Ritbhatmarathi

Search
Close this search box.

सकाळचा चहाचा आस्वाद घेत शोभा काकू ह्या नेहमी प्रमाणे वर्तमानपत्र वाचत त्यांचा बाल्कनी मध्ये बसल्या होत्या. त्या दिवशी आभाळ स्वच्छ होत आणि सूर्याची किरणे सर्व परिसर त्यांचा पिवळा सडा पाडत सोनेरी रंगात न्हाऊन होती. ह्या प्रसन्न वातावरणात शोभा काकू यांना आपल्या जुन्या दिवसांची पोलिस झाली आणि त्यांच्या ओठांवर एवलुस हसू उमटले. त्यांनी आपले डोळे बंद करून त्या जुन्या आठवणींना पुन्हा एकदा आपल्या त्या क्षणांना जागी करत होत्या.

” शोभा…चहा झाला का???” विजय काका समोरच्या घरात आपले शर्ट अंगावर चढवत म्हणाले.

” हो झालं आहे …तुम्ही आधी नाश्ता करून घ्या बर” शोभा काकू लगबगीनं त्यांच्या समोर तोंडाला पाणी सुटले असे मोहक पोहे भरलेली डिश आणि ककड चहा टेबल वर ठेवत त्या म्हणाल्या.

” पिल्लु उठल का ??” चहाचा घोट घेत विजय काका म्हणाले.

” नाही अजून …तुमचं आवरल की उठवते तिला पण….” शोभा काकू आपल्या पदराला हात पुसत म्हणाल्या.

विजय काका आणि शोभा काकू यांनी आपला नश्टा संपवला आणि विजय काका हे त्यांच्या कामाला आपला डबा घेऊन निघून गेलं.

शोभा काकू तिथेच वृत्तपत्र घेऊन बसल्या आणि एक गोंडस चिमुकली त्यांना जाऊन बिलगून ” आई गुड मॉर्निंग”

” गूड मॉर्निंग माझं पिल्लु….” शोभा काकू तिला गोड पापी देत कुरवाळत होत्या.

शोभा काकू आपल्या त्या जुन्या आठवणीमध्ये इतक्या मग्न झाल्या होत्या की त्यांना रोशनी कधीच हाक मारत आहे ते सुद्धा उमजले नाही. आपल्या खांद्यावर हाताने थाप मारल्याचे जाणवताच शोभा काकू यांनी आपले डोळे अलगद उघडले.

” आई काय करत आहेस….की आवाज देत होती…”

” लहान होती तेव्हा किती गोड होती तू पिल्लु ….” शोभा काकू रोशनी कडे आपल्या ममतेच्या नजरेने पाहत होत्या.

” कधीतरी माझ नाव घेऊन बोल…. मी आता मोठी झाली आहे….पुढे पण पिल्लु बोलशील का..” रोशनी हसत म्हणाली.

” आई वडिलांसाठी आपले बच्चे हे कितिजरी मोठे झाले तरी ते लहानच असतात. म्हणून तू माझ्यासाठी पिल्लुच आहे…”

” बरं सुधा काकुचा काही कॉन्टॅक्ट झाला का???” रोशनी उत्सुकतेने विचारल.

” नाही ना ..मला पण तिची फार आठवण येते. ” शोभा काकू यांचा चेहरा आता थोडा उदासवणा झाला.

” ओके आपण मला सुट्या भेटल्या की जाऊया गावी??? म्हणजे सगळ्यांची भेट होईल??” रोशनी हे म्हणताच शोभा काकू यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

” खरच …जाऊया आपण …मला ते वातावरण ते घर ते झुळझुळ वाहणारे पाण्याचे झरे….यांची खूप आठवण येत आहे….इथे काय शहरात फक्त मोठ्या मोठ्या इमारती आणि गाड्या यांचीच भरती आहे….अस मोकळ वातावरण नाहीये इथे निसर्गरम्य परिसर…..” शोभा काकू आता आपल्या मनात घर करून राहिलेल्या त्यांच्या जुन्या घरा विषयी बोलत होत्या.

” हो…समजल मला… आपण नक्की जाऊ ओके…आता मी माझ सगळ आवरलं आहे …मी निघते …” रोशनी आपली बॅग घेत म्हणाली. रोशनी एक एमबीबीएस डॉक्टर आहे. तिने तिचं शिक्षण पूर्ण करत ती आता एका मोठ्या हॉस्पिटल मध्ये डॉक्टर म्हणून काम करत आहे.

” सावकाश जा ग पिल्लु….” शोभा काकू रोशनी ला बाल्कनी मधून टाटा करून आपल्या घरात येऊन बसल्या.

शोभा काकू ह्या एक गृहिणी होत्या. आपले बीएड झाले असतानाही त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी जॉब न करण्याचा निर्णय घेतला आणि आपले आत्ता पर्यंतचे जीवन त्यांनी मुलांकरिता आणि आपल्या सुखी संसारमध्ये सुखात घालवला. आपली दोन्ही काळजाचे तुकडे आपल्या आयुष्यात सुखी आहेत याचं त्यांना समाधान वाटत होत.

त्या घरात काहीतरी साफसफाई करत असताना त्यांचा मोबाईल मोठ्याने वाजत करत कॉल आला आहे याची जाणीव शोभा काकू यांना करून देत होत्या. त्या लगेच आपल हातातील काम सोडून मोबाईल हातात घेत
” कोणाचा कॉल ” आणि ते कळताच त्यांनी तो उचलला.

” हा सोनू बोल….काय चालू आहे तुझ??? ” शोभा काकू आनंदित होऊन म्हणाल्या.

” मम्मी मी मस्त आहे तुझ सांग, आणि पापा पिल्लु छ काय चालू आहे???” कॉल वर दुसऱ्या बाजूला सोनू म्हणजे प्रज्वल बोलत होता.

” मी पण छान आहे सोनू, पप्पा पण आणि पिल्लु बोलत होती की तिला सुट्ट्या भेटल्या की गावी जाऊ म्हणून…. तू आणि पल्लवी ला जमेल का यायला??”

” मम्मी पल्लवी ला विचारून बघतो …इकडे मला पण सुट्टी भेटेल की नाही माहित नाही ….मी बघून सांगतो तुला…”

” ठिक आहे…बाकी कशी आहे माझी सूनबाई…सर्व ठीक ना??” शोभा काकू  आपल्या सुनेला अगदी आपल्या मुलीप्रमाणे वागवत होत्या. त्यांनी कधीच त्यांच्या सुनेला तीच सासर आहे अशी जाणीव होऊ दिली नाही. पल्लवी सुध्दा आपल्या सासूचा असेला मोकळा स्वभावामुळे शिंदे परिवारात मिसळून गेली.

” पल्लवी छान आहे ….ती पण तुला खूप मिस करते…मम्मीच्या हातचा गाजारचा हलवा खायचा म्हणते….”

” सोनू …तुम्ही या बर इकडे…काही दिवस सुट्टी घ्या त्या पुण्यातून ….मस्त इकडे मज्जा करू…” शोभा काकू आपल्या सुनेला आणि मुलाला घरी पाहण्यास खूप आतुर होत्या.

” हो येऊ लवकरच….” प्रज्वल आपल्या आईला खुश पाहून तो ही आनंदित होता.

काही वेळ आपल्या लाडक्या मुलाशी बोलून झाल्यावर शोभा काकू पुन्हा आपल्या कामाला लागल्या.

” शोभा ….हे सामान घे जरा….” विजय काका त्यांच्या हातातील बॅग्स घरात घेऊन म्हणाले.

” आले…काय आणल तुम्ही ….” शोभा काकू ते घेत म्हणाल्या.

” त्यात फळ आहेत …आता ह्या वयात आपण आपली काळजी घेतली पाहिजे. अजुंना आपल्याला खूप जगायचं आहे….” विजय काका सोफ्यावर बसत म्हणाले.

” हो…आधी ती आणलेली फळ तुम्हीच खा….मग मला सांगा…”

” तुला अधिक बोल्लेच पाहिजे हो ना…सवय काही जात नाही बायकांची…” विजय काका आपले तोंड वेडेवाकडे करून म्हणाले.

” बरं ते सोडा….ऐका ना पिल्लु म्हणत होती की जाऊ म्हणून दापोलीला … जाऊ आपण…मला तर खूप इच्छा आहे….”

” सोनू आणि पल्लाविला न घेता??”

” अस काय करता हो….. बोलले मी सोनू सोबत तो पण म्हणाला की बघतो म्हणून….”

” बघतो म्हणजे काय लगेच नाही भेटत सुट्टी….”

” तुम्हाला काही सांगणं म्हणजे माझी चुकी आहे….” शोभा काकू वैतागून म्हणाल्या.

” तुला वैतागायला काय झालं आता ….मी फक्त विचारल.तुम्हा बायकांचं मला काही कळत नाही…..नेहमी चिडचिड करत असता…” विजय
काका शोभा काकू यांच्या चेहऱ्याकडे पाहून म्हणाले.

” मी म्हणत आहे ना की जाऊ आपण दापोलीला ….माझी काही काळजी आहे की नाही तुम्हाला???” शोभा काकू आता रुसल्याचं नाटक करत म्हणाल्या.

” शोभा…मी काही म्हणालो का?? फक्त सगळ्यांना वेळेवर सुट्टी भेटली की जाऊ मग….मला पण गावी जाऊ वाटते …इथल वातावरण आता नको वाटते ….तिकडे त्या सुंदर परिसरात छान वाटते. ” विजय काका यांचे ते शब्द ऐकून शोभा काकू यांना बर वाटलं.

विजय काका हे मूळचे कोकण विभागातले, लहान पण पासून मोकळ्या वातावरणात वाढलेल्या त्या दांपत्याला मुंबईतील ती वाहतूक, ते मोठ्या मोठ्या इमारती, सगळी कडे गर्दी आणि ते दमट वातावरण आवडेना. म्हणून इतके दिवस शोभा काकूंना गावी जायची इच्छा असली तरी मुलांच्या शिक्षणामुळे ते जमत नव्हत. आता मुले मोठी झाली आणि स्वतः कमवायला लागली त्यामुळे आता ते दोघे निश्चिंत पने गावी जाऊन थोडा निसर्गाचा आस्वाद घेऊ शकतील.