Ritbhatmarathi

Search
Close this search box.

विद्या एका नामांकित सेवाभावी संस्थेमध्ये एक सुपरिटेंडेंट म्हणून सर्विस करत होती लग्नानंतरही तोच जॉब विद्याने करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय आपला नवरा श्रीपादच्या सहमतीने टिकवलाही पण घर सावरता सावरता नोकरी अशी दोन्ही दगडावर पाय ठेवणं अवघडच असत असं म्हणतात ते काय चुकीचं नाही हे नक्की….रोज कार्यालयात वरिष्ठांची मर्जी राखता राखता विद्याची दमछाक होत होती पण बाई म्हणजे कुठलीही परिस्थिती तितक्याच नेटाने पेलणारी असते असं म्हणतात ते काय चुकीचं नाही विद्याच्या सासरी…सासू,सासरे, नवरा आणि स्वतः विद्या असं मस्त चौकोनी कुटुंब होत पण आधार असला तरीही कसरत प्रत्येक बाईच्या वाट्याला असतेच विद्याचे पती म्हणजे श्रीपाद एक सरकारी अधिकारी म्हणून सेवेत रुजू असल्याने श्रीपादच्या वेळा विद्याला पाळाव्या लागत ते सर्व सांभाळून विद्या स्वतःसाठी कधीच असा वेळ काढत नसे कारण भरल्या घरात इतरांचा विचार न करणारी बाई म्हणजे स्वार्थीच समजली जाई…याचा प्रत्यय विद्याला सुरुवातीला आला नाही पण नंतर हळू-हळू स्वार्थी बाईचा प्रत्यय विद्याला येऊ लागला…

सासूबाई म्हणजेच देविकाताई अगदी मनमोकळ्या स्वभावाच्या पण तितक्याच खोचकपने बोलणाऱ्या अशा होत्या…एक दिवस असेच विद्या हाफ डे असल्याने दुपारी घरी आली…अगदी भुकेने कासावीस अशी विद्याची अवस्था होती…पटकन काहीतरी पोटात टाकावं असं विद्याला वाटू लागलं…आपल्या सासूबाईंना विचारूनच विद्या पुढच्या तयारीला लागली…

विद्या – आई…मी आत्ता मॅगी करतीय…तुम्ही खाणार ना…अनायसे श्रीपादही येईलच इतक्यात…

देविकाताई – अगं…मग नवऱ्याच्या आधी जेवणार कि काय तू…? येऊ तर दे त्याला…आत्ता मॅगी का काय ते करणार…आणि परत आल्यावर त्याच्यासाठी वेगळा स्वयंपाक बनवणार…आणि परत ते खात बसणार…कसं वाटेल ते…बघ तुला पटतंय का ते…

विद्या – ठीक आहे…मग तो आल्यावरती पाहुयात काय करता येईल खायला ते…

असं म्हणून विद्याने वेळ मारून नेली पण पोटात भुकेनं कावळे ओरडत होते…’ आपलं आपल्या नवऱ्यावरती खूप प्रेम आहे…’ हे दाखवण्याची काय गरज…म्हणजे बायको म्हणून आपण आपल्या नवऱ्यासाठी ताटकळत बसावं हे काही विद्याला पटत नव्हतं…म्हणून विद्याने फक्त मॅगीची तयारीच करून ठेवली होती…हे पाहून देविकाताई म्हणाल्या…

देविकाताई – विद्या…अगं कळत नाही का तुला..आता येईलच कि तो…

विद्या – आई…अहो मी फक्त तयारीच करून ठेवलीय…

देविकाताई – अगं असं काढून…तयारी करून पण ठेऊ नकोस…एकदा सांगितलेलं ऐकावं जरा मोठ्या माणसांचं…नोकरी करतेस म्हणून बाई मिजास दाखवतीयस…आम्ही नोकरीला होतो पण नवऱ्याच्या आज्ञेत होतो…मोठी कानामागून आली….आणि तिखट झाली…

विद्या एकही शब्द न बोलता तशीच बसून राहिली…आपल्या सासूबाईंचं बोलणं जिव्हारी लागलं म्हणून डोळ्यांमधून पाणी आलं…श्रीपादच्या वाट पाहता पाहता सहा वाजले…तरीही विद्या तशीच बसलेली…’ खरंच आपलं काही चुकलं का…पोटात भुकेनं आगडोंब चालला असताना भूक मारून नवऱ्यासाठी वाट पाहणं खरंच जरुरीचं आहे का…? ‘ अशा विचारांनी विद्याच्या मनात काहूर माजलं होत…साडेसहाचा टोल वाजला…घड्याळातला टोल वाजला तशी विद्या तंद्रीतून जागी झाली…इतक्यात दारावरची बेल वाजली…दरवाजा उघडताच विद्याला श्रीपाद समोर दिसला…तसं भुकेनं विद्याचा चेहरा कोमेजून गेलेला होता…श्रीपादला आपल्या बायकोच मन कळलं असं नाही पण काहीतरी झालंय याची कुणकुण मात्र जाणवत होती… ..श्रीपादने लागलीच आपल्या बायकोला विचारले…

श्रीपाद – काय ग काय झालं…एवढी कोमेजयाला काय झालंय…

विद्या – काही नाही…आज जरा लवकर आले होते…ऑफिस मधून…

श्रीपाद – मग कोमेजली कशी काय…आल्यापासून आराम मिळाला असेल की तुला…

विद्या – भूक लागलेली असताना कसं काय शांतपणे आराम करू शकते मी…

श्रीपाद – अगं…मग खाऊन घ्यायचं ना…बनवायचा कंटाळा आला असता तर बाहेरून आणू शकली असतीस तू…

विद्या – तू लवकर येत जा बस…

श्रीपाद – विद्या…हा काय बालिशपणा आहे…आज काम होत ग…पुढच्या महिन्यात सुट्टी घेतोय मी म्हणून आजचा दिवस भरून दिला…म्हणजे काम हलकं झालं…नाहीतर परत माझ्या डोक्याला ताप झाला असता…म्हणून उशीर झाला मला…लवकर ठरवूनही मी लवकर कसा बरं येईल…

विद्या – केवढा कामसू असल्यासारखं दाखवता तुम्ही सगळे मला…मी काहीतरी खायलाच घेणार होते….

श्रीपाद – थांबलीस का…?

विद्या – काही नाही…जाऊ देत…

श्रीपाद – लवकर येत जा म्हणजे काय….तुला भूक लागली म्हणजे खाऊन घेत जा ना तू…

देविकाताई – तिला काय खायला सांगतोस…मीच म्हणाले तिला तसं…की श्रीपादला येऊ देत म्हणून…

श्रीपाद – काय….आई…तू अशी कशी वागू शकते…घरात अन्नपूर्णा म्हणवतेस ना स्वतःला…मग असं उपाशी ठेऊन काय मिळालं ग तुला…

देविकाताई – मला बाई वाटलं…बायको आहे ना ती तुझी मग थोडंसं तुझाही विचार केला पाहिजे हिने…म्हणून मी बोलले तिला…

श्रीपाद – आई…हे बघ…तीच माझ्यावर तुझ्याइतकंच प्रेम आहे…मग ते असं वागून सिद्ध होणार आहे का…नात्याची गंमत कशी असते माहिती आहे का तुम्हाला…आपल्या नात्यातला नवेपणा…एक्सक्लुसिव्हपणा जाईल म्हणून आपण दडपणाखाली ते नातं खुसखुशीत ठेवण्याचा प्रयत्न करतो किंवा दबावाखाली…लोक काय म्हणतील…आई काय म्हणेल याचा विचार आपण खूपदा करतो…ते आनंदाने होत असेल तर ठीक आहे…पण आज मी असं नाही केल तर समोरच्याला वाईट वाटेल …मग याच रूपांतर स्वतःला सिद्ध करण्यात अनेकदा जातं…याला अशा सूनबाई सामोरं जातात

विद्या – श्रीपाद अरे…पण यांन मी किती स्वार्थी आहे असं होईल ना…

श्रीपाद – असं काहीही होणार नाही…पोटात भूक लागली आणि तू माझी वाट पाहत राहणं…यात कसलं स्वार्थीपणाचं लॉजिक लावतेस तू…एवढी शिकलेली तू…पण असं कसं बोलतेस… ..आणि आई तुही कमाल करतेस…तुझंही माझ्यावर विद्यापेक्षाही जास्त प्रेम आहे हे मला चांगलंच माहिती आहे…तरीही तिने तुझ्या मुलासाठी असं उपाशी ताटकळत बसणं मला तरी पटत नाही…

विद्या – अरे…श्रीपाद जाऊ देत ना…मी इतकं मनाला लावून घेतलेलं नाही ते उपाशी राहणं…

श्रीपाद – आता मात्र तू काहीतरीच सांगायला लागलीस…तेही वाद होऊ नये म्हणून…चेहरा बघ कसा झालाय तो…कामाच्या ठिकाणीही वरिष्ठांची मर्जी राखण्यासाठी आपण काय काय करतो…सतत स्पर्धात्मक रित्या आपण वावरत असतो…आपलं वर्चस्व नेहमी सिद्ध करत राहतो…कारण त्यावेळी आपण आपल्या कामावर प्रेम करत असतो…पण तरीही एवढं करून जर आपलं पारडं हलकं राहील तर ते आपल्या मेहनतीवर पाणी फेरण्यासारखं होत नाही का…! आपण कास इतरांपेक्षा अपटुडेट आहोत याकडे काहींचा कल असतो म्हणून आपण कामाच्या ठिकाणीही एका दबावाखाली राहत असतो…आता हे आजच ताज

उदाहरण आहे…विद्या खरं सांग…तुझ्या पोटात भुकेनं काहूर माजलं होत हो ना…पण तुला आई काय म्हणेल याची जास्त काळजी वाटत होती…पण वास्तवात तुला काहीतरी खाणं महत्वाचं वाटलं हो ना…

विद्या – हो पण…श्रीपाद लिव्ह इट ना…

श्रीपाद – ऐक तर गं…रोज रोज अशी कसरत करण्याची खरंच काही गरज नसते…स्वतःवर प्रेम करायला शिक आधी…स्वतःला किंमत दे आधी…पण कोणताच दबाव न घेता व्हयला हवंय…तू दोन्हीही जबाबदाऱ्या अगदी चोखपणे पार पाडतीयस यात कुठलाच वाद नाही…पण एक दबाव दिसतोय त्यामध्ये…म्हणजे तू अजूनही दबावाखातर हे काम करतीय असं वाटतंय त्यात…

विद्या – हो नवरोबा…मी नाही दबाव घेत आजपासून…मग सांग तरी आता काय खायला  करू ..तुझ्यासाठी….म्हन्जे तुमच्यासाठी….मी तर मॅगी बनवायला लागले होते…

श्रीपाद – मला नको ती दबाव मॅगी…[ हसून बोलतो…विद्याला आता टेन्शन येऊ लागत नवीन फर्माईश करायला लागते कि काय…]

विद्या – अरे वाह…मॅगीचा नवीन प्रकार विकसित झालाय वाटत…[ त्याच गमतीत हसते ]

श्रीपाद – त्यापेक्षा मी आज डिनर आणि आत्ताचा ब्रेकफास्ट ऑर्डर करतो…कशी वाटली कल्पना…

आज काहीच स्वयंपाक करावा लागणार नाही म्हणून विद्या ऑर्डर असा शब्द ऐकताच गालातल्या गालात हसते…आणि फ्रेश व्हायला जाते…देविकाताई म्हणतात…

देविकाताई – अरे असं वागून डोक्यावर चढवू नकोस तिला…

असं ऐकून श्रीपाद परत आपल्या कपाळावर हात मारतो आणि सोफ्यावर बसून डिनर आणि ब्रेकफास्टची ऑर्डर देऊ लागतो.