Ritbhatmarathi

Search
Close this search box.

बाई पण म्हटलं कि न्हाणं आलंच… स्त्रीच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा घटक…. ज्या स्त्रीला महिना झाला कि न्हाणं येत. त्याच स्त्रीला समाज लायक समजतो. त्यावर थोडं लिहावंसं वाटलं.. इयत्ता ७ वी नेहमीप्रमाणे शाळेत जायचं म्हणून आई ने मला ५. ३० पहाटे चे उठवलं.. मी झोपेतून उठताच तिने माझ्याकडं पाहिलं आणि खाली बसली.. मला झोपेत असल्यामुळे काहीच समजलं न्हवते कि झालंय काय… आता जरा नीट जाग आल्यावर पाहिलं स्वतःला आणि समजेना आज काय झालंय??
आई ने हळुवारपणे मला जवळ घेऊन डोक्यावर हाथ फिरवला आणि समजावलं.. माझ्यासाठी हे सगळं नवीन होतं.  वयाने लहान असल्यामुळे समजायला सुद्धा कठीण जात होतं.. विचारांच्या गर्दीत मी शाळेत पोहचले. सगळ्या मुली मला दिसत होत्या, पण हि गोष्ट बोलायची कोणासोबत?? सगळे हसतील मला.. म्हणून तसंच शाळा सुटायची वाट पाहत बसले.. खेळाच्या तासाला सगळे खेळत होते, पण मी मात्र एकाच जागी बसून सगळ्यांना पाहत होते.. मनात येऊन सुद्धा एकाच जागी बसून राहिले.. घरी गेल्यावर तर चित्र बदललेलं होतं.. माझ्या काकूने मला माझ्या आवडीचं जेवायला केलं होतं.. माझ्यासाठी नवीन कपडे आणले होते.. सकाळपासून आपल्याला काय झालंय हे समजण्याच्या आतच असा सोहळा घरात सुरु झाला होता.. आणि सोहळ्याच्या शेवटी मोठ्या काकांनी मला बोलावून सांगितले, आज पासून शाळेतल्या मुलांसोबत बोलायचं नाही..सरांसोबाबत सुद्धा बोलायचं नाही, कोणी बोलावलं तरीही जायचं नाही.. आणि एकच भीती डोक्यात येऊन बसली..
वेळ गेला तसं वय वाढत गेलं आणि या सगळ्याचा अर्थ हळूहळू समजत गेला…. पण किव आली ती या सोहळ्याची… त्याच वेळी या सगळ्याचा अर्थ कोणी समजावून सांगितला असता तर किती बरं झालं असतं….
मातृत्वासाठी सज्ज असणारी स्त्री म्हणजे जिच्या वाट्याला असा न्हाणं येत… इतकी पवित्र आणि महत्वाची गोष्ट कोणीच समजावून सांगत नाही फक्त असं करू नको, जड उचलू नको, ओढणी नीट घे, पाय फाकवुन चालू नको अश्या सूचनांचा ससेमिरा लावला जातो… ज्या पुरुषांना स्त्री म्हणजे संभोगाची सोय वाटते त्यांनी एकदा महिण्याच्या या चार दिवसांचं दुखणं समजावून घ्यावं… अंगावरून होणारा रक्तप्रवाह…. तरीही सगळे कामे करणारी स्त्री म्हणजे हत्तीच्या बळाची मानायला हवी… जोवर स्त्रीच न्हाणं चालू असतं तोवर समाजासाठी स्त्री एक गरजेची गोष्ट असते.. पण कालांतराने हेही संपून जातं….
“आणि न्हाणं बंद होतं”… हे न्हाणं जाताना स्त्रीचे होणारे हाल कोणताच समाज समजून घेत नाही… तिच्या शरीरामधले बदल, वाढती चिडचिड, येणारा एकाकीपण याकडे समाजाची पाठ असते… जेव्हा स्त्री वयात येते त्यावेळी तिच्या वयात येण्याचे सोहळे साजरे केले जातात. मग ज्यावेळी तिचं न्हाणं संपून जातं त्यावेळी तिने इतके वर्ष केलेल्या सेवेचा किमान आदर ठेऊन कृतज्ञता म्हणून एक तरी सोहळा साजरा झाल्याचे मी पाहिलं नाही… इतका समाज कोत्या मनाचा असावा…. ज्या स्त्रिया मिळून हे सोहळे साजरे करतात त्यांनी न्हाणं बंद झाल्याचा उत्सव का साजरा करू नये? ह्याचा प्रत्येक स्त्रीने विचार करायला हवा…
न्हाणं बंद होणं म्हणजे सेवेतून निवृत्त होणे नव्हे तर राहून गेलेल्या गोष्टींची सुरुवात असे का मानू नये…..

क्रमशः

© RitBhatमराठी

=======================

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories