Ritbhatmarathi

Search
Close this search box.

“ए थांब!”

“थांब नाहीतर गोळी घालीन…”

मी त्या जंगलात काही दिवसांसाठी राहायला आलो होतो,काही दिवसांचा आधी इथे मस्त फार्म हाऊस विकत घेतला होता.. मुंबई चा रहदारीचा जीवना पासून दूर इथे निसर्गाचा सानिध्यात खूप छान वाटत होत.मुंबईचा कामाचा व्याप आणि ताण सर्वकाही बाजूला ठेवून काही क्षण आनंदाने घालवण्यासाठी मी इथे आलोय.अगदी स्वस्तात मला हा फार्म हाऊस मिळाला…मी,माझी बायको आणि माझा सात वर्षाचा मुलगा इथे एकांतात काही दिवस घालविण्यासाठी आलोय..

माझा फार्म हाऊसला लागूनच खूप मोठ घनदाट जंगल आहे..अगदी दिवसा पण कोणीही आत जायला घाबरेल एवढं घनदाट जंगल. आमचा फार्म हाऊस पासून लांब पर्यंत लोकवस्ती नाहीये,चांगलच आहे ना,कोणाचा कसला त्रास नाही होणार,पण हो गरज पडली तर कोणाची मदत पण नाही मिळणार.. 

या फार्म हाऊसच एक गुपित आहे.ते म्हणजे याला असलेला तळमजला..एका नजरेत लक्षात येणार नाही असा त्याला दरवाजा आहे..खाली जमिनीवर लावलेल्या नक्षीदार फरशा आहेत..त्यातील एक काळी फरशी..त्याला एका बाजूने खाच आहे..त्यात बोटाने दाबलं की आपोआप फरशी एका बाजूने उचलली जाते मग फरशीला पकडून उचलायच.. मग तिथून खाली जाणार्‍या लाकडी पायर्‍या होत्या.. एक माणूस आरामात उभा राहिलं एवढी ऊंची होती…मी आल्या पासून एकदाच तिथे गेलो होतो..तिथे जुन्या मालकाचा काही वस्तु पडल्या होत्या.. तशा काही महत्वाचा नव्हत्या पण त्यात एक कुर्‍हाड होती..समजा आपल्याला काही लपवून ठेवायचं असेल तर आरामात लपवून ठेवता येईल अशी गुप्त जागा होती ती.. .माझा मुलगा आणि बायको खूप खुश होते इथे आल्या पासून,ती काहीशी घाबरायची पण आता तिला छान वाटत होत. 

मी आज शिकार करायला बाहेर पडलोय.आता शिकार म्हणजे वाघाचीच करायची अस काही नसतं.पण नक्की कशाची शिकार करायची हे अजून तरी नाही ठरवलं.कस ठरवणार?समोर जे येईल त्याची करायची.तर मग मी बंदूक घेऊन निघालो..हो आहे माझा कडे खरीखुरी दोन नाळी बंदूक..तर मी ती घेऊन निघालो,त्या घनदाट जंगलातून वाट काढत मी निघालो.सगळीकडे गर्द झाडी होती..भर दुपार असूनही सूर्याची किरणे जमिनीवर पोहोचत नव्हती एवढं घनदाट जंगल होतं..पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता..सरडे,खारी माझा पावलांचा आवाजाने उगीचच वर खाली धावपळ करत होते..पण मी शिकार करावी असा एकही प्राणी मला दिसत नव्हता.. मी चालता चालता बराच आत आलो होतो.. अचानक सगळीकडे अजून जास्त अंधार होवू लागला अंधार म्हणजे अगदीच अंधार नाही..संध्याकाळी पडतो ना तसा अंधार..मला थोड्याच वेळात लक्षात आलं की आकाशात काळे ढग दाटून आलेत..  

मी घरी जायचं ठरवलं,पानांचा वर पडणार्‍या टपोर्‍या थेंबांचा आवाज येऊ लागला..मी अंदाज बांधला खूप मोठा पाऊस येणार.. मी निघणार इतक्यात मला एक भयंकर दृश्य दिसलं.. एक माझाच वयाचा माणूस हातात धारदार कुर्‍हाड घेऊन उभा होता..समोर एक काळी साडी घातलेली बाई होती..जी गुडघ्यावर बसली होती..तिचे केस पूर्ण मोकळे सोडलेले होते..त्या मोकळ्या केसांचा मुळे तिचा चेहरा झाकला गेलेला होता… 

मी त्याला आवाज दिला 

“ए थांब!” 

पण त्याने लक्ष नाही दिलं..त्याचे डोळे लाल भडक होते..पावसाचा जोर वाढला होता.. त्याने हळूहळू कुर्‍हाड वर उचलली..

“थांब नाहीतर गोळी घालीन..” मी शेवटचा इशारा दिला… पण माझे शब्द जणू त्याला ऐकू जात नव्हते.. तो पूर्ण वेगाने कुर्‍हाड तिचा माने चा दिशेने आणू लागला मग मी नाईलाजाने गोळी चालवली जी त्याचा छातीवर जाऊन लागली. तो तसाच मागे कोसळला.. 

मी तर एखाद्या प्राण्याची शिकार करायला आलो होतो पण माझा हातून एका माणसाचा खून झाला होता पण माझा समोर तरी कुठे पर्याय होता?मी त्याला नसतं मारल तर त्याने तिला मारल असतं. 

मी जवळ गेलो..तो अजूनही जीवंत होता.माझा कडे पाहत होतं. मी त्या बाई चा खांद्याला पकडून उभं केलं..पाऊस जोरात कोसळत होता..बिचारी थरथर कापत होती..थंडीने की भीतीने..?? माहित नाही.. ती उभी राहिल्या नंतर मी तिला घेऊन चालू लागलो.. ती पुढे चालत होती आणि मी मागे.. मी तिच्या शरीराकडे पाहतच राहिलो.. पावसाने भिजून तिची साडी पूर्ण शरीराला चिकटलेली होती..त्यात तीच यौवन ठळकपणे दिसत होत.. पंचविशीची असेल ती..अंगाने पूर्ण भरलेली…थोडीशी उंच,छातीचा तो उभार..अर्धी उघडी पाठ.. खाली कमर निमुळती होत गेलेली आणि मग पुन्हा कर्व घेऊन वाढत जाणारे तिचे नितंब… मागून तीच ते मादक मांसल शरीर..काळ्या साडी मधून तीच एकदम गोरं शरीर स्पष्ट दिसत होत..चालताना तिचा शरीराची लयबद्ध हालचाल होत होती… काय सांगू.. मी तिला पाहूनच धुंद झालो.. 

“तुझ नाव काय?” मी विचारलं.. 

तिने वळून मागे पाहिलं. आणि बोलली …”मोहिनी”.

तिचा चेहर्‍यावर हास्याची एक लकेर होती..कदाचित सुटकेच हास्य…तिचे गुलाबी ओठ आणि त्यावर पाण्याचे काही थेंब…चेहर्‍यावर अजूनही केसांचा पहारा होता..पण मी पण तिला थोडसं हसताना पाहून सुखावलो…त्या माणसाला तिथेच मरताना सोडून मी तिला घेऊन घरी आलो.. दारात बायको होती.. मुलगा आत खोलीत होता.. तिला पाहताच ती पण स्तब्ध झाली.. मी तिला घडलेली सर्व हकीकत सांगितली.. तिला पण तिची दया आली.. ती तिची विचारपूस करू लागली..ती खुर्ची वर मान खाली घालून बसली होती..पण ती एका शब्दाने देखील काहीच बोलली नाही.. मोहिनीचे ओले केस अजूनही चेहर्‍यावर तसेच होते..त्यातून एक एक थेंब पाणी खाली पडत होतं..तिला बायको ने जेवायला वाढल पण तिने काहीच खाल्लं नाही.. कदाचित भीतीने.. पण ती माझा कडे सुरक्षित होती.. पण काहीच बोलत नव्हती..बरेच प्रश्न विचारायचे होते तिला .. तो माणूस कोण होता?नवरा होता का तिचा?तिला का मारत होता? पण कदाचित ती अजूनही सावरली नव्हती म्हणून आम्ही तिला काहीही न विचारण्याच ठरवलं.. 

मी रोज रात्री काही पेग घेतल्या शिवाय झोपत नाही.. बायको मुलाचा सोबत आतल्या रूम मध्ये झोपली होती..त्या बाईची व्यवस्था आम्ही दुसर्‍या रूम मध्ये केली..मी हॉल मध्ये बसून एक एक घोट वाईन पीत होतो..बाहेर जोरात पाऊस पडत होता आणि माझा नजरे समोर सतत मोहिनीचे ते गच्च शरीर येत होत..तिचा शरीराचा भाग जो मी नजरेत साठवला होता..तो मी पुन्हा पुन्हा आठवत होतो…तिचा मादक शरीरा समोर ही वाईन अगदीच फिकी वाटत होती..

अचानक मागून कसला तरी आवाज आला मी पाहिलं तर मोहिनी तिचा रूम चा दारात उभी होती..अगदी तशीच काळ्या साडी मध्ये चेहर्‍यावर केस सोडून… एक जोरात वीज कडाडली.. त्याचा काही क्षण प्रकाश पडला.. त्या क्षणात तिने खांद्यावरील साडी चा पदर काढून खाली सोडला..हे पाहून माझा वर जणू वीज कोसळली…ती हळुवार पावलांनी आत गेली.. दरवाजा तसाच उघडा ठेवून.. मी एका घोट मध्ये पूर्ण ग्लास रिकामा केला आणि झटकन तिचा मागे मागे आत गेलो आणि दार लावून टाकलं… 

मोहिनी बेडवर बसली होती.. मी तिचा जवळ जाऊ लागलो..तिचे गरम श्वास मला जाणवत होते इतक्या जवळ गेलो..मी तिला मिठीत घेणार इतक्यात तीच माझावर तुटून पडली..अगदी अधाशा सारखी..तिचा गुलाबी ओठांनी चुंबनांचा वर्षाव करू लगाई..नजरेत साठवलेल्या प्रत्येक भागावरुन मनसोक्त हात फिरवत होतो..मग आम्ही दोघे प्रणयात बुडालो…ती प्रणय कलेत निपुण होती..यात एवढं सुख असत ते मला त्या रात्री जाणवलं..मी प्रत्येक क्षणात आनंद अनुभवत होतो…नाहीतरी बायको नुसती पडून राहायची..ना कसली साद ना कसला प्रतिसाद…आज चा सारखा आनंद कधीच मिळाला नव्हता.आम्ही दोघे सुखाचा परमोच्च बिंदू पर्यंत पोहचलो.. मग एकमेकांचा पासून बाजूला होवून मोठमोठ्याने श्वास घेऊन लागलो… मी तृप्त झालो होतो मी तिचाकडे पाहिलं तर तिचा पण चेहर्‍यावर हास्याची लकेर होती.. कदाचित तृप्तीच हास्य..

माझ लक्ष दारात गेल तर तिथे माझी बायको उभी होती.. तिचा डोळ्यातील राग स्पष्ट दिसत होता..ती तशीच तिथून निघून गेली…  मी स्वतःला सावरत उठून उभा राहिलो.. मोहिनी कडे पाहिलं तर तिचा चेहर्‍यावर कोणतेच भाव नव्हते.मी पळत तिचा मागे जाऊ लागलो.. 

“अग थांब.. माझ ऐक…” 

ती आत गेली हातात बॅग आणि अर्धवट झोपेतील माझा मुलाला घेऊन बाहेर आली.. 

मी तिला अडवण्याचा प्रयत्न करत होतो पण ती माझ काहीही न ऐकता डोळे पुसत कार मध्ये बसली आणि कार चालवत निघून गेली… बाहेर अजूनही पाऊस चालू होता.. मी जाणार्‍या कार कडे फक्त पाहत राहिलो.. ती कार घेऊन गेल्याने मला पण खूप त्रास होणार होता कारण माझाकडे दुसर कोणतही वाहन नव्हतं..

मी वळलो..मोहिनी दारात उभी होती..अगदी जस मी बेडरूम मध्ये सोडून आलो होतो तस..नैसर्गिक अवस्थेत…निर्वस्त्र …चेहर्‍यावर हास्याची लकेर होती.. कदाचित एकांताची..माझा मेंदू वर पुन्हा तिची नशा चढू लागली आणि मी तिचा मागेमागे जाऊ लागलो… 

दिवसा मागून दिवस जात होते.. ती माझा साठी जेवन बनवायची.. पण स्वत: मात्र काही खात नसायची.. काहीच बोलायची नाही.. कायम अंगावर ती काळी साडी असायची.. आणि इतर वेळी आम्ही प्रणयात व्यस्त होवून जायचो.. त्यानंतर मला अगदी गाढ झोप लागायची..थकव्याची झोप..सुखाची झोप… बर्‍याच वेळा मी झोपेतून उठल्यावर ती मला दिसायची नाही..मी कावरा बावरा होवून तिला शोधायचो..ती दिसली की मी पळत जाऊन तिला मिठी मारायचो… तिचा चेहर्‍यावर हास्याची लकेर असायची… कदाचित आनंदाची…मी झोपल्या नंतर ती कुठे जास्त असेल का?ती आहे तरी कोण.? काहीच का खात नव्हती?तो माणूस कोण होता?ती एवढी मादक का आहे..? पण माझी इच्छा असूनही मी कोणताही प्रश्न तिला विचारत नव्हतो.. अस का होत होतं?? 

मला बायको सोडून गेल्याच काहीच का दू:ख वाटत नव्हतं? उलट अजून एकांत मिळाल्याचा आनंद वाटत होता.. दोन आठवडे होवून गेले होते… माझावर एक वेगळीच धुंदी चढली होती तिची.. जस दारू पिल्यानंतर होत तस  म्हणजे सगळं कळत होत पण काहीच वळत नव्हतं..स्वत:च स्वत:वर ताबा नव्हता.. जणू मी एका गाडी चा मागे बसलोय आणि ड्रायव्हिंग सीटवर ती बसलीय…मोहिनी.. आणि मला हव तिथे घेऊन जात होती.. पण मला तो प्रवास आवडत होता तिचा सहवास आवडत होता… 

पण त्या रात्री भलतच घडलं… दारावर थापे चा आवाज आला.. मी दार उघडले.. समोर चार-पाच लोक उभे होते.. 

“काय हवय..??” मी विचारलं.. 

“आम्ही जवळचाच वस्तीवर राहतो.. आमचा वस्ती वरची दोन लहान पोर गायब झाल्यात.. एक दहा दिवसा पूर्वी आणि एक आज सकाळी.. तुम्ही पाहिलय का त्यांना..??” 

“नाही..इथे कोणीच नाही आल..” मी बोललो.. 

तोंड पाडून..नाराज होवून ती लोकं तिथून निघून गेली.. 

मी दार लावलं आणि आत आलो.. मोहिनी आत किचन मध्ये होती.. अचानक मला ऊं..ऊं चा आवाज आला.. आवाज कुठून येत होता काही समजत नव्हतं.. मग माझं लक्ष खाली जमिनीवर गेल… तो तळघराचा दरवाजा…मी त्यावर कान लावला.. आवाज तिथूनच येत होता.. मी दरवाजा उघडणार इतक्यात त्यावर मोहिनी येऊन उभी राहिली.. माझा समोर तिचे पाय होते… ती हळूहळू साडी वर करू लागली.. मीही त्यासोबत तिचा गोर्‍या पायांचा वरुन हात फिरवत उठू लागलो… ती चालत बेडरूम कडे निघाली.. आणि मी तिचा मागे मागे.. त्या रात्रीचा प्रणया नंतर पण गाढ झोप लागली.पण कस कोणास ठाऊक त्या रात्री जाग आली… कानावर कसल्या तरी गुरगुरण्याचा आणि तोंडाचा चप-चप आवाज येत होता.. जणू एखादा जंगली प्राणी काहीतरी खात असावा… 

मी आवाजाचा दिशेने जाऊ लागलो..आवाज तिथूनच येत होता..तळघरातून… मला थोड्या वेळा पूर्वीची घटना आठवली.. मी पटकन तो दरवाजा उघडला,एक कुजका घाण वास नाकात शिरला..पायर्‍या वरुन खाली आलो,मी आवाजाचा दिशेने पाहिलं आणि  समोरील दृश्य पाहून नख-शिखांत हादरलो.. 

समोर मोहिनी बसली होती..तिचा मांडीवर एक चार-पाच वर्षाच मूल होत,तिने आधीच त्या लहान मुलाचा मानेचा लचका तोडला होता.. त्यातून खूप रक्तस्त्राव झाला होता आणि तो मुलगा निष्प्राण होवून पडला होता.. तिथेच बाजूला अजून एक लहान मुलाचा हाडांचे तुकडे पडलेले होते.. त्या हाडांना अजूनही काही ठिकाणी मांस चिकटलेले होत जे आता पूर्ण सडलेले होत..तिने माझाकडे पाहिले.. तिचा चेहरा रक्ताने माखलेला होता..तिचे दात रक्त-मांसाने लाल झाले होते.. तिने माझाकडे पाहिलं तिचा चेहर्‍यावर हास्याची लकेर होती.. कदाचित कुत्सित हास्य…

माझा तोंडातून शब्द फुटत नव्हता.. मी तिथेच कोसळलो… सकाळी जेंव्हा जाग आली तेंव्हा ती मला बिलगून झोपली होती.. रोजचा सारखं.. मग मी रात्री पाहिलं ते..??ते स्वप्न होत का?? की सत्य होत.. काहीच समजत नव्हतं.. मी तिच्याकडे पाहिलं..तिचा चेहरा निरागस वाटत होता पण अचानक तिचा तो रात्री पाहिलेला रक्ताने माखलेला चेहरा आठवला आणि मी झटकन उठून बाजूला झालो… 

मी बाहेर आलो.. काय सत्य काय भास काहीच समजत नव्हतं…. मी कपाटातून बाटली काढली पटापट ग्लास मध्ये ओतली आणि एक कडवट घोट डोळे गच्च बंद करून घश्या खाली उतरवला…त्यानंतर अजून एक…अजून एक..बघता बघता बाटली रिकामी झाली.. पण नजरे समोर अजूनही त्या लहान मुलाचा लचका तोडणारी मोहिनी दिसत होती… मग माझी नजर तळघराचा दरवाजा कडे गेली.. मी पुन्हा त्यात आत जायचं ठरवलं.. मी तो दरवाजा उघडला.. पुन्हा तोच घाण वास आला जो मी रात्री अनुभवला होता.. मी हळूहळू एक एक पायरी उतरू लागलो.. काय पाहायला मिळणार याची आधीच कल्पना आली होतीच पण तस काही दिसू नये म्हणून मी प्रार्थना करत खाली उतरलो.. 

पण समोर हाडांचे सांगाडेच होते.. पण एक नव्हे दोन.. कारण रात्रीचा त्या मुलाला त्या मोहिनीने खाऊन संपवल होत.. मी मागे वळलो तर काही इंचावर ती उभी..चेहरा अर्धवट केसांनी झाकलेला आणि चेहर्‍यावर तीच हास्याची लकेर.. कदाचित पकडले जाऊन पण तिला काहीच फरक पडत नसल्याचं हास्य…..मी दचकून दोन पावले मागे सरकलो.. तीच ते हास्य आता भयानक वाटत होत.. तिची मला किळस वाटू लागली.. 

“कोण आहेस तू..?? बाई की मूल खाणारी हडळ.??चेटकीण की राक्षसिण ?? “मी ओरडून ओरडून तिला विचारत होतो.. 

पण तिचा चेहर्‍यावर कोणतेच भाव नव्हते ती चेहर्‍यावर हास्याची लकेर तशीच ठेवत बोलली.. 

“मोहिनी…” 

माझा डोक्यात आता राग शिरला होता.. तिचा सौंदर्याची नशा आता पूर्ण उतरली होती.. मी इकडे तिकडे पाहिलं तर जवळच एक धारदार कुर्‍हाड पडली होती.. ती मी उचलली.. आणि तिचा त्या काळ्या लांबसडक केसांना धरून तिला ओढत घेऊन जाऊ लागलो.. तिच्या तोंडून कसलेच शब्द निघत नव्हते… मी तिला बराच वेळ असच ओढत आत जंगलात घेऊन गेलो…आत दाट जंगलात गेल्या नंतर मी तिचे केस सोडले.. ती माझा समोर गुडघ्यावर बसली होती.. तिचा चेहरा केसांनी झाकला गेला होता.. अचानक सगळीकडे अंधार पडू लागला होता.. आकाशात काळे ढग जमा झाले आणि पानांवर पडणार्‍या टपोर्‍या थेंबांचा आवाज वाढू लागला आणि मुसळधार पाऊस सुरू झाला.. 

पण मला कसलच भान नव्हतं.. आत  बस हातातील कुर्‍हाडीने या नरभक्षक बाई च मुंडक धडा वेगळं करायचं होत… 

“ए थांब..!”

माझा कानावर शब्द पडले… पण मला तिकडे लक्ष द्यायचं नव्हतं.. मी रागाने तिच्याकडे पाहत होतो..तिचा जीव घ्यायचा होता…लहान मुलांना खाणार्‍या या बाई ला जगायचा अधिकारच नाही… पावसाचा जोर वाढत होता..मी कुर्‍हाड चालवण्या साठी हात पूर्ण मागे घेतला… 

“ए थांब नाहीतर गोळी घालीन…” पुन्हा काही शब्द कानावर पडले… पण मी तिकडे दुर्लक्ष करत पूर्ण वेगाने कुर्‍हाड चालवली पण…. पण इतक्यात एक बंदुकीची गोळी येऊन माझा छातीवर लागली आणि मी मागे कोसळलो.. 

कोणीतरी जवळ येऊन मला पाहत होत..मग त्याने खांद्याला धरून तिला उभ केल.. ति पुढे चालत होती आणि तो तिचा मागे…  मी त्याला त्या बाई बद्दल सावध करणार होतो पण माझा  तोंडातून शब्द फुटत नव्हता आणि त्याचही पूर्ण लक्ष तिच्या भिजलेल्या गच्च देहाकडे होत.. तिला तर आता नवीन सावज भेटला होता.. 

“तुझ नाव काय..?”त्याने विचारलं. 

तिने वळून पाहिलं..तिची नजर माझावर होती.. चेहर्‍यावर हास्याची लकेर होती..कदाचित मला हिणवणार हास्य…पण त्या बिचार्‍याला वाटलं ति त्यालाच पाहून हसतेय.. अगदी जस मला वाटलं होत पहिल्यांदा.. 

हास्याची लकेर तशीच ठेवत ति बोलली…..”मोहिनी…” 

समाप्त.. 

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *