Ritbhatmarathi

Search
Close this search box.

तांबूल म्हणजे पान…म्हणजेच विड्याचे पान…आपण सर्व जण पाहत आलो आहोत की कुठलीही पूजा असू देत विड्याचे पान हे देवाच्या अग्रभागी ठेवतात याचे कारण काय…? तर विड्याच्या पानाची उत्पत्ती नेमकी कशी झाली यासाठीचीही कहाणी आहे…आपण सर्व जण विड्याच्या पानाचे सेवन नेमके केव्हा करतो तर विड्याच्या पानांचे सेवन हे जेवण झाल्यानंतर केले जाते कारण खाल्लेल्या अन्नपदार्थांचे बारीक कण किंवा अन्नाचे छोटे-छोटे अंश दातांमधून तोंडात चिकटले जातात अशाने मुखदुर्गंधी होते…म्हणूनच जेवण झाल्यानंतर विड्याचे पान खाल्ले जाते…एक आख्यायिकाही सांगितली जाते समुद्रमंथनातून ज्यावेळी भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून सर्वांना अमृताचे वाटप केले त्यामधूनही थोडेसे अमृत शिल्लक राहिले मग मोहिनीने उरलेले अमृत त्याचठिकाणी उभ्या असलेल्या नागराज नावाच्या हत्तीच्या खुंटाजवळ नेऊन ठेवले…सर्वांचे त्या अमृतापासून दुर्लक्ष झाले…काही दिवसांनीच त्या खुंटा जवळील अमृतामध्ये एक वेळ उगवली…ती वेल अगदी एका नागाप्रमाणे भराभर सरसर चढत पूर्ण मंडपभर पसरू लागली..ती हिरवीगार वेल पाहून सर्व देवतांना आनंद झाला…कारण त्या वेलाची हिरवीगार पाने पाहून सर्वांना अगदी प्रसन्न वाटू लागले त्या वेलाची बारीक,नाजूक,गुळगुळीत ,चमकदार,हृदयाच्या आकाराची टोक असलेली पान पाहून जो तो आकर्षित होत होता…भोजन झाल्यावर सगळे देवदेवता हि पान आवडीने खात असत…म्हणूनच देवाला नैवेद्य दाखवून झाल्यावर देवाच्या अग्रस्थानी विड्याचे पान आपण ठेवतो… त्या वेलाचे वैशिष्ट्य म्हणजे एकाआड एक पाने येऊन अशीच वेल वाढत जाते म्हणून या वेलास नागाप्रमाणे गती असते म्हणूनच या विड्याच्या पानाच्या वेलास ‘ नागवेल ‘ म्हणूनही आपण ओळखतो.

नवरात्रींमध्येही देवीला तांबूल देण्यात येतो…विड्याचे महत्व या दिवसातही अनन्यसाधारण असे आहे  एका आपल्या अभंगांमधून अंबाबाईला विडा अर्पण केलेला आहे…त्या अभंगाच्या ओळी-

विडा घ्या हो अंबाबाई I जगज्जननी माझे आई II

विनवितो दास प्रेमे I हस्त जोडुनी तुज आई II

त्रिगुणपूगीफळ । चूर्ण केलें निर्मळ ॥

निर्गुण केशराने ॥ रंगविलें सोज्वळ ॥ विडा. ॥

प्रपंच पक्व पानें । हाती घेउनि विवेकाने ।

द्वैतभाव जाळूनिया ।वर लावला चूना ॥ विडा. ॥ २ ॥

भावार्थ शुभ्रकार । प्रेमलवंग त्यांत ॥

सुवासिक सर्व द्रव्यें ॥मेळविलीं समस्त ॥ विडा. ॥ ३ ॥

जय जय कुळदेवते ।आदिशक्ती मूळमाते ॥

घेउनि विडा हाती ।हरी तुज विनवीत ॥ विडा घ्याहो ॥ ४ ॥

अगदी नेटक्या भाषेमधून विडा या अभंगांमधून देवीला विडा अर्पण केलेला आहे…याच विड्याचे आपण आता प्रकार पाहणार आहोत –

१. गोविंद विडा – जुनी विड्याची पाने रुचकर असतात,ती विड्याची पाने घ्यावीत देठ व खराब भाग काढून टाकावा  चुना पातळ करून लावावा,चुना ओला असतानाच त्यावर काताची वस्त्रगाळ पूड टाकावी,सुपारीची पूड,जायपत्री ओला नारळ किंवा सुक्या खोबऱ्याचा कीस,बडीशेप आणि दोन गुंजाची पान घालून हा पाच पानी गोविंदविडा तयार करतात. पहिल्यांदा दोन पाने कोण होईल अशी घडी हातात घ्यावी मग त्यावर तीन पाने ठेवून गोविंद विद्याचा आकार देऊन लवंग टोचावी हा विडा देवाच्या नैवेद्याला अवश्य करतात.

२. गोपाळ विडा – ह्या विड्याला गोविंदविडयाप्रमाणेच सर्व साहित्य वापरावे..हा विडाही पाच पाणीच असतो मात्र घडी करताना दोन्ही बाजू दुमडून घेऊन लवंग टोचावी…याला गोविंद विड्याचा भाऊ असेही म्हणतात.

३. होडी विडा – दोन मोठी विड्याची पाने घ्यावीत ती कात्रीने चौकोनी कापावीत त्याला ओला चुना आणि कात लावावा. त्या पानांची कागदी होडी करतो त्याप्रमाणे घडी करावी त्या होडीत बारीक सुपारीची पूड घालावी आणि वरती ओल्या खोबऱ्याचा चव घालावा आणि त्यात थोडी तुटुफ्रूटी घालावी कापलेल्या पानांचाच शेंड्याकडचा तुकडा घेऊन त्याची सुरळी करून त्याचे निशाण वरच्या बाजूस खुपसावे म्हणजे डॉलदार होडी तयार होईल तबकात अशा हिरव्या होड्या फारच मोहक दिसतात.

४.खण विडा – हा विडा दोन पानांचा किंवा चार पानांचाही करतात नेहमीप्रमाणे सर्व साहित्य घालून विडा तयार ठेवायचा एक पण घेऊन त्याची बारीक पट्टी काढायची नक्षी काप किंवा साधी पट्टी केली तरीही

चालेन हीच पट्टी खाली धरून त्यात साहित्य घातलेल्या विड्याचे पण हातात घेऊन खणाप्रमाणे त्याची घडी घालावी आणि पानाच्या घडी घातलेल्या भागाला लवंग टोचावे.

५. स्वस्तिक विडा – एकसारखी पाने घ्यावी त्याच्या स्वतंत्र्य गुंडाळ्या करून चार लांबट पट्ट्या तयार कराव्यात नंतर त्या एकमेकांवर फुलीसारख्या ठेवाव्यात नंतर त्यात दोन पाने घेऊन नेहमीप्रमाणे त्यात विड्याचा मसाला घालून चारी बाजूने घडी घालावी त्यावर फुली ठेवलेली पाने ठेऊन लवंग टोचावी मध्यभागी नंतर चार पट्ट्यांच्या कडेला बाजूला थोडे दुमडून स्वस्तिकसारखा आकार द्या तेथे थोडासा साखरेचा घट्ट असा पाक लावा म्हणजे विडा हलत नाही अगदीच जमले नाही तर लवंग टोचावी आणि खाताना लवंग काढून ठेवावी.

६. डबा विडा – हा विडा दोन पानी चार पानी कसाही करावा..नेहमीप्रमाणे सर्व साहित्य विड्यात भरावे…पाने निमुळती कापावी…गुंडाळताना मात्र हलक्या हाताने गुंडाळावी खोवलेल्या ओल्या नारळाचा थोडा जिलेबीचा रंग भुरभुरावा व एक लवंग टोचावी

७. वृद्धांचा विडा – वृद्धांचा विडा म्हणजे काय…? अगदी मऊ पिकलेली पाने घ्यावी,त्याच्या शिरा काळजीपूर्वक काढाव्यात, त्यात घालताना सर्व मसाला बारीक कुटून घालावा…त्यात ओला चुना व कात घालावा आणि साधीच घडी घालावी…हा विडा दात नसलेल्याना सुद्धा खाता येऊ शकतो.

८. त्रयोदशगुणी विडा – हा विडा फार जुन्या काळापासून प्रचलित आहे. त्यात घालायचा मसाला म्हणजे विड्याची पाने,पांढरा कात,लवंगा,जायफळ,केशर,खोबरे,कंकोळ,जायपत्री,वेलदोडा,बदाम,चुना,कस्तुरी,हा सर्व मसाला घालून हा विडा तयार करतात.

९. पन्नास गुणी औषधी तांबूल – विड्याची पाने,सुपारी,कात,चुना,जायफळ,जायपत्री,वेलदोडे,पत्री लवंग, कंकोळ, पिस्ते, अक्रोड,बदाम, खोबरे,केशर ,कस्तुरी, खारीक, बेदाणे, खडीसाखर, जेष्ठमध, गुलाब कळी, पुदिना, दालचिनी, पांढऱ्या गुंजेची पानं, जिरे, शहाजिरे, सुंठ, तमालपत्र, दगडी फुल, भुईमूग, मध, मनुका, पायचंद, हिना, बकुळ,वाळा,तळलेला डिंक,अहळीव,धने,कपूर,जर्दाळू,जर्दाळू बी,काजू,काळे तीळ,पांढरे तीळ,जवस,मेथी,मोहरी.

हा विडा बाळंतिणीस देण्यासाठी त्याचप्रमाणे अजीर्ण किंवा पोटदुखीवर अगदी रामबाण उपाय म्हणून दिला जातो. ही नवरात्र खास नऊ दिवस देवीला विडा जरूर ठेवा.