Ritbhatmarathi

Search
Close this search box.

जाणून घ्या दुर्गा सप्तशती पाठ करण्याचे महत्व. साक्षात देवीचा वास असेल तुमच्या घरी

saptashati path marathi: देवीचा हा पाठ करून एकच नाही तर अनेक फायदे तर मिळतीलच शिवाय सुरक्षा कवच प्राप्त होईल ते वेगळेच.

मित्रांनो आपल्या भारतीय संस्कृतीत देवतांप्रमाणेच देविंनाही विशेष महत्त्व आहे. देवी म्हणजेच शक्ती, माया, करुणा आणि भक्तीचे रुप. या देविंनी कितीतरी शक्तिशाली आणि भयंकर असुरांना मारून जनतेचे रक्षण केल्याचे उल्लेख पुराणात आढळतात. त्यामुळेच या देवींची उपासना करून आपण त्यांना प्रसन्न करून घेतो आणि आयुष्यातील संकटे दूर करतो.

नवरात्र म्हटले की देवींची प्रकर्षाने आठवण होते. नवरात्रात नऊ दिवस जल्लोषाने वातावरण भरून गेलेले असते. एक वेगळ्याच प्रकारची शक्ती संचारत असते प्रत्येकाच्या मनात. या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांचे दर्शन होते. गरब्याच्या आवाजात अंग अंग थिरकून उठते आणि भक्तीत सगळ्या त्रासाचा, व्यापाचा विसर पडतो. याच काळात प्रत्येक जण जमेल तशी देवीची आराधना करत असतो. कोणी उपवास करून, जप करून, चप्पल पाळून, मंदिरात जाऊन तर दान धर्म करून या ना त्या मार्गाने सेवा करतच असतो.

आता नवरात्र तोंडावर येऊन ठेपले आहे. सगळ्यांच्या घरात दसरा काढण्याची तयारी चालू असेलच. त्याच निमित्ताने आज अशा एका पाठा विषयी, स्तोत्र विषयी जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुम्हा सर्वांवर देवीची अखंड कृपा दृष्टी राहील आणि तुम्ही नेहमीच सुखी रहाल.

हे स्तोत्र किंवा पाठ म्हणजे मार्कंडेय ऋषींनी रचलेले देवीची स्तुती आहे. यालाच आपण दुर्गा सप्तशती असे म्हणतो. हा पाठ संस्कृत आणि मराठी मध्येही उपलब्ध आहे.

या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।

नवरात्रोत्सव म्हणजे साक्षात शक्तिदेवतेचा उत्सव. शक्तीची निरनिराळी रूपे आपल्याकडे परंपरेने पुजली जातात. पुण्य नवरात्रात केलेले दुर्गा देवीचे पूजन सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. अनेक ठिकाणी आपापाले कुळाचार, कुळधर्म, प्रथा, पद्धती, परंपरा यांनुसार विशेष व्रताचरण केले जाते. पण असे म्हणतात की, पाठ करताना काही नियम आणि अटी पाळणे खूप आवश्यक असते. तसे केले नाही तर अघटीत म्हणजेच वाईट घटना घडतात त्यामुळेच सप्तशती पाठ करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. बघुया.

दुर्गा सप्तशती हे स्तोत्र म्हणजे देवीचे स्तवन, म्हणजेच तिची स्तुती होय. हे स्तोत्रपठण केल्याने पठण करणार्‍या व्यक्तीभोवती ‘सूक्ष्म स्तरावरील देवतेचे संरक्षक-कवच’ निर्माण होऊन तिचे अनिष्ट शक्तींपासून रक्षण होते.

मार्कंडेय महापुराणातील ‘सप्तशती’ म्हणजेच ‘देवीमहात्म्य’. याची रचना अनुष्टुप छंदात केलेली आहे. हे स्तोत्र नारायण ऋषींनी रचले आहे.

दुर्गा सप्तशती देवीचे चरित्र वर्णन करणारा ग्रंथ आहे. या ग्रंथात १३ अध्याय असून, तो तीन भागात विभागण्यात आला आहे. दुर्गा सप्तशतीमधील प्रत्येक अध्यायात भगवती देवीचा महिमा, महती, महात्म्य आणि देवीच्या स्वरुपांविषयी वर्णन करण्यात आले आहे. दुर्गा सप्तशतीच्या पहिल्या भागात मधु कैटभ वधकथा, मध्यक्रमात महिषासुर संहार आणि उत्तरार्धात शुंभ-निशुंभ वध तसेच देवीकडून सुरथ आणि वैश्य यांना देण्यात आलेल्या वरदानांविषयी विस्तृत माहिती देण्यात आली आहे.

१.पाठाला शुचिर्भूत शरीराने व मनाने बसावे.
२. अंघोळ करून संध्यादि व देवांची पूजा करावी.
३. देवाला व घरांतील वडिलधार्यांना नमस्कार करावा.
४. पाठाला बसण्याची जागा स्वच्छ करून, रांगोळी घालून तीन पाट अगर आसने मांडावीत.
५. दोन आसने समोरासमोर मांडावीत व एक आसन बाजूस मांडावे. हे आसन देवीसाठी असते. आपण वाचत असलेले देवीमहात्म्य आपल्याजवळ बसून देवीसुद्धा ऐकत असते. वाचणार्याचे तोंड पूर्वेस अगर उत्तरेस असावे.
६. आपल्या समोर चौरंगावर श्रीमहाकाली, श्रीमहालक्ष्मी अगर श्रीमहासरस्वतीस्वरुप आर्यादुर्गा देवीची प्रतिमा ठेवावी. त्याची पूजा करून हार घालून समोर श्री दुर्गा सप्तशतीची पोथी घेऊन पोथीचीही पूजा करावी.
७. कलश स्थापना व त्याचे पूजन करावे.
८. तूपाचे निरांजन सतत समोर तेवत असावे.
९. वाचनाची जागा स्वच्छ व मन प्रसन्न ठेवणारी असावी.
१०.पाठ कशासाठी करत आहोत त्याचा उच्चार करून संकल्प सोडावा व वाचनाला सुरवात करावी.
११. वाचन मोठ्यानेच करावे मनांत करू नये.
पाठ चालू असताना फोन/मोबाईल बंद ठेवावा. कोठच्याही प्रकारचे बोलणे पाठ चालू असताना करू नये.
१२. वाचन सुरु असताना एकाग्रता अतिशय महत्वाची आहे. वाचनांत एकाग्रतेने मनाने एकरूप व्हावे.

१. नवरात्रातील प्रत्येक दिवशी दुर्गा सप्तशती पठण केल्यास दुर्गा देवीचे शुभाशिर्वाद आणि कृपादृष्टी लाभते.
२. अनेक संकटातून बाहेर पडण्यास मोलाची मदत होते.
३. दुर्गा सप्तशतीमधील अध्याय पठणाचे विविध लाभ मिळतात. तसेच भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात, असे सांगितले जाते.
४. दुर्गा सप्तशती पठणानंतर दान करणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते. यथाशक्ती आणि यथासंभव दान करावे. असे केल्याने प्रत्येक कठीण टप्प्यावर देवीचे शुभाशिर्वाद, कृपा, पाठिंबा मिळतो, अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते.
५. सप्तशती पाठ केल्यावर अगणित पुण्य मिळते , शिवाय प्रत्येक अध्याय पठणाचे फळ वेगवेगळे आहे . त्याची माहिती आपण आज बघणार आहोत .

१) पहिला अध्याय :

पहिला अध्याय भक्तिपूर्वक पठण केल्यास सर्व चिंता दूर होतात , शक्तिशाली शत्रूचा नाश होतो , शत्रू भय नाहीसे होते .

२) दुसरा अध्याय :

दुसरा अध्याय पठण केला असता शत्रूकडून बळजबरीने बळकावले घर , जागा , जमीन मुक्त होते .

३) तिसरा अध्याय :

तिसरा अध्याय पठण केला असता युद्धात विजय मिळतो , कोर्ट कचेरी, कर्जे यात विजय होतो.

४) चौथा अध्याय :

चौथा अध्याय पठण केला तर धन मिळते , सुंदर जीवनसाथी मिळतो , व देवी भक्तीचा लाभ मिळतो.

५) पाचवा अध्याय :

पाचवा अध्याय पठण केला तर भक्ती वाढते , भीती नाहीशी होते , भीतीदायक स्वप्न बंद होतात .
प्रेतबाधा , भूतबाधा दूर होते .

६) सहावा अध्याय :

सहावा अध्याय मनःपूर्वक पठण केल्यास सर्व संकटे दूर होतात व सर्व मनोकामना पूर्ण होतात .

७) सातवा अध्याय :

सातवा अध्याय पठण केला तर मनात आणलेले काम पूर्ण होते , काही गुप्त हेतू असतील तर ते तडीस जातात.

८) आठवा अध्याय :

धन लाभ होतो , इतरांना वश करता येते . अधिकार प्राप्त होतात.

९) नववा अध्याय :

नववा अध्याय पठण केला असता हरवलेले सापडते , व धनसम्पदा मिळते.

१०) दहावा अध्याय :

हा अध्याय पठण केला तर , आप्त स्वकीय काही कारणाने बेपत्ता असतील तर परत येतात , मुलाबाळांचे सुख प्राप्त होते.

११) अकरावा अध्याय :

अकरावा अध्याय मनःपूर्वक पठण केल्यास व्यापार , धंदा यात मोठा लाभ मिळतो , कर्ज बाजारीपणा नाहीसा होतो , सुख सम्पत्ती मिळते.

१२) बारावा अध्याय :

बारावा अध्याय पठण केला तर रोगराई पासून सुटका होते , आरोग्य लाभते , निर्भरता येते व समाजात मान सन्मान मिळतो !

१३ ) तेरावा अध्याय :

तेरावा अध्याय मनःपूर्वक पठण केल्यास मातेचा आशीर्वाद लाभतो , धनसम्पदा , सुख समृद्धी मिळते.

व्रताच्या भोजनात कांदा,लसूण का वापरत नाहीत??

नवरात्री मध्ये घट कसे बसवायचे. जाणून घ्या संपूर्ण पूजा विधी

सर्वात शक्तिशाली स्तोत्र असे श्री महालक्ष्मी अष्टक स्तोत्र..नवरात्री मध्ये नक्की पठण करा

जाणून घ्या तुळशीचे आध्यात्मिक आणि आयुर्वेदिक महत्त्व आणि फायदे

नवरात्रातील संपूर्ण नऊ दिवस व्रत आचरणे अतिशय शुभ मानले जाते. मात्र, काही कारणास्तव नऊ दिवस व्रत करणे शक्य नसल्यास नवरात्रातील ठराविक दिवशी व्रताचरण करावे. यापैकी घटस्थापना म्हणजेच पहिल्या दिवशी आणि नवरात्रातील अष्टमीला मुख्यत्वे करून व्रताचरण करावे, असे म्हटले जाते.

१. व्रताचरणादरम्यान ज्यांना शक्य आहे त्यांनी एकदाच जेवण करून व्रत आचरावे. केवळ फलाहारावर भर द्यावा. आजारी व्यक्ती किंवा ज्यांना एकभुक्त राहणे शक्य नसेल त्यांनी दिवसभरात दोन वेळा फलाहार करावा.

२. व्रताचरण कालावधीत पाणी पिण्यावर अधिकाधिक भर द्यावा. त्यामुळे अशक्तपणा जाणवत नाही, असे सांगितले जाते.

३. नवरात्राचे व्रत आचरण करताना नेहमी ब्रह्म मुहुर्तावर उठावे. अन्यवेळी सकाळपर्यंत झोपले, तरी चालते. मात्र, नवरात्रात हा नियम पाळणे आवश्यक आहे. संपूर्ण नवरात्रात ब्रह्म मुहुर्तावर उठून नित्यकर्मे आटोपून घ्यावीत. यानंतर सूर्योदयावेळी सूर्याला अर्घ्य द्यावे. यानंतर शास्त्रोक्त पद्धतीने देवीचे पूजन करावे. देवीचे पूजन झाल्यानंतर नामस्मरण, जप, मंत्र वा श्लोक पठण करणे उत्तम मानले जाते.

४. नवरात्राचा कालावधी हा दुर्गा देवीचे पूजन, भजन, कीर्तन, नामस्मरण, जप, आराधना, उपासना करण्यासाठी सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ मानला जातो, त्यामुळे शक्य तितकी सेवा करावी.

५. नवरात्रातील व्रताचे आचरण करताना बटाटे, तळलेले, तेलकट पदार्थांचा आहार करू नये, असे सांगितले जाते. व्रताच्या कालावधी बटाटा अधिक प्रमाणात खाल्यास शरीराचे स्थुलत्व वाढते, असा दावा केला जात असल्याचे सांगितले जाते. यामुळे आळस वाढतो. तसेच तळलेले, तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे अपचन होऊन पोटाचे विकार उद्भवू शकतात. याशिवाय कांदा, लसूण यांसारखे तामसी पदार्थ खाणे टाळावे.

६. नवरात्रातील व्रताचरण कालावधीत सकस, सात्विक, पचायला सोपा, हलका आहार घ्यावा, असे सांगितले जाते.

७. कोणाची निंदा करू नये, अपशब्द, अपमान करू नये. वर्तन चांगले असावे. शक्य असेल तर मौन रहावे.

१. दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचताना हे लक्षात ठेवावं की पाठाचे उच्चारण स्पष्ट आणि शुद्ध असावे.

२. चंडी पाठ करण्याच्या पूर्वी खोली शुद्ध, स्वच्छ, शांत आणि सुवासिक असावी. देवी आईच्या मूर्ती जवळ, देऊळात किंवा जवळ कोणत्याही प्रकाराची अशुद्धता नसावी.

३. चंडी पाठ किंवा दुर्गा सप्तशती पाठच्या दरम्यान रजस्वला बायकांना त्या पूजेच्या स्थळापासून किंवा देऊळापासून दूर राहावं, नाही तर चंडीचे पाठ करणाऱ्यांना वाईट परिणाम भोगावे लागतात.

४. चंडी पाठ करताना पूर्ण ब्रह्मचर्यच्या व्रताचे पालन करावे आणि वाचिक किंवा तोंडी परंपरेचे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या स्वच्छतेचे पालन करावं.

५. चंडी पाठच्या दरम्यान साधारणपणे चंडीपाठ करणाऱ्यांना वेग वेगळे चांगले आणि वाईट अध्यात्मिक अनुभव येतात. त्या अनुभवांना सहन करण्याची इच्छा शक्ती घेऊनच चंडीपाठ करावं.

असे म्हणतात की आपण ज्या इच्छापूर्ती साठी चंडीपाठाचे वाचन करत आहात, आपली ती इच्छा नवरात्राच्या काळात किंवा दसऱ्या पर्यंत पूर्ण होते. पण आपण जर का निष्काळजी पणा करत असाल आणि आपल्या कडून काहीही कळत-नकळत चुका होत असल्यास, आपल्या बरोबर अघटित घडतं किंवा अपघात होतात.

पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनात सगळ्यांनाच हे करायला जमेल असे नाही. ज्यांना जमत नाही पण पाठाचे पुण्य प्राप्त करण्याची इच्छा आहे अशांनी सर्वप्रथम कवच, कीलक व अर्गला स्तोत्र म्हणावे. यानंतर कुंजिका स्तोत्राचे पठण करावे. असे केल्याने संपूर्ण दुर्गा सप्तशती म्हटल्याचे पुण्य प्राप्त होऊ शकते, असे सांगितले जाते. एका पौराणिक कथेनुसार, महादेव शिवशंकरांनी पार्वती देवीला या उपायाबाबत सांगितल्याचे म्हटले जाते.

=====================

प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *