Ritbhatmarathi

Search
Close this search box.

Ramesh Dev: अगदी डोळ्यांनीही हसणारे, सर्वांना आपलेसे वाटणारे,मराठी व हिंदी चित्रपटजगतातले ज्येष्ठ अभिनेता रमेश देव यांनी आज (२ फेब्रुवारी २०२२)रात्री मुंबईतल्या कोकिलाबेन इस्पितळात शेवटचा श्वास घेतला. ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले.

पाच फुट आठ इंच उंचीचा दिलखुलास माणूस..अगदी आपल्यातलाच एक असा वाटणारा..ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव या त्यांच्या अर्धांगिनी.

रमेश देव यांचा जन्म  ३० जानेवारी १९२९ रोजी कोल्हापुरात झाला होता.  ते मुळचे राजस्थानमधील ठाकुर घराण्यातले. देव हे आडनाव त्यांच्या पुर्वजांना राजश्री शाहू महाराज यांनी एका न्यायालयीन कामगिरीबद्दल बहाल केले होते. नुकतेच तीस जानेवारी रोजी त्यांनी वयाची ९३ वर्षे पुर्ण केली होती.

 रमेश देव अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक होते. सन १९५१ मधे पाटलाची पोर या चित्रपटात त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले होते.

रमेश देव यांनी ‘आंधळा मागतो एक डोळा ( वर्ष १९५६) या राजा परांजपे दिग्दर्शित चित्रपटातून त्यांच्या मराठी चित्रपट कारकिर्दीस प्रारंभ केला होता.

त्यांचा पहिला हिंदी चित्रपट “आरती” होता,ज्यात त्यांनी खलनायकाची भूमिका केली होती.

१९७१ साली “आनंद” आणि “तकदीर” या चित्रपटामुळे रमेश देव यांची ओळख निर्माण झाली.  त्यांनी ‘पैशाचा पाऊस’ आणि ‘भाग्य लक्ष्मी’ या गाजलेल्या  चित्रपटांत काम केले.  “दस लाख” (१९६६) चित्रपटात मनोहरची भूमिका साकारली होती.  मुर्जिम, खिलोना, जीवन मृत्यू या हिंदी चित्रपटांतील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या.

अशा रीतीने रमेश देव यांनी मराठी हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. रमेश देव यांनी  चित्रपट दिग्दर्शनही केले आहे तसेच अनेक टीव्ही मालिका आणि नाटकांची निर्मिती केली आहे. अभिनय व अजिंक्य ही त्यांची दोन मुले चित्रपटस्रुष्टीत कार्यरत आहेत.

रमेश देव यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

रमेश देव यांनी त्यांच्या प्रदीर्घ चित्रपट कारकिर्दीत २८५हून अधिक हिंदी सिनेमे, १९० मराठी चित्रपट तसेच ३० मराठी नाटकांत काम केलं आहे.. त्यांच्या अभिनयाकरता त्यांना बरेच राज्य तसेच राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. रमेश देव यांनी चित्रपट, दुरदर्शन मालिका व २५० हून जास्त जाहिरातपटांची निर्मिती केली होती.

रमेश देव यांची पत्नी सीमा देवसोबतची  सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला..यांसारखी लोकप्रिय गाणी रसिकप्रेक्षकांच्या चिरकाल स्मरणात रहातील.

आज त्यांच्या निधनाची बातमी कळताच चाहत्यांच्या ओठी हेच वाक्य होते..देव देवाघरी गेला..

©️®️ सौ. गीता गजानन गरुड.

हेही वाचा

घरच्या घरी इम्युनिटी वाढवण्यासाठी हे पदार्थ नक्की करून पहा.

प्रेवेडींग आणि मॅटर्निटी फोटोशूट साठी प्रसिद्ध असलेली पुण्यातील खास ठिकाणे

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *