Ritbhatmarathi

Search
Close this search box.

सिंहगड किल्ला संपूर्ण माहिती

sinhagad fort information in marathi: पुण्याला भेट देताय तर एकदा सिंहगढ ला भेट द्याच. जाणून घेऊ या सिंहगड चा इतिहास, गडावरील आणि गडाजवळील प्रेक्षणीय स्थळे, सिंहगढची विशेषता

सिंहगड हा किल्ला पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील डोणजे गावामध्ये आहे. सिंहगड हा किल्ला पुण्यापासून ३० ते ३५ किलोमीटर अंतरावर आहे तर मुंबईपासून १८० किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. समुद्रसपाटीपासून किल्ल्याची उंची ४४०० फूट असून या किल्ल्यावरून लोहगड,राजगड,पुरंदर,विसापूर हे भाग सहज दिसतात म्हणूनच पूर्वी शिवकाळात मुघलांचे लक्ष सिंहगड किल्ला जिंकून घेण्याकडे जास्त असे. सिंहगडावर पाहण्यासारख्या विविध गोष्टी आहे…छत्रपती राजाराम स्मारक,तानाजी स्मारक,तानाजी कडा,देवटाके,कोंढाणेश्वर मंदिर,अमृतेश्वर मंदिर,कल्याण दरवाजा,डोणगिरीचा कडा म्हणजेच तानाजी कडा,उदयभानाचे स्मारक,दारूचे कोठार अशी ठिकाणे आवर्जून भेट देण्यासारखी आहेत या ठिकाणांबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊयात…

सिंहगडावर हे मंदिर यादवकाळापासून अस्तित्वात आहे. हे मंदिर त्याकाळी यादवांचे कुलदैवत असल्याचे मानले जाते. हे मंदिर शंकराचे आहे आणि आजही आपल्याला सिंहगडावर गेल्यास कोंढाणेश्वर मंदिर पाहायला मिळते.

कोंढाणेश्वर मंदिराच्या थोडे पुढेच गेल्यावर डाव्या बाजूस आपल्याला हे मंदिर पाहावयास मिळते.भैरव आणि भैरवी अशा दोन मुर्त्या आपल्याला या मंदिरात पाहावयास मिळतात. या देवतेची पूजा प्रामुख्याने मच्छीमार लोक करतात. या देवतेची मूर्ती म्हणजे भैरवाची मूर्ती एक राक्षसाचे डोके आहे. दोन्ही मुर्त्या निसर्गाचे द्वैत दाखवतात. हे मंदिर हेमाडपंथी असून प्राचीन बांधकामासारखीच मंदिराची रचना आहे.

अमृतेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूने वर गेल्यावर डाव्या बाजूस सुभेदार तानाजी मालुसरेंचे स्मारक दिसते. हे स्मारक सुभेदार तानाजी स्मारक समितीच्या वतीने बांधण्यात आलेले आहे ४ फेब्रुवारी १६७२ साली झालेल्या लढाईत सुभेदार तानाजी मालुसरे याना वीरमरण आले. दरवर्षी माघ नवमीस या दिवशी सुभेदार तानाजी मालुसरे यांचा स्मृतिदिन मंडळाच्या वतीने साजरा करण्यात येतो.

छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच छत्रपती राजाराम महाराजांनीही मुघलांबरोबर दोन हात करण्यात यश मिळवले. सतत अकरा वर्ष राजाराम महाराजांनी मुघलांशी निकराचे युद्ध केले पण अवघ्या ३० वयामध्ये त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले. २ मार्च १७०० साली राजाराम महाराजांचा मृत्यू सिंहगड येथेच झाला. आपण सिंहगडाला भेट देण्यासाठी गेलोच तर तेथेच राजस्थानी पद्धतीची रंगीत आणि गोल घुमट असलेली जी स्थापत्यशैली दिसते तीच छत्रपती राजाराम महाराजांचे स्मारक म्हणून ओळखले जाते.

देवटाके म्हणजे एक पाण्याची टाकीच आहे जिचा उपयोग पाणी पिण्यासाठी केला जातो. अजूनही याच पाण्याचा उपयोग होतो.तानाजी स्मारकाच्या मागून डाव्या हाताच्या बाजूला असणाऱ्या तलावाच्या बाजूने गेल्यास प्रसिद्ध असे देवटाके लागते ते दुसरे काही नसून पिण्याच्या पाण्याची टाकी आहे.

किल्ल्याच्या दरवाजातून आत आल्यावर जी दगडी इमारत दिसते ते दारूचे कोठार म्हणून ओळखले जाते

किल्ल्याच्या दरवाज्याच्या मागच्या बाजूस असणाऱ्या टेकडीवर एक चौकोनी दगड आहे तेच उदयभानचे स्मारक म्हणून ओळखले जाते.मुघलांकडून उदयभान हा सिंहगडाचा अधिकारी होता.जो हिंदू राजपूत असून मुघालांसाठी मराठ्यांविरुद्ध उभा राहिला होता.

झुंजारबुरूज म्हणजे सिंहगडाचे दक्षिण टोक होय.उदयभानचा स्मारकाच्या पुढून टेकडी उतरून  या झुंजार बुरुजावर येता येते.झुंजार बुरुजावरूनच राजगड आणि तोरणा गड दिसतात आणि पूर्वेकडे पुरंदर दिसतो.

झुंजारबुरूजावरून मागे येऊनच ताटाच्या भिंतीच्या बाजूच्या पायवाटेने तानाजी कड्याकडे जाता येते हा कडा गडाच्या पश्चिमेस आहे याच कड्यावरून तानाजी आपल्या मावळ्यांसह गड चढला.

पुणे-कोंढणपूर बसने आपण कोंढणपूर या गावी उतरून कल्याण गावातून कल्याण दरवाजातून आपण गडावर जातो.या मार्गाने दोन दरवाजे पार केल्यावर आपला गडावर प्रवेश होतो.

पुणे-सिंहगड बसने गेले असता आपल्याला खडकवासला धरण लागते.या मार्गाने तीन दरवाजे पार केल्यावर आपला गडावर प्रवेश होतो.

सहा आणि किंवा खासगी वाहनाने सिंहगडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते.ज्यांना गडावर चालत जायचं नसेल त्यांच्यासाठी पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी वाहने साधारण ३०-६० मिनिटांनी मिळतात.

१) हा गड ट्रेकिंगसाठी उत्तम आहे.

२) सिंहगड हा किल्ला सह्याद्रीच्या सह्याद्रीच्या शिखरावर एका पठारावर बांधलेला आहे. पर्वताचे उतार खडबडीत आहे.

३) हा ऐतिहासिक किल्ला समुद्रसपाटीपासून १३०० मीटर उंचीवर आहे. पर्वताच्या पायथ्यापासून या किल्ल्याची उंची ७५० मीटर इतकी आहे.

४) पुणे दरवाजा आणि कल्याण दरवाजा हि किल्ल्याची दोन मुख्य प्रवेशद्वारे आहेत.

५) किल्ल्यामध्ये देवी कालीला समर्पित मंदिर,जुने लष्करी शेड आणि छत्रपती राजाराम,तानाजी मालुसरे यांच्या समाधी आहेत.

६) सुभेदार तानाजी मालुसरे यांचे स्मारक ३५० वर्षांपूर्वी बांधले गेले होते पण किल्ल्याच्या आवारात ते गाडले गेले त्यानंतर त्याचा जीर्णोद्धार केला गेला.

७) महान सह्याद्रीची भुलेश्वर रांग हे ऐतिहासिक वास्तूचे माहेरघर आहे.

८ ) सिंहगड हा किल्ला पुण्याच्या नैवृत्य प्रदेशाची शान आहे.

९) सिंहगडाला चारही बाजूनी संरक्षित करण्यासाठी विलोभनीय असा उतार आहे १० ) सिंहगडाची समृद्धता आणि सत्यता सुमारे १००० वर्षांपूर्वीची आहे हे कोडिण्यऋषींच्या मंदिरावर असलेल्या कोरीव कामावरून स्पष्ट होते.

निसर्गरम्य लोणावळ्याजवळ असलेला लोहगड किल्ला..एकदा भेट नक्की द्या.

सिंधुदुर्ग – एक ऐतिहासिक किला

सिंहगड या किल्ल्याचे आधीचे नाव ‘ कोंढाणा ‘असे होते. तिथल्या काही महादेव कोळी बांधवांच्या आख्यायिकेनुसार कौंडिण्य ऋषी यांनी तिथे घोर अशी तपश्चर्या केली म्हणून सिंहगड या किल्ल्याला कोंढाणा असे संबोधले जायचे.पूर्वीपासून हा किल्ला महादेव कोळी लोकांच्या ताब्यात होता. इ.स.वी. सन १३६० मध्ये सुलतान मुहम्मद तुघलक ने दक्षिण स्वारी केली त्यावेळी मंगोल आक्रमणापासून सुरक्षित राहावी यासाठी राजधानी देवगिरी येथे हलवली पण त्या वेळी दक्खनच्या भागात कोळी राजाचे वर्चस्व होते.त्यावेळी राजा नागनाथ आणि मुहम्मद तुघलक यांच्यात तुंबळ युद्ध झाले त्यात त्यावेळी राजा नागनायक याने जनतेला घेऊन याच किल्ल्यात आश्रय घेतला. नऊ महिन्यांपेक्षा जास्त हा किल्ला लढवला म्हणून मुघल सरदार मुहम्मद तुघलक चकित झाला.पुढे मग रसद तुटल्यामुळे किल्ला सोडून दिला गेला तिथून पुढे सुलतान दिल्लीला निघून गेल्यावर किल्ला महादेव कोळी सामंतांच्या ताब्यात होता.                

सिंहगड या किल्ल्याला सिंहगड हे नाव पडले याचे कारण म्हणजे ज्यावेळी हा किल्ला जिंकण्यासाठी शिवरायांचे मित्र सुभेदार तानाजी मालुसरे यांनी स्वतः वीरमरण पत्करून स्वराज्याला अभेद्य असा किल्ला जिंकून दिला म्हणून शिवरायांनी तानाजी मालुसरे यांना सिंह संबोधून ‘ गड आला पण सिंह गेला ‘ असे उद्गार काढले आणि कोंढाणा या किल्ल्याचे नाव ‘ सिंहगड ‘ असे केले.

सिंहगड किल्ला हा साधारण २००० वर्ष जुनी ऐतिहासिक वस्तू असल्याचे मानले जाते. या किल्ल्याचे सुरुवातीचे नामकरंन हे कोंढाणा असे केले गेले आहे कारण कौंडिण्य ऋषींच्या घोर तपश्चर्येमुळे या किल्ल्याला कोंढाणा असे संबोधायचे.कौन्डीनेश्वर मंदिराची उपस्थिती आणि त्या लेण्यांवरील कोरीवकाम हे दर्शवतात,१४ व्या शतकामध्ये कोळी राजा नागनायक हे त्या किल्ल्याचे राजे होते पण पुढे मुहम्मद बिन तुघलक याच्या ताब्यात हा किल्ला गेला.

त्यापुढे पुणे शहाजी भोसले यांच्या ताब्यात आल्यावर सिंहगडाचा ताबा शहाजी राज्यांकडे आला.त्याकाळात शहाजी राजांनी इब्राहिम आदिलशहाचा सेनापती म्हणून कार्यभार सांभाळला.पण त्याच वेळी शहाजी राजांचे सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन केली आणि आदिलशहाची सेवा करण्याचे शहाजीराजांनी नाकारले.कोंढाण्यावर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात पुढे १६४७ मध्ये एका आदिलशाही सरदाराला किल्ल्याचे व्यवस्थापन आणि रक्षण करेल अशी खात्री दिली त्याऐवजी किल्ला ताब्यात घेतला.

पुढे मग सिद्धी अंबर आणि शहाजी राजे भोसले यांना आदिलशहाने कैद केले त्यानंतर सिद्धी अंबरने १६४९ मध्ये किल्ला परत करून शाहजी राजांची सुटका केली त्यानंतर शिवाजी राजांनी आपला सेनापती बापूजी मुद्दल देशपांडे यांच्या मदतीने १६५६ साली सिंहगड परत आपल्या स्वराज्यात सामील करून घेतला.मुघलांनी १६६२ ते १६६५ या तीनही वर्षात सिंहगडावर हल्ले केले त्यानंतर १६६५ मध्ये शिवाजी राजे आणि मिर्झाराजे जयसिंग यांच्यात तह झाला आणि परत सिंहगड मिर्झाराजे जयसिंगाच्या ताब्यात देण्यात आला. संभाजीराज्यांच्या निधनानंतर परत हा किल्ला मुघलांनी आपल्या ताब्यात घेतला.

परत मुघलांनी सिंहगड काबीज करण्यासाठी उदयभान नावाच्या मुस्लिम झालेल्या पण मूळचा राजपूत असलेल्या सरदाराची नेमणूक करून परत किल्ला जिंकण्यासाठी प्रयत्न केला पण छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या शूर आणि कर्तृत्ववान सुभेदार तानाजी मालुसरे यांनी किल्ला परत स्वराज्यात सामील करून घेतला. सिंहगडाची लढाई हा इतिहासातील खूपच रोमांचित करणारा क्षण आहे ज्यावेळी जिजाऊ माँ साहेबांच्या कानी कोंढाणा किल्ला संकटात आहे ही बातमी पडताच.

शिवाजी महाराजांनी किल्ला स्वराज्यात मिळवण्यासाठी आपले नवीन बेत आखण्यास सुरुवात केली.त्याचवेळी सुभेदार तानाजी मालुसरे आपल्या मुलाच्या म्हणजेच रायबाच्या लग्नाचे निमंत्रण महाराजांना देण्यास गेले. ज्यावेळी महाराजांना तानाजी मालुसरे यांच्या मुलाच्या लग्नाविषयी कळले तेव्हा महाराजांनी आपला बेत बदलला परंतु तानाजी मालुसरे यांनी ‘ पहिले कोंढाण्याचे लगीन लावायचे मगच रायबाचे ‘ असे उद्गार काढले अजूनही आपण ते उद्गार विविध पोवाड्यामधून,कथांमधून आणि प्रत्यक्ष इतिहास अभ्यासताना वाचलेले आहेत,पाहिलेले आहेत आणि ऐकलेले आहेत.             

सरळ सरळ युद्ध करून किल्ला घ्यायचं असता तर त्याकाळी तो घेतला गेला नसता कारण मराठ्यांना खूप नुकसान सहन करावे लागले असते.म्हणून किल्ला चढण्यासाठी तानाजी मालुसरे यांनी गडाची सर्वात कठीण बाजू निवडली.गडाची कठीण बाजू असल्याने त्या बाजूला सैनिक तैनात नव्हते.नव्वद अंश एवढे तानाजी आणि त्यांचे मावळे कडा चढून गेले खरे पण पुढे मुघल सैनिक आणि मराठे मावळे यांमध्ये तुंबळ असे युद्ध झाले. उदयभान आणि सुभेदार तानाजी मालुसरे या दोघांमध्ये द्वंद्वव युद्ध झाले.

लढत असतानाच तानाजी मालुसरे यांची ढाल तुटली गेली तरी आपल्या डोक्यावरचा शेला हाताला गुंडाळून तानाजी मालुसरे लढले.काही वेळातच मराठ्यांची सरशी होत गेली पण जखमी तानाजी मालुसरे हे उदयभानच्या तलवारबाजीपुढे फार काळ राहू नाही शकले म्हणून तानाजी मालुसरे गतप्राण झाले पुढे युद्धाची धुरा शेलार मामा आणि उपसेनानी सूर्याजींनी सांभाळली तेव्हा मात्र उदयभान मरण पावला.

उदयभान गतप्राण झाला तेव्हा मुघल सेना सैरावैरा पळू लागली आणि….कोंढाणा किल्ला स्वराज्यात सामील झाला….पण शिवाजी राजे तोफ डागण्याची वाट पाहत असतानाच त्यांना जाणवले कि आपण स्वतः कोंढाण्यावर गेले पाहिजे आपला जिवलग मित्र संकटात आहे म्हणून तोफेचा इशारा होण्याआधीच शिवाजी राजे कोंढाण्यावर पोहोचले पण सुभेदार तानाजी मालुसरे यांची प्राणज्योत केव्हाच मालवली होती. शिवाजी राज्यांच्या तोंडून आपसूकच निघाले ‘ गड आला पण सिंह गेला…. ‘ आणि तेव्हापासून कोंढाणा हा किल्ला ‘ सिंहगड ‘ म्हणून ओळखला जातो.

किल्ल्याला ऐतिहासिक महत्व प्राप्त असल्याने शिवप्रेमींची गर्दी या किल्ल्यावर असतेच असते त्याचप्रमाणे किल्ल्यावर पर्यटनासाठी,ट्रेकिंगसाठीही तरुणांची गर्दी असते.किल्ल्यावर राहण्याहची कुठलीही सोय नाही,पण किल्ल्याच्या आस पास छोटी-छोटी घरगुती भोजनालये असल्याने पिठलं-भाकरी,कांदा-भजी,बटाटा-भजी,झणझणीत मिरचीचा ठेचा,वांग्याचे भरीत अशी मराठमोळी खाद्यपदार्थ तिथे सहज मिळतात. तर आता आपण पाहुयात गडावर कुठल्या ऋतूमध्ये जाणे चांगले..

उन्हाळ्यामध्ये सिंहगडावर जाणे टाळावे. कारण तिथले तापमान अतिउष्ण असते. तरीही किल्ल्याला भेट देण्याची उत्तम वेळ म्हणजे सकाळी ५ वाजल्यापासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत.

जास्त पाऊस असेल तर सिंहगडाला भेट देण्याचे टाळावे. आज आपण पहिले तरी सिंहगड हे  पावसाळ्यात प्रचंड व्यस्त असे ठिकाण समजले जाते तरीही पावसाळ्यात भेट दिली तर तिथे फेसाळणारे धबधबे जरूर दृष्टीक्षेपात पडतील. या आकर्षक अशा फेसाळणाऱ्या धबधब्यांमुळे सिंहगडाचा सौन्दर्य अधिकच खुलून दिसतं.

या ऋतूमध्ये सिंहगडाला भेट देणे तर केव्हाही उत्तम कारण उत्तम असा निसर्गाचा वारसा लाभलेलं ठिकाण म्हणजे सिंहगड आहे. तरीही सिंहगड ट्रेक करण्यासाठी हिवाळा हा औत्तम ऋतू मानला जातो नोव्हेंबर ते मार्च या महिन्यांदरम्यान गडाच्या कडा ओलांडून थंड वाऱ्याची झुळूक येते त्यामुळे ट्रेकर्ससाठी सिंहगड हा किल्ला सहज सर करता येण्यासारखा आहे.

घरगुती पद्धतीचे जेवण इथे गडाच्या आस-पास हमखास भेटते. त्यामध्ये पिठलं-भाकरी,वांग्याचे भरीत,थंडगार दही किंवा ताक असे जेवण मिळते त्याचप्रमाणे ताज्या फळांचा आस्वादही इथे घेता येतो त्यामध्ये करवंद्या,खारवलेले-वाफवलेले शेंगदाणे आणि कुरकुरीत काकडी असे फळेही तिथे खाण्यासाठी मिळतात.

> ट्रेकर्ससाठी गडावरी खाण्याची अशी सोय आहे. घरगुती पद्धतीचं जेवण इथे मिळत. राहण्याची सोय म्हणजे वेवेगळ्या प्रकारचे टेन्ट करून इथे राहावे लागते. कारण कुठल्याही हॉटेल्स ची सोय इथे पाहायला मिळत नाही. टेन्ट नसेल तर दुसरा पर्याय म्हणून गडावरच राहावे लागते.

> ट्रेक ला जाण्यापूर्वी बॅग पॅक चे वजन हलके असावे कारण ट्रेकला जाताना अवजड बॅग बाळगणे शक्यतो टाळावे.

> किल्ल्यावर वीज उपलब्ध नसल्याने तिथे जाण्यापूर्वी आपल्याला पॉवर बँक घायवी लागते.

१) ट्रेकिंगसॅक सह सामान

२) पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या

३) पॉवर बँक चार्जिंगसाठी

४) हवामानानुसार स्वेटर आणि इतर कपडे

५) सनग्लासेस,टोपी, सनस्क्रीन लोशन आणि मॉस्किटो रिपेलर मॉश्चरायझर

६) कॅमेरा,दुर्बीण (चित्रे आणि काही खास क्षण टिपून घेण्यासाठी ) ,टॉर्च.

७) फर्स्ट एड किट,एनर्जी पावडर,एनर्जी ड्रिंक

८) ट्रेकिंग शूज,स्वतःचे आयडेंटिटी कार्ड

९) नॅपकिन,फेसवॉश आणि रुमाल                          

आपण ट्रेकिंग न करताही गडावरी जाऊ शकतो कारण फक्त ट्रेकिंगसाठी सिंहगडावर जाणारे असतातच त्याचबरोबर फॅमिली पिकनिक आणि हवापालटासाठी किल्ल्याला भेट देणारे खूप जण असतात.सिंगडावर जाण्याचा टाईमिंग हा सकाळी पाच वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत असल्याने रात्री गडावरी जाता येत नाही याचे कारण रात्री च्या वेळी वीज उपलब्ध नसल्याने सर्वत्र अंधार असतो आणि अंधारात जमीन डोळ्यांना दिसू शकत नाही म्हणून किल्ल्यावरून घरंगळत पडण्याची शक्यता जास्त असते म्हणून रात्रीच्या वेळी किल्ल्यावर जाणे टाळावे.

सिंहगड हा एक निसर्गरम्य ठिकाणांमध्ये येतो त्यामुळे सिंहगडाव्यतिरिक्त अशी निसर्गरम्य ठिकाणे आपल्याला आजूबाजूला पाहावयास मिळतात तर आपण या निसर्गरम्य ठिकाणांची माहिती घेऊयात.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणारे हे धरण आहे.पुण्यापासून १५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या धरणाला पुण्याची चौपाटी असेही म्हणतात सिंहगड किल्ल्याच्या रस्त्यावरच असणारे हे ठिकाण सहलीसाठी पर्यटकांचे आवडते असे ठिकाण समजले जाते.धरणाच्या परिसरातच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्र आहे ( CWPRS ) आजूबाजूच्या निसर्गरम्य ठिकाणांमध्ये मयूर खाडी,कुडजे गाव आणि निळकंठेश्वर यांचा समावेश आहे.

पवना डॅम यालाच कृत्रिम तलाव,जलाशय असेही म्हणतात.हा तलाव भारतातील महाराष्ट्रामधील जलाशयात बदलेला कृत्रिम तलाव आहे हा डॅम लोणावळ्यापासून २५ किमी अंतरावर आहे हा तलावही कॅम्पिंग आणि पिकनिक स्पॉट म्हणून लोकप्रिय होत आहे.

पुण्यातल्या मानाच्या समजल्या जाणाऱ्या गणपतींमध्ये दगडूशेठ हलवाई गणपतीचे नाव प्रामुख्याने घेतले जाते सिंहगसपासून जवळच असणारे हे एक आकर्शक असे ठिकाण आहे.नवसाला पावणारा गणपती असेही दगडूशेठ हलवाई गणपतीला संबोधतात.या गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य बालगंगाधर टिळकांच्या हस्ते झाली होती.सध्याचं असणार बुधवार पेठेमधील दत्त मंदिर हे श्रीमंत हलवाईवाले म्हजेच ज्यांचं हे मंदिर आहे ते त्याठिकाणी त्यावेळी वास्त्यव्यास होते.

==================

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *