Ritbhatmarathi

Search
Close this search box.

“अरे हो रे…..फायनल म्हणजे फायनल…दरवर्षी प्रमाणेच ….यावेळचा न्यू यर गोवा मधेच सेलिब्रेट करू…..फुल्ल कल्ला… हो हो मी नीता ला पण सोबत आणतो….तिला माहीत आहे मी थोडी घेतो ते….तिची काहीच हरकत नसते कधी…….???”

दीपक फोन वर मित्राशी बोलत होता…. फक्त काहीच दिवस उरले होते… नवीन वर्षाची सुरवात होणार होती…..दीपक चा हा दरवर्षीचा प्लान होता…. मस्त गोवा गाठायचं…..बार मधे डांस आणि मद्यधुंद व्हायच……

दीपक चे बाबा बेड वर पडून होते….. गणेश त्यांना पेपर मधील कोणती तरी बातमी वाचून दाखवत होता…..गणेश म्हणजे त्यांची काळजी घेणारा नोकर होता….

नोकर जरी असला तरी घरातील सर्वजण त्याला घरातीलच सदस्या सारखं वागवत होते….. ….

दीपक चा आई देवघरात बसून पोथी वाचत बसल्या होत्या…..

नीता म्हणजे दीपक ची बायको किचन मधे व्यस्त होती …..

तेवढ्यात छोटा गंपू पळत त्याचा  आजोबांजवळ आला….

“आजोबा…..” गंपू त्यांना बिलगला…..

“अरे सावकाश …. “ असे म्हणत गणेश ने त्याला उचलून बेड वर बसवले….

“बोला छोटे सरकार काय म्हणताय….??

“आजोबा आजोबा…..उद्या 31 डिसेंबर आहे….मग आपण नवीन वर्षा साठी काय करायचं…??? गंपू बोलला……

आजोबा ना त्या एवढ्याशा गंपू च कौतुक वाटलं….

“अम्म…..तू बोल काय करायचं…..” आजोबा बोलले…..

गंपू ने विचार केला पण त्याला काही सुचलं नाही……

“आजोबा….तुम्ही कसं करायचा हो नवीन वर्षाच स्वागत…..” गंपू बोलला….

नवीन वर्ष म्हटलं की नीता पण किचन मधून बाहेर आली आणि बोलली

“हो सांगा ना बाबा….. तुमचा वेळी कस होत…तुम्ही आणि आईनी खूप धमाल केली असेल ना आधी..आम्ही दोघे दर वर्षी गोव्याला जातो तस…”

आई पण पोथी मधून डोक काढून वर पाहू लागल्या….

गणेश ने त्यांना आधार देऊन बसवलं……..

नीता आणि गंपू चा प्रश्न ऐकून बाबांची नजर पोथी वाचणार्‍या त्यांचा बायको वर गेली….

मग ते भूतकाळात हरवले……आणि सांगू लागले…..

‘’आमचा वेळी नवीन वर्ष म्हणजे तसा रोजचा सारखाच….. फक्त एक नवीन कलेंडर आणायचा….. तसा आमचा त्यावेळी मोडकाच संसार….. ही लग्न करून आली आणि मोडकया संसाराला आधार मिळाला……नवीन वर्ष कुठल्या तरी मोठ्या हॉटेल मध्ये साजरा करावं म्हटलं तर तेवढ्याच पैशा मध्ये पूर्ण आठवड्याचा बाजार यायचा….. मग हीच  म्हणायची….. नको कुठे बाहेर जायला…..बघा मी कशी घरा मधेच मस्त जेवण बनवते….. आणि मग मस्त मुगाची खिचडी आणि पूरण पोळी बनवायची…. मुगाची खिचडी….. दीपक च जीव की प्राण…. खूप आवडायची त्याला…..जेंव्हा तो इवळूशा हाताने डोळे मिचकावत खिचडी खायचा…. तेंव्हाच वाटायचं नवीन वर्षाची मस्त सुरवात झालीय म्हणून……”

बोलता बोलता बाबांचे डोळे पाणवले…. पोथी वर पण काही अश्रुंचे थेंब पडले…..

नीता आणि गंपू पण शांत पणे ऐकत होते…..

तेवढ्यात दीपक ऑफिस मधून घरी आला…….

त्याने बॅग नीता कडे दिली… फ्रेश होवून बाहेर आला…

हॉल मध्ये येऊन बसला….. गंपू नवीन वर्षा चा प्लॅनिंग बद्दल बोलणार इतक्यात दीपक बोलला…..

“उद्या मी नीता आणि गंपू गोव्याला चाललोय,,,,”

नीताला या बद्दल आधीच माहीत होत…. दरवर्षीच जायचे ते गोव्याला….. पण का कुणास ठाऊक यावेळी उत्साह वाटत नव्हता….. गंपू तर खूपच नाराज झाला…..

“पप्पा….मी नाही येणार तुमचा सोबत …” गंपू बोलला….

दीपक हसला आणि बोलला….”का रे बाबा… “

“मला नाही यायचं तुमचा बोरिंग पार्टी ला… तुम्ही बसता पार्टी करत मी बसतो तसाच….तुमचं तर लक्ष पण नसत माझा कडे…..” गंपू नाराजीचा स्वरात बोलला…….

दीपक ला काय बोलावं कळेना….त्याला मागचा वर्षीची पार्टी आठवली….. कळत नकळत का होईना त्याचा कडून दुर्लक्ष झालं होत…..

तरीही हसत तो बोलला….”ठिकय…. तू थांब आजी आजोबा सोबत……”

बाबा आणि आई काहीच बोलले नाहीत…..

नीता ला काही बोलायच होत पण ती ही शांतच राहिली…..

दुसर्‍या दिवशी सकाळी दीपक ची घाई चालली होती….

“अग नीता आवर….लवकर….”

नीता चा मनात वेगळच काही चालू होत…..

दीपक त्यांचा बाबाचा बेड जवळ आला….गणेश बाजूलाच उभा होता….

“गणेश ..नीट काळजी घे बाबांची….. सर्व औषध दे वेळेवर…..”

“व्हय दादा…तुम्ही नका काळजी करू…. मी हाय की…” गणेश बोलला….

बाबांनी दीपक कडे पहिलं…..आणि हातानेच बसायची खूण केली…..

दीपक त्यांचा बाजूला बसला….. त्यांनी गणेश ला खुणावल…. गणेश ने एक पॅकेट त्यांचा हातात दिल….काही गिफ्ट होत…..

“बाबा हे काय…??” दीपक बोलला…

“माझा कडून तुला नवीन वर्षा साठी भेट…” बाबा बोलले….

दीपक ने ते घेतले….. “आहे तरी काय यात…??”

“बघ खोलून…” बाबा बोलले….

दीपक ने उघडून पहिलं तर आत शांपेन ची बाटली होती….

दीपक ते पाहून चकित झाला आणि बाबांकडे पाहू लागला…..

“अहो बाबा….तुम्ही मला हे देताय..पण मी नाही पित…” दीपक अडखळत बोलला…..

“अरे बाप आहे तुझा मी… सगळं माहीत  आहे रे मला…. जा एंजॉय कर…..”

दीपक ला काय बोलावं ते कळेना….. तो लगेच निघाला तिथून कार मधून सर्वांना बाय केल…..

गंपू तसा नाराजच होता….. आई आणि बाबा पण नाराज होते पण एवढ्या वर्षात त्यांनी स्वत: चा मनातील भावना चेहर्‍यावर न आणण्याच सामर्थ्य मिळवल होत…..

दीपक कार चालवत होता….नीता बाजूला बसून आई बाबांचा चेहरा आठवत होती…. त्यांचा नकली हास्या मागचे त्यांचं दुख दिसत होत…..दीपक मात्र त्याचाच धुंदीत होता……

“यू नो नीता…..ओल्ड शांपेन…..अँड चकणा म्हणून चिकन….. इट्स बेस्ट कॉम्बिनेशन इन द वर्ल्ड….याचा चवीची सर कशालाच येणार नाही……”

नीता ने क्षणभर त्याचाकडे पहिलं आणि बोलली…..

“आईंचा हातची मुगाची खिचडीला पण नाही का…???

नीताचा या वाक्याने दीपक ने करकचून ब्रेक मारला….तो स्तब्ध झाला आणि नीता कडे पाहू लागला….

“कुठे चाललोय आपण दीपक….गोव्याला….तिथे जाऊन काय करणार….? तू दारू पिणार मनाला वाटेल ते खाणार आणि मग पडणार नशे मध्ये… उद्या सकाळी जेंव्हा नवीन वर्षाचा सूर्य उगवेल तेंव्हा त्याच स्वागत आपण असे करणार मद्यधुंद होवून…..दरवर्षी आपण करतोच ना हे…या सर्वात आपली माणस कुठे आहेत….??

दीपक विचारात पडला…..बोलला…”तू आहेस की सोबत..”

नीता बोलली…”अरे फक्त तू आणि मी म्हणजे आपल कुटुंब आहे का..??यात बाबा कुठे आहेत….आई कुठे आहे……आपला गंपू कुठे आहे..??? थोडसं आठव तू लहान असताना बाबा आणि आई तुला सोडून कुठे असे फिरायला गेलेत्त का…?? त्त्यांनी त्यांचा सुखाचा विचार केला का कधी…???मग आपण कसे रे एवढे स्वार्थी वागतोय…….”

दीपकचे डोळे पाणावले……”हो ग पण आपण ही त्यांची काळजी घेतोच ना…. त्यांची काळजी घ्यायला स्वतंत्र माणूस ठेवला आहेच की….”

“दीपक…माझी तुझा बद्दल काहीच तक्रार नाहीये….उलट मला तुझा अभिमानच वाटतो….. कारण ऑफिस ची काम सांभाळून तू तुझा जबाबदर्‍या पूर्ण करतोस….. पण नवीन वर्षाचा हा क्षण आपण आपल्या लोकांसोबत घालवला तर….?? गोवा ला तर जातोच ना आपण…?? हेच बघ ना… माझे बाबा आता या जगात नाहीत…. माझी इच्छा असूनही त्यांना भेटू शकत नाही…..”

बोलता बोलता तिचा कंठ दाटून आला…… ती पुढे बोलली…..

“खूप काही अपेक्षा नसतात रे….फक्त आनंदाचे काही क्षण….प्रेमाचे चार शब्द…..”

नीता बाबांनी दिलेल्या शांपेन कडे पाहून बोलली…..

तुझा समोर दोन पर्याय आहेत दीपक….. शांपेन की मुगाची खिचडी……”

गंपू अजूनही नाराज होवून बसला होता….. आई बाबा त्याची समजूत काढत होते…..

तेवढ्यात दारावरची बेल वाजली…

आईंनी जाऊन दार उघडल…… समोर दीपक आणि नीता उभे होते….

गंपू खुश होवून नीता ला जाऊन बिलगला,,,,

बाबा गणेश चा आधार घेत बेड वर उठून बसले…. आणि बोलले…..”अरे काय झाल..??”

गणेश कडे पाहत दीपक बोलला….. “गणेश….जा तुला 2 दिवस सुट्टी…. नवीन वर्षाच स्वागत कर तुझा कुटुंबा सोबत….”

दीपक डस्टबिन जवळ गेला हातातील शांपेन बोटल कडे एकदा पहिलं आणि ती बोटल त्याने त्यात फेकली……

आणि आई कडे पाहिलं आणि बोलला…….

“आई आज मला मुगाची खिचडी आणि पूरण पोळी हवीय…..ते पण तुझा हातची…”

सर्वांचे डोळे भरून आले होते…..

बाबा बोलले…. “आज खर अस वाटतय की नवीन वर्ष सुरू झालं….. हॅप्पी न्यू यर “