Ritbhatmarathi

Search
Close this search box.

भगवान विष्णूचा अवतार असलेल्या या देवाच्या मंदिरात दान करण्याला का आहे इतके महत्त्व …. जाणून घ्या या मागे दडलेली रंजक कथा

tirupati balaji story: आपला भारत देश हजारो मंदिरांनी भरलेला आहे. कारण आपल्या भारत देशाला हजारो वर्षांची प्राचीन परंपरा लाभलेली आहे. या हजारो मंदिरात कोट्यवधी भाविक श्रद्धापूर्वक येत असतात. यातील काही मंदिरे ही प्राचीन असून स्थापत्य कलेचा उत्कृष्ठ नमुना आहेत. तर काही मंदिरे ही खूप श्रीमंत आहेत. तर काही मंदिरातील प्राचीन प्रथा, परंपरा आणि मान्यता पूर्वापार चालत आलेल्या आहेत ज्या देशभरात प्रसिद्ध आहेत.

तसे पाहिले तर आपल्या देशात बरीच मंदिरे म्हणजेच त्यातील देव श्रीमंत मानले जातात पण त्यातही घेता येईल असे प्रमुख नाव म्हणजे आंध्र प्रदेशमधील चित्तूर जिल्ह्यात तिरुमला डोंगरावर वसलेले तिरुपती बालाजी मंदिर. या मंदिराचे निर्माण वीर नरसिंहदेव यादवराय, वीर राक्षस यादवराय आणि रंगनाथ यादवराय यांनी केले आहे. तिरुमला पर्वत रांगेत असलेले हे ठिकाण भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. मंदिरातील मूर्ती स्वयंभू असून या मंदिराची भव्यता आणि दिव्यता अचंबित करणारी आहे.

नजरा फिरल्या शिवाय राहणार नाहीत असे बांधकाम आणि लखलखाट आहे मंदिराचा. भगवान विष्णूच्या अनेक अवतार रुपातील फक्त बालाजीची मूर्ती अशी आहे, जीचा वरदहस्त खाली झुकलेला आहे जणू काही तो भक्तांना लक्ष्मी प्रमाणे धन देतो. हे मंदिर जसे श्रीमंत म्हणून जगभर प्रसिद्ध आहे, तसेच या मंदिरात अजून एक प्रथा प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे आणि ती म्हणजे केस दान करण्याची प्रथा. इथे फक्त पुरुषच नाही तर स्त्रियाही केस दान करतात.

आपण जरा अभ्यासपूर्वक कोणतीही गोष्ट पहिली तर आपल्या लक्षात येईल की आपल्याकडील प्रत्येक परंपरा आणि चालीरीतीमागे काहीना काही कारणे दडलेली आहेत. त्याचा उल्लेख पुराणात कुठे ना कुठे आपल्याला पाहायला मिळतो. केस दान करण्यामागे पण एक रंजक कथा आणि कारण दडलेले आहे. उगाच करायचं म्हणून काही कोणी करत नाही. त्यामागील कारण आणि हेतू समजला तर ते करण्याला कारण मिळत आणि अर्थही प्राप्त होतो.

जाणून घ्या महाराष्ट्रातील देवींचे साडेतीन शक्तिपीठे (sadetin shaktipeeth) आणि त्यांचा इतिहास

श्री त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिर Trimbakeshwar Jyotirling mandir in Marathi

चारधाम यात्रेचे अनन्यसाधारण महत्व आणि चारधाम यात्रेची पूर्वतयारी

सध्या भगवान बालाजीचे मंदिर जिथे आहे त्या ठिकाणी पूर्वी मुंग्यांचा पर्वत तयार झाला होता. तिथे एक गोमाता रोज येत असे आणि दूध देत असे. असे बऱ्याच वेळा झाले. एक दिवस गाईच्या मालकाने ते पाहिले आणि तो खूप क्रोधित झाला. तिथे जवळच पडलेली कुऱ्हाड त्याने उचलली आणि गाईवर उगारली, मात्र तो घाव गाईला न लागता बालाजी देवतेला लागला. त्या घावामुळे बालाजी देवतेचे काही केस तुटले.

हे सगळे पाहून नीला देवीने लगेच तिथे येऊन स्वतःचे काही केस कापले आणि बालाजीला जिथे घाव झाला तिथे ठेवले.असे केल्याने बालाजी देवतेचा घाव लगेच भरला आणि भगवान विष्णू म्हणजेच बालाजी प्रसन्न झाले. ते म्हणाले केस हा शारीरिक सुंदरतेचे एक महत्त्वाचा भाग आहे, असे असूनही त्याचा त्याग करून तुम्ही माझा घाव भरला. जी व्यक्ती अशा प्रकारे केसांचा त्याग करून अर्पण करेल त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. असे वरदान बालाजी देवतेने दिले.

केस दान करणे म्हणजे पाप आणि चुकीच्या गोष्टींचा त्याग करणे असे मानले जाते. चुकीच्या गोष्टींचा त्याग करून सत्कर्माच्या म्हणजे चांगल्या मार्गाला लागलेल्या माणसावर देवी लक्ष्मीचा विशेष कृपाशीर्वाद रहातो, लक्ष्मीदेवी सुख, समृध्दी, वैभव आणि संपन्नता देऊन भरभराट देते अशीही मान्यता आहे. त्यामुळे येथे दररोज वीस हजार भाविक दान करतात. भाविक जितके केस दान करतात त्याच्या दहा पट जास्त केस बालाजी परत देतात अशीही श्रद्धा आहे.

लग्नासाठी बालाजी देवाने कुबेराकडून कर्ज घेतले ( देवांनाही लग्नासाठी कर्ज घ्यावे लागते ) होते तेंव्हा बालाजीने कुबेराला सांगितले की, कलियुगात माझे भक्त मला सोने, चांदी वाहतील त्यातून मी तुझे कर्ज फेडीन. त्यामुळेच बालाजी देवतेला सोने आणि चांदी दान केले जाते.

थोडक्यात आपण दान करून देवाचे कर्ज फेडत आहोत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. असो एकदातरी मंदिराची भव्यता आणि दिव्यता पाहून सोने, चांदी जरी दान करायला जमले नाही तर केस नक्कीच दान करून पाप मुक्ती किंवा पापाचा त्याग करूच शकतो. हो ना ??

==========

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *