Ritbhatmarathi

Search
Close this search box.

नशीब (लघुकथा_स्पर्धा_जाने_२२)

रीतभातमराठी_ लघुकथा_ स्पर्धा_ जाने_२२”

©️®️ शांभवी कैसरे

नविन वर्ष म्हणुन नलुच्या दिन क्रमात काहीच बदल झालेला नव्हता. तिचं तेच कष्टी जीवनाचं रहाटगाडे चालू होतं.आज सकाळी
गावच्या विहिरीवर पाणी भरायला गेली तेव्हा समोरच्या देवळात गर्दी दिसली. तिने पाणी भरल्यानंतर आजूबाजूला चौकशी केली तर तिला समजले की देवळात कूणी मोठा साधू बाबा आला आहे आणि त्याला भेटण्यासाठी ही गर्दी जमली आहे.लोक आपले प्रश्न घेवून त्यांच्या
कडे जात होते आणि ते त्यांच्या शंका निरसन करीत होते. बाबांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरते हे आतापर्यंत अख्ख्या गावाला माहीत झाले होते. प्रचंड ध्यानधारणा करून त्यांनी ही दिव्यशक्ती मिळवली होती.तेवढ्यात नलु च्या मैत्रिणीनं तिला सांगितले की ती पण देवळातल्या बाबांना भेटायला संध्याकाळी जाणार आहे.” तू पण चल की माझ्याबरोबर
,तुला तुझ्या नशीबाच चक्र कधी फिरणार हे जाणून घ्यायची इच्छा नाही आहे का ” शांती, नलूच्या मैत्रिणीने तिला प्रश्न केला.

” माझ मेलीच नशीब आता काय उजळणार आहे ” असा प्रतिप्रश्न करून नलू आपल्या दिशेने निघून गेली. तिला घरी जायची घाई होती.गंपी तिची मुलगी तिची वाट पाहत होती.तिच्यासाठी तिला जेवण बनवायचे होते. 

घरी गेल्यावर, घर कसलं ती एक झोपडीच होती, ती लगबगीने जेवणआच्या तयारीला लागली पण तिचे मन मात्र १८ वर्ष मागे गेले होते.मनोजचं स्थळ लग्नासाठी जेव्हा तिला सांगून आले होते तेव्हाच तिने ठरविले होते की लग्न करायचं तर ह्याच्याशी च करायचे. मनोजचे
ते राजबिंडे रूप पाहून ती त्याचक्षणी त्याच्या प्रेमात पडली होती. आणि तिच्या मनासारखे घडतंही होते. मनोज ला पण ती आवडू लागली होती. नलूची घरची परिस्थिती तशी बेताची होती त्यामुळे बापाने लगेचच तिचे हात पिवळे करून टाकले. आणि नलू नवी नवरी बनून मनोजच्या घरी आली.तिची लग्नाबद्दलची खूप स्वप्ने होती. सुरवातीचे तिचे दिवस नवीन घराशी जुळवून घेण्यातच गेले. हळूहळू तिला समझायला लागले की मनोज हा एक भपकेबाज माणूस आहे.दिवसभर घरी बसून स्वप्नरंजन करणे आणि बाहेर मित्राबरोबर टवाळक्या करणे हाच त्याचा दिनक्रम होता.
आमदनी अठ्ठनी खर्चा रुप्पय्या अशी काहीशी त्याची जगण्याची पद्धत होती.त्यातच नलुला दिवस गेले.तिला वाटले आता तरी हा सुधारेल. पण इथेही तिच्या अपेक्षा फोल ठरल्या. 

काही दिवसांनी नलूच्या घरी मुलगी झाली. नलु खूप खुश होती.पण आता तिला तिचे आणि मुलीचे पोट भरण्यासाठी हातपाय मारायची गरज होती. गावात नोकरीसाठी खूप प्रयत्न केल्यानंतर तिला एका गिरणीत नोकरी मिळाली.खूप कष्टाचं काम होतं.दिवसामगून दिवस जात होते.

नलुची मुलगी गंपि मोठी होत होती. नली तिच्यासाठी पै- पै जमवत होती.तीच्या नवऱ्याचा काहीच हातभर नव्हता. अशातच एक दिवस
कामाच्या ठिकाणी नलूला खबर मिळाली की मनोज जुगाराच्या खेळात बरीच मोठी रक्कम हरून बसला आहे आणि त्या तणावामुळे तो फरार झाला आहे.नलूने त्याचा खूप शोध घेतला पण काहीच फायदा झाला नाही.
 गंपेच्या हाकेने ती भानावर आली.जेवण वगैरे करून ती गिरणीवर कामाला गेली. तिथेही देवळात आलेल्या बाबाविषयी चर्चा चालू होती. आता नलुला पण वाटायला लागले की त्या देवळातल्या बाबांना भेटाव आणि विचारावं की तिचा नवरा ह्या जन्मी कधी परत येणार

दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने ती सकाळीच मनाशी काही ठरवून देवळात निघाली.बाबाच्या ठीकण्याची चौकशी करून ती त्यांना
भेटायला गेली. गर्दीतून कशीबशी जागा काढून ती त्याच्या समोर उभी राहिली.त्याला पाहून मात्र तिची पायाखालची जमीन सरकली.

देवळातल्या साधुबाबा दुसरा तिसरा कोणी नसून मनोजच होता.मनोजने ह्या अठरा वर्षात भरपूर पैसा केला होता,तसेच लोकांची मदतही केली होती. मनोज तिच्याशी बोलत होता पण नलु काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती.

तिचा नशिबावरचा विश्वास उडाला होता.ती तशीच माघारी फिरली,कधीच कोणत्याच साधुबाबाच्या जाळ्यात न अडकण्याचा विचार करून.

शांभवी कैसरे ©️®️

=========================

फोटो साभार – गूगल

तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा. स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही….पाहिजे ती फक्त मजबूत शब्दांची मांडणी. तर मग विचार कसला करताय लवकरात लवकर तुम्हीही भाग घ्या.

हि स्पर्धा दि. ३ जानेवारी ते २९ जानेवारी आयोजित करण्यात येणार आहे.

विजेत्या स्पर्धकांना खाली दिल्यानुसार मानधन देण्यात येईल.

पहिला विजेता – १००१/-

दुसरा विजेता (अनुक्रमे २ विजेते काढण्यात येतील) – ५०१/- प्रत्येकी

तिसरा विजेता (अनुक्रमे ३ विजेते काढण्यात येतील) – २५१/- प्रत्येकी

बाकी सर्व सहभागी स्पर्धकांना RitBhatमराठीच्या वतीने डिजीटल प्रमाणपत्र देण्यात येईल.

स्पर्धेचे नियम जाणून घेण्यासाठी खालील ई-मेल अथवा फेसबुक मेसेंजर वर संपर्क साधा.

ई-मेल : ritbhatmarathi@gmail.com

फेसबुक पेज : https://www.facebook.com/ritbhatmarati/

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *