Ritbhatmarathi

Search
Close this search box.

©हासिम एन

“आई…. मला नको मारू आई….”

सीमा खडबडून जागी झाली….. चेहरा घामाने भिजला होता…. जवळच ठेवलेला पाण्याचा ग्लास तिने गटगटा पिऊन संपवला….

“काय झालं….” राजेश पण उठून बसला…..

“मला लहान बाळाचा रडण्याचे भास होतात हो…. सारखा आवाज येतो… आई मला नको मारू म्हणून….” सीमा रडत रडत बोलली….

“ नाही ती नाटक करू नको…. उद्या जायचं आहे आपल्याला…..डॉक्टर कडे….” एवढं बोलून राजेश झोपला……सीमा एकटक त्याचाकडे पाहत राहिली…. तिला आठवला तो दिवस…..

सीमा बाहेरच अस्वस्थ होवून बसली होती…. प्रचंड तणावात होती ती… मनोमन यावेळी तरी मुलगा असावा म्हणून प्रार्थना करत होती… लग्न झालं आणि छान सुखाचा संसार सुरू झाला…. राजेश मोठ्या कंपनी मध्ये चांगल्या पगारावर कामाला होता….पण खूप प्रयत्न करूनही फ्लॅट घेता येत नव्हता… पण पहिल्या मुलीचा रूपाने जणू लक्ष्मी नेच घरात प्रवेश केला… कामावर बढती मिळाली… थोडसं शहारा बाहेर का होईना पण होम लोन काढून फ्लॅट घेतला… सर्व काही व्यवस्थित चालू असतानाच सीमा ला पुन्हा दिवस गेले…

यावेळी मात्र त्याला मुलगाच हवा होता….

“सीमा… यावेळी मुलगाच हवा बर का…” सीमाची सासू तिला बोलली…

सीमा काहीच बोलली नाही…

“होणार ग आई… नक्की होणार…” राजेश बोलला…

“पण आपल्या हातात काही असत का…? देव देईल ते देईल..” सीमा बोलली…

राजेश आणि त्याच्या  आई ला थोडा रागच आला….

“यावेळी पण मुलगीच झाली तर….” सासू बोलली…

“आई… ऑफिस मध्ये एक जण बोलत होता… त्याच्या  ओळखीचे एक डॉक्टर आहेत.. ते चेक करून सांगतात.. मुलगा का मुलगी ते….” राजेश बोलला…

“अरे मग जाऊन ये,…”

त्याच दिवशी त्यांनी चेक अप केल….

मुलगी असल्याचं डॉक्टर ने सांगितलं… पण त्याला मुलगी नको होती म्हणून काही दिवसात गर्भपात केला….यावेळी तिसर्‍यांदा तीला दिवस गेले होते….. आज ही ती आणि राजेश पुन्हा आले होते गर्भलिंग तपासणी साठी….

“डॉक्टर…. काय आहे..? मुलगा की मुलगी..” राजेश बोलला…

“मुलगी…..” डॉक्टर हळूच बोलले…

राजेश ने डोक्याला हात लावला….

“परत मुलगी…. नशिबाने अगदी थट्टा मांडून ठेवलीय माझी….. एक आहे की घरात अजून एक मुलगीच म्हटलं तर कसं होणार…”

“काय करायचं ते सांगा… ठेवायचं की पाडायच….” डॉक्टर बोलले…

“ठेवून काय करू… पाडून टाका… पुढच्या वेळी बघू मुलगा असेल तरच ठेवू…” राजेश बोलला….

“हो पण एकदा त्यांना पण विचारा त्यांची काय इच्छा आहे…?” डॉक्टर बोलले…

“तिला काय विचारायच.. सर्व निर्णय मीच घेतो…. “ राजेश बोलला…

“ठिकय मग… या पुढच्या रविवारी… कुठे बोलू नका म्हणजे झालं… पोलिसांना कळलं तर जेल ची हवा खावी लागेल..” डॉक्टर समजावत बोलले…

“हो डॉक्टर… माहीत आहे… मागच्या वेळी केलचं होत की आपण… तेंव्हा पण मुलगीच होती की…”

राजेश बोलला…

“हो… त्याला वर्ष पण नाही झालं अजून… काळजी घ्या बायकोची…” डॉक्टर बोलले…

“हा घेतो… एका वंशाला दिवा लाव म्हटलं तर इथ मुली वर मुली….” पुटपुटत राजेश उठला आणि बाहेर आला…राजेश केबिन मधून बाहेर आला…. त्याला पाहून सीमा उठून उभी राहिली…

काहीशा रागानेच पाहत राजेश बोलला…”पुढच्या रविवारी यायचं खाली करायला….”

एवढं बोलून तो चालू लागला…. मागे हळुवार पावले टाकत सीमा चालू लागली…..

त्या दिवसा पासून तर सीमा ला होणारे भास खूप वाढले होते….. पोटात खूप दुखायचं… मागच्या वेळीच तिला गर्भपात करायचा नव्हता…. पण भीतीने काहीच बोलली नाही…. यावेळीही विरोध करायचं तिच्या अंगात धाडस नव्हतं…..

आज रविवार होता…. दोघे दवाखान्यात आले… तिला आत घेऊन जाणार इतक्यात सीमा डॉक्टरना बोलली…

“डॉक्टर… मला एकदा माझ्या बाळाचे ह्रदयाचे ठोके ऐकायचे आहेत….”

“हे काय नवीन खूळ…” राजेश काहीसा चिडला….

“प्लीज… एकदाच… माझ्यासाठी….” सीमाच्या डोळ्यात पाणी आले….

राजेश तयार झाला….

सोनोग्राफीची मशीन तिच्या पोटावरून फिरवली गेली…

मोठ्या स्क्रीन वर पोटातील अर्भक दिसत होते…

ह्रदयाचे ठोके ऐकू येऊ लागले…

“आई……” एका लहान मुलीचा आवाज कानावर पडला….

डॉक्टर…राजेश आणि सीमा एकदम दचकले…. इकडे तिकडे पाहू लागले….

“आई…बाबा.. मी बोलतेय तुमची मुलगी…तुमची होणारी मुलगी…..तुझ्या गर्भातून बोलतेय…. मी मागच्या वेळी ही होते…. तुझ्या गर्भात माझ अस्तित्व स्थिरावल होत… दुसर्‍यांदा तू आई होणार होतीस, बाबा आजी किती खुश होते…. माझा इवलूशा चेहर्‍यावर स्मितहास्य फुलल…. माझे छोटे छोटे अवयव वाढत होते प्रत्येक अवयव फक्त तुझेच गुण गात होते….बाबा..आजी तुझे किती काळजी घ्यायचे…. दिवसा मागून दिवस गेले आणि चौथा महिना आला… अचानक एके दिवशी तू इथेच आली होतीस…. अशीच निवांत झोपून होतीस आणि असाच स्कॅनर तुझ्या पोटावरून फिरवला गेला…. मला थोडीशी भीती वाटली…. पण या डॉक्टर मामांनी तुम्हाला काय सांगितलं आणि कसला सल्ला दिला काय माहीत पण पुढच्या आठच दिवसात तू पुन्हा आलीस या दवाखान्यात… आपल्याला पुन्हा का आणलं गेलय याचा विचार मनात आला…. तू एका अंधार्‍या खोलीत होतीस…. चोवीस तासा साठी तुझं खाण पिण बंद होत…. मीही भुकेने व्याकूळ झाले होते….. गर्भपात हा शब्द मी कुठून तरी ऐकला आणि माझ काळीज हादरलं…..

गर्भाशयात कैचीचे पात आले….मला तर ते तलवारी सारखे वाटत होते…. माझा इवलूशा देहाचे छोटे छोटे तुकडे केले जात होते…. जे माझे अवयव तुझे गुण गात होते ते या देहा पासून तोडले गेले…. एक एक तुकडा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता…. नंतर कापसाच्या बोळ्यात… मलाच ओळखता येत नव्हतं… कोणता हात आहे आणि कोणता पाय…  तुला आणि मला जोडणारी नाळ अस्तव्यस्त पडली होती…… ती तर तुझाकडे पाहून जणूकाही रडतच होती…..आई…. एक विचारू का ग..? जन्मा आधीच माझी हत्या का केलीस..? आई बाबा तुमचं काळीज इतक क्रूर कस झालं..? तुला गर्भाशयात माझी हालचाल जाणवली नाही का…?? बाबा…. वंशाच्या दिव्यासाठी तुम्ही पणती विझवली…. कदाचित मीही बनले असते जिजाई ..अहिल्या किंवा सावित्री… पण एकदा संधी तरी द्या…. 

डॉक्टर मामा……. कितीतरी मुक्या अश्रूंचा पुर डोळ्यात दाबला गेला असेल… जेंव्हा तुम्ही बिनबोभाटा गर्भपात केला असेल…… आता तरी ऐकाल ना या गर्भातील मुलीची हाक…. नका ना करू हत्या आमची…. आई बाबा… मला पुन्हा जन्म घ्यायचा आहे… यावेळी तरी मला जन्म द्याल ना…??”

मशीन मधून येणारा आवाज बंद झाला….. पण सीमा, राजेश आणि डॉक्टरच्या डोळ्यातून पाणी वाहत होत….. आज या छोट्या आत्म्याने त्या तिघांचा अंतरात्मा जागा केला होता….

शब्दांची गरज राहिली नव्हती…

राजेश आणि सीमा घरी गेले… अगदी हसत आणि येणार्‍या परीचे ते आनंदाने स्वागत करणार होते…

डॉक्टर मामांनी पण गर्भनिदान करणे सोडून दिल… अगदी कायमचं….

©हासिम एन

=================

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *