Ritbhatmarathi

Search
Close this search box.

एअरपोर्टलाही मागे टाकतील ही रेल्वे स्टेशन्स | Most Beautiful Railway Station in India

Most Beautiful Railway Station in India : प्रवास म्हटलं की बस स्टँड, रेल्वेस्टेशन आणि विमानतळ अशा ठिकाणी जाणे आलेच. सर्वसामान्य लोक यातील रेल्वेमार्ग आवर्जून निवडतात. बऱ्याच लोकांची प्राथमिकता रेल्वेने प्रवास करण्यावरच असते. कारण बस पेक्षा रेल्वेप्रवास हा खूप सोयीचा आणि स्वस्त सुद्धा असतो. बसचे धक्के, बसची अनियमित वेळापत्रक, ऊनाचे चटके खाण्यापेक्षा आपण रेल्वेने आरामदायक, कमी वेळेत आणि कमी खर्चात हा प्रवास करू शकतो. रेल्वेचे वेळापत्रक हे अतिशय काटेकोर असते. म्हणूनच रेल्वेमार्गच निवडतात लोक.

रेल्वे स्टेशन म्हटलं की डोळ्यासमोर येते ती अस्वच्छत जिकडे तिकडे कागदांचे रॉपर्स, स्वच्छ्ता गृहांचा सहन न होणारा वास, सिगरेटच धूर आणि थुंकून पानांच्या किंवा तंबाखूच्या मारलेल्या पिचकाऱ्या.

कल्पना करूनच तोंड वाकडे होते ना ?? पण हे ऐकून आनंद होईल की आपल्या भारत देशात अशीही काही रेल्वेस्टेशन आहेत, ज्यांची स्वच्छत, टापटीप पाहून डोळे दिपून जातील.

आपल्या भारत देशाचे रेल्वे जाळे इतके मोठे आहे की, जगाच्या इतिहासात त्याचा चौथा नंबर लागतो. हे जाळे उत्तरेला काश्मीर पासून, दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत, पूर्वेला आगरतळा ते पश्चिमेला भुजपर्यंत पसरलेले आहे. हे जाळे १,१५,००० किमी ट्रॅक इतके आहे.

भारतात एकूण ८००० रेल्वे स्थानके आहेत. त्यावर धावणाऱ्या सुपरफास्ट एक्स्प्रेस ४५० असून देशातला एकूण ६५००० किमी भागाने एकमेकांना जोडण्याचे काम केले आहे.

भारतात पहिली रेल्वे धावली १५ एप्रिल १८५३ बोरीबंदर ते ठाणे दरम्यान. पहिली पेसेंजर धावली १५ ऑगस्ट १८५४ हावडा ते हुबळी दरम्यान. तेंव्हापासून ते आजपर्यंत भारतीय रेल्वे आपल्या कर्तृत्वाचे पुल रचतच आहे.

आपल्या देशात एकूण ११००० रेल्वे धावतात त्यातील ७००० पॅसेंजर आहेत.

बघुया त्यापैकी कोणती रेल्वेस्टेशन, जी भारतातील सुंदर रेल्वेस्टेशन म्हणून ओळखली जातात.


हे रेल्वेस्टेशन गुवाहाटीमधील दुसरे सगळ्यात मोठे स्थानक आहे. याचं बांधकाम आसाममधील प्रसिद्ध कामाख्या देवी मंदिरासारखे आहे. त्यामुळेच याचे नाव कामाख्या रेल्वेस्टेशन पडले.


या रेल्वेस्टेशनच्या नावातच याची विशेषता आहे. चाराबाग स्टेशन भोवती चारबाग आहेत. मुघल, अवधी आणि राजपूत संस्कृतीची झलक या स्टेशनच्या बांधकामात दिसून येते. स्टेशनच्या बांधकामाचा एरियल व्ह्यू पहिला तर बुद्धिबळाच्या पटासारखी रचना दिसून येते.


जगातील सगळ्यात मोठ्या लांबीचा प्लॅटफॉर्म या स्थानकात असून याची एकूण लांबी १.३५ किमी आहे. इतकेच नसून याची स्वच्छ्ता पाहून आपल्याला आश्चर्य वाटल्ाशिवाय राहणार नाही.


श्रीनगर स्थानकाचे लाकडी बांधकाम पाहून काश्मिरी शैलीची आठवण होते. काश्मीरमध्ये अक्रोडची झाडे आणि भोवती मजबूत बांधकाम आहेत. त्याचीच आठवण श्रीनगरच्या बांधकामाकडे पाहून होते. तेथील स्वच्छता पाहण्यासारखी आहे म्हणूनच सुंदर रेल्वेस्टेशन मध्ये याचा समावेश होतो.


हे स्टेशन म्हणजे आपल्या देशाच्या राजधानीचे सगळ्यात जुने स्टेशन. दिल्लीची लाल किल्ला ही ओळख दिसून यावी याकरता स्टेशनचे बांधकाम लाल दगडात केले आहे. जगातील सगळ्यात मोठे रुट रीलेच सिस्टीम इथेच आहे. इथे आल्यावर लाल किल्ल्यात असल्यासारखे वाटते.


या स्थानकाची निर्मिती तत्कालीन हैद्राबाद निजामाने केली. याचे बांधकाम गॉथिक पदधतीप्रमाणे केले आहे म्हणजेच इस्लामिक आणि ख्रिस्ती संस्कृतीचा मेळ यात दिसून येतो. मिनार आणि घुमट यांच्या मिलाफाने याच्या सौंदर्यात खूप भर पडते.


या स्टेशनकडे पाहिल्यावर गुजरात आणि कच्छच्या सांस्कृतिक वारसाचे दर्शन होते. स्वच्छ आणि सुंदर परिसर तर आहेच, शिवाय डोळ्यांना सुखावणारे फ्लोमिंगो पक्षी, विजय विलास महाल, कोटेश्वर मंदिर या चित्रांमुळे सुंदरतेत चार चाँद लागले आहेत.


हे रेल्वेस्थानक आधी सुंदर रेल्वे स्थानक मध्ये मोडत नव्हते. पण दोनशे महीलांच्या अथक मेहनतीमुळे हे स्थानक सुंदर स्थानकांच्या यादीत आले आहे. या स्थानकाच्या भिंती मधुबनी चित्रशैली मधील चित्रांनी सजवल्या आहेत, त्यामुळे याच्या सौंदर्यात भर पडली आहे.


किल्ल्यासारखे बांधकाम असलेले सुंदर बांधकाम कौशल्याचे उदाहरण म्हणजे हे कटक स्टेशन. हे बांधकाम इतके सुंदर आहे की जगातल्या अनेक रेल्वेस्थानकाच्या बांधकामा मागे या स्थानकाचे प्रतिबिंब पाहण्यात येते.


हे स्टेशन उत्तर भारतातील रेल्वेकेंद्र म्हणून ओळखले जाते. उत्तर भारतातील अनेक मंदिरे पाहण्यासाठी याच स्थानकात उतरावे लागते म्हणून गमतीने याला देशातलं सगळ्यात पवित्र स्टेशन म्हणतात.

हालक्ष्मी मंदिर कोल्हापूर माहिती व इतिहास


जगातील दुसरे सगळ्यात लांब प्लॅटफॉर्म इथेच आहे. याची लांबी १.१ किमी असून गोरखपुर नंतर दुसरा मोठा प्लॅटफॉर्म असलेले हे स्थानक आहे. त्रावणकोरचे महाराज श्री मुलाम तुरूनाल रजावर्मा यांनी १९०४ मध्ये याची निर्मिती केली. दक्षिण भारतातील जुन्या स्थानकात याचा समावेश होतो.


आगरतळा ही स्वतंत्र भारताची पहिली अशी राजधानी आहे जी रेल्वेच्या संपर्कात सगळ्यात आधी आली. त्रिपुरचा इतिहास दाखवणाऱ्या उजयांता पॅलेससारखे हुबेहूब स्टेशनचे बांधकाम करण्यात आले आहे.


ऐतिहासिक, सगळ्यात जुने, युनेस्को हेरिटेज असलेलं महाराष्ट्रातील मोठे रेल्वे स्टेशन. या ठिकाणी उपनगरीय रेल्वे वाहतूक आणि लांब पल्ल्याची वाहतूक या दोन्हींचा समतोल येथे ठेवला जातो. तसेच येथील नीटनेटकेपणा जपण्यात आला आहे.


हे देशातील सगळ्यात मोठे आणि जुने स्टेशन म्हणून प्रसिद्ध आहे. देशातलं सगळ्यात जास्त म्हणजे २३ प्लॅटफॉर्म असण्याचे रेकॉर्ड हावडा रेल्वेस्टेशन होल्ड करत आहे.


इथे स्टेशन जवळच जगप्रसिद्ध ताडोबा अभयारण्य असल्याने ताडोबातील जैवविविधता आणि स्थानिक लोककला दर्शवणारी चित्र रेखाटण्यात आली आहेत. तसेच अनेक मूर्तींची चित्रे पण आहेत. ही स्टेशन्स स्वच्छ आणि सुंदर आहेत.

जाणून घ्या त्र्यंबकेश्वरला गंगा नदीचा उगम कसा झाला?

खंडेरायाची दंतकथा


देवी मिनक्षीच्या लग्नातील प्रसंग इथे चीतरण्यात आले आहेत. शिवाय स्टेशनच्या भिंती मनमोहक चित्रांनी रंगवण्यात आल्या आहेत. जगप्रसिद्ध मीनाक्षी मंदिर असलेल्या मदुराईचा स्वच्छतेच्या बाबतीत अव्वल क्रमांक लागतो.


येथील स्थानकाची प्रवेशद्वारे, प्रतिक्षालाय आणि प्लॅटफॉर्मच्या भिंती विशेष चित्रशैलीत रंगवलेल्या आहेत. ही चित्रे चेरियाल स्कॉल चित्रशैलीत काढण्यात आली आहेत. या स्थानकाला ग्रीन रेल्वे स्टेशन हा मान मिळाला आहे.


या स्थानकांवर राजस्थानच्या राजेशाही जीवनशैलीवर आधारित चित्र रेखाटण्यात आली आहेत. त्यात राजा महाराजांकडून केली जाणारी शिकार, राजमहालात रंगणाऱ्या संगीत मैफिली , न्यायदान प्रसंग दाखवणारी चित्रे रेखाटण्यात आली आहेत. ही चित्रशैली कोटाबुंदी चित्रशैलीमधील आहे. त्यामुळे राजस्थानातील कोटाचा सुंदर स्टेशन मध्ये उल्लेख केला जातो.


हे देशातलं आणि बंगाल मधील एक जुने आणि दमदार स्टेशन आहे. इथे जगातील तिसरा मोठा प्लॅटफॉर्म होता २०१३ पर्यंत ज्याची लांबी १०७२ मीटर होती. नंतर गोरखपुर स्टेशनाने तो विक्रम मोडला.


या रेल्वेस्टेशनची लांब, निमुळती आणि तीन मजली इमारत हे याचे वैशिष्ठ्य आहे. भोपाळमध्ये असलेले हे एक सुंदर स्थानक आहे.


या स्थानकाची ब्रिटिश बांधकामशैली आणि गॉथिकरीवायवल पद्धतीने केलेले बांधकाम ही त्याची विशेषता आहे. यातून पाश्चिमात्य बांधकामशैली दिसून येते. याचे अधिकृत नाव आहे पूरातची थलेवर डॉ. एम.जी रामचंद्रन सेंट्रल रेल्वे स्टेशन. नंतर ते चेन्नई सेंट्रल स्थानक ठेवण्यात आले. देशातलं सगळ्यात मोठे नाव असलेले हे स्टेशन आहे. तसेच जागतिक हेरिटेज म्हणून दर्जा मिळालेले स्थानक आहे.

तर ही आपल्या भारतातील सुंदर आणि स्वच्छ रेल्वेस्टेशन आहेत. नक्की भेट द्या.

===============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *