Ritbhatmarathi

Search
Close this search box.

हे करून तर पहा, आयुष्य सोपे वाटेल …

Motivational Articles: आयुष्य जगत असताना निर्णय चुकतात आणि त्यामुळे मनाची अवस्था काय होते, आणि आपण किती नैराश्यात जातो हे मी पूर्वीच्या लेखात सांगितले आहे.
माझ्या या लेखावर काही जणांनी प्रश्न केले की असे घडल्यावर काय करावे हे विस्तृत सांगा. म्हणून आज हा लेख.

खरतर हाच प्रश्न मलाही पडला होता, की आता काय करायचे ??
कारण प्रश्न तर सगळ्यांनाच पडतात, अडचणी असतात पण त्याची नेमकी आणि अचूक उत्तरे शोधणे आणि त्यानुसार अवलंब करणेच जास्त योग्य असते. त्यासाठी काय करावे तर –

  • आपण चुकलो आहोत हे सगळ्यात आधी मान्य करा. जगासमोर नव्हे तर स्वतःशी कबूल करा. एखादी गोष्ट घडून गेल्यानंतर त्यावर विचार करण्यात किंवा पश्चात्ताप करण्यात अर्थच नाही. त्यात आपली एनर्जी आणि वेळ वाया घालवण्यापेक्षा जे झालं आहे ते बदलता तर येणार नाही तर मग त्यावर उपाय काय, ती चूक कशी सुधारता येईल याचा विचार करा. पण हा विचार प्रमाणिक हवा, मनापासून हवा.
  • दुसरी गोष्ट म्हणजे आहे त्या परिस्थितीचा मनापासून स्वीकार करा. जे आहे ते असं आहे आणि असच राहणार हे मनाशी ठासून सांगा. परिस्थितीला बदलत बसण्यापेक्षा स्वतः मध्ये बदल करून परिस्थिती कशी बदलता येईल ते बघा. एकदा का मनाने सगळे स्वीकारले ना की मग गोष्टी सोप्या वाटायला लागतात.
  • तिसरे म्हणजे कोणाशीही कधीही तुलना करत बसू नका. कारण आपल्यालाना नेहमी दुसऱ्याची परिस्थिती आपल्या पेक्षा छान आणि उत्तम वाटत असते. आपला स्वभाव गुण असतो तो. मी याच्या जागी असते तर किती बरं झालं असतं किंवा काय नशीबवान आहे रे हा / ही ? असेच वाटत रहाते. पण नेहमी लक्षात ठेवा या जगात कोणीही कधीही पूर्णपने सुखी नसतोच.

जगी सर्व सुखी असा कोण आहे
विचारी मना तूची शोधूनी पाहे

या ओळी नेहमीच लक्षातच ठेवा. कारण ज्याच्या बद्दल आपण असा विचार करत असतो ना त्यालाही आपल्या बद्दल असेच वाटत असते.

खरंच आयुष्य किचकट असते का ??

  • इतरांना बदलण्याच्या भानगडीत कधीच पडू नका. आणि कोणाकडून कधी अपेक्षाही ठेवू नका. हे सांगणे खूप सोपे आहे पण आमलात आणणे तितकेच कठीण. आता तुम्ही म्हणाल की अपेक्षा तर असणारच ना?? आणि ही अपेक्षा पण आपल्याच माणसाकडून आपण करतो ना ? मग त्यात काय चुकीचे ?? नाही चुकीचे काहीच नाही मित्रानो. पण जेंव्हा या अपेक्षा पूर्ण होत नाहीत ना तेंव्हा त्याचा त्रास खूपच वेदनादायक असतो. अमुक एक व्यक्ती अशी कशी वागू शकते ?? माझ्या इच्छेला काहीच महत्त्व नाही का ?? इतकीही अपेक्षा पूर्ण होऊ नये का ?? असे अनेक नको नको ते प्रश्न डोक्यात नाचायला लागतात आणि हा जीवघेणा त्रास थांबता थांबत नाही. जो तो आपल्या मर्जीच मालक असतो. अमुक व्यक्ती माझ्या अपेक्षा पूर्ण करत नाही म्हणजे ती चांगली किंवा वाईट ठरत नाही. प्रत्येक नात्याला मोकळे सोडा. जर एखद्याल तुम्ही सांगितले की तू रोज माझ्यावर प्रेम केलेच पाहिजे तर तो करेल का ओ ?? तुम्ही मात्र तुमच्या जबाबदाऱ्या, कर्तव्य पूर्ण करत रहा.
  • मेंदूला सकारात्मक विचार करण्याची सवय लावा. अगदी ठरवून. सवय लागेपर्यंत कठीण जाईल पण एकदा का ही सवय लागली ना की मग आपला मेंदू वाईटातून पण चांगलेच शोधेल आणि आपण छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मिळवू शकू.
  • सगळ्या गोष्टींवर अगदी मनापासून भरभरून प्रेम करा. छंद जोपासा, पुस्तके वाचा, गाणी ऐका, फिरायला जा. निसर्गप्रेमी असाल तर निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवा. ती प्रत्येक गोष्ट करा ज्याने तुम्हाला आनंद मिळेल. तुमचा राग, तुमचा आनंद, तुमचे दुःख हे फक्त आणि फक्त तुमच्याच वागण्यावर अवलंबून असवें इतरांच्या नाही.
  • समोरची परिस्थिती कशीही असली तरी तुम्ही स्थितप्रज्ञ रहा, निश्चल रहा, नुट्रल रहा. कोणत्याही वेळी तुमच्या मनाची शांतता भंग व्हायला नको.
  • प्रत्येकाचे कोणते ना कोणते श्रद्धास्थान असते. त्या स्थानावर मनापासून सगळे सोपवून मोकळे व्हा. तूच माझा करता करविता, पालनहार. तू जे करशील ते मला मान्य आहे असे म्हणून फक्त त्याचे नाव घेत रहा.
  • आपल्या भाग्यविधात्याने जे आणि जितके दिले आहे त्यात समाधानी रहा. त्या विधात्यावर भार टाकून मोकळे व्हा.

-नेहमी आपल्या पेक्षा दुःखी आणि अडचणीत अडकलेल्या लोकांकडे बघा. म्हणजे आपले दुःख हलके होईल.

-बोला. जगात अशी कोणतीही समस्या नाही ज्यावर बोलून उत्तर मिळणार नाही. त्यामुळे संवाद साधणे खूप जास्त गरजेचे आहे. संवाद संपला की नाते संपते. त्यामुळे बोलत रहा, सुरुवातीला कदाचित टोमणे , कुचके काहीतरी ऐकावं लागलं तरी हरकत नाही पण बोलायचे सोडू नका.

मी जे काही सांगत आहे तसे वागणे कठीण आहे मान्य आहे मला. पण प्रयत्न करा अगदी जाणीवपूर्वक प्रयत्न करा. कोणतीही गोष्ट कधीच सोपी नसते, अडथळे तर येतातच पण म्हणून आपण प्रयत्न करणे सोडत नाही ना. तो तर करतोच करतो. मग स्वतःच्या सुखासाठी थोडे कष्ट घ्यायला काय हरकत आहे.

या गोष्टी साध्य करण्यासाठी रोज ध्यान करा, जप करा, मनाचा आतला आवाज ओळखायला शिका, स्वतःमधील चांगले वाईट गुण ओळख आणि त्यावर काम करा. रेकी शिकून घ्या, आपल्या शरीरातील चक्रे ॲक्टीव करून घ्या, गरज वाटत असेल तर समुपदेशन केंद्राची मदत घ्या.

आणि शेवटी आपली वृत्ती, वागणूक, विचार, नियती चांगली ठेवा. ईश्वर, देव नावाची गोष्ट या जगात होती, आहे आणि राहीलच. यात शंकाच बाळगू नका. त्या अलौकिक शक्तीवर विश्वास ठेवा आणि निश्चिंत रहा. सगळे छानच होईल.

==================

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *