Ritbhatmarathi

Search
Close this search box.
रोशनी आराध्य सोबत व त्याच्या आई सोबत मनसोक्त गप्पा मारून जेवण करून निघाले, त्यावेळेस आराध्यची आई म्हणाली की ” तिला तु नेउन सोड तिला एकटीला जाऊ देऊ  नको. ” 
 
रात्री उशीर झाला तेव्हा आराध्य आणि रोशनीअसे दोघेही खुशीने घराच्या बाहेर निघाले व पार्किंग मध्ये आले.
 
आराध्य ने त्याची गाडी पार्किंग मधून काढली व ते निघाले.  रोशनी गाडीत बसली त्यावेळेस तिचे मन  अगदी भरून आलं होतं. जसे पौर्णिमेच्या चंद्राला समुद्राच्या भरतीची ओढ लागते तशी ओढ तिच्या मनाला जाणवू लागली व त्या ओढीतून, त्या प्रेमाच्या पोटी तिला असं झालं मी कधी घरी पोहोचते आणि ती कधी तिच्या आईला सगळ्या गोष्टी सांगते की तिचं आराध्य वर प्रेम आहे. आणि तिला त्याच्याशी लग्न करायचे ह्या सगळ्या गोष्टी मन मोकळ कधी सांगते. अगदी भरलेलं गाठोड कधी सोडते असं तिला वाटू लागले. रोशनी ने आराध्य ला सांगावे लागले की ” आराध्य प्लीज फास्ट गाडी चालव, लवकर नेउन सोड मला” 
 
त्या खुशीमध्ये ते दोघं पण तिच्या घराच्या दिशेने वाटचाल करत त्याने तिला घरी सोडलं. रोशनी  अगदी सशासारख्या उड्या मारत दुसऱ्या मजल्यावर आली व जोरात कसलेही भान न ठेवता बेल वाजवली लागली. रोशनी ची आई धावत आली ” थोडासा धीर धरवत नाही तिला …किती वेळ बेल वाजवशिल……” तोच  रोशनी ने  आईला मिठी मारून गोल गोल गोल गिरकी घेतली आणि म्हणाले की ” आई मी आज खूप खूश आहे मला खूप चांगली बातमी तुला सांगायची आहे. ” 
 
“आई मी आज खूप खूश आहे”  हे बोलताना आईला तिच्या डोळ्यांमध्ये एक विशिष्ट नवखेपन जाणवले. शोभा काकू तिच्याकडे व तिचे निरीक्षण करायला लागली.  त्या स्वत बारकाईनं बघायला लागली की आज रोशनी काहीतरी बदल आहे, म्हणून उत्साहाने म्हणाले ”  बोल बोल बाळा तू अगदी मनमोकळे”  त्यावेळेस रोशनी  पण खूप खुश झाली आणि आईला जवळ घेऊन बसली.  तिने सांगायला सुरुवात केली की कसा तिला आराध्य भेटला आणि ती त्याच्या घरी गेली, सुधा काकू भेटल्या, गप्पागोष्टी झाल्या आणि ” आई त्यांना आपण पण घरी बोलवायचं” अस म्हणून रोशनी त्यांना घरी बोलावण्याचा प्रॉमिस घेऊनच आपल्या रूममध्ये फ्रेश व्हायला गेली. 
 
ग्रीष्म ऋतू मध्ये पाण्याची गळती होऊन नवीन पालवी ज्याप्रमाणे फुटते त्याप्रमाणे रोशनीच्या मनाला नवी पालवी फुटली. रोशनी आपल्या रूममध्ये निघून गेली व फ्रेश होऊन बेड वर आडवी झाली पण निद्रा देवता काही प्रसन्न होईना. 
 
 
सकाळी उठल्यावर शिभकाकुनी सर्वांना चहा पिता पिता आनंदाचा सुखद धक्का दिला व डिक्लेअर केला की आज संध्याकाळी आराध्य आणि त्याचे आई वडील घरी येणार आहेत.  रोशनीला क्षणभर सुचलेच नाही काय करावे नी काय बोलावे. तिचे डोळे मोठाले झाले आणि ‘ आ ‘ वासला.  आदित्य येतो म्हटल्यावर रोशनी चे गाल एकदम खूष  गुलाबी गुलाबी झाले. 
 
जसे फुलपाखरू हवेवर तरंगत या फुलावरून त्या फुलावर जातो आणि आनंद घेतो त्याप्रमाणे रोशनी या रूम मधून त्या रूम मध्ये अगदी तरंगत गेल्यासारखे जाऊ लागली व भराभर हॉस्पिटल ला जाण्याची तयारी करू लागली. 
 
हॉस्पिटल मध्ये गेल्यावर रोशनी ने  भराभर स्वतःचे काम आटोपून आणि हाफ डे घेऊन परत घरी आली. घरी आल्यानंतर फ्रेश होऊन रोशनी ने  गुलाबी रंगाची साडी घातली, गुलाबी त्याच्यावर आणि डोळ्यांना आकर्षित करणारे बारीक नक्षीकाम होते. काळ्याभोर दाट केसांची  सागर वेणी घातलेली त्यावर चाफ्याची फुल सजवलेली. 
एका हा ब्रेसलेट  व एका हातात घड्याळ, सुंदर गुलाबी रंगाचे नेलपेंट. अगदी साध्या पद्धतीने पण खूप सुंदर.  
 
बारक्या चाफेकळी सारख्या नाकामध्ये सुंदर पांढराशुभ्र खडा अगदी चमचम चमचम करणारा उठून दिसत होता. खूप सुंदर साध्या पद्धतीने रोशनी ने तयारी केली व बेल आणि घडळ्याच्याआवाजाकडे लक्ष देऊन होती. तोवर शोभा काकूंनी तयार केलेल्या खमंग स्वयंपाकाचा वास घरभर दरवळत होता. तोंडाला पाणी सुटेल असे होते ते. 
 
बेल वाजल्या बरोबर रोशनी धावत जाऊन दार उघडले.  सगळी मंडळी चे रोशनी आणि शोभा काकूंनी स्वागत केले. 
 
सुधाताई आणि शोभा काकू त्यांनी एकमेकांना बघून ” किती दिवसांनी भेटतोय आपण ” अस म्हणत आलिंगन दिले.
 
रामू काकाने सगळ्यांना पाणी आणून दिला व ताईंना विचारून गेला जेवणाची तयारी करू का. जेवणाची ताट वाढल्या गेली. जेवण मध्ये शोभा काकूंनी सुंदर बासुंदी पुरीचा बेत केलेला. सगळी मंडळी मस्त पोटभर जेवण केल्यानंतर, गप्पा मारत बाहेर निघाले व झोपाळ्यावर येऊन तोंडात बडीशेप चघळत आता रंगलेल्या गप्पा सुरू झाल्या. मध्येच  सुधाताईंनी हळूच विषय काढला आणि सांगितलं की ” आपण इतके वर्ष झाले भेटलो नाही पण आपल्या भेटीचा कारण निमित्त साठी आपल्याला काही तरी करावाच लागेल त्या शिवाय आपल्या वारंवार भेटी होणार नाही त्यासाठी आपण आराध्य आणि रोशनी चे एका सुंदर नात्याचे बंधन साकार करुया का???”  
 
हे ऐकुन विजय काका, कुणाल काका आणि शोभा काकू यांनी सहमती दर्शविली. सुधा ताईंचा विषय जवळजवळ सर्वांनी मान्य होता. रोशनी आणि आराध्य च्या गालांवर गुलाबी रंग झळकला.  हे सगळं ऐकून जुळून येती रेशीमगाठी म्हणायला हरकत नाही.