Ritbhatmarathi

Search
Close this search box.

प्रिवेडींग आणि मॅटर्निटी फोटोशूटसाठी प्रसिद्ध असणारी पुण्यातील खास ठिकाणे

पुण्याच्या आसपास राहता तर प्री वेडिंग फोटोशूट साठी शिमला मनाली किंवा गोव्याला कशाला जायचं? पुण्यातच बघा किती अप्रतिम ठिकाणे आहेत कुठल्याही फोटोशूट साठी आणि तीही पॉकेट फ्रेंडली | prewedding photo shoot places in pune

काय असत प्रिवेडींग आणि मॅटर्निटी फोटोशूट?

प्रिवेडींग फोटोशूट ही संकल्पना मुळातच अलीकडे रुजू झालेली संकल्पना आहे असं आपण म्हणूया कारण अगदी आधीपासून आपल्या भारतात तरी ही संकल्पना नव्हती.लग्न ज्याप्रमाणे एक कधीही न विसरता येण्यासारखा सोहळा असं आपण समजतो त्याचप्रमाणे लग्नाआधीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी प्रिवेडींग फोटोशूट ही संकल्पना आलेली आपण पाहतो आहोत ? आता यामध्ये फक्त प्रिवेडींग फोटोशूट नसून मॅटर्निटी वेडिंग शूटचाही समावेश असतो. तर आपण फोटोशूटसाठी प्रसिद्ध असलेली काही पुण्यातील ठिकाणे पाहुयात.

1. एम्प्रेस गार्डन

एम्प्रेस गार्डन ही पुण्यातली प्रसिद्ध अशी बाग ३९ एकर परिसरात विस्तारलेली आहे. वर्षभरातील बदलत असलेल्या निसर्गाला अनुसरून या बागेतील झाडाझुडुपांची रचना आहे.तब्बल दोनशे वर्षांचा महाकाय वड,दुर्मिळ असलेला कांचन वेल या बागेची विशेष अशी वैशिष्ट्य आहेत.वैशिष्ट्यपूर्ण अशी वृक्षसंपदा या बागेला लाभलेली आहे.इथे फक्त झाडे लावलेली असून या उद्यानात विविध प्रकारची फुल झाडेही लावलेली आहेत.गुलाब ते तगरीपासून विविध आंतरराष्ट्रीय दर्जाची फुलझाडेही आपल्याला एम्प्रेस गार्डनमध्ये पाहायला मिळतात.पाण्याचे झरे,विविध पक्षी,फुले यामुळे वेवेगळ्या फोटोग्राफरची फोटोशूटसाठी आवडते असलेले एम्प्रेस गार्डन हे ठीकाण आहे.              अगदी ब्रिटिशकाळापासून ही बाग अस्तित्वात आहे.या गार्डनचे बोटॅनिकल गार्डन मध्ये रूपांतरण करण्यासाठी वन खात्याने कंबर कसलेली आहे कारण एम्प्रेस गार्डन मध्ये दर वर्षी विविध प्रकारच्या वनस्पतीची लागवड केली जात आहे. ब्रिटिशांनी ही बाग त्यावेळी सैनिकांच्या विश्रांतीसाठी उभारलेली होती त्या वेळेला या बागेचे नाव ‘ सोल्जर्स बाग ‘ असे करण्यात आलेलं होते.पुढे जाऊन राणी व्हीकटोरिया च्या कारकीर्दीस या बागेचे नाव एम्प्रेस गार्डन असे करण्यात आले.

प्रकार – उद्यान

भेट देण्याचा कालावधी – वर्षाचे ३६५ दिवस खुले असते

उद्यानाची वेळ – सकाळी १० वाजल्यापासून ते संध्याकाळी ६:३० वाजेपर्यंत

प्रवेश शुल्क – १५ रुपये प्रत्येकी

उद्यानाचा पत्ता – रेस कोर्स च्या जवळ,एम्प्रेस गार्डन,कवाडे मळा,छावणी पुणे ४११००१

2. आगाखान पॅलेस

आगाखान पॅलेस ही एक पुण्यातील महत्वाची वस्तू आहे. या वास्तूची बांधणी सुलतान मोहम्मद शहा यांनी इ.सन १८९२ साली केली होती तर १८९७ मध्ये या पॅलेसचे बांधकाम पूर्ण झाले.१९४२ ते १९४४ या दरम्यान महात्मा गांधीजी या वास्तूमध्ये राहिले असल्याने या वास्तूला एक ऐतिहासिक असे महत्व प्राप्त झालेले आहे.आगाखान पॅलेस या इमारतीला पुण्यातील येरवडा पॅलेस म्हणूनही ओळखले जाते.सुलतान मोहम्मद शहा यांच्या पूर्वजांना पर्शियन राजाने आगाखान का ‘किताब दिला होता. ७२ मीटर लांब आणि २१ मीटर रुंद अशी भव्य दिसणारी ही वस्तू आहे.

ऐतिहासिक असे महत्व असण्याचे कारण की या पॅलेसच्या आवारात आपल्याला महात्मा गांधीजींचे सहायक असणारे महादेव देसाई आणि कस्तुरबा गांधी यांच्या समाध्या आपल्याला दिसतात.त्याचप्रमाणे पॅलेस मध्ये महात्मा गांधीजींच्या चपला,माळा,कपडे आणि भांडी या वस्तू आहेत.महात्मा गांधीजींच्या जीवनातील काही क्षण किंवा काही प्रसंगाची छायाचित्रे या पॅलेस मध्ये आपल्याला दिसतात.              

विस्तीर्ण कॅम्पस मध्ये असलेला वाडा हा इस्लामिक,इटालियन आणि फ्रेंच स्थापत्यशैलीचे आठवण करून देतो.या वाड्याचे क्षेत्रफळ १९ एकर इतके आहे. त्यापैकी मुख्य वस्तू ७ एकर एवढ्या क्षेत्रफळावर बांधलेली आहे.विस्तीर्ण असा लॉन या पॅलेसच्या आवारात आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर आजूबाजूला असलेली विविध झाडांची लागवडही आपल्याला आकर्षित करते. फोटोशूटसाठी तरुणाईचं आवडत ठीकाण असंही आपण म्हणू शकतो कारण पुष्कळ लोक याठिकाणी फोटोशूटसाठी येत असतात.फक्त फोटोशूटसाठी या पॅलेस चे महत्व नसून इतिहासप्रेमींसाठी खास आणि आवडते पुण्यातील ठीकाण आहे.

प्रकार – ऐतिहासिक स्थळ / पॅलेस

भेट देण्याचा कालावधी – सकाळी ९ ते संध्याकाळी ५:३० पर्यंत

प्रवेश शुल्क भारतीयांसाठी – प्रत्येकी ५ रुपये,लहान मुलांसाठी – प्रत्येकी २ रुपये, विदेशी पर्यटकांसाठी – प्रत्येकी १०० रुपये

पॅलेसचा पत्ता – नगर रोड-सम्राट अशोक रोड,पुणे महाराष्ट्र ४११००६

3. पु.ल.देशपांडे बाग

पु.ल. देशपांडे हे उद्यान १० एकर जमिनीमध्ये विस्तारलेले आहे हे उद्यान सिंहगड रोडवरील असून या उद्यानाची रचना जपानी पद्धतीची आहे.पु.ल. देशपांडे हे उद्यान ‘पुणे ओकोमाया मैत्री उद्यान‘ या नावाने पूर्वी प्रसिद्ध होते.उद्यानात फिरताना पाण्याचे झरे,तळी,आजूबाजूची हिरवळ,टेकड्या या सर्वांचा अनुभव घेता येतो.               

या उद्यानात गुलाब,मोगरा,तगर याचबरोबर काही पाश्चात्य पद्धतीची झाडे लावलेली दिसून येतात पाण्याचे झरे,तलाव यांमध्ये आपली तहान शमवण्यासाठी वेगवेगळे पक्षी उद्यानात आपल्याला दिसतात.जपानी पद्धतीने उभारण्यात आलेल्या उद्यानामुळे या बागेत चक्क जपानमध्ये आलोय की काय असा भास होतो.म्हणूनच कित्येक हौशी मंडळी पु.ल.देशपांडे बागेत आपली छबी टिपण्यासाठी येताना दिसतात.

प्रकार – उद्यान

भेट देण्याचा कालावधी – सकाळी सूर्योदयापासून ते ११ वाजेपर्यंत आणि संध्याकाळी ४:३० ते रात्री ८:०० वाजेपर्यंत

प्रवेश शुल्क – ५ रुपये प्रत्येकी

पॅलेसचा पत्ता – सिंहगड रोड,पुणे ओकामाया फ्रेंडशिप गार्डन,दत्तवाडी,पुणे ४११०३०

4. लवासा

लवासा हे ठिकाण पुण्यातील अत्यंत शिस्तबद्ध असलेले ठिकाण म्हणून नावाजलेले आहे. लवासा हे हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीने इटलीच्या पोर्टोफिनो शहराच्या धाटणीमध्ये बांधलेले आहे.२५००० एकर क्षेत्रफळावर लवासा प्रकल्प विस्तारलेला आहे.लवासा पश्चिम घाटात बाजी पासलकर जलाशयाच्या काठावर वरसगाव धरणाच्या मागे पुणे आणि मुंबईजवळ आहे हे शहर मोठ्या डोंगरांच्या कुशीत वसलेले आहे.

पश्चिम घाटात लवासा हे शहर असल्याने पर्वत,टेकड्या,डोंगर यांचा नैसर्गिक वसा या शहराला लाभलेला असलेला आपल्याला दिसून येतो त्यामुळेच लवासा प्रकल्पाचे रूप पालटले आहे.यामुळेच पर्यटकांसाठी आकर्षक केंद्रबिंदू असलेला हा प्रकल्प आपल्याला दिसतो.म्हणूनच या ठिकाणी प्रिवेडींग शूट आणि मॅटर्निटी शूटसाठी एकदम उत्तम असं ठिकाण तरुणांना वाटत.उन्हाळ्यात जर लवासाला भेट द्यायची असेल तर जरूर भेट द्यावी कारण बोटिंगचा अनुभव आपण या ठिकाणी घेऊ शकतो.वेवेगळ्या डोंगरांच्या कुशीत लवासा सिटी असल्याने आपण ऍडव्हेंचर ही करू शकतो बरेच ऍडव्हेंचर क्लब इथे येऊन हजेरी लावताना आपल्याला दिसतात.              

सभोवतालची हिरवळ, पाण्याचे जलाशय, धरण यामुळे जून-जुलै दरम्यानही आपण याठिकाणी लवासा भेटीसाठी हजेरी लावू शकतो.

प्रकार – प्रेक्षणीय स्थळ / एक सुनियोजित प्रकल्प

भेट देण्याचा कालावधी – वर्षभर कधीही

प्रवेश शुल्क – ५०० रुपये – चार चाकी वाहनांकरिता, २०० रुपये – दुचाकी वाहनांकरिता

पॅलेसचा पत्ता – लवासा सिटी @ पोस्ट दसवे लवासा, तालुका मुळशी जिल्हा पुणे महाराष्ट्र ४१२११२

पुण्याला भेट देताय? मग ह्या ठिकाणी चमचमीत आणि महाराष्ट्रीयन ऑथेंटिक पदार्थ नक्की ट्राय करा.

सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुण्याला शिक्षणाचे माहेरघर असे का म्हणतात?

5. रेसिडेन्सी लेक रिसॉर्ट मुळशी

रेसिडेन्सी लेक रिसॉर्ट ही ब्रह्मा कॉर्प च्या मालमत्तेचा एक अग्रगण्य भाग आहे पुण्यापासून ४० किमी अंतरावर मुळशी इथे आहे.जवळपास १२ तलावांच्या समोर राहण्याची उत्तम सोय रेसिडेन्सी लेक येथे आहे.शहराच्या गजबजाटापासून शांत आणि एक प्रकारचा दिलासा देणारी हि जागा आहे त्यामुळे कित्येक तरुण वर्ग या ठिकाणी वीकेंडला येण्याचा प्लॅन नक्कीच आखात असतो.              

हिरवागार निसर्ग आणि आलिशान निवासांसह राहण्याची उत्तम सोय हे या रिसॉर्टचं वैशिष्ट्य आहे आणि त्याशिवाय लहान मुलांसाठी स्विमिंग पूल,खेळणी अशी विविध साधन इथे उपलब्ध आहे म्हणून वीकेंडला कित्येक कुटुंब इथे मौज मजा करण्यासाठी येते. त्याचबरोबर तलाव आणि त्यासमोर असलेला अद्भुत निसर्ग या सर्व फोटोशूटसाठी उजव्या समजल्या जाणाऱ्या बाजू आहेत म्हणून जर मॅटर्निटी किंवा प्रिवेडींग फोटोशूट करत असाल तर रेसिडेन्सी लेक चा विचार जरूर करावा.

प्रकार – रिसॉर्ट

भेट देण्याचा कालावधी – २४ तास सेवेस उपलब्ध

प्रवेश शुल्क – रुपये ७००० पासून पुढे मात्र फोटोशूटसाठी प्रवेश विनामूल्य

पॅलेसचा पत्ता – ताम्हिणी घाट रोड,मुळशी,गोणवाडी गाव पुणे महाराष्ट्र ४११००४

6. मल्हार माची रिसॉर्ट

खडबडीत सह्याद्रीच्या पर्वतरांगावरील निळ्याशार पाण्याचे दृश्य मनाला शांत करते.हे पुण्यातील एक सुस्थितीत असलेले रिसॉर्ट आहे.शहरी जीवन वेगवान आणि तणावपूर्वक बनत असताना तुमचे मन हे दूर या सगळ्या गजबजाटापासून दूर राहावे असे वाटत असेल तर मल्हार माची रिसॉर्ट हे मनाला शांतता देणारे रिसॉर्ट आहे म्हणून कित्येक लोक य याठिकाणी आलेले आपल्याला दिसतात.मल्हार माची रिसॉर्ट च्या खात्यात जवळ जवळ २० कॉटेज आहेत त्यात बोगन वीला गार्डन या ठिकाणी प्रिवेडींग फोटोशूट करतात कारण अत्यंत फुलांनी सजलेलं हे गार्डन असल्याने छबी खूप सुंदर टिपता येते.              

फोटोशूटचा जर आपण विचार करत असाल तर मल्हार माची या रिसॉर्टवर जर जावे.हिरव्यागार पर्वतरांगाच्या पार्श्वभूमीवर शांत,निळे मुळशीचे बॅकवॉटर हे एक अत्यंत सुंदर दृश्य इथेदिसते म्हणून जर प्रिवेडींग फोटोशूट किंवा मॅटर्निटी फोटोशूटचा विचार जर आपण करत असाल तर मल्हार माची रिसॉर्ट या ठिकाणाला जरूर भेट द्यावी.सूर्यास्त पाहताना सुद्धा आपण निसर्गाच्या सानिध्यात आहोत कि काय असा भास होतो म्हणूनच मल्हार माची रिसॉर्ट हे एक आवडते तरुणाईचे ठिकाण झालेले आपल्याला दिसून येते.

प्रकार – रिसॉर्ट

भेट देण्याचा कालावधी – २४ तास सेवेस उपलब्ध

प्रवेश शुल्क – २०००० रुपये

पत्ता – @ पोस्ट वळणे.ता.मुळशी महाराष्ट्र ४११०४०

7. जाधवगड

पिलाजीराव जाधव यांनी १७१० मध्ये टेकडीवर किल्ला बांधला ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेत मराठा सेनापती होते मुघल हल्ल्याच्या वेळी एक सुरक्षित आश्रयस्थान म्हणून म्हणून हा किल्ला पिलाजीराव जाधवानी बांधला.हॉटेल व्यावसायिक डॉ.विठ्ठल कामात यांनी २००७ मध्ये या किल्याचा जीर्णोद्धार केला आणि या किल्ल्याचे रिसॉर्ट मध्ये रूपांतर केले.             

जंगलाच्या मधोमध आणि निसर्गाच्या कुशीत वसलेला जाधवगड का शहराच्या गजबजाटापासून आपली सुटका करतो प्रिवेडींग फोटोशूटसाठी हि एक आल्हाददायक अशी जागा आहे.या किल्ल्याच्या आवारात ड्रोन फोटोग्राफी ची सुद्धा परवानगी आहे.उत्कृष्ट अशा हवाई शॉट्स मुले आपले फोटोशूट एक वेगळे आणि हटके होऊ शकते.टेकडीवर असलेला जाधवगड किल्ला मुख्य दरवाजावरील चिलखती,दगडी पायऱ्या आणि दगडी बाल्कनी जे तुमचे गेल्या गेल्या स्वागत करतात लगेच तुम्ही जुन्या आठवणीत गेल्याशिवाय राहणार नाही त्या किल्ल्याची स्थापत्यकला हि इतिहास प्रेमींसाठी एक प्रकारची पर्वणीच आहे.म्हणूनच फोटोशूटसाठी एकदा जाधवगड्ला भेट द्याच..

प्रकार – किल्ला

भेट देण्याचा कालावधी – सकाळी 7 ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत

प्रवेश शुल्क – ६०००/- ( कपडे बदलण्यासाठी आणि फ्रेश होण्यासाठी)

पत्ता – हडपसर,सासवड-जेजुरी रोड जाधववाडी महाराष्ट्र ४१२३०१

8. शनिवारवाडा

एक ऐतिहासिक महत्व प्राप्त असलेला वाडा म्हणजे पुण्यातला शनिवारवाडा पुणे शहराला लाभलेला एक अनमोल ठेवा म्हणून शनिवारवाड्याला ओळखले जाते.अठराव्या शतकात मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेले पेशवे यांचे निवासस्थान आणि कार्यालय म्हणून शनिवारवाडा ओळखला जायचा.शनिवारवाड्याच्या पायाभरणीचे काम १० जानेवारी १७३० रोजी सुरु झाले तर २२ जानेवारी १७३२ रोजी शनिवारवाड्याची वास्तुशांती करण्यात आली त्या दिवशी शनिवार होता म्हणून वाड्याचे नामकरण शनिवारवाडा असे करण्यात आले.शनिवारवाडा हा १७ जून १९१९ रोजी संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले गेले आहे.             

शनिवारवाडा जसा एक ऐतिहासिक वस्तू म्हणून आपण पाहतो त्याचप्रमाणे वाड्याच्या सभोवती असणाऱ्या बागा या सर्वांचे लक्ष वेधून घेतात आपण फोटोशूटचा विचार करत असाल तर फोटोशूटसाठी एकदम परफेक्ट असणार स्थळ म्हणजे शनिवारवाडा म्हणून नक्की पारंपरिक पुणेरी वेशभूषा करून एकदा फोटोशूट नक्की करावं.

प्रकार – किल्ला

भेट देण्याचा कालावधी – सकाळी ९:३० ते संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत

प्रवेश शुल्क – ५०००/- ते १००००० पर्यंत ( जसा फोटोग्राफी चा स्कोप असेल तसं)

पत्ता – शनिवार पेठ,पुणे महाराष्ट्र ४११०३०

==============

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *