Ritbhatmarathi

Search
Close this search box.

राणी एका मध्यमवर्गीय घरातली मुलगी. गावाकडे शिकायची उत्तम सोय नसल्याने ती आपल्या मामा मामींकडेच पुण्याला होती शिकायला. मामा मामींनाही मुलबाळ नसल्याने राणीला फार जीव लावत. मामींमध्ये आणि राणीमध्ये तर फार जबरदस्त केमिस्ट्री होती. 

बरेच दिवस झाले होते कुठे बाहेर निघणं नाही म्हणून मामींना फिरायला जायची ओढ लागली होती. तशीही मामी फार जिंदादिल होती. फिरायला जायची तिला फार हौस. पण मामांना कामामुळे अजिबात वेळ मिळत नव्हता. म्हणून मामांनी राणी आणि मामींना संमती दिली, 

मामा – मला काही टाईम नाही फिरायला जायला. असं करा तुम्ही दोघी जाऊन या. कुठे जायचं तेवढं ठरवा मी हॉटेलची तिकिटं बुक करतो आणि ड्राईव्हर ला सांगतो तुम्हाला सोडायला.  

मामाची सहमती मिळताच मग राणीने आणि तिच्या गलेलठ्ठ मामीने प्रवासाचा बेत आखला.. 

मामी  – कुठे जाऊया राणूबाई…? 

मामींना लय फिरायची हौस हो. त्यांना कुठे जवळपास जायचं नव्हतं. मग चर्चा करता करता जास्त दूरही नाही आणि फार काही जवळ पण नाही असं “कूर्ग” डेस्टिनेशन त्यांनी फायनल केलं. 

राणी  – वाह मामी काय प्लॅन बनवलाय तुम्ही..वाह…फारच छान..! 

मामी  – हम्म…पण चार दिवस लागतील हा जायला…आमच्या  नणंदबाईंना सांग मात्र पूर्ण चार दिवस लागतील असं.. 

राणी  – हम्म..मी आत्ताच्या आत्ता फोन करून सांगते…आणि हो आई कितीही नाही म्हटली तरी मी येणार..

      असं म्हणून राणी लागलीच फोन करते आणि आपल्या आईची परवानगी घेऊनच येते. 

राणी – मामी…म्हटलं होतं न तुला..मी येणार म्हणजे येणारच..! 

मामी – बरं…काळजी मिटली..मामांनी हॉटेलही ऑनलाइन बुक केलंय….आणि ड्राईव्हर काका येतीलच आपल्याला सोडायला…. 

दोन दिवसांनी…दोघीही कूर्गला पोहचतात आणि रूम बुक करायला जातात तसं तिथल्या मॅनेजरशी त्यांचं बोलणं होतं. 

मामी  – साहेब..यहा पे रूम बुक केलं है हमने  [मामीच हिंदी खूपच भयानक असतं] 

मामींना फिरायची लय हौस हो न त्यातही त्यांना निसर्ग सानिध्यात राहायची लय हौस….म्हणून मामींनी मॅनेजरला खडसावून सांगितलं, 

हमको उपर के माले पे चाहिये हा रूम” 

मॅनेजर – सातवे मंजिल कि रूम खाली है…आपको चलेगी..? 

मामी  – चलेगी क्या ? दौडेगी…! 

 मग लिफ्टने दोघीही आपल्या बुक केलेल्या रूमवर गेल्या आणि आपलं सामान ठेऊन आणि फ्रेश होऊन दोघीही फिरायला बाहेर पडल्या… फिरून दमून-भागून आपल्या रूमवर आल्या तेव्हा लिफ्ट बिघडली असल्याचे दोघीना कळले…तेवढ्यात मॅनेजर तिथे आला आणि घडलेला प्रकार त्याला कळाला. 

मॅनेजर  मामींकडे बघून – मॅम..ये लिफ्ट बिगड गयी है..आप कहे तो आप दोनो की सोने की व्यवस्था आज यही नीचे भी हो सकती है..! 

मामी  – नहीं ….नहीं …हम सीडीयों से चले जाते है..उतनाच मेरा वजन कम होएगा..! 

राणी  – मामी…अगं खालीच सोय करतोय असं म्हटले आहेत ते…तर झोपूया की खालीच…आणि तुला जिन्याने वर जाणं होणार आहे का…दमछाक होईल तुझी… 

मामी – एक आयडिया करू… 

राणी – आता काय..? 

मामी – जिन्याने चढायला बराच वेळ लागेल…कंटाळा येईल ना…मग पहिले पाच मजले मी ना…तुला गाणी ऐकवेल आणि पुढचे दोन मजले तू मला गोष्ट सांग…ठीक आहे.. 

राणी – ठीक आहे…[मॅनेजर तिथेच ऐकत असतो दोघींची बोलणी]

 मामी – ए…तुम क्या सून रहा है…हमारी बात…चलो..धन्यवाद..! 

राणी – मामी ऐकवतेस ना मग…गाणं.. 

मामी – हो ..हो….हूऊउ..बिडी जालॆले….जिगर से पिया…जिगरमा बडी आग है….[पहिला मजला जातो] 

कजरा रे…कजरा…रे…मेरे काळे काळे डोळे [दुसरा,तिसरा मजला जातो ] 

राणी जांभई देत – मामी..अगं नीट म्हण की गाणं… 

मामी – थांब गं तू…तुझे मामा मला गाणी म्हणून देत नाही इथे चान्स भेटलाय…तर तू ..शीला…शीला की जवानी… 

 राणी कानात कापसाचे बोळे टाकते आणि तोपर्यंत दोघीही नवव्या मजल्यापर्यंत येऊन थांबतात..मामींच्या गाण्यांच्या नादात दोघीही २ मजले एक्सट्रा चढल्याचं भानच राहत नाही त्यांना.. 

पण राणीच्या डोक्यात मात्र पटकेस ट्यूब पेटते. 

मामी  – चला राणी सरकार…आता तुमची बारी…सांगा मग गोष्ट एखादी…एक नाही हा…दोन गोष्टी ठरल्यात आपल्या. 

राणी  – म्हणजे काय ? सांगावीच लागणार मला गोष्ट नाही सांगितली तर कसं होईल आपलं..नाहीतर इथे बाहेरच झोपावं लागेल आपल्याला. 

मामी – म्हणजे..ते जाऊ दे…तू गोष्ट सांग.. 

राणी – मी दोन छोट्या आणि खूप कंटाळवाण्या गोष्ट सांगणार आहे तुला…ऐकायची तयारी ठेव.. 

मामी – सांग की खूप वेळ लागेल का सांगायला…अगं सांग बिनधास्त…दोन मजले बाकी आहेत अजून…ऐकेल मी.. 

राणी  – वेळ नाही लागणार ग…फक्त दहा सेकंदाची गोष्ट आहे… 

मामी  – अरे वाह..खरंच सांग की मग.. 

राणी  – पहिली गोष्ट अशी की..तुझ्या गाण्यांच्या नादात आपण २ मजले जास्त चढलो….आपण सध्या नवव्या मजल्यावर आहोत…. आणि दुसरी गोष्ट अशी कि म ला इतक्यात आठवलं आपण खाली रिसेप्शन कडून खोलीची चावी आणायची विसरलोय.. 

तशी मामी डोक्याला हात लावून खाली तिथेच बसते, “अरे….बाप रे….एक काम दोनदा आणि ताकात पाणी तिनदा…!

================

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories