Ritbhatmarathi

Search
Close this search box.

जाणून घ्या साई बाबा नेहमी पांढरेच कपडे का घालत?

sai baba information in marathi:

आपले महाराष्ट्र राज्य अनेक ऐतिहासिक घटनानी, रहस्यानी, विविध प्रकारच्या प्रश्नांनी भरलेले आहे. त्यामुळेच आपल्या राज्याचे नाव महा – राष्ट्र हे अगदी अर्थपूर्ण आहे. आपल्या महाराष्ट्रात अशा कित्येक घटना आणि रहस्ये आहेत ज्यांची उत्तरे अख्खा महाराष्ट्र आजही शोधत आहे.

एकतर आपल्या राज्यात हजारो मंदिरे आहेत. त्यात म्हणजे प्राचीन काळापासून अनेक संत महात्मे होऊन गेले आहेत, ते नेमके कोण होते याचा शोध आजही सुरूच आहे. म्हणजे ते देवाचा अवतार होते की फकीर, संत होते का ?? कोणी योगी पुरुष होते का ?? की सामान्य माणूस ?? त्यांचा जन्म कुठे झाला ? कधी झाला ?? ते कुठून आले आणि खरंच मृत्यू प्राप्त होऊनही त्यांचे अस्तित्व संपले का ?? असे अनेक प्रश्न आजही कायम आहेत.

काही प्रश्नांची उत्तरे सापडली आहेत पण ज्यांनी ती दिली त्यांच्याकडे तसा कोणताही पुरावा आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळे आजही वाद विवाद सुरूच आहेत. पण इतके मात्र खरे की हे जे कोणी होऊन गेले ते सामान्य व्यक्ती नव्हते, ते आले फक्त लोककल्याणासाठी आणि शेवटपर्यंत लोककल्याण हाच हेतू ठेऊन ते काम करत राहिले. आपल्यापैकी अनेक श्रद्धाळू लोक असेही म्हणतात की परमेश्वर सतत या ना त्या रुपात येऊन आपल्याला मदत करत असतो, मार्गदर्शन देत असतो. त्यातलेच हे सगळे दैवी पुरुष.

आज अशा अनेक लोकांचे आपल्याला उदाहरण म्हणून नाव घेता येईल ते म्हणजे सत्यसाईबाबा, गोंदवलेकर महाराज, अम्मा भगवान, श्री स्वामी समर्थ, संत गाडगे बाबा, अप्पा बाबा इत्यादी. यांनी मानव रुपात प्रकट होऊन अनेक साक्षात्कार दिले आपल्या सर्वांना. पण ते पटवून घ्यायला, समजून घ्यायला आपण नेहमीच कमी पडलो.

त्या परमात्म्याला मानव रुपात आल्यानंतर आपण सर्वांनी खूप त्रास दिला, उपेक्षा केली. त्यांच्या लीला समजून घेऊ शकलो नाहीत. म्हणूनच तर गोंदवलेकर महाराज म्हणतात जे माझी निंदा करतात त्यांनाही मी समजलो नाही आणि जे माझी स्तुती करतात त्यांनाही मी समजलो नाही.

आज अशाच एका संताची, फकीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या योगी पुरुषाची माहिती करून घेऊया, ज्यांच्या अस्तित्वावर, जन्मावर आजही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. ते म्हणजे शिर्डीचे नाव घेताच तोंडावर ज्यांचे नाव येते ते शिर्डीचे साईबाबा.

[tablesome table_id=’14316’/]

ई. स. १८५६ ते १५ ऑक्टोंबर १९१८ हा साईबाबांचा कार्यकाल होता. ते एक भारतीय फकीर असून अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील शिर्डी गावात त्यांचे वास्तव्य होते. त्यामुळे शिर्डीचे साईबाबा अशी ओळख निर्माण झाली. साईबाबा हे कोणी देव नव्हते, संत नव्हते किंवा गुरूही नव्हते असा निकाल स्वयंघोषित धर्मसंस्थेने दिला आहे. मग कोण होते साईबाबा. तर साईबाबा मोमीन वंशीय मुस्लिम होते असे मानण्यात येते.

कारण ते नेहेमी मशिदीत मुक्कामी असत आणि नेहमी पांढरे कपडे परिधान करत असत. नमाज पठण करत असत. शिर्डीत त्यांना पहिल्यांदा म्हाळसा पतींनी म्हणजे शिर्डीचे पुजारी यांनी पाहिले आणि साई अशी हाक मारली , त्यावेळी लोक मराठी – हिंदी – पारशी एकत्रित मिळून भाषा बोलत असत. साई या शब्दाचा अर्थ फकीर किंवा यवनी संत असा आहे.

सुरुवातीच्या काळात शिर्डीतील लोक साईबाबांना कुठेच बसू देत नसत. बऱ्याचदा तर मंदिरात बसलेले असताना अनेक वेळा पुजाऱ्याने त्यांना हाकलून दिले होते. पण त्याचे त्यांना वाईट वाटत नसे. ते तिथून उठून त्यांनीच द्वारकामाई असे नाव दिलेल्या मशिदीत बसत. अनेकदा गावातील मुले त्यांना दगड मारत, त्यामुळे ते धावत असत आणि त्यांच्या मागे ही मुले पण धावत. नंतर तर हा जणू त्या मुलांसाठी खेळच झाला होता. पण मुलांच्या आनंदात साईबाबा आनंदी होऊन जात.

स्वतःचे अस्तित्व, ओळख त्यांनी पटवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही. त्याच वेळी साईबाबांनी सर्वधर्म समभावची शिकवण दिली. सबका मालीक एक आहे असे ते नेहमी म्हणत असत. याशिवाय अल्लाह मालीक हे त्यांचे नेहमीचे बोल होते. श्रद्धा आणि सबुरी हा जीवनाला उपयोगी पडणारा महामंत्र त्यांनी जगाला दिला. त्यांच्या या विचारांचा प्रभाव लोकांवर पडत होता. त्यांची वागणूक बरच काही शिकवून जात होती.

त्यामुळे लोकांच्या मनात त्यांनी एक वेगळी जागा मिळवली होती. त्याचाच परिणाम म्हणून शिर्डीत चांदीची मुढ असलेली छत्री त्यांच्या डोक्यावर धरून चावडी ते मशीद अशी साईबाबांची मिरवणूक निघत असे. तेंव्हा पण लोकांच्या आनंदात ते सहभागी होत. मुलांनी दगड मारले तरी त्याचे त्यांना दुःख नव्हते आणि मिरवणूक काढली तरी आनंद नव्हता. कोणत्याही परिस्थितीत ते स्थितप्रज्ञ असत.

श्रावणी शुक्रवारचे महत्व, जिवतीचा कागद म्हणजे काय? जिवतीची कथा आणि पूजा विधी

जाणून घ्या श्रावणात सोमवारच्या दिवशी शंकराच्या पूजेला एवढं महत्व का आहे?

मंगळा गौरीची माहिती मराठीत

sai baba information in marathi

साईबाबांच्या जन्माविषयी जगभरातून अनेक दावे करण्यात आले आहेत पण त्याला अनुसरून प्रमाणित पुरावे देण्यात सगळ्यांनाच अपयश आले आहे. तसेच स्वतः साईबाबांनी स्वतःच्या जन्म स्थानाबद्दल उल्लेख केला नाहीच शिवाय स्वतःच्या अस्तित्वाबद्दल पण उल्लेख केला नाही.

पण कांदिवलीच्या साईधाम चॅरिटेबल ट्रस्टने ते मुस्लिम नसून ब्राह्मण होते म्हणजेच हिंदू होते असा दावा केला आहे सप्टेंबर २०१४ मध्ये. त्यांचा जन्म परभणी जिल्यातील पाथरी गावात २७ सप्टेंबर १८३७ रोजी दुपारी सव्वा बारा झाला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. साईबाबांचे खरे नाव हरिभाऊ आहे. साई बाबांच्या आईवडिलांनी त्यांना त्यांच्या लहानपणी एका मुस्लिम फकिराच्या आग्रहावरून त्यांच्या हवाली केले.

फकिरांनी साईबाबांना वेंकुशा नावाच्या हिंदू गुरूकडे सोपवले. या सर्व गोष्टींचे पुरावे असल्याचा दावा साई धाम चॅरिटेबल ट्रस्टने केला आहे. स्वामी स्वरूपानंद यांनी साईबाबांच्या अवतार पुरुष असण्याला विरोध केला आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्या पुजेलाही त्यांचा विरोध होता.

साईबाबांची ठिकठिकाणी मंदिरे उभारण्यात आली आहेत. भक्तांना आलेल्या अनुभवा नुसार ते एक अवतारी पुरूष होते. कोणी त्यांना दत्त, कोणी विष्णु तर कोणी शंकर अवतार मानत. त्यांच्या भक्त समुदायात सगळ्याच जाती धर्माचा समावेश आहे. त्यात प्रामुख्याने हिंदू आणि मुस्लिम धर्माचा समावेश होतो. भक्तांना आलेल्या अनुभवामुळे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात त्यांचे अनेक भक्तगण आहेत.

साईबाबांनी कायमच भिक्षा मागून उदरनिर्वाह केला. सबका मलिक एक हाच उपदेश सर्वांना आयुष्यभर दिला. सतत देवाचे नाव घेत रहावे आणि कोणत्याही परिस्थितीत आनंदी रहावे ही शिकवण त्यांनी दिली.

१५ ऑक्टोंबर १९१८ दसरा या दिवशी शिर्डीतच त्यांचे निधन झाले. शिर्डीत आल्यावर मिळणारी मनशांती आणि आत्मविश्वास यामुळे केवळ भारत तून नव्हे तर जगभरातून लाखो भाविकांचे ते श्रद्धा स्थान ठरले आणि कायम राहील यात शंका नाही.

काकड आरती करीतों साईनाथ देवा ।
चिन्मयरूप दाखवीं घेऊनि बालक-लघुसेवा ।।धु० ॥

काम क्रोध मद मत्सर आटुनी कांकडा केला।
वैराग्याचे तूप घालुनी मी तो भिजविला ।
साईनाथगुरूभक्तिज्वलनें तो मी पेटविला ।
तवृत्ती जाळूनी गुरूनें प्रकाश पाडीला ।
द्वैत-तमा नासूनी मिळवी तत्स्वरूपी जीवा । ॥ चि० ॥१॥

भू-खेचर व्यापूनी अवघे हृत्कमलीं राहसी ।
तोचि दत्तदेव शिरडी राहुनी पावसी ।
राहनी येथे अन्यत्रहित भक्तांस्तव धावसी।
निरसुनिया संकटा दासा अनुभव दाविसी ।
न कळे त्वल्लीलाही कोण्या देवा वा मानवा ।। ॥ चि० ॥२॥

त्वद्यशदुदुंभीने सारे अंबर हे कोंदलें ।
सगुण मूर्ति पाहण्या आतुर जन शिरडी आले ।
प्राशुनी त्वद्वचनामृत अमुचे देहभान हरपलें ।
सोडूनियां दुरभिमान मानस त्वच्चरणीं वाहिले ।
कृपा करूनियां साईमाउले दास पदरी घ्यावा ।। ॥ चि० ।।का० ।।चि० ।।३।।

जय जय साईनाथ आतां पहुडावें मंदिरी हो ।
आळवितो सप्रेमें तुजला आरति घेऊनि करी हो ।
जय जय साईनाथ आतां पहुडावें मंदिरी हो ।। ध्रु०॥

रंजविसी तू मधुर बोलुनि माय जशी निज मुला हो ।
भोगिसि व्याधी तूंच हरूनियां निजसेवकदुःखाला हो ।।
धावुनि भक्तव्यसन हरिसी दर्शन देसी त्याला हो ।
झाले असतील कष्ट अतिशय तुमचे या देहाला हो ।
जय० ॥१॥

क्षमा शयन सुंदर ही शोभा सुमनशेज त्यावरी हो ।
घ्यावी थोडी भक्तजनांची पूजनादि चाकरी हो ।
ओवाळितों पंचप्राण, ज्योति सुमती करी हो ।
सेवा किंकर भक्त प्रीती अत्तर परिमळ वारी हो ।।
जय० ।।२।।

सोडुनि जाया दुःख वाटतें देवा त्वच्चरणांसी हो ।
आज्ञेस्तव हा आशीर्प्रसाद घेउनि निजसदनासी हो ।
जातों आतां येऊं पुनरपि त्वच्चरणाचे पाशीं हो।
उठवू तुजला साईमाउले निजहित साधायासी हो ।।
जय० ॥३॥

ओवाळू आरती माझ्या सद्गुरूनाथा, माझ्या साईनाथा ।।
पाचाही तत्वांचा दीप लाविला आतां ।।

निर्गुणाची स्थिती कैसी आकारा आली ।।
सर्वां घटीं भरूनि उरली साई माउली ।। ओवाळू० ।।

रज तम सत्व तिघे माया प्रसवली ।।
मायेचिये पोटीं कैसी माया उद्भवली ।। ओवाळू० ।।

सप्तसागरी कैसा खेळ मांडिला ॥
खेळूनिया खेळ अवघा विस्तार केला ।।ओवाळू।।

ब्रह्मांडीची रचना कैसी दाखविली डोळां ॥
तुका म्हणे माझा स्वामी कृपाळू भोळा ।। ओवाळू

==========

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *