Ritbhatmarathi

Search
Close this search box.

टाळ घेऊनी हाती,चाले वारकरी…
मुखी नाचतो ईथे,पांडूरंग हरी…

सावळ्या विठूची रुक्मिणी,
नाही कोणाच्या ही ठायी….
जगी नाचतो पुरूष, लक्ष्मी कोंडी देवघरी….

जगी विठूची माऊली जाहली..
वेडी रूखमाई आज वांझ ठरली…

लेकरांना ऊराशी धरू पाहे रूखमाई…
तुला ही संसाराने, वाळीत टाकले बाई…

संसाराचा भार म्हणे विठू वाही…
थके विठू तेव्हा, तो तुझ्या कुशीत येई…

जगाच्या हरीला आई तु सुख देई…
संसाराची माऊली तुझ्याविना शोभे अपूरी….

रूखमाई ऊभी हरी संगे विटेवरी…
जग भजे एक नाम पांडूरंग हरी..

रूखमाई कधी येईल तुज साठी वारी…
जन घेऊनी ऊंची पताका भारी…

एकादशी सुध्दा तुझ्या नावाची येऊ दे..
विठू माऊली परी तुला आईपण मिळू दे….