून घरात एकूण सर्वांच्याच मनात उत्साह होता….गावामध्ये निंबाळकरांचा गणपती म्हणजे मानाचा पहिला गणपती समजला जात असे…रोज आईसाहेबांच्या हातून दोन वेळची आरती होत…अजूनही तशीच प्रथा त्या गावात चालू होती हे विशेष कारण घरच्या सुनेच्या हातून रोजची आरती अशी प्रथा तीस वर्षांपासून चालत आली म्हणून गौरी आणि गणपती अशा कामांची तयारी करण्यासाठी आईसाहेबांना काही गरजू मुलींची मदत हवी होती म्हणून आईसाहेबांनी हे कामं मनीषावर सोपवलं होत…मनीषा अशीच रस्त्याने चालली होती पण डोक्यात फक्त आईसाहेबांची कामं…म्हणून स्वतःशीच पुटपुटत रस्त्याने चालली होती घरात गौरी आणि गणपतीची लगबग हाय…कामासाठी एखादी गरजू मुलगी पाहिजे…आता पोरी मिळणं अवघड हाय…हे कसं सांगायचं आपण…? ‘ तिच्याच शेजारून कमला म्हणजेच मुग्धाची जिवलग मैत्रीण चाललेली असते…कमला मनीषाला थांबवते आणि विचारते…

कमला – काय ग मनीषा…काय बडबड करतेयस…जरा सांग तरी मला…

मनीषा – काही नाही गं…निंबाळकरांकडे कामासाठी मुलगी हवीय…कामाचे पैसे पण मिळतील…काम बाकी बिनबोभाट करणारी मुलगी पाहिजे बस…

कमला – अगं एवढंच ना…मिळेल माझ्या ओळखीतली असली तर चाललं ना…?

मनीषा – हा गं बाई…चाललं…बघ आणि सांग मला लवकर…माझा नंबर लिहून घे…

कमला – लिहून कशाला मला सांग मी मिस कॉल करते कि तुझ्या नंबरवर…

मनीषा आपला नंबर कमलाला देते आणि घरी निघून जाते….कमला मात्र मुग्धाची वाट पाहत उभी असते…कारण कॉलेज ला सोबत जाणाऱ्या…जीवाला जीव लावणाऱ्या…अशा जिवलग मैत्रिणी त्या असतात…कमला मात्र काळजी करत बसलेली असते…मुग्धाकडे मोबाईल नसल्याने….मुग्धाची चौकशी करण्यासाठी कमला मुग्धाच्या मामांकडे फोन करते…रमेशराव खूप गडबडीने फोन उचलतात…

रमेशराव – हा कमल बोल गं….काय कामं काढलंस…?

कमला – मामा…अहो आज मुग्धा कॉलेज ला येणार आहे की नाही…आज तर यालाच लागणार कारण परीक्षेची फी भरण्याची शेवटची तारीख आहे आज…

रमेशराव – फी भरायची आहे होय…ती निघालीच आहे कॉलेज ला येतीय ती…तू कुठे आहेस ते सांग तिलाच…मुग्धा घे तुझ्या मैत्रिणीचा फोन आहे…

मुग्धा – [ जास्त काही बोलत नाही ] कमला पिंपळाच्या झाडापाशी येऊन थांब मी आलेच…

            असं म्हणून मुग्धा फोन ठेऊन देते आणि कॉलेज ला निघण्याची तयारी करते…तेवढ्यात मुग्धाची मामी मुग्धावर खेकसून म्हणते-

रेखा – झालं का फोन वर बोलून…घरात काडीची कामं करायला नको …नुसतं कॉलेज च्या नावाखाली गाव कोळपायला सांगा…

रमेशराव – रेखा अगं…का एवढी चिडतीस…मुग्धा हे घे तुझ्या कॉलेजची फी भरण्याची आज शेवटची तारीख आहे ना…घे पैसे…

रेखा – काय…फी भरायला पैसे आहेत तुमच्याकडे…पण घरात काही घ्यायचं झालं तर त्यासाठी पैसे नाहीत…द्या इकडं ते पैसे…रेश्मा च काही भलं व्हावं असं वाटत का तुम्हाला…तिचीही परीक्षा फी भरायची राहिलीय…

मुग्धाच्या मामीने रागाने पैसे हिसकावून घेतले म्हणून मुग्धाच्या डोळ्यात चटकन पाणी आलं…म्हणून काहीही न खाता घरातून कॉलेज ला जाण्यासाठी बाहेर पडली….पिंपळाच्या झाडापाशी कमला वाट पाहताच उभी होती…समोर आपल्या मैत्रिणीला पाहताच डोळ्यातलं पाणी मुग्धाने लपवलं….पण जिवलग मैत्रीणीच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही काहीतरी झालंय म्हणूनच मुग्धा रडत होती…न राहवून कमलाने आपल्या मैत्रिणीला बोलतं केलं…घडला प्रकार मुग्धाने आपल्या मैत्रिणीला सांगितला…

मुग्धा – काय करू मी आता…मला तर वाटतंय जाऊदेत या वर्षी नापास होते…काय होईल सगळी स्वप्न भंग होतील दुसरं काय होणार….

कमला – नाही असा विचार करायचा नाही…तुझी इच्छा आहे ना परीक्षेला बसायची…मग मार्गही आहेच…पैशाचा प्रश्न आहे ना…मग सॉर्ट झाला प्रश्न असं समज…

मुग्धा – पैसे काय झाडाला लागलेत की काय…परिस्थिती काय आहे तुला मस्करी सुचतीय…

कमला – हे बघ…झाडावरून पैसे नाही काढायचे…मेहनतीने पैसे मिळवायचेत…आहे तयारी…

मुग्धा – पण मला कोण कामं देणार…?

कमला – अगं…तो हिरो नाही का…ज्याच्या गाडीसमोर तू धडकलीस…त्याच्या इथं काम आहे…काय आहे गौरी गणपती आलेत…मग निमंबालकरांचाच गणपती आपल्या गावात असतो तोही मानाचा…मग तू जा तिथं कामाला…परीक्षा फी देशीलही…पंधरा दिवस कामं आहे फक्त…बघ विचार कर…आणि सुरुवातीला थोडा ऍडव्हान्स मिळतोय की ते पहा…म्हणजे फी चा प्रश्न मिटेल…

मुग्धा – खरंच…असं होईल…काहीही कामं करेल मी…

असं म्हणून मुग्धा आपल्या मैत्रिणीच्या गळ्यात बिलगली…आणि परत हसू लागली…खरंच मुग्धा निंबाळकरांच्या घरी कामास सुरुवात करेल की कुणी त्यात मोढता घालेल…पाहुयात पुढच्या भागात…