Ritbhatmarathi

Search
Close this search box.

रोशनी आज उत्साहाने हॉस्पिटल ला सकाळची सगळी कामे करून आणि नाष्टा करून ती निघाली. घरी नाश्ता करत असताना रोशनी नाही शोभा काकू आणि विजय काकांना ती आज उशिरा येईल आणि तिकडुनच जेवू नये असे आधीच कल्पना देऊन ठेवली होती कारण की रोशनी शिवाय तिचे आई-वडील जेवणार नाहीत कितीही उशीर झाला तरी. रोशनी ना आई-वडिलांची फार काळजी त्यामुळे त्यांनी स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे अशी तिची इच्छा.

आता रोशनी घाई गडबड करत हॉस्पिटलला निघाली. कार मध्येही असताना आज ती फार खूष होती मनोमनी आराध्याच्या घरी जाणं हेही एका स्वप्नासारखं तिच्यासाठी होतं. इतक्या दिवसात झालेली मैत्री तो जिव्हाळा न दिसणारे प्रेम या सर्व गोष्टींचा रोशनीला नवल वाटे. प्रेम म्हणजे काय असतं हे अजूनही रोशनीला अवगत नव्हतं झाले. असिन प्रेमाची तेव्हा जाणीव होते जेव्हा समोरचा हि व्यक्ती आपल्यावर तितकच प्रेम करते.

रोशनी हॉस्पिटल मध्ये गेल्यावर सगळ्यांना विश करून ती तिच्या नेहमीच्या कामाला लागली तरी तिचं लक्ष कुठेतरी गुंतलेलं होतं. आज आदित्य लेट झाला होता आणि म्हणून रोशनीला काहीतरी कमी आहे असं वाटत होतं.

आराध्य घाईत आला आपले सामान स्टाफरूममध्ये ठेवून तो जाऊन त्यांनी रोशनीला जॉईन केला. त्यांनी पेशंटचा राऊंड घेता घेत थोडी विचारपूस करत करत त्यांनी त्यांचे काम संपवले.

आजचा दिवस रोशनी साठी फार पटकन सरून गेला. जशी हातातील वाळू निसटून जावी तसा वेळ निघून गेला.

आराध्यची चाहूल लागताच सुधा काकू लगबगीने समोरच्या घरात आल्या तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली आणि सुधा काकू दरवाजा उघडून त्यांनी रोशनी आणि आराध्य चे स्वागत केले.

सुधा काकुंना बघून रोशनी चकित झाली तिला काही क्षण सुचलेच नाही की काय म्हणावे. दोन मिनिट तिच्या तोंडातून काही शब्दच फुटेना तेव्हा आराध्य ने पुढाकार घेत ” रोशनी ही माझी आई आहे ” असं म्हणत त्यांची ओळख करून दिली.

सुधा काकू ही रोशनीला बघून आनंदित झाल्या. ” रोशनी कशी आहेस ग तू छोटी होती तेव्हा तुला पाहिले आणि आता तू किती सुंदर ही झाली आहेस. ” असं म्हणत सुधा काकूंनी रोशनीच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवला आणि ” तुझी मम्मी आणि पप्पा कसे आहेत ग किती दिवस झाले त्यांच्याशी काही भेटच नाही काही बोलले नाही मला तर खूपच आठवण येते त्यांची. ” असं म्हणून त्याने रोशनीला बसायचा इशारा केला.

रोशनी ही खुश होऊन त्यांच्याशी गप्पा मारल्या अगदी मनसोक्त होऊन बालपणीच्या सर्व आठवणी इथे ताज्यातवान्या झाल्या. सुधा काकू लहानपणी रोशनी आणि आराध्य कसे खेळायचे कसे वागायचे या गोष्टी त्यांना सांगत असताना तिथल्या वातावरणाचा एक माहोल बनला .

जेव्हा मला कळलं आराध्या हा माझा लहानपणीचा मित्र आहे त्या वेळेस नकळत माझे डोळे मोठा लावून तोंडाला वास लागेल मग मला आराध्याला करशील मी तोच. नकळत भूतकाळातल्या आठवणी जाग्या झाल्या आता मी विसरले

कायम उशिरा येणारा, त्याच्या वडिलांसोबत सकाळीच राहणार जायचा शेतावर. चालत चालत कधी अकरा वाजायच्या कळायचंच नाही शाळेची घंटा व्हायची तेव्हा हा पट्ट्या शाळेची घंटा झाल्यावर घरी यायचा कसंतरी भाकरीचे गाठोडे बांधून दप्तरात की हा पळत सुटायचा पोहोचेपर्यंत प्रार्थना होऊन जायचे. आमचे वैद्य हळूच डोळे उघडुन त्याच्याकडे बघायचे आणि त्याला मान हलवून इशारा करायचे. ” आता आला होय तुला बघतो प्रार्थना झाल्यावर ” अस इशारा करायचे. प्रार्थना झाली की वैद्य सरचा डोळा चुकवून क्लास वर्गात येऊन बसायचां.

तरी वैद्य सर वर्गात येऊन आराध्य चा कान पकडून उभा करायचं आणि दररोज त्याचं ठरलेलं उत्तर यांनी द्यायचं हा दररोजचा नित्यक्रम पण अभ्यासात हुशार. कधीही पुस्तक न घेतलेला हा परीक्षा मध्ये पहिल्या क्रमांकाने पास व्हायचं असा आराध्य कधी डॉक्टर झाला कळलंच नाही.

एकमेकांच्या ओळखी झाल्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला मग आराध्य म्हणाला” संध्याकाळी आपल्या हॉस्पिटल ओपीडी संपल्यानंतर आपण माझ्या घरी जाऊ डोंबिवली ला” मी त्याला लगेच ” हो ” म्हटलं.

हॉस्पिटल संपून आम्ही झाड माणसांची गर्दी पार करत आम्ही डोंबिवलीला पोहोचलो डोंबिवलीला कंपाऊंड गेट चौकीदाराने करून ओढून धरलं आमची गाडी पार्किंग मध्ये आले दहा पंधरा मजली बिल्डिंग मध्ये आम्ही तिसऱ्या मजल्यावर गेलो तिसऱ्या मजल्यावर दरवाजाची बेल वाजवली आणि सुधा काकू यांनी क्षणात दार उघडलं पावसामध्ये पावसाचा थेंब पानावर पडून त्याचे तुषार आजूबाजूला कडून जो जसा फवारा तयार होतो तसे मनात तुषार निर्माण झाले सुद्धा काकूंना बघून मला खूप छान वाटलं आणि मी त्यांना गळाभेट घेतली, मिठी मारली.

खूप छान वाटलं मला. जसा भुंगा कमळा मध्ये बसून त्याला अलगद मिटून घेतो आणि सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात होऊन आल्यावर आलगत सगळे पाकळ्या वेगवेगळे होऊन एकमेकांना रात्रभर दिलेल्या आलिंगन सोडून देतात आणि त्यातून अलगद वरती येतो तशी मनात तरंग उठून मी त्या मिठीतून बाहेर आले.

खूप छान वाटले काकूंना पण मला पण. सुधा काकूंनी माझ्या तोंडावर हात फिरवला माझा खूप छान वाटलं त्यांनी चहा नाष्टा करून आणल्या आणि खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या.

काकूंनी मला जवळ घेतलं आणि आम्ही सोफ्यावर येऊन बसलो. मी घरावर सभोवार नजर फिरवली खूप काकुना खूप कलात्मकतेने घर सजवलं होतं मोठा हॉल. हॉल मध्ये छान भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठी फ्रेम हातात तलवार घेतलेली. बाजूला दोन फ्लावर पॉट. खाली लाकडी टेबल वर जुन्या पद्धतीने नक्षीकाम केलेल्या टेबलवर ठेवलेला त्याच्या बाजूला सुंदर बारीक कोरीव काम केलेल्या टेबलवर दुसरा फ्लावर पॉट आणि साधी बैठक खूप सुंदर वाटलं मला. त्याच्यामध्ये हलका डोळ्यांना सुखद वाटेल असा रंग दिलेला, अगदी मन शांत वाटलं.

सुधा काकूंनी दोन ग्लास पाणी आणलं आणि ते घसा कोरडा पडला म्हणून पाणी पिलं.

काकूंनी चहा दिला छान खूप गप्पा मारल्या मग काकू म्हनाल्या ” एक दहा मिनिटात तुम्ही फिरा थोडसं तू घर बघून ये तोपर्यंत मी स्वयंपाक तयार करते “

काकूंनी मस्त अळू वड्या ची भाजी बनवली पोळ्या बनवल्या. मला आवडतो तसंच साजूक तुपातला शिरा बनवला बदाम टाकून आणि घरभर मस्त तुपाचा गोड घमघमाट सुटला खूप खाण्याची इच्छा झाली.

आम्ही पूर्ण घर बघून खाली आलो तर काकीने आवाज दिला ” रोशनी या जेवायला ” मस्त डायनिंग टेबल सजवलेला त्यांच्या पद्धतीने सुंदर सजवलेला होतं. डायनिंग टेबलवर बसलो. छान डिनर सेट मध्ये काचेच्या मस्त फुल असलेल्या ताटामध्ये जेवण दिलं. आम्ही तिघांनी जेवण केलं. मनसोक्त शिरावर ताव मारला खूप छान वाटलं मग असं जेवता जेवता गप्पा मारल्या मी काकींना सांगितलं की ” आता तुम्ही वेळ काढून माझ्या आई बाबांना भेटायला या त्यांनाही तुमची खुप आठवण येते आणि हो असं काही गडबडीत नाही वेळ काढून या दिवस गप्पा मारत जेवण करु आणि रात्रीच्या जेवणाला बाहेरचं जाऊ. ”
असं असं म्हणून मी त्यांचा निरोप घेतला व बाहेर निघाले तर काकूंना मला थांबत सांगितलं ” थांब एकटी नको जाऊ आराधी तुला सोडायला येईल. “

आराध्याने लगेच गाडीची चावी घेतली व हातातल्या बोटामध्ये गाडीची चावी गोल फिरवत आला. ” त्याला म्हटलं खूप पोटभर खाल्ले आपण पायऱ्यांवरून जाऊ . ” आम्ही असेच गप्पा मारत खाली आलो कार मध्ये बसून माझ्या घराच्याच्या दिशेने निघालो.

रात्री जेवण करून निघेपर्यंत साधारण दहा साडेदहाचा टाईम झाला असेल. मुंबईचा वातावरणामध्ये दोन्ही कडूनही दिव्यांचा झगमगाट गाड्यांचे लाईट्स जाणाऱ्या दहा वाजले तरी रोडवरची रहदारी आहे तशीच थोडीही कमी नाही झालेली एवढ्या गर्दीमधून हॉर्न देत आमची गाडी चाललेली गप्पा मारत. अनेक आठवणी जाग्या झाल्या. गप्पांच्या ओघात कधी ते रोशनीच्या घरासमोर येऊन पोहोचले ते कळलेही नाही.