Ritbhatmarathi

Search
Close this search box.

जाणून घ्या काय आहे संजय गांधी निराधार योजना?

sanjay gandhi niradhar yojana in marathi : मित्रांनो आपल्या देशात अनेक अशा समस्यांनी लोक त्रस्त आहेत ज्याची आपल्याला कल्पनाही नसते किंवा आपल्याच छोटया छोटया अडचणींना आपण कुरवाळत रहातो ज्यामुळे त्याकडे आपले लक्षच जात नाही कधी. पण कधी स्वतःचा आत्मकेंद्री विचार न करता बाहेरच्या जगात पाहिले तर आपल्या लक्षात येईल की, जग किती मोठं आहे आणि या मोठ्या जगात किती मोठ्या अडचणींना तोंड देत लोकं जगत आहेत.

आपल्या अवतीभोवती असे कित्येक लोक आहेत ज्यांना शारीरिक अपंगत्व, मानसिक आजार, अंध, अत्याचारित निराधार महीला, वेश्या व्यवसायातून मुक्त महिला तसेच अनेक घटस्फोटित एकट्या पालकत्व सांभाळणाऱ्या महिला आहेत ज्यांचा संघर्ष आपल्या पेक्षा कित्येक पटींनी मोठा आणि डोळ्यात अश्रू उभे करणारा आहे. जरा विचार करा अशा लोकांनी करायचे काय ?? कसे जगायचे ???

आज अशा सगळ्याच लोकांसाठी सरकारने जी खास योजना उभी केली आहे त्याचीच माहिती घेणार आहोत. ही योजना म्हणजेच संजय गांधी निराधार योजना.

संजय गांधी निराधार पेन्शन अनुदान योजना 2022 ही योजना राज्यातील निराधार, मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती, वृद्ध व्यक्ती. अंध, अत्याचारित महिला, अपंग, शारीरिक, विधवा, वेश्या व्यवसायातून मुक्त महिला, तसेच घटस्फोटीत महिलांना अर्थसहाय्य देण्याच्या मूळ हेतूने संजय गांधी निराधार अनुदान योजना १९८० पासून राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत राज्यातील ६५ वर्षाखालील वयाच्या निराधार लोकांना मदत दिली जाईल. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिनाऱ्या इच्छुक लाभार्थीनी या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन योजनेचा फॉर्म मिळवू शकता. या योजनेंतर्गत गरीब महिला, अनाथ मुले व कोणत्याही आजाराने ग्रासलेल्या लोकांना मदत दिली जाईल.ही एक विशेष पेन्शन योजना आहे जी केवळ निराधारांना मदत करेल.

१. या योजनेचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे गरीब लोकांना मदत करणे.

२. निराधार लोकांना या योजनेतून मासिक पेन्शन मिळणार आहे.

३. निराधार लोकांना आर्थिक सहाय्य करणे आणि त्यांचे जीवन अधिक सुखकर करणे हे या योजनेचे मुख्य उद्दीष्ट आहे. जेणेकरून ते त्यांचे आयुष्य सुखाने जगू शकतील.

४. राज्यातील निराधारांना आर्थिक पाठबळ संजय गांधी निराधार पेन्शन योजनेच्या रूपात मिळणार आहे.

५. या योजनेंतर्गत सरकार निराधार लोकांना मासिक पेन्शन देईल. त्यामुळे हे लोक त्यांच्या स्वतःच्या गरजा भागवू शकतात.

शासनाच्या बाल संगोपन योजनेअंतर्गत प्रति बालक मिळणार आता ठराविक रक्कम. जाणून घ्या सविस्तर माहिती

jan dhan yojana (PM JDY): लाभार्थ्यांना आता या खात्यांमधून थेट लाभ मिळेल. जाणून घ्या नियम व सविस्तर माहिती

अटल पेन्शन योजना (APY) : 60 वर्षावरील पेन्शन योजना सविस्तर माहिती

 • ६५ वर्षाखालील निराधार पुरुष व महिला
 • मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती.
 • वृद्ध व्यक्ती
 • अंध
 • विधवा
 • वेश्या व्यवसायातून मुक्त महिला
 • घटस्फोटीत महिला
 • निराधार पुरुष व महिला
 • अनाथ मुले
 • अपंगातील सर्व प्रवर्ग
 • कुष्ठरोग, क्षयरोग, कर्करोग, एड्स यासारख्या आजाराने पीडित महिला व पुरुष.
 • निराधार विधवा ( आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या विधवासह )
 • घटस्फोट प्रक्रीयेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या.
 • अत्याचारित महिला
 • तृतीयपंथी
 • देवदासी
 • ३५ वर्षावरील अविवाहीत स्त्री.
 • तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी.
 • सिकलसेलग्रस्त

१. लाभार्त्यांस दरमहा रुपये ६००/- देण्यात येतात
२. जर लाभार्त्याच्या कुटुंबात एका पेक्षा जास्त पात्र अर्जदार असल्यास कुटुंबाला रुपये ९०० प्रतिमाह देण्यात येतात.

१. कमीत कमी १५ वर्षांपासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक असणार आहे.

२. अर्जदाराचे वय ६५ वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

३. कुटुंबाचे उत्पन्न प्रतिवर्षी रुपये २१,०००/- पर्यंत असणे आवश्यक आहे.

संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे:

१. महाराष्ट्र निवासी प्रमाणपत्र
२. अपंगत्वाचे प्रमाणपत्र
३. वय प्रमाणपत्र
४. बीपीएल प्रमाणपत्र
५. कौटुंबिक उत्पन्न सिद्ध करण्यासाठी उत्पन्न प्रमाणपत्र/ दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीमध्ये समावेश असल्याबद्दलचा साक्षांकित उतारा.
६. मोठा आजार झाल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र.

ज्या लाभार्थ्यांना या योजनेंतर्गत लाभ मिळवायचे आहेत त्यांनी खाली दिलेल्या पद्धतीनुसार या योजनेत अर्ज करू शकताः –

१. संजय गांधी निराधार योजना २०२२ फॉर्ममध्ये सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.

२. आता हा फॉर्म घेऊन तहसीलदारांकडे जावा.

३. अर्जाची संपूर्ण माहिती मिळविण्यासाठी समाज कल्याण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.

४. राज्य सरकार लाभार्थ्यांची यादी जाहीर करेल आणि निराधार व ज्यांना बहुतेक पेन्शनची आवश्यकता आहे अशा लाभार्थ्यांना पेन्शन देण्यात येईल.

५. सर्व लाभार्थ्यांना पेन्शनची रक्कम तहसीलदारांच्या माध्यमातून वितरीत केली जाईल.

६. संजय गांधी निराधार अनुदान पेन्शन योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग जबाबदार आहे.

७. अधिक माहितीसाठी अर्जदार राहत असलेल्या भागातील संबंधित तलाठी/ तहसीलदार यांच्याशी संपर्क करावा.

तर तुम्ही अशा कोणत्याही प्रकारात मोडत असाल तर जरूर या योजनेचा लाभ घ्यावा.

==============

प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *