Ritbhatmarathi

Search
Close this search box.

आज आपण चविष्ठ असा मालपुवा बघणार आहोत. मालपुवा खरंतर उत्तर प्रदेश मधला पदार्थ. पहिल्यांदा मालपुवा मी बनारस मध्ये खाल्ला होता. 
आता बनारस म्हटलं कि तऱ्हेतऱ्हेचे मिष्ठान्न आणि चाट आलंच. तिथे तुम्ही गेलात कि तुम्हाला चौकाचौकात टपरी वाले भेटतील आणि मग काय तिथे गेलात कि खाण्यापिण्याची चंगळच होऊन जाते.. मला गोडाचे पदार्थ तसे फार काही आवडत नाही, अहो!! पण काय सांगता तिथल्या दुकानातला खव्यात लोळत असलेला मालपुवा मी खाल्ला आणि मग काय मालपुव्याच्या प्रेमातच पडले…. 
मालपूवाच जेवढं वर्णन करा तेवढं कमीच आहे हो!!!!

तिथे जेवण बनवणाऱ्याला हलवाई असं म्हणतात. तर हो.. दुकानातल्या हलवाई ने मालपुवा आणि त्यावर रबडी आणि भरभरून ड्राय फ्रुटस अशा पद्धतीने सर्व्ह केला होता.

वाह्ह! वाह्ह! मज्जाच आली हो मालपुवा खाऊन. तो स्वाद अजून माझ्या जिभेवर रुळत होता. म्हणून मीही ठरवलं कि आपणही मालपुवा बनवायचाच. 
चला तर बघू या…. मालपुवा बनवण्याचा माझा हा पहिलाच प्रयोग.. रेसिपी पाहून तुम्हीच सांगा कि पहिल्याच प्रयत्नात मी पास झाले कि नाही..

मालपुवा बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
 • रबडीसाठी साहित्य –
  दूध – १ लिटर (म्हशीचं घेतलं तर उत्तमच , त्याने घट्ट रबडी बनते )
 • साखरेचा पाकासाठी साहित्य –
  साखर – १ कप
  पाणी – १ कप (साखरेच्या समप्रमाणात)
  केसर – ५-६ काड्या
  वेलची पूड – तुमच्या आवडीनुसार
 • मालपुवा मिश्रणासाठी साहित्य –
  मैदा – ४-५ चमचे
  वर तयार केलेली रबडी – (१ वाटी रबडी बाजूला काढून बाकी शिल्लक रबडी )
 • गार्निशिंगसाठी –
  १ वाटी बाजूला काढलेली रबडी
  ड्राय फ्रुटस – आवडीनुसार
मालपुवा बनवण्याची कृती :

सर्वप्रथम रबडी बनवून घ्यावी. त्यासाठी १ लिटर दूध घट्ट होईपर्यंत आटवून घ्यावे. रबडी मध्ये हवी असेल तर एक चमचाभर साखर टाकावी. (मी टाकली नाही )

त्यानंतर साखरेचा पाक करून घ्यावा.त्यासाठी एका भांड्यात साखर टाकून साखरेच्या समप्रमाणात पाणी टाकावे. साखर विरघळूस्तोवर पाक शिजवून घ्यावा.  एक्दाकी साखर पूर्णपणे विरघळली कि त्यात केसर आणि वेलची पूड टाकावी आणि गॅस बंद करावा. साखरेचा पाक तयार आहे.

आता मालपुवा मिश्रण बनवून घ्यावे. त्यासाठी तयार रबडी मध्ये हळू हळू चमच्याने मैदा टाकावा. मैदा एकदम टाकू नाही. नाहीतर गुठळ्या होण्याची शक्यता असते. इडलीच्या मिश्रणासारखं मिश्रण बनवून घ्यावं. मिश्रण पातळ वाटल्यास एक चमचाभर मैदा टाकावा. मालपुवा मिश्रण तयार आहे.

एका कढई मध्ये तूप तापवावे. तूप तापले कि पळीने मालपुवा मिश्रण तुपात सोडावे. मालपुवा दोन्ही बाजूने छान तळून घ्यावे. मालपुवा बाहेर काढून लगेच साखरेच्या पाकात टाकावा आणि ५ मिनिटाने बाहेर काढावा. अशाप्रकारे सर्व मालपुवे बनवून घ्यावे.

सर्व्ह करताना मालपुवा आणि मग त्यावर १ वाटी बाजूला काढलेली रबडी आणि ड्रायफ्रुटस टाकावे.

मग जमलं कि नाही ? तुम्हीहि हि रेसिपी नक्की ट्राय करा

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories