Ritbhatmarathi

Search
Close this search box.

ओट्स आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. ओट्स मधून आपल्याला फॉस्फरस , मॅग्नेशियम आणि झिंक सारखे मिनरल्स मिळतात .
तसेच ओट्स रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करतात आणि वजन कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहेत. त्या मुळे ओट्सचा वेगवेगळ्या तऱ्हेने आपल्या आहारात समावेश करणे गरजेचे आहे.

ओट्स डोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

१) बारीक दळलेले ओट्स – २ कप (रेडिमेड दळलेल्या पीठ पेक्षा बाजारात ओट्स मिळतात ते घरीच मिक्सर मधून दळले तर उत्तमच )

२) तांदळाचे पीठ – १ कप

३) रवा – १/२ कप

४) पाणी लागेल तसं – साधारण वर दिलेल्या साहित्यासाठी २ कप पाणी लागेल

५) ऑइल/तेल – १ टीस्पून ओट्स मिक्सर मध्ये टाकायला आणि साधारण १ टीस्पून डोसा बनवताना

६) मीठ चवीपुरतं

ओट्स डोसा बनवण्याची कृती :

प्रथम एका खोलगट भांड्यामधे ओट्स , तांदळाचे पीठ आणि रवा मिक्स करून घ्यावे.

त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकावं . पाणी एकदम टाकू नये. एकंदर तांदळाच्या डोस्याचं पीठ ज्या पद्धतीचं असतं, त्या पद्धतीने ओट्स डोसा पीठ बनवावं. त्यात चवीपुरतं मीठ आणि एक चमचाभर तेल टाकावं.

त्यानंतर पीठ ५-१० मिनिटे भिजत ठेवावं.

५-१० मिनिटांनंतर पीठ छान भिजतं आणि छान एकजीव होतं.

पीठ थोडं घट्ट वाटलं तर त्यात थोडं अजून पाणी टाकावं.

तव्याला थोडंसं ग्रीसिंग करून त्यावर डोसे टाकावे.

दोन्ही बाजूने छान शिजवून घ्यावे.

गरमागरम डोसे नारळाच्या चटणी सोबत सर्व्ह करावे. किंबहुना कुठल्याही चटणी आणि सांबर सोबत छान लागतात हे डोसे.

================

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories