Ritbhatmarathi

Search
Close this search box.

खरंतर आजचा विषय थोडा गंमतीचा आणि थोडा विचार करायला लावणारा आहे. माझ्या लेखनाला  तुम्ही वाचक खूप छान प्रतिसाद देत आहात त्यासाठी आभार!!!!  generation बदलत चाललीय आणि त्यानुसार प्रत्येक नातं बदलताना बघायला  मिळतंय. बाबांचे dad झालेत, आणि आई ची mumma झालीय.

पालक आणि मुलं यांमध्ये एक प्रकारचे मैत्रीपूर्वक संबंध नव्याने निर्माण झालेत, पण एक मात्र गल्लत होतीय, माझं पाल्य हे इंग्रजी माध्यमातूनच शिकला पाहिजे!!!!!!!!!

काळाची गरज आहे पण या भाषेला जसा आपण मोठं केल, गरज बनवली त्याच सोबत स्वभाषेला बगल का दिली????  मराठी भाषेत पु. ल. देशपांडे, व. पु. काळे , इरावती कर्वे , ग.दि.मा यांनी आणि यांसारख्या अजून मान्यवर साहित्यिकांनी  कितीतरी साहित्य आपल्यासाठी लिहून ठेवलीय, ती आपल्या पुढच्या पिढीला समजणार कशी???? जसा इंग्रजीचा आग्रह आहे तसा  साहित्याबाबत चा आग्रह पालक का करत नाही. माध्यम शिक्षणाचं कोणताही असो परंतु रोज एक  तास मराठी साहित्य वाचन यासाठी का काढला जात नाही. मराठी माध्यमात शिक्षण घेणं म्हणजे डाउन मार्केट असा का??? आज किती तरी मोठ्या हुद्द्यांवर काम करणारी माणसे हि मराठी माध्यमातून शिकून पुढे आली आहेत.

माझा मुद्दा इंग्रजी आणि मराठी असा कोणताच नाही, माझा आग्रह हा आहे कि ज्या प्रमाणे इंग्लिश माध्यमांना आपण गरज बनवली त्याच प्रमाणे मराठी साहित्यासाठी आग्रही असावं . “Twinkle, Twinkle, Little Star”  म्हणल्यावर ज्या प्रमाणे आपल्याला आनंद होतो, तसाच आनंद “असावा सुंदर चॉकलेटचा बंगला” हे गाऊन आपण मुलांना देयला हवा.  प्रत्येक mumma ने मराठी कविता,कथा या मुलांना समजावून देयला हव्यात, तरच पुढच्या पिढीला ताकदीचे मराठी साहित्यिक मिळतील. ज्या माध्यमातून आपण शिकलो त्या माध्यमाला मोठा करायची जबाबदारी आपली आहे अस मला वाटत….

बाकी MUMMA  तुझ्यातली आई प्रेमळ आहे तशी सुजाण आहे, आणि तुला तुझ्या मुलाच्या भविष्याचा विचार करण्याचा पूर्ण हक्क आहे….

================

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories