Ritbhatmarathi

Search
Close this search box.

रेणूचं लग्न होऊन २ दिवसच झाले होते. लग्नानंतरचे सगळे सोपस्कार उरकले होते. सगळे पाहुणेही आपापल्या घरी निघून गेले. होते लग्नाला आज २ दिवस झाले होते तरी तिच्यात आणि सुभाषमध्ये (रेणूचा नवरा) खूप कमी संभाषण झाले होते. रेणूला वाटलं कि नवीन लग्न झालं आहे आणि एवढे सगळे पाहुणे म्हणून सुभाष काही बोलला नसेल, पण आज रेणू आपल्या माहेरी जाणार होती पाठवणी साठी. तिचा भाऊ तिला न्यायला आला होता .

रेणूचे सासू सासरे तिला वाटी लावायला दारात आले, पण रेणूची नजर सुभाषला शोधत होती. कारण आज सकाळपासून सुभाष घरी नव्हता. हिरमुसलेल्या चेहऱ्याने रेणूने सासू सासऱ्यांचा निरोप घेतला. माहेरी जाऊनही रेणू त्याच विचारात गुंतली होती. माहेरी रेणू ४ दिवस होती तरी सुभाषने एकदाही रेणूची फोन करून विचारपूस केली नव्हती. ४ दिवसानंतर रेणूच्या भावाने रेणूला सासरी आणून घातलं.

आज लग्नानंतर पहिल्यांदा रेणूला मोकळा वेळ मिळाला होता सुभाष सोबत बोलायचा. रेणू काही बोलणार त्या आधीच सुभाषने बोलायला सुरुवात केली. सुभाष बोलायला लागला की “रेणू मला माफ कर, पण माझं दुसऱ्या एका मुलीवर प्रेम होतं, पण आई बाबांना आमचा नातं मंजूर नव्हतं. म्हणून त्यांनी माझ्या विरुद्ध माझं लग्न तुझ्याशी लावलं आणि त्यामुळे माझी प्रियसी ही मला सोडून गेली. पण मी अजूनही तिला विसरलो नाही, आणि तिची जागा मी कुणाला द्यायचा विचारही करू शकत नाही. त्यामुळे मला माफ कर. समाजासाठी भलेही आपण नवरा बायको आहोत पण वैयक्तिक आयुष्यात मी तुला बायकोचं स्थान कधीही देऊ शकणार नाही. ” अस बोलून सुभाष रूम मधून निघून गेला.

हे सगळं ऐकून रेणूच्या पायाखालची जमीनच सरकली होती. एका क्षणात तिच्या मनात विचार आला कि आता आपण आयुष्यभर काय करणार? आपलं तर आयुष्यच संपलं सगळं. तेवढ्यात सासूने आवाज दिला आणि तिला जाग आली. पुढचे काही दिवस असेच गेले.तिचं कुठल्याच कामात लक्ष लागत नव्हतं. सासू सासऱ्यांसमोर तर सुभाष रेणूशी चांगला बोलायचा, जणू काही झालंच नाही. पण ४ भिंतीच्याआड त्यांच्यात काहीच नातं नव्हतं,

हळू हळू जस जशे दिवस पुढे जात होते, तशी रेणूला ह्या संगळ्यांची सवय होऊन गेली आणि ती तिच्याच दुनियेत रमायला लागली होती. खुश राहायला शिकली होती ती या परिस्थिती मध्ये. तिने सासू सासऱ्यांची आणि सुभाषची काळजी घेण्यात झोकून टाकलं होतं स्वतःला. एके दिवशी सुभाष ऑफिसला जात असताना त्याच्या दुचाकीला अपघात झाला. अपघातामध्ये सुभाषला बरंच लागलं होतं आणि त्यात त्याच्या एका पायाला फ्रॅक्चर पण झालं होतं. सुभाष जवळपास १ आठवडा हॉस्पिटल मध्ये होता आणि त्या नंतरही डॉक्टरने सांगितलं होतं कि सुभाषला २ महिने तरी लागतील सुरळीत चालायला. रेणूने सुभाष हॉस्पिटल मध्ये असताना आणि घरी आल्यावरही खूप काळजी घेतली. सुभाषला वेळेवर औषधं देण्यापासून ते त्याला अंघोळ घालणं, त्याच्या पायाचं प्लास्टर दर २ दिवसाला बदलणं, त्याला हवं नको ते सगळं बघणं आणि परत सासू सासऱ्यांची काळजी घेणं, हे सगळं काही रेणूने अगदी जबाबदारीने सांभाळलं होतं. सासू सासऱ्यांना तर रेणूचा फार हेवा वाटायचा.

रेणूच्या काळजी मुळे सुभाषही एका महिन्यातच चालायला लागला होता. सुभाषलाही कळून चुकलं होतं की आपण आपल्या हट्टापायी रेणूला नकळत किती त्रास दिला आणि तरी सुद्धा ती आपली आणि आपल्या आई बाबांची किती काळजी करते. सुभाषने हळू हळू रेणू सोबत बोलायला सुरुवात केली. हळू हळू त्यांच्यात मैत्रीचं नातं निर्माण होतं गेलं आणि त्यांच्यात प्रेमाचा धागा कधी जुळला हे त्यांनाही कळलंच नाही

आज रेणू आणि सुभाषच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यांची मन जुळायला संपूर्ण एक वर्ष लागलं होतं आणि त्यांचा आनंदाचा संसार सुरु झाला होता आणि काही वर्षांनी त्यांच्या संसारात एक कळी ‘सई’ च्या नावाने उमलली होती

बोध : कुठलेही नातं समजून घायला काही वेळ द्या. नातं जोडून ठेवा. कारण कुठल्याही नात्याचे धागे जुळायला खूप काळ जातो, पण ते धागे तुटायला एक क्षणही लागत नाही.

==============

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories