Ritbhatmarathi

Search
Close this search box.

पुरुष सूक्तम (प्राकृत) मराठी अर्थासह

purusha suktam in marathi:

पुरुषसुक्त हे ऋग्वेदातल्या दहाव्या मंडलातील नव्वदावे स्तोत्र आहे . आपल्याला सभोवताली दिसणारे संपूर्ण जग हें एका पुरुषाचाच भाग आहे हेच या पुरुषसुक्तात मांडलेले आहे. विश्वपुरुष आणि त्याने निर्माण केलेली सृष्टी यांची महती एकूण १६ ऋचांमध्ये केलेली आहे . पुरुषसूक्ताच्या शेवटी आपल्याला मंत्रपुष्पांजलीमधील ‘ यज्ञेन यद्न्य मयजन्त देवा स्थानी धर्मानी ‘ याचाही समावेश केलेला आपल्याला पाहायला मिळतो.

१. पुरुषसुक्त दररोज पठन केल्यास पठन करणाऱ्याची बुद्धी कुशाग्र होते 

२. पुरुषसूक्ताचे पठन विधीपूर्वक केल्यास अपत्य प्राप्तीचे सुख मिळते

३. या सूक्ताचे पठन केल्यास भगवान विष्णूची सदैव कृपादृष्टी आपल्यावर राहते

४. नियमित पठनाने आपली आध्यात्मिक प्रगती होऊन मानसिक शांती आणि समाधान मिळते.

सुख, समृद्धी, सफलता, भरभराट मिळवण्यासाठी श्रीसूक्त स्तोत्राचे रोज पठण करा – श्रीसूक्त स्तोत्र मराठी अर्थासहित

अत्यंत साध्या पद्धतीने कृपादृष्टी दाखवणारे आणि प्रसन्न होणारे हे करोडो लोकांचे श्रद्धा स्थान…. बघुया कशी करावी नित्यसेवा

हम गया नाही, हम जिंदा है – श्री स्वामी समर्थ आख्यायिका

सहस्रशीर्षा पुरुषः 

सहस्राक्षः सहस्रपात् ।
स भूमिं विश्वतो 

वृत्वात्यतिष्ठद्दशाङुलम् ॥१॥

पुरुष एवेदं सर्वं 

यद्भूतं यच्च भव्यम् ।

उतामृतत्वस्येशानो 

यदन्नेनातिरोहति ॥२॥

एतावानस्य महिमातो 

ज्यायाँश्च पूरुषः ।
पादोऽस्य विश्वा भूतानि 

त्रिपादस्यामृतं दिवि ॥३॥

त्रिपादूर्ध्व उदैत्पूरुषः 

पादोऽस्येहाभवत्पुनः ।
ततो विष्वङ् 

व्यक्रामत्साशनानशने अभि ॥४॥

तस्माद्विराळजायत 

विराजो अधि पूरुषः ।
स जातो अत्यरिच्यत 

पश्चाद्भूमिमथो पुरः ॥५॥

यत्पुरुषेण हविषा 

देवा यज्ञमतन्वत ।
वसन्तो अस्यासीदाज्यं 

ग्रीष्म इध्मः शरद्धविः ॥६॥

तं यज्ञं बर्हिषि 

प्रौक्षन्पुरुषं जातमग्रतः ।
तेन देवा अयजन्त 

साध्या ऋषयश्च ये ॥७॥

तस्माद्यज्ञात्सर्वहुतः 

सम्भृतं पृषदाज्यम् ।
पशून्ताँश्चक्रे वायव्यानारण्यान् 

ग्राम्याश्च ये ॥८॥

तस्माद्यज्ञात्सर्वहुत ऋचः 

सामानि जज्ञिरे ।
छन्दांसि जज्ञिरे 

तस्माद्यजुस्तस्मादजायत ॥९॥

तस्मादश्वा अजायन्त 

ये के चोभयादतः ।
गावोः ह जज्ञिरे तस्मात् 

तस्माज्जाता अजावयः ॥१०॥

यत्पुरुषं व्यदधुः 

कतिधा व्यकल्पयन् ।
मुखं किमस्य कौ बाहू 

का ऊरू पादा उच्येते ॥११॥

ब्राह्मणोऽस्य मुखमासीद् 

बाहू राजन्यः कृतः ।
ऊरू तदस्य यद्वैश्यः 

पद्भ्यां शूद्रो अजायत ॥१२॥

चन्द्रमा मनसो जातश्चक्षोः 

सूर्यो अजायत ।
मुखादिन्द्रश्चाग्निश्च 

प्राणाद्वायुरजायत ॥१३॥

नाभ्या आसीदन्तरिक्षं 

शीर्ष्णो द्यौः समवर्तत ।
पद्भ्यां भूमिर्दिशः श्रोत्रात्तथा 

लोकाँ अकल्पयन् ॥१४॥

सप्तास्यासन् परिधयस्त्रिः 

सप्त समिधः कृताः ।
देवा यद्यज्ञं तन्वाना 

अबध्नन्पुरुषं पशुम् ॥१५॥

यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि 

धर्माणि प्रथमान्यासन् ।
ते ह नाकं महिमानः सचन्त 

यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः ॥१६॥

सहस्रशीर्षा पुरुषः 

सहस्राक्षः सहस्रपात् ।
स भूमिं विश्वतो 

वृत्वात्यतिष्ठद्दशाङुलम् ॥१॥

मराठी भावार्थ –

ज्या व्यक्तीला हजार डोळे , हजार मस्तके आणि हजार पाय आहे असा पुरुष या धरतीमातेला वेढून फक्त दहा बोटे इतकाच शिल्लक राहिला आहे

पुरुष एवेदं सर्वं 

यद्भूतं यच्च भव्यम् ।
उतामृतत्वस्येशानो 

यदन्नेनातिरोहति ॥२॥

मराठी भावार्थ –

ही सृष्टी काल बनलेली होती , आजही ती सृष्टी आहे , उद्याही ती सृष्टी असणार आणि ती सृष्टी म्हणजे एक विराट पुरुषच आहे आणि हे सृष्टी अन्नाद्वारे उगवलं जात त्याचा अधिपतीही पुरुषचं आहे

एतावानस्य महिमातो 

ज्यायाँश्च पूरुषः ।
पादोऽस्य विश्वा भूतानि 

त्रिपादस्यामृतं दिवि ॥३॥

मराठी भावार्थ –

विराट  पुरुषाचा महिमा अगाध आहे . या अगाध पुरुषाच्या एका चरणात सर्व प्राणी मात्र आहेत आणि बाकी तीन भाग अंतरिक्षात स्थित आहेत.

त्रिपादूर्ध्व उदैत्पूरुषः 

पादोऽस्येहाभवत्पुनः ।
ततो विष्वङ् 

व्यक्रामत्साशनानशने अभि ॥४॥

मराठी भावार्थ –

उंच अवकाशात असणारा हा पुरुष पुन्हा अंश रूपात या विश्वात प्रकट झाला त्यानंतर त्याने अन्न भक्षण करणारे आणि अन्न न भक्षण करणारे अशा मध्ये हे विश्व व्यापून टाकले

तस्माद्विराळजायत 

विराजो अधि पूरुषः ।
स जातो अत्यरिच्यत 

पश्चाद्भूमिमथो पुरः ॥५॥

मराठी भावार्थ –

त्या आदिपुरुषापासून एक भव्य असा ब्रह्म्हांडपुरुष निर्माण झालं आहे आणि त्या पुरुषानेच हे विश्व व्यापून टाकले आहे. त्या आदिपुरुषापासून एक भव्य असा ब्रह्म्हांडपुरुष निर्माण झालं आहे आणि त्या पुरुषानेच हे विश्व व्यापून टाकले आहे त्यातूनच भूमी आणि हे जीव उत्पन्न झाले आहेत

यत्पुरुषेण हविषा 

देवा यज्ञमतन्वत ।
वसन्तो अस्यासीदाज्यं 

ग्रीष्म इध्मः शरद्धविः ॥६॥

मराठी भावार्थ –

जेव्हा सर्व देवानी या पुरुषाला यद्न्य म्हणून होम हवन केलं त्यावेळी यज्ञासाठी वसंत ऋतू म्हणजे साजूक तूप वापरलं गेलं त्यानंतर ग्रीष्म ऋतू ला अनुसरून समिधा यज्ञामध्ये टाकण्यात आल्या तर शरद ऋतूमध्ये हविद्रवंये टाकून यद्न्यकुंड तयार झालं

तं यज्ञं बर्हिषि 

प्रौक्षन्पुरुषं जातमग्रतः ।
तेन देवा अयजन्त 

साध्या ऋषयश्च ये ॥७॥

मराठी भावार्थ –

जो पुरुष सर्वांच्या अगोदर निर्माण झाला अशा त्या पुरुषाच्या आसनावर पाणी शिंपडून त्याच्याच योगाने दैवी ऋषींनी हवन केले

तस्माद्यज्ञात्सर्वहुतः 

सम्भृतं पृषदाज्यम् ।
पशून्ताँश्चक्रे वायव्यानारण्यान् 

ग्राम्याश्च ये ॥८॥

मराठी भावार्थ –

त्या यज्ञ कुंडात आहुती दिल्यानंतर त्या आहुतीपासून रवेदार तूप तयार झाले आणि त्या तुपापासून हवेवर उदरनिर्वाह करणारे जीव उत्पन्न झाले.(पशु -पक्षी)

तस्माद्यज्ञात्सर्वहुत ऋचः 

सामानि जज्ञिरे ।
छन्दांसि जज्ञिरे 

तस्माद्यजुस्तस्मादजायत ॥९॥

मराठी भावार्थ –

त्या सर्व आहुती दिलेल्या यज्ञामधील गोष्टीपासून तीन छंद निर्माण झाले ऋग्वेद , सामवेद आणि यजुर्वेद हे वैदिक छंद उत्पन्न झाले

तस्मादश्वा अजायन्त 

ये के चोभयादतः ।
गावोः ह जज्ञिरे तस्मात् 

तस्माज्जाता अजावयः ॥१०॥

मराठी भावार्थ –

त्या यज्ञापासून घोडे , एडके , गायी , बोकड असे प्राणी निर्माण झाले

यत्पुरुषं व्यदधुः 

कतिधा व्यकल्पयन् ।
मुखं किमस्य कौ बाहू 

का ऊरू पादा उच्येते ॥११॥

मराठी भावार्थ –

या महापुरुषाला कोणकोणते अवयव होते त्या सर्व अवयवांचीअवयवांची निर्मिती कशी कशी झाली त्याचे चेहरा तोंड कुठे होते , हात , पाय , मांड्या या सर्वांसाठी कुठली जागा योग्य आहे?

ब्राह्मणोऽस्य मुखमासीद् 

बाहू राजन्यः कृतः ।
ऊरू तदस्य यद्वैश्यः 

पद्भ्यां शूद्रो अजायत ॥१२॥

मराठी भावार्थ

माणूस हा चार भागां मध्ये विभागला गेला आहे . ब्राह्मण , क्षत्रिय , शूद्र आणि वैश्य तर महापुरुषाचा चेहरा म्हणजेच इथे ब्राह्मण असे संबोधित केलेले आहे तर क्षत्रिय तत्व म्हणजे महापुरुषाच्या बाहुंमध्ये सामावलेले आहे . शूद्र तत्व म्हणजे पोषणशक्ती अर्थात पोटाचा भाग आणि त्याखालील भाग म्हणजेच मांड्या आणि पाय हा वैश्य तत्वात मोडतो

चन्द्रमा मनसो जातश्चक्षोः 

सूर्यो अजायत ।
मुखादिन्द्रश्चाग्निश्च 

प्राणाद्वायुरजायत ॥१३॥

मराठी भावार्थ –

महापुरुषाच्या अंतर्भागातील अवयवांपासूनच सभोवतालची सृष्टी बनलेली आहे जसे कि , चंद्राची उत्पत्ती महापुरुषाच्या मनापासून झालीय , सूर्याची उत्पत्ती डोळ्यांपासून झालेली आहे , मुखापासून इंद्र आणि अग्नी निर्माण झालेला आहे तर आपल्या जीवापासून म्हणजेच प्राणापासून वारा उत्पन्न झालेला आहे

नाभ्या आसीदन्तरिक्षं 

शीर्ष्णो द्यौः समवर्तत ।
पद्भ्यां भूमिर्दिशः श्रोत्रात्तथा 

लोकाँ अकल्पयन् ॥१४॥

मराठी भावार्थ –

महापुरुषाच्या नाभीपासून म्हणजेच बेंबीपासून अंतराळ , मस्तकापासून स्वर्ग , दोन पावलांपासून जमीन तर कानांपासून दाही दिशा उत्पन्न झालेल्या आहेत अशी कल्पना देवाने मांडलेली आहे

सप्तास्यासन् परिधयस्त्रिः 

सप्त समिधः कृताः ।
देवा यद्यज्ञं तन्वाना 

अबध्नन्पुरुषं पशुम् ॥१५॥

मराठी भावार्थ –

विराट पुरुषाला म्हणजेच महापुरुषाला बळी देण्यासाठी म्हणून देवांनी त्याला सात कठडे असलेला होमकुंड आणि एकवीस समिधा असलेल्या यज्ञात एक पशु म्हणून खांबापाशी बांधलेले आहे

यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि 

धर्माणि प्रथमान्यासन् ।
ते ह नाकं महिमानः सचन्त 

यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः ॥१६॥

मराठी भावार्थ –

देवांनी यज्ञ करून यद्न्यरूपी महापुरुषाचे पूजन केले. याज्ञीक जीवन जगणारे महापुरुष यांचे स्थान नेहमी स्वर्गात असते.

=============

प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *