Ritbhatmarathi

Search
Close this search box.

skin care tips चेहरा उजळण्यासाठी हे घरगुती उपाय नक्की करून पहा

skin care tips : मित्रानो सुंदर दिसायला कोणाला आवडत नाही ?? आपण सुंदर दिसावे, आपल्या सौंदर्याचे कौतुक करावे ही प्रत्येकाची सुप्त इच्छा असते. सुंदर दिसण्याची प्रत्येकाची कल्पना, व्याख्या वेगळी असू शकते कदाचित. म्हणजे कोणाला बाह्य सौंदर्य पेक्षा आंतरिक सौंदर्य म्हणजेच मनाचे सौंदर्य, गुणांचे सौंदर्य अधिक आकर्षित करू शकते. ते तर आहेच आपण जसे बाहेरून सुंदर दिसतो तसेच मनातूनही विचार सुंदर असायला हवेत, वागणे सुंदर असायला हवे. पण त्याच बरोबर हे सौंदर्य बाहेरूनही तितकेच निखरलेले , मुलायम, नितळ असेल तर आपल्या सौंदर्यात अजुनच भर पडेल. आपली त्वचा जर उजळलेली असेल तर आपण कमालीचे दिसू शकतो.

मग सौंदर्य म्हणजे नक्की काय ?? तर रोज उठून मेकअप करून, नटून थटून बसने म्हणजे सुंदर असणे असे नाही. मुळात आपली त्वचा किती सुंदर आहे, किती निरोगी आहे यावरून आपले सौंदर्य ठरते.आपला रंग किती उजळ आहे यावरून सौंदर्याचे मोजमाप करण्या पेक्षा आपली त्वचा किती निरोगी आहे यावरून ते केले तर अधिक समर्पक म्हणजेच योग्य ठरेल.

आजकाल आधुनिक विज्ञान आणि प्राचीन आयुर्वेदाच्या मदतीने त्वचा उजळने, निरोगी ठेवणे जास्तच सोपे झाले आहे. याशिवाय यातील उपाय पद्धती या आयुर्वेद आणि मेडिकल दोघांनीही मान्य केलेल्या आहेत. त्याही पेक्षा महत्त्वाचे म्हणजे या उपाय पद्धती या घरगुती आहेत. त्यामुळे पार्लर मध्ये जाऊन त्वचेसाठी ट्रीटमेंट घेण्याचा बराच खर्च वाचणार आहे. पण यासाठी काही खाण्या पिण्याच्या सवई बदलणे आणि काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

चला तर मग बघुया काय करावे लागेल ते :

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण तुमच्या दिवसाची सुरुवात जर ऊर्जेने, उत्साहाने झाली तर तुमची त्वचा दिवसभर सूर्याप्रमाणे तेजस्वी आणि निरोगी रहाते. बघुया त्यासाठी काही खास टिप्स ज्या तुमच्या त्वचेला उजळपणा देतील आणि तो टिकवून ठेवण्या सोबत सुंदर करतील.

  • रोज सकाळी एक ग्लास पाणी गरम करा, त्यात तीन चमचे साखर आणि १/४ मीठ टाका. पाणी उकळू लागल्यावर गॅस बंद करा आणि गाळून चहा पीतो त्याप्रमाणे घोट घोट घेत रहा. असे केल्याने आपले शरीर आणि मेंदू ताजेतवाने राहतीलच शिवाय त्वचा उजळण्यासाठी मदत होईल. त्यामुळे दिवसाची सुरुवात आरोग्यदायी आणि ताज्या ड्रिंक ने करावी.
  • रात्री झोपण्यापूर्वी aloe Vera जेल आणि गुलाबजल एकत्र मिसळून फ्रिजरमध्ये ठेवून द्या. सकाळी उठल्यावर डोळे उघडताच सगळ्यात आधी आपल्या हातांनी चेहऱ्यावर मसाज करावा. हे खूप फायदेशीर असते. रात्री त्वचेद्वारे निर्माण झालेले तेल त्वचेवर येते आणि साचून रहाते. आपण मसाज केला तर त्वचेवर नैसर्गिक चमक येते. हे करून झाल्यावर रात्री बनवून ठेवलेल्या आईस क्युब्जने ४-५ मिनिटे चेहऱ्यावर मसाज करा. आईस क्युब्जनी मसाज करण्याची योग्य पद्धत म्हणजे एखाद्या सूती कपड्यात किंवा रुमालात बर्फ लपेटून त्वचेवर फिरवावे. यामुळे ते पकडण्यास सोपे जाते आणि बर्फ डायरेक्ट त्वचेच्या संपर्कात येत नाही.
  • ग्रीन टी आईस क्युब्ज : यासाठी सगळ्यात आधी ग्रीन टी बनवा. आणि थंड झाल्यावर आईस ट्रे मध्ये भरून फ्रिजरमध्ये ठेवा. हे सकाळी हलकेच चेहऱ्यावर चोळा. हे त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. यामुळे त्वचा नैसर्गिकपने चमकण्यास मदत होते.
  • सकाळी उठल्यावर ४-५ थेंब बदाम तेल चेहऱ्यावर आणि मानेवर हलक्या हाताने मसाज करा. हे करण्याआधी चेहरा ताज्या थंड पाण्याने स्वच्छ धुवा. जर त्वचा चीपचीपित वाटत असेल तर फेस वॉश वापरू शकता. ज्यांना आईस क्युब्ज लावायचा नाही अशांनी हा साधा सोपा उपाय केला तरी चालेल.

जर तुम्हाला शुगर असेल तर सकाळची ताजी पेय पिण्याऐवजी ग्रीन टी किंवा ब्लॅक टी घेऊ शकता पण यात साखर किंवा मध मिसळू नये.

या सोबतच आयुर्वेदातील काही घरगुती उपायचा आपण उपयोग करू शकतो.

आयुर्वेदात हळद जादुई पदार्थ म्हणून ओळखला जातो. कारण हळद खूप उपयोगी आणि गुणकारी आहे. यात अँटी बॅक्टरीअल, अँटी फंगल आणि त्वचा उजळणारे विशेष घटक असतात. यामुळे त्वचेवरील काळपटपना दूर होऊन त्वचा उजळते, चमकदार होते शिवाय पिंपल्स कमी करण्यास मदत करते.

हळदीचा मास्क : यासाठी एका वाटीत दोन चमचे दूध घ्या आणि त्यात अर्धा चमचा हळद पावडर मिसळा. हे मिश्रण एकत्रित करून कापसाच्या मदतीने चेहरा आणि मानेला लावा, १५-२० मिनिटे सुकू द्या आणि नंतर साबण न लावता कोमट पाण्याने धुवून घ्या. असे नियमित केल्याने कळवटपना दूर होऊन त्वचा चमकदार होईल.

लिंबात सायट्रिक ऍसिड असते जे त्वचेला हलके करते तर गुलाबजल थंडावा देते. यासाठी एका वाटीत गुलाबजल घ्या आणि त्यात अर्धा लिंबू पिळून घ्या. हे ही हळदीच्या मास्क प्रमाणे कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचा उजळते, चेहऱ्यावर चमक येते आणि चेहऱ्यावरील काळेपणा दूर होतो.

यासाठी एक बटाटा मिक्सर मधुन काढून त्यात पाणी ओतून ते पातळ करा. आणि हे मिश्रण चेहऱ्यावर मालिश करत लावा १०-१५ मिनिटांनी धुवून घ्यावे.

लिंबा मधील सायट्रिक ऍसिड पिंपल्स तयार करणाऱ्या जंतूंना नष्ट करते आणि मध त्वचा मऊ ठेवण्यास मदत करते. हे चेहऱ्यावर लावण्यासाठी एक चमचा मधात दोन चमचे लिंबू रस टाका आणि एकत्र करून कापसाच्या मदतीने चेहरा आणि मानेला लावा. १५-२० मिन नंतर साबण न लावता कोमट पाण्याने धुवा. असे केल्याने त्वचा विकार दूर होतील. पिंपल्स आणि पुटकुळ्या येणार नाहीत. शिवाय त्वचेवरील जंतू मरून जातील.

आपल्या आहारातील सावाईंचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर होतो. वात, पित्त आणि कफ यांचे असंतुलन झाल्याने त्वचेचा रंग सावळा होतो आणि त्वचा निस्तेज व्हायला लागते. बघुया त्यासाठी काय करायला हवे.

उन्हाळ्यात उष्णतेपासून राहत मिळण्यासाठी कोणती शीतपिये प्यावी.

उन्हाळ्यात उष्णतेपासून थंडावा मिळण्यासाठी आहार कसा असावा.

याचे चमत्कारी परीणाम शरीराला तर होतातच शिवाय त्वचेला ही अनेक फायदे होतात. त्वचेसाठी त्वचा संबंधी काही व्यायाम प्रकार करावेत. अधोमुखासान आणि सिंहासन ही काही त्यातील आसने आहेत ज्यामुळे त्वचा सुंदर दिसते.

आपल्या खाण्या पिण्याचा त्वचेवर प्रभाव पडतो. व्हिटॅमिन सी, ई आणि ए च्या कमतरतेमुळे चेहरा निस्तेज दिसतो. त्यासाठी ही पोषक घटक असणारे पदार्थांचे सेवन करावे. मग त्यासाठी फळे आणि पालेभाज्या खाण्याची सवय लावून घ्यावी. पपई आणि गाजर ही अशी एकमेव फळे आहेत ज्यात व्हिटॅमिन सी, ई आणि अँटी oxident गुणधर्म आहेत. यांचे सेवन त्वचेसाठी उपयोगी आहे. फास्ट फूड आणि तेलकट खाल्ल्याने त्वचेवरील किटाणू वाढतात आणि त्यामुळे पुटकुळ्या आणि पिंपल्सची समस्या निर्माण होते.

उन्हाळ्यात सूर्यप्रकाश अधिक प्रखर असतो आणि सूर्याची अल्ट्रावायलेट किरणे गोऱ्या आणि सुंदर त्वचेला हानी पोहचवून नुकसान करतात. त्यामुळे जास्त वेळ उन्हात राहिल्याने रंग सावळा होतो. म्हणूनच उन्हात जाताना रुमाल किंवा टोपी घालूनच बाहेर पडावे. शिवाय उन्हात जाण्याआधी २० मिनिट आधी चेहरा, मान आणि हातांना सनक्रीम लोशन लावावे अशामुळे त्वचेची हानी टळेल.

तुम्ही जर धूम्रपान करत असाल तर ऐका ९० % त्वचेचे विकार हे धूम्रपान करण्यामुळे होतात. सुरकुत्या,काळेपणा,पुटकुळ्या येतात. सिगरेट ओढल्याने रक्तवाहिन्यांचे प्रवाह बाधित होतो. ज्यामुळे त्वचेचा बाहेरील भाग सावळा आणि सुरकुत्या युक्त होतो. तसेच नेहमी सिगरेट ओढल्यांने पाण्याची कमतरता कमी होऊन त्वचा सुरकुतलेली दिसते.

बऱ्याच लोकांना बाराही महिने गरम पाण्याने अंघोळ करण्याची सवय असते. पण उन्हाळ्यात गरम पाण्याने अंघोळ केल्याने शरीरातील ओलावा कमी होतो, त्वचा कोरडी पडू लागते. म्हणून गरम पाण्याचा वापर टाळावा असा सल्ला बरेच त्वचा तज्ञ देतात. शिवाय थंड पाण्याने अंघोळ केल्याने शरीर आणि मन दोन्ही ताजे तावाने रहाते.

उन्हाळ्यात सतत तहान लागते.शरीराला पाण्याची जास्त प्रमाणात गरज भासते आणि आपण नेहमीच ऐकतो दिवसातून ८-१० ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. त्यामुळे शक्य तेवढे पाणी प्या आणि दिवसभरात एकदा तरी कोमट पाणी प्यावे त्यामुळे रक्त शुद्ध होईल आणि त्वचा चमकदार होईल.

दिवसभर आपण प्रदूषण, धूळ, कचरा यांचा सामना करत असतो. या प्रदूषणामुळे धुळीचे कण चेहऱ्यावर साचून राहतात आणि आपण चेहरा न धुताच झोपी गेलो तर हे धूलिकण चेहऱ्यावरील छिद्र बंद करतात यामुळेच पिंपल्स आणि पुटकुळ्या येतात. म्हणून झोपण्यापूर्वी फेस वॉश किंवा गुलाबजल ने चेहरा स्वच्छ करावा.

बऱ्याच जणांना रात्री उशिरा पर्यंत जागणे, सकाळी उशिरा उठणे किंवा कमी झोप घेणे अशा सवई असतात. पण हे आरोग्यासाठी चांगले नाही. या सवईंमुळे डोळ्याखाली काळी वर्तुळे येतात. त्यामुळे रात्री १० च्या आत आणि सकाळी ६ च्या आधी उठावे.

पालकच काय तर सगळ्याच पालेभाज्या नेहमीच खायला हव्यात. खूप काम, झोप न येणे यामुळे डोळ्याखाली वर्तुळे येतात आणि हे घालवण्याचे काम हिरव्या पालेभाज्या करतात. म्हणून त्यांचे सेवन त्वचेसाठी उपयुक्त आहे.

हा हृदयासाठी अत्यंत गुणकारी मनाला जातो. तसेच चेहऱ्यावरील काळे डाग,मुरूम आणि सुरकुत्या घालवण्याचे तसेच रक्त शुद्ध करण्याचे काम करतो. त्यामुळे रोज सकाळी १-२ पाकळ्या चावून खायला हव्यात.

हे विटमिन ए, सी आणि पोटॅशियमने भरपूर असल्यामुळे त्वचेसाठी उपयुक्त आहे. म्हणून याचा आहारात वापर करावा.

आधीच सांगिल्याप्रमाणे गाजर आणि पपई मध्ये त्वचेसाठी लागणारे अनेक पोषक घटक असतात. हे खाल्ल्याने त्वचेचे बाह्य आवरण स्वस्थ आणि निरोगी रहाते तसेच सुरकुत्या कमी होतात.

हे प्रोटीन युक्त आहे. व्हिटॅमिन बी ७ चे प्रमाण भरपूर असते अंडी मध्ये. चांगल्या परिणामाने मिळण्यासाठी उकडलेल्या अंड्यांचा पांढरा भाग खावा तर पिवळा भाग टाळावा.

तर अशा काही खाण्या पिण्याच्या गोष्टी लक्षात ठेवल्या आणि घरगुती आयुर्वेदाचा वापर नियमित केला तर आपली त्वचा निरोगी तर राहीलच शिवाय आपले सौंदर्य आणखी खुलून दिसेल. काही लोकांना आपण सुंदर दिसू शकत नाहीत असा न्यूनगंड उगाचच असतो. पण आता हे दिलेले उपाय वाचून आपणही सुंदर दिसुच शकतो असा विश्वास त्यांना नक्कीच वाटेल. बरोबर ना ??

=================

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *