Ritbhatmarathi

Search
Close this search box.

आपला एकुलता एक मुलगा सुधीर याचे लग्न बऱ्याच दिवसांनी जमले म्हणून लताताई खूपच आनंदात होत्या…जसा सुधीर चांगल्या नोकरीला लागला तश्या लताताई वधूसंशोधनासाठी आपल्या मुलाच्या मागे लागल्या होत्या..सुधीर घरातलं लाडकं शेंडेफळ असल्याने अगदी थाटामाटात लग्न करण्याचे लताबाईंनी ठरवले…स्वराली म्हणजे सुधीरची होणारी बायको अत्यंत सालस,सुस्वभावी,सुशिक्षित आणि नोकरी करणारी होती…

म्हणून एकूण सुधीरही तिच्यावर भलताच खुश असे… लताताईही संसारदक्ष असल्याने घरकामात कुठल्याही प्रकारची हलगर्जी त्यांना चालत नसे…म्हणजेच संसार निगुतीनं करणाऱ्या होत्या असं म्हणायला काहीच हरकत नाही…आपल्या सुनेकडूनही लताताईंची हीच अपेक्षा होती…सुधीर आय.टी कंपनीमध्ये नोकरीला असल्याने पाच आकडी पगार सुधीरला होता…तरीही मुलीच्या घरच्यांकडून म्हणजेच स्वरालीच्या माहेरहून बरंच काही हुंड्याच्या रूपाने त्यांना उकळायचं होतं त्यासाठी स्वरालीच्या वडिलांना म्हणजेच रमेशराव यांना तगादा लावून स्वरालीसाठी दहा तोळे…आपल्या मुलासाठी बाईक किंवा चारचाकी वरती आणखी दोन तोळे द्या असं मागून घेतलं…याखेरीज मंगलकार्यालय निवडतानाही खूपच रमेशकाकांना जेरीस आणून सोडलं…स्वरालीचं माहेर एक्दम साधं पण सुशिक्षित विचारसरणीचं असल्याने वायफळ गोष्टींवर खर्च करणारं नव्हतं…आपल्या सासरकडच्या लोकांच्या मागण्या वाढता..वाढत असल्याने स्वरालीने आपला खर्च कमी करण्याचे ठरवले…लग्नाचा बसता करतानाही स्वरालीने लग्न लावतानाची साडी,हळदीची साडी,साखरपुड्याची साडी,सप्तपदीची साडी अशा कमी किमतीच्या पण चांगल्या साड्या घेतल्या….आणि त्यात घरगुती वापरण्यासाठी चार साध्या साड्या अशा साड्या घेतल्या म्हणून आपला स्वतःचा बस्ताही स्वतःच्याच कमाईतून केला…आपल्या वडिलांना जास्त खर्च होऊ नये याची पावलोपावली  खबरदारी स्वराली घेत होती…लग्नातला मेकअप करण्यासाठी बिऊटिशिअन सुद्धा स्वरालीने आणली नाही…

लग्नही मस्त लताताईंच्या मनासारखं धुमधडाक्यात पार पडलं…मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात ते काही चुकीचं नाही…याची प्रचिती लग्नानंतर स्वरालीला आली…स्वराली आपल्या माहेरी असतानाच सगळ्या कामात तरबेज असल्याने लताताई कामात काही खोट काढत नव्हत्या…तरीही संसारात तडजोड कशी करावी याचे दाखले त्या नेहमी स्वरालीला गाउन दाखवत असे….असंच स्वयंपाकघरात स्वराली काम आवरत बसली होती…सवयीप्रमाणे टोमॅटो जसं चिरतात तसं स्वराली चिरत होती…टोमॅटोचा देठाकडचा भाग स्वरालीने कापून टाकला…ही गोष्ट सासूबाईंनी हेरली…तशा त्या ओरडून म्हणाल्या-

लताताई – स्वराली…आईकडं असताना कधी टोमॅटो चिरला नाहीस का…देठाकडचा भाग का बरं चिरून टाकलास ? तेवढा टोमॅटो वाया गेला ना…इथून पुढे देठाकडचा भाग कापून फेकून देऊ नकोस…तो भागही टोमॅटो चिरताना घेत जा…वाया घालवत जाऊ नकोस…

स्वराली  – ठीक आहे आई…मला माहित नव्हतं..इथून पुढे नाही होणार असं…

लताताई – हम्म…फोडणीला जिरं घालशील ना…तर दोन चिमटीत येईल एवढंच जिरं घेशील…जास्त घेत जाऊ नकोस…समजलं..?

स्वराली  – हो आई…नक्की तुम्ही सांगताय तसंच करेल…

अशा प्रकारे…दिवसभराचा स्वयंपाक आणि इतर कामं स्वराली बिबोभाट करत असे…एक दिवस सुधीर ऑफिसवरून आला…स्वरालीने सुधीरचा टिफिन काढून पहिला तर त्यात भाजी उरलेली दिसली…स्वरालीने ती भाजी टाकून दिली…ही सुद्धा गोष्ट लताताईंनी पहिली…मग मात्र लताताईंचा आवाज चढला…

लताताई – स्वराली…हद्द झाली आता…तू चांगली भाजी टाकून दिलीस की…वाया कशाला घातलीस भाजी…मी खाल्ली असती ना…तुला माहितीय…आमच्या काळात एकत्र कुटुंब होत म्हणून मला भाजीही मिळत नव्हती…मी भाजीने बरबटलेली कढई चाटून-पुसून खात होते…तू तर चक्क डस्टबिन मध्ये टाकून दिलीस भाजी…तुम्हा आजकालच्या मुलींना काय ठाऊक संसार कसा करायचा ते…उत-मात करू नये ग…भजून खावं माणसाने…माजून खाऊ नये…

स्वराली गप्प ऐकून घेत होती…तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं…तसंच हुंदके देत पाण्याचा घोट प्यायली…रडू कसं-बस आवरलं…आपल्या नवऱ्याला रडका चेहरा दिसू नये म्हणून रडणं आतल्या-आत दबून ठेवलं…कसं-बस जेवण उरकलं…सगळी आवरा-आवर करून झोपण्यासाठी गेली…सुधीरही झोपण्यासाठी आला..स्वराली काही बोलत नाही…हे पाहून सुधीर स्वतः स्वरालीशी बोलू लागला –

सुधीर   – स्वरा…आज भाजी खूप छान केली होतीस…

स्वराली – हम्म…[एव्हडेच बोलते आणि डोळे मिटून शांत पडते]

सुधीर   – काय झालंय…?

स्वराली – काही नाही…आणि सांगून तरी काय होणारे…?

सुधीर   – काही व्हायलाच हवंय का…स्वरा…नीट सांग इकडे बघ माझ्याकडे…[स्वरालीला आपल्याकडे खेचतो ]

स्वराली – तुला जसं काही माहितीच नाहीय …आईंनी सांगितलं नाही वाटत…

सुधीर   – ती मला काही सारख्या तुझ्या चहाड्या सांगत बसत नाही…

स्वराली – जाऊ देत ना तुला सांगून काहीच होणार नाहीय…

सुधीर   – तुला सांगायचं असेल तर तू सांग नाहीतर सांगू नकोस….मला उद्या ऑफिस आहे…त्यामुळे मी झोपतोय..

स्वरालीही सुधीरशी काहीही न बोलता झोपी जाते…मग पुढचे आठ दिवस दोघेही एकमेकांशी अबोला धरतात…लताताईंना अबोल्याचं कारण कळू नये म्हणून दोघे फक्त कामापुरतं एकमेकांशी बोलत असे…त्यात मोकळेपणा नव्हता…एक दिवस स्वरालीच्या ओटीपोटात खूप दुखू लागतं…सकाळी कशी बशी काम आवरून दुपारी बेडवर गडबडा लोळू लागते…भयंकर असह्य अशा वेदना स्वरालीला होत असतात…दोन तासांनी अंग पूर्ण तापाने भरून येतं….तरीही दुपारचा चहा लताताईंना लागत असे म्हणून स्वराली चहा बनवून घेऊन जाते…खूपच वाकून चालत असल्याने स्वरालीला काहीतरी होतंय याचा अंदाज लताताईंना येतो म्हणून त्या स्वरालीला म्हणतात-

लताताई – काय ग स्वराली…एवढी वाकून का चाललीस…ताठ चालावं माणसाने…काही होतंय का तुला…

स्वराली  – नाही…ते…माझ्या ओटीपोटात भयंकर दुखतंय…[असं सांगत असतानाच स्वराली थडकन जमिनीवर कोसळते सासूबाई कशाबशा तिला उठून चेअर वरती बसवतात आणि खोसकपणे बोलतात ]

लताताई – काय ग बाई..आजकालच्या मुली…साधी कळ सोसत नाही यांना…बाळंतपणातल्या कळा काय सोसणार यांना…आम्ही नाही का अंगावर काढली दुखणी…

स्वराली काहीही न बोलता तशीच खुर्चीत बसून राहते…एका हाताने ओटीपोटावर हाताने मालिश करते पण दुखणं काही थांबत नाही…संध्यकाळी आपल्या नवऱ्याला….आपण आजारी आहोत हे कळू नये म्हणून काहीही सुधीरला सांगत नाही…कारण बायको आजारी असलेली नवऱ्याला आवडत नाही…म्हणून स्वरा गप्प असते…निमूटपणे आपलं काम करत असते…रात्री बेडवर झोपायला जाते…सुधीर नेहमीप्रमाणे शतपावली करून येतो…आता बायकोशी असलेला अबोला सोडावा म्हणून स्वरालीच्या अंगाला हात लावतो….तर….एकदम सुधीरच्या हाताला चटका बसतो…चटका बसल्याने सुधीर पटकन हात मागे घेतो…स्वराली बेशुद्ध असते…

सुधीर  – स्वरा…काय झालं तुला…?

स्वराली – [बरळत म्हणते] प्प्प्प्प्पाआणणं…पा….नि…

सुधीर   – पाणी हवंय…थांब आणतो…आई….आई…अगं…स्वरालीला काय झालंय…दिवसभर कशी होती…

लताताई – [जांभई देत येतात] काही नाही रे…घेरी आली होती फक्त…मग मीच उठून खुर्चीत बसवलं तिला…

सुधीर    – अगं…आई…डॉक्टरकडे न्यायचं सोडून काय करत बसलीस तू…?

लताताई – ते मला परवडणार नव्हतं…खर्च किती वाढलाय…थोडंसं दुखणं अंगावर काढायचं….तेच महत्वाचं असत संसारिकदृष्ट्या…

सुधीर   – इथेही तडजोड करायचीय तुला आई…चल…फोन कर डॉक्टरला नाहीतर मीच घेऊन जातो…डॉक्टरकडे…स्वरा…चल…थांब…मी पकडतो तुला…

एवढ्या रात्री सुधीर आपल्या बायकोला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो…डॉक्टरही ऍडमिट करून घेतात …रक्त-लघवी तपासणी करून युरीन इन्फेकशन असल्याने निदर्शनात आलं तशा डॉक्टरांनी मेडिसिन्स दिले आणि दोन दिवसांनी डिस्चार्ज दिलास्वराली घरी आल्यानंतर..काही वेळ आराम केला तसं सुधीरही आपल्या आईसमोर स्वरालीला विचारू लागला-

सुधीर – स्वराली…त्यादिवशी नक्की काय झालं होत…?

स्वराली – त्या दिवशी….माझ्या ओटीपोटात खूप दुखत होत…

सुधीर – मग तू आईला बोललंय नाहीस का ?

स्वराली – नाही बोलले…

सुधीर – कुठल्या मातीची बनलीस तू ? बोलायला हवं ना…माझ्याशी नको बोलूस पण काय त्रास होतोय हे सांगितलं पाहिजे ना तू…

स्वराली – कशी सांगणार मी…? कारण प्रत्येक गोष्टीत तडजोड करायची असं आईंनेच सांगितलंय…

सुधीर – आई…काय म्हणतीय ही..?

लताताई – मग…बरोबरच आहे माझं…अरे आम्ही नाही का राहिलोय इतक्या तडजोडीत…!

स्वराली – मग…माझे बाबाही लग्नात तडजोडच करत होते….तरीही त्यांच्या तडजोडीला कुणी जुमानलं नाही…कशाच्या बाबतीत तडजोड करावी हे माहिती नाहीय सुधीर आईंना…!

लताताई – म्हणजे काय म्हणायचं आहे नक्की तुला…? आम्हाला संसार करता येत नाही कि काय..

स्वराली – मी तडजोड कुठे करावी हे सांगतेय…आज माझ्या जीवाशी खेळलात तुम्ही तडजोडीच्या नावाखाली…दाग-दागिने,उंची कपडे…यात तडजोड करावी…हेल्थ च्या बाबतीत कशासाठी तडजोड करावी…? दाग-दागिने,कपडे याने शरीराची वरकरणी भूक भागेल पण आतल्या भुकेचा काय…अगदी खाण्या-पिण्याच्या बाबतीतही काटकसर करता तुम्ही…खाण्याचे हाल म्हणून मला सारखी भोवळ येत होती…तर काम करता करता कोसळणार होते मी…जीवावर आलं तरीही तडजोड सुचतीय तुम्हाला…

लताताई – बसल्या…बसल्या टिप्पलबाजी मस्त करता येते तुला…माझ्या लेकाच्या अंगावर सगळ्या घराची जबाबदारी आहे म्हणून जीव तीळ-तीळ तुटतोय माझा…एव्हढच असेल तर मग स्वतः नोकरी कर ना…

स्वराली – आई…मी नोकरी करण्यासाठी केव्हाच तयार होते…तुम्ही घरात एकट्या असल्याने…सुधीरने मला घरात तुमच्याबरोबर राहायला सांगितलं…तुमची काळजी घ्यायला सांगितली मी त्याचंच ऐकलं…पण माझ्या काळजीचा ज्यावेळी प्रश्न आला तेव्हा मला पदोपदी तडजोडीला सामोरं जावं लागलं…मी तर तयार आहे नोकरी करायला…[सुधीरकडे पाहून म्हणते] सुधीर तुझी सहमती असेल तर नक्की करेल मी नोकरी…

सुधीर – कर की…आता तर प्रत्यक्ष आईनेही सहमती दिली आहे…तुला जमेलही…   

मग काय आपल्या नवऱ्याचा प्रत्यक्ष पाठिंबा मिळाला म्हटल्यावर स्वरालीही आपली नोकरी मिळवून जोमाने नव्या वळणावर येऊ लागली…काही महिन्यांनी आर्थिक चनचन कमी होऊ लागली…स्वराली आपल्या मिळणाऱ्या पगारामधून थोडेसे पैसे एका हेल्थ इन्शुरन्स मध्ये दर वर्षी टाकत असे पुढची तजवीज आधीच करून ठेवलेली होती….मग घरखर्चही व्यवस्थित भागतं असे…आपोआपच लताताईंची चिडचिडंही कमी झाली.

हा लेख रीतभात टीमच्या मार्फत मुद्दाम पब्लिश केला आहे याचे कारण म्हणजे आजही आपल्या कुटुंबामध्ये आपली आई किंवा गृहिणी आपले आजारपण अंगावर काढणे हा एक उपाय समजते…पण हे साफ चुकीचं आहे आपला आजार याने दुपटीने वाढतो ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही म्हणून घरातील सासू आपल्या सुनेला आजारपण अंगावर काढण्याचा सल्ला देते…आणि सून जर आजारपण अंगावर काढणारी नसेल तर अप्रत्यक्षरीत्या शारीरिक अत्याचार सुनेवर होतो..हा सुद्धा एकादृष्टीने शारीरिक अत्याचारच आहे.

=================

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories