Ritbhatmarathi

Search
Close this search box.

उन्हाळ्यात ‘हि’ फळे आवर्जून खा. त्यांच्या सेवनाने मिळतात हे फायदे | summer season fruits in india

©® सौ. गीता गजानन गरुड.

summer season fruits in india: उन्हाळ्यात विविध फळांची रेलचेल असते. सिझनल फळं खाणे हे आरोग्यास हितकर असते.
चला तर मग पाहुयात उन्हाळ्यात उपलब्ध असणारी प्रादेशिक फळे व त्यांच्या सेवनाने आरोग्यास होणारे फायदे.

summer season fruits in india - mango

प्रथम स्थान येते ते फळांच्या राजाचे, अर्थात आंब्याचे. चैत्र महिन्यात आंब्याच्या झाडांना मोहर येऊ लागतो. आमराई या मोहोराच्या सुगंधाने दरवळते. अगदी बाळ कैऱ्यांपासनं आंब्याची झाडावर पुर्ण वाढ होईस्तोवर लहान बाळासारखं आंब्याला जपावं लागतं. अवेळी होणारी गारपीट, पाऊस, अतीउष्णता याततून तग धरुन जो आंबा शिल्लंक रहातो ते निसंर्गाचं दान आंबाउत्पादक शेतकरी विनातक्रार स्वीकारतो.

हापूस, केसर,रत्ना, सिंधू, सुवर्णा पायरी,लंगडा,वनराज अशा बऱ्याच आंब्याच्या प्रजाती आहेतं.

आंब्याची काढणी दुपारी चार नंतर करतात. फळे झेल्याच्या सहाय्याने देठांसहीत काढतात. झेला म्हणजे एका लांब बांबूला घुमटाकार जाळी बसवलेली असते. काठी फळाच्याजवळ न्हेऊन फंळ झेल्यात आलं की ओढतात.

१. रोगप्रतिकारशक्ती वाढते: आंब्यात ‘अ’जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने आंबे खाल्ल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते. अनेक आजारांपासून आपले रक्षण होते. आंब्याच्या पानांना स्वच्छ धुवून पाण्यात उकळतात. या पाण्याने डोळे धुतात.

२.पचनासंबंधी समस्या दूर होतात: नियमित आंबे खाल्ल्याने मलावरोधाची समस्या दूर होते. आंब्यामधे भरपूर पाणी व फायबर असल्याकारणाने बद्धकोष्ठता दूर होते.

३. केसांचे व त्वचेचे आरोग्य सुधारते: आंब्यामध्ये ‘क’ व ‘इ’ जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असल्याने आंबे नियमित खाल्ल्याने केसांचे व त्वचेचे आरोग्य सुधारते.

४.स्मरणशक्ती सुधारते: आंब्यामध्ये ‘क’, ‘अ’ व ‘इ’ जी्नसत्व तसेच लोह, कैल्शिअम, जस्त ही खनिजे असल्याने आंब्याच्या सेवनाने बुद्धी तल्लख होते, स्मरणशक्ती सुधारते.

५.बलवर्धक: काही आजारपणामुळे एखाद्यास थकवा आला असेल, वजन कमी झाले असल्यास आंबे खावे..प्रक्रुतीत निश्चित सुधारणा होते.

आंब्याची कोय, पाने, साल यांचाही वापर आयुर्वेदात विविध आजारांवर करतात.

आंब्यापासून आंबा कुल्फी, आंबा पल्प, आंबा आईसक्रीम, आंबा मस्तानी, आमरस, आंबा लस्सी, आंबा बर्फी, मोरंबा,आंब्याची साठं असे स्वादिष्ट पदार्थ बनवतात.

summer season fruits in india - jamun

जांभळाची झाडं ही अगदी माळरानावरील पडीक जमिनीपासून ते सुपीक मध्यम काळ्या जमिनीतही चांगली वाढतात. जांभूळ व्रुक्ष काटक असल्याने अतीपावसाच्या प्रदेशातही तग धरतो. उष्ण व समशीतोष्ण हवामान या झाडांना चांगले मानवते.

रोपांपासून लागवड केल्यास आठ-नऊ वर्षांनी फळे धरतात व कलमापासून केल्यास सात वर्षांनी फळे धरतात. बांबूच्या करंडीतून अगर फळांच्या बॉक्समधै जांभळांचे घड विक्रीसाठी पाठवतात.

१. मधुमेहावर लाभदायी: जांभूळ बियांचे चुर्ण ऊन पाण्यासोबत दर चार तासांनी घेतल्यास मधुमेहात रक्तातील शर्करा नियंत्रणात रहाते व दोनेक महिन्यात तब्येत सुधारते.

२. रोगप्रतिकारक शक्ती वाढते: जांभूळ फळांमधे केल्शिअम, पोट्याशिअम, लोह व ‘क’ जीवनसत्व मुबलक प्रमाणात असल्याने जांभळं खाल्ल्याने शरीरातील रक्ताची पातळी वाढते ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

३. जखमांवर फायदेशीर: जांभूळ बीची बारीक पूड करुन किंचीत पाण्यात कालवून जखमेवर लावल्यास जखम भरुन येते.

४. पोटाच्या तक्रारींवर लाभदायक: जांभळाची साल ठेचून ती पाण्यात उकळवून काढा तयार करतात व त्यात योग्य प्रमाणात मध, तूप, खडीसाखर घालून वैद्य, रोग्यास अतिसार,आव यावर देतात तसेच स्त्रियांच्या श्वेतप्रदरावरही हा काढा गुणकारी आहे.

५. मोडशी: पिकलेल्या जांभळांचा रस काढून तो बरणीत भरुन ठेवतात. बरणीस दादरा लावतात. साधारण वर्षभरानंतर बरणी खोलतात. अशारीतीने जांभूळआसव तयार होते. एक भाग जांभूळआसवात चारभाग पाणी मिक्स करुन पिल्यास पोटदुखी, मोडशीत आराम पडतो.

६. तोंडातील छाले दूर होतात: जांभळाच्या सालीच्या काढ्याच्या गुळण्या केल्यास तोंडातील छाले बरे होतात.

७. तारुण्यपिटीकांवर लाभदायी: जांभूळबी पाण्यात उगाळून तो लेप मुरमे, पुटकुळ्यांवर लावल्यास मुरमे नाहीशी होतात.

जांभळे ही लांबुटकी, फुगीर,रसदार, काळीजांभळी असतात. जांभळापासून सरबत,स्क्व्याश बनवतात.

summer season fruits in india - jackfruit

फणसाच्या प्रामुख्याने दोन जाती आहेत. कापा व बरका.कापा गर हा हातास चिकटत नाही. तर बरके गरे हे काप्याच्या मानाने अधिक मधुर व रसाळ असतात. बरका गरा हा लिबलिबीत असतो. विलायती फणस हीसुद्धा फणसाची जात आहे. फणसाचे झाड हे लेकुरवाळे असते. अगदी बुंधा दिसत नाही इतकीही काही झाडं धरतात. झाडाचे लाकूड टणक असते. त्याचा उपयैग खेळणी, विणा, उच्च प्रतिचे फर्निचर, घरबांथणीसाठी, शोभेच्या लस्तू बनविण्यासाठी करतात.

१. शक्तीवर्धक: हंगामात नियमित फणसाचे गरे खाल्ल्याने क्रुश व्यक्तीची शक्ती वाढते. वजन वाढवायचे असल्यास हंगामात गरे खाणे हा उत्तम पर्याय आहे. हंगाम नसताना फणसपोळ्यांच्या सेवनाने वजन वाढवू शकतात.

२. हगवणीवर उपाय: फणस पचनास कठीण. फार खाल्ल्यास अतिसार होतो, परंतु दहा ग्राम फणसाची पाने घेऊन त्याचा एक अष्टमांश काढा केल्यास व पाजल्यास लहान मुलांची हगवण थांबते.

३. रोगप्रतिकारक शक्ती: फणसात ‘क’ जीवनसत्त्व विपुल प्रमाणात असल्याने फणसाच्या गऱ्यांच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

४. पोट साफ होते: बद्धकोष्ठता, अल्सर यांसारख्या रोगांवर गऱ्यांचे सेवन लाभदायक आहे.

५. मधुमेहात फायदेशीर: गऱ्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स हा अतिशय कमी असल्याने गरे खाल्ल्यास रक्तातील साखर वाढत नाही. मधुमेही व्यक्ती हे फळ खाऊ शकतात.

६. उच्चरक्तदाबावर उपयोगी: ज्यांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी गऱ्यांचे सेवन आवर्जून केले पाहिजे. गऱ्यांत मुबलक प्रमाणात potassium असल्याने रक्तदाब नियंत्रणात येतो.

७. हाडांसाठी उपयोगी: गऱ्यांत magnesium व calcium मुबलक प्रमाणात असल्याने गरे खाल्ल्यास हाडे व मांसपेशी मजबूत होतात.

गरे अधिक प्रमाणात खाल्ल्यास अपचन होते. फणसाचे गरे खाल्ल्यानंतर त्याच्यावर लगेच नागवेलीचे पान खाल्ल्यास पोट फुगते, श्वास लागतो.

कोकणात बरके गरे घोटून त्यात तांदळाचा रवा घालून रुचकर सांदण बनविले जाते. फणसाची साठं बनवली जातात.
फणसाचे कच्चे गरे उभे कापून ते खोबरेल तेलात खमंग तळतात.

फणसाची कुयरीचे वरचे आवरण काढून, तुकडे करुन ते वाफवून घेतात व पाट्यावर ठेचतात. जिरे,मोहरी,लसणाची हिरव्या मिरचीची फोडणी करतात त्यात ही ठेचलेली कुयरी घालून परततात. वरतून ओले खोबरे पेरतात.

कच्च्या फणसाचे गरे पिकण्याआधी फणस फोडून, त्या गऱ्यांची भाजी करतात. कोकणात लग्नाकार्यात या भाजीला विशेष मान असतो.अतिशय चविष्ट लागणाऱ्या या भाजीस जनताभाजी असेही म्हणतात.
आठळ्या वाळवून पावसाळ्यात भाजी, आमटीसाठी वापरतात. भरपूर पाऊस पडत असला की उकडून, चुलीत भाजून आठळ्या खातात.

उन्हाळ्यात उष्णतेपासून राहत मिळण्यासाठी कोणती शीतपिये (best summer drinks) प्यावी.

उन्हाळ्यात उष्णतेपासून थंडावा मिळण्यासाठी आहार कसा असावा.

कोकण , कर्नाटक, मलबार या प्रदेशांत कोकमाची झाडे आढळतात. कोकमाच्या झाडास एप्रिल, मे दरम्यात लालसर रातांबे धरतात. या रातांब्यांत बिया असतात. बिया काढून त्यांना रखा लावून त्या वाळवतात व वाळल्यावर वरचे आवरण काढून त्यांपासून कोकमतेल बनवतात. रातांब्यांच्या सालींना दोनतीनदा आगळ, मीठ लावून ती उन्हात खडखडीत वाळवतात व हवाबंद बरणीत भरुन ठेवतात.

१. जळवातावर लाभदायक: तळपायास भेगा पडल्यास कोकमतेल(मुठेल) हे ऊन करुन भेगांवर चोळून लावावे. भेगा लवकर भरुन येतात. अनेक सौंदर्यप्रसाधनांत मुठेलचा वापर केला जातो.

२. उष्माघातापासून बचाव: उन्हाळ्यात शरीराचे तापमानही वाढते. ते नियंत्रणात ठेवण्यासाठी कोकमसरबत हा उत्तम पर्याय आहे. रातांबे चिरुन त्यातील बिया काढून रातांब्यांच्या वाट्यांमधे साखर भरतात. या वाट्या काचेच्या बरणीत एकावर एक थराने रचतात व बरणीचे झाकण लावून नियमित उन्हात ठेवतात. कोकम सरबत तयार झाले की ते गाळून बाटल्यांत भरतात व आंबटगोड आमसुले पित्तशामक म्हणून खातात.

३. पित्तशामक: अंगावर पित्त उठले असता आमसुले पाण्यात टाकून ते पाणी वरचेवर प्यावे. पित्त शांत होते.

४. पाचक: अन्नाचे पचन सुरळीत व्हावे याकरता भोजनात सोलकढीचा आवर्जून समावेश करतात. ओल्या नारळाचा चव, लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या, जिरे एकत्र वाटून मलमलच्या कपड्यात ओतून नारळाचे दूध गाळून घेतात. यात कोकम आगळ व मीठ टाकून सोलकढी बनवतात.

५. वजन कमी करण्यासाठी: रातांब्यांत ‘अ’ ,’ब3′ जीवनसत्व, magnesium, acetic acid, ascorbic acid, hydroxy citric David ,fiber ,zinc, iron असल्याकारणाने वजन कमी करण्यासाठी कोकमाचे सेवन लाभदायक ठरते.

रातांब्यांपासून कोकमबटर, आमसुलं/कोकम, कोकम आगळ, कोकम सरबत बनवतात. कोकणात माशांच्या सारात व मच्छी फ्राय करताना आंबटपणासाठी कोकम वापरतात.

काजूची झाडे ही सुमारे 12 मीटर उंच, मध्यम आकाराची आंबा वृक्षांसारखे सदाहरित असतात. फांद्या मऊ असतात. काजूच्या झाडाच्या सालातून डिंक बाहेर येतो. जानेवारी, फेब्रुवारीदरम्यान काजूच्या झाडांना मोहोर धरतो. काजूच्या झाडांना लाल, पिवळ्या रंगाचे आकर्षक बोंडू लागतात. या बोंडूस खाली काजूबी लागते. ही काजूबी भाजून, फोडून त्यातनं काजुगर काढतात.

१. ह्रद्ययविकारापासून दूर ठेवते: काजुगरांत monosaturated , poly saturated fats असतात जी bad cholesterol नियंत्रणात ठेवतात त्यामुळे काजुगरांचे सेवन ह्रदयासाठी लाभप्रद आहे.

२. वजन नियंत्रणात ठेवते: काजुगरांमधे fibre, magnesium असते त्यामुळे पचनशक्ती वाढते तसेच काजुगरांतील कर्बोदके वजन कमी करण्यास मदत करतात.

३. त्वचा, केस निरोगी रहातात: काजुगरांतील zinc, phosphorus,iron,antioxidantsमुळे त्वचा व केसांचे आरोग्य राखले जाते. काजुगरांच्या सेवनाने केस ,त्वचा मऊ,मुलायम होते.

४. बुद्धी तल्लख होते: काजुगरांतील monosaturated fats, polysaturated fats मुळे मेंदूंचे कार्य सुरळीत होते. बुद्धी तल्लख होते.

५. डोळ्यांच्या आजारांपासून रक्षण होते: काजुगरांतील omega3fati acids, e vitamin मुळे डोळ्यांच्या आजारांपासून रक्षण होते.

६. मधुमेह,ह्रदयविकारावर लाभप्रद: काजुगरांत हेल्दी फेट्सचं मुबलक प्रमाण असल्याने उच्च रक्तदाब, मधुमेह तसेच ह्रद्यविकारावर काजूचे सेवन लाभप्रद ठरते. कोलैस्ट्रॉल नियंत्रणात रहाते. रक्ताभिसरण सुधारते. रक्तातील ग्लुकोजचे लेवल नियंत्रणात रहाते. रक्तात गुठळ्या निर्माण होत नाहीत. काजूतील पोषकतत्वांमुळे पेशी निरोगी रहातात.

७. मांसपेशी,हाडे बळकट होतात: काजुगरांतील पोषक तत्वांमुळे थकवा जातो, उत्साह येतो. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी काजुगरांचे सेवन लाभप्रद आहे. काजुगरांतील magnesium, manganese मुळे काजुगरांच्या नियमित सेवन केल्यास मांसपेशी व हाडे बळकट होतात.

काजूच्या बोंडांवर प्रक्रिया करुन त्यापासून मद्यनिर्मिती,सरबत, ज्याम तयार करतात.
काजुगर हे पुलाव,बिरयानी,चिकनमधे वापरतात. काजुगरांची पेस्ट ही ग्रेव्हीमध्ये वापरतात. ओल्या काजुगरांची उसळ, आमटी रुचकर व प्रसिद्ध आहे. साल काढलेले, बिनसालीचे, काजुतुकडा, विविधमसाला काजू असे काजुगरांचे वर्गीकरण करुन देशभर व देशाबाहेर काजुगरांची विक्री होते.

सर्व उष्ण प्रदेशांत कलिंगडाची लागवड मोठ्या प्रमाणावर करतात.
मध्यम काळी पाण्याची निचरा होणारी जमीन या पिकास योग्य असते. या पिकासाठी उष्ण व कोरडे हवामान आणि भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक असतो. वेलींची वाढ होण्याकरिता २४ अंश सेल्सिअस ते २७ अंश सेल्सिअस तापमान उपयुक्त असते.
कलिंगडाच्या वेलीची खोडे अशक्त व लिबलिबीत असतात. खोडांवर केस व प्रतानही उगवतात.

१. वजन कमी होते: कलिंगडामध्ये फॅट आणि कॅलरीज अजिबात नसतात. त्यामुळे कलिंगडाच्या हंगामात कलिंगड खाल्ल्याने वजन कमी करणे सुलभ जाते.

२. पचनशक्ती सुधारते: कलिंगड खाल्ल्याने तुमची पचनशक्ती सुधारते. यात भरपूर प्रमाणात पाणी असल्याने अपचन, बद्धकोष्ठता अशा समस्या दूर होतात.

४. रोगप्रतिकारशक्ती सुधारते: कलिंगडात व्हिटॅमिन ए व सी भरपूर प्रमाणात असतं. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. डोळ्यांच्या आजारांपासून आपले रक्षण होते.

५. त्वचा चमकदार होते: कलिगंडात असलेल्या leucopin मुळे कलिंगडाच्या सेवनाने तुमची त्वचा चमकदार होते.

५. ह्रदयविकारापासून बचाव: कलिंगडामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. आपल्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यात कलिंगड महत्वाची भूमिका बजावते. तसेच रक्तवाहिन्यांमध्ये फॅट्स जमा होण्याचे प्रमाणही कमी होते.

६. उष्माघातापासून बचाव: उन्हाळ्यात अतिघामामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची झालेली कमतरता कलिंगड भरुन काढते. थकवा दूर करते व उत्साह.वाढतो.

७. उच्चरक्तदाबापासून बचाव: कलिंगडात असलेल्या potassiumमुळे रक्तदाब नियंत्रित रहातो.

कच्च्या कलिंगडापासून भाजी व लोणचे बनवतात. पिकलेल्या कलिंगडाचा उपयोग खाण्यासाठी व सरबता करण्यासाठी करतात.

जांब या वनस्पतीचे मोठे झुडूप किंवा वृक्ष ३—१२ मी. उंचीपर्यंत वाढतो. खोड आणि फांद्या साधारणपणे चपट्या असतात. पाने साधी, हिरवी गर्द व भाल्यासारखी असतात. झाडाला मोहक व सुगंधी फुले येतात. फळे फिकट हिरवी, हिरवी-गुलाबी, जांभळी, लाल अशा वेगवेगळ्या छटांमध्ये असतात. फळांचा गर रसाळ, कुरकुरीत,स्वादिष्ट असतो; परंतु कमी गोड असतो फळांमध्ये करडया रंगाच्या १-२ बिया असतात.

जांब हे फळ मुत्रल आहे. उष्माघातापासून वाचण्यासाठी जांबाचे सेवन लाभप्रद आहे.

पानांपासून तयार केलेले तेल हे स्नायूच्या दुखण्यांवर वापरतात.

उन्हाळ्यात घशास कोरड पडते. यावर जांबचे सेवन लाभप्रद आहे.

जांबफळापासून jam व जेली तयार करतात.

================

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *