Ritbhatmarathi

Search
Close this search box.

करोडो रुपयांची नोकरी सोडली आणि स्वतःचा व्यवसाय सुरु केला. आज नवऱ्यासोबत विनिता सिंह चालवतेय स्वतःची कंपनी | sugar cosmetics owner Vineet Singh

ज्या लोकांनी विशेषतः महिलांनी व्यवसायात यश मिळवून उत्तम कामगिरी केली आहे अशा लोकांसाठी खास मॅगझिन बनवले जाते. फोर्ब्स मॅगझिन हे एक असे मॅगझिन आहे ज्यात यशस्वी महिला व्यावसायिकांची ओळख करून दिली जाते,या मॅगझिनच्या मुखपृश्टा वर जागा मिळणे हे खूप मानाचे समजले जाते.या मॅगझिनने २०२१ पासून वूमन पॉवर लिस्ट सुरू केली असून यातील एक नाव आहे शुगर कॉस्मेटिक्सची संशोधक आणि सी.ई.ओ विनिता सिंग (sugar cosmetics owner Vineeta Singh).

व्यवसाय सुरू करणे आणि त्यात यश मिळवणे ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही.व्यवसाय करण्यासाठी असणाऱ्या संभाव्य धोक्याचा विचार करणे खूप गरजेचे असतेच पण त्याबरोबर महत्त्वाचा असतो ठाम निर्णय. बऱ्याच वेळा आपण मोठमोठी स्वप्ने बघतो,त्यासाठी धडपडतो,पण प्रत्यक्षात जेंव्हा निर्णय घेण्याची वेळ येते तेंव्हा मात्र मन चलबिचल होते आणि मग काहीच हाती लागत नाही. पण जिद्द,काहीतरी नवीन आणि वेगळं करण्याची धडपड आणि स्वतःच विश्व निर्माण करण्याचे स्वप्न असेल तर आपण काहीही करू शकतो.

१. विनिता सिंह ह्यांचे शिक्षण:

विनिता सिंग यांचे शिक्षण आय.आय.टी मद्रासमध्ये झाले तर मॅनेजमेंटची पदवी आय.आय.एम अहमदाबाद येथे पूर्ण केली.त्यांचे पती कौशिक मुखर्जी आणि विनिता सिंग यांनी मिळून शुगर कॉस्मेटिक्सची (Sugar Cosmetics) सुरुवात केली,त्यासाठी त्यांनी त्यांची शेवटची तीस लाख रुपयांची एफ.डी मोडली होती.

विनिता सिंग यांचे वडील तेज सिंग एम्स मध्ये संशोधक होते,त्यांनी कॅन्सर आणि बाकी आजारांसाठी लागणाऱ्या औषधांना अधिक सक्षम करण्यासाठी प्रथिनांच्या संरचनेचा संशोधन करण्यासाठी पूर्ण आयुष्य वाहून टाकले होते.विनिता सिंग यांच्या कुटुंबात कोणीही व्यवसाय करत नव्हते,त्यामुळे तसा त्यांना व्यवसायाचा काहीही अनुभव नव्हता.

विनिता सिंग यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर मोठ्या नामांकित बँकेत सालाना १ करोड या पगाराची नोकरीची संधी त्यांना मिळाली होती, त्या वेळी विनिता सिंग यांचे वय केवळ २३ वर्षे इतके होते, विनिता सिंग यांनी त्यासाठी सरळ नकार दिला होता,त्यांच्या या निर्णयाची चर्चा बराच काळ होत होती,पण विनिता सिंग यांना स्वतःचे वेगळे असे काहीतरी करायचे होते आणि त्यांचा निर्णय ठाम होता.

२. कशी केली शुगर कॉस्मेटिक्सची सुरुवात:

त्यादृष्टीने त्यांनी २००७ मध्ये Quetzal नावाचे स्टार्ट अप सुरू केले,त्यामध्ये ज्या लोकांना नोकरी हवी आहे अशा लोकांच्या वैयक्तिक किंवा भौगोलिक माहितीची पडताळणी करण्याची सेवा पुरवली जात असे पण या कामात विनिता सिंग यांना यश मिळाले नाही.त्या वेळी विनिता सिंग यांना हताश व्हायला झाले होते,एकतर इतक्या मोठ्या पगाराची नोकरी सोडून व्यवसाय करण्याचा घेतलेला निर्णय त्यात पहिल्याच प्रयत्नात आलेले अपयश,त्यामुळे त्यांना आपला निर्णय चुकला तर नाही ना असे वाटू लागले होते,परिस्थिती इतकी कठीण झाली होती की त्यांनी दर महिना केवळ दहा हजार रुपये पगाराची नोकरीही केली.

पण त्यांचे स्वप्न हरले नव्हते,उमेद संपली नव्हती,मग पुढे २०१२ मध्ये त्यांनी Fab Bag ची सुरुवात केली,ज्यामध्ये महिलांना अगदी माफक फी भरून प्रत्येक महिन्यात सौदर्य प्रसाधनांची सेवा पुरवली जात होती.यामुळे ग्राहकांची विशेषतः महिलांची मुख्य गरज काय आहे हे समजण्यासाठी विनिता सिंग यांना खूप मोठा फायदा झाला.तो असा की यात समाविष्ट असलेल्या महिलांनी विनिता सिंग सोबत त्यांची आवड निवड,त्वचेच्या तक्रारी तसेच आवड नसलेल्या गोष्टी सांगितल्या.ही सगळी माहिती विनिता सिंग यांनी जेंव्हा पडताळून पाहिली तेंव्हा त्यांच्या हे लक्षात आले की विदेशी आणि स्थानिक मेकअप ब्रँड हे भारतीय त्वचा विकारांवर नीट काम करत नाहीत,पाहिजे त्या प्रमाणात परिणाम दिसून येत नाहीत.

३. मार्केटिंग स्ट्रॅटेजी | Marketing Strategy:

आपण जे काही मेकअप साहित्य वापरतो त्याचा योग्य वापर कसा करावा याची जाण आपल्याला असणे गरजेचे आहे तसेच हा मेकअप प्रदूषित ठिकाणी किंवा प्रवासातही दीर्घ काळ टिकला पाहिजे असे विनिता सिंग यांना वाटे.त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर त्यांनी शुगर कॉस्मेटिक्सची सुरुवात केली ते साल होते २०१५.सौदर्य प्रसाधनं ्चा वापर कसा करावा हे ग्राहकांना समजण्यासाठी त्यांनी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर केला यात इंस्टाग्राम, यू ट्यूब आणि विनिता सिंग यांचे शुगर अॅप यांचा समावेश होता.

४. शुगर कॉस्मेटिक्सचा एकूण टर्नओव्हर | sugar cosmetics net worth:

शुगर कॉस्मेटिक्स हे एक डिजिटल ऑनलाईन सुविधा देणारे पहिले दुकान आहे. आज त्यांचे ऑफलाईन सुद्धा खूप दुकाने आहेत. तब्बल १३० पेक्षा जास्त शहरात २५०० पेक्षा जास्त आउटलेट आहेत.त्यांच्या प्रसाधनांचे उत्पादन केवळ भारत देशापुरते मर्यादित नसून जर्मनी, इटली आणि कोरिया मध्ये सुद्धा होत आहे आणि अमेरिकेत सुद्धा त्यांचे प्रसाधने पुरवले जातात. भारताची युवा महिला हे विनिता सिंग यांच्या उत्पादनांचे मुख्य केंद्र आहे.

सुरुवातीला शुगर कॉस्मेटिक्सचा निव्वळ नफा दोन करोडपेक्षा कमी होता,तिथे आज दिवसाची विक्री दोन करोड रुपये आहे तर २०१९-२० मध्ये निव्वळ नफा १०५ करोड रुपये इतका होता.विनिता सिंग यांच्या शुगर कॉस्मेटिक्सचे मुख्य प्रॉडक्ट आहे स्कार्लेट ओ हारा लिपस्टिक.त्यांच्या सौदर्य प्रसाधनं वर सवलत मिळत नसूनही दर वर्षी तीस हजार ऑर्डर पूर्ण होतात कारण यांनी उत्पादनांची गुणवत्ता कायम ठेवली आहे.

जिथे काही कंपन्यांना १०० करोडोंची कमाई करायला वीस वर्षे लागतात तिथे विनिता सिंग यांनी केवळ ४ वर्षात हे यश मिळवले आहे.२०१९ मध्ये भारतात त्यांनी पहिले दुकान सुरू केले तर आज ९२ शहरांमध्ये ७०० पेक्षा जास्त उत्पादने बाजारात उपलबध आहेत.जिथे काही कंपन्यांना १०० करोडोंची कमाई करायला वीस वर्षे लागतात तिथे विनिता सिंग यांनी केवळ ४ वर्षात हे यश मिळवले आहे.२०१९ मध्ये भारतात त्यांनी पहिले दुकान सुरू केले तर आज ९२ शहरांमध्ये ७०० पेक्षा जास्त उत्पादने बाजारात उपलबध आहेत. विनिता सिंग यांच्या कंपनीचे काम तीन विभागात केले जाते.

  • long lasting
  • weather proof आणि प्रत्येक ऋतुंमध्ये वापरता येतील असे उत्पादन तयार करणे.

२०१७ मध्ये त्यांच्या कंपनीला “सिरीज ए फंडिंग” सुद्धा मिळाले.
जर तुम्हाला या जगात सर्वोत्तम, सर्वश्रेष्ठ अस काही करायचं असेल तर त्यासाठी सातत्याने कामास वाहून घ्यायला हवे आणि चांगल्या परिणाम साठी संयम ठेवायला हवा, हा विनिता सिंग यांच्या यशाचा मंत्र आहे. विनिता सिंग या केवळ व्यवसायातच पारंगत नाहीत तर त्या उत्तम धावपटू पण आहेत. इतकेच नव्हे तर त्यांनी अल्ट्रा मेरेथोन आणि ट्राय इथीलिस्त यासारख्या नामांकित १४ पेक्षा जास्त स्पर्धेत सहभाग घेऊन सलग तीन वर्षे ८९ किमी धावा पूर्ण केल्या आहेत.

विनिता सिंग यांनी वार्षिक एक करोड रुपये पगार असलेली नोकरी सोडली, पण व्यवसायात रोज एक करोड रुपये मिळतील इतके घवघवीत यश मिळवून यश पायाशी खेचून आणले.

अशा प्रकारे त्यांनी जगासमोर एक उत्तम आदर्श उभा केला आहे.व्यवसायाची कोणतीच माहिती किंवा समज नसताना सुद्धा आपण शून्यातून विश्व निर्माण करू शकतो हेच त्यांनी दाखवून दिले आहे.

आपणही तोच आदर्श समोर ठेवून आपल्या स्वप्नांना पंख द्यायला हवेत.हो ना ??

====================

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *