Ritbhatmarathi

Search
Close this search box.

मला ही जगायचंय (लघुकथा_स्पर्धा_जाने_२२)

“#रीतभातमराठी_लघुकथा_स्पर्धा _जाने_२२”

©️®️ स्वाती माळी

सकाळचे ६-६.३० होत आले होते. थंडीचे दिवस होते; त्यामुळे सकाळचे  वातावरण खुप सुंदर होते. सगळीकडे शांतता; त्यात होणारी पक्षांची चिवचिवाट कानावर पडत होती. कुणी अंगण झाडत होत, कुणी अंगनात सडा शिंपडत होत, कुणी रांगोळी काढत होत,कुणी तुळशीला पाणी घालत होत, तर कुणाची आत्ता सकाळ झाली होती ते चुलीमध्ये जाळ घालत पाणी तापवत होते. शेतकरी अवजारे घेवुन आपल्या शेताकडे जात होते. सुर्याची कोवळी किरणे हळु हळु वरती येत होती.

पहाटे पाचला उठणारी गायत्री ७ वाजले तरी खुप शांत झोपली होती. खिडकीतुन सुर्याची किरणे आत आली व तिच्या चेहऱ्यावर पडली. त्या कोवळया उन्हाच्या स्पर्शाने गायत्रीला जाग आली.तिने डोळयासमोर आपला हात पकडला व डोळे उघडले; तर सुर्य डोक्यावर आला होता. बापरे आज खुपच वेळ झाला उठायला अस बडबडत ती गडबडीने उठुन जात असते. तितक्यात बाजुला झोपलेल्या तिच्या नवऱ्याने म्हणजेच शशांकने तिला ओढुन मिठीत घेतले.”अहो काय करताय? सोडा मला, खुप वेळ झालाय सुर्य डोक्यावर आला.

मला आवरायच आहे.‘कामाची काय गडबड आहे. काम होत राहतील अशी सकाळ रोज रोज येणार आहे का?….शशांक’‘

अहो आई उठल्या असतील त्या ओरडतील सोडा मला…गायत्री’

तु विसरलीस की काय आई गावी गेली आहे…….शशांक‘

अरे! हो की माझ्या लक्षातच नाही.’ आई गावी गेल्या आहेत; पण तरीही वेळ झालाय मला आवरायला हव आणि चिवु उठायच्या आधी मी काम आवरुन घेते. अस बोलत गायत्री उठत असते. पण शशांक परत तिचा हात ओढतो व तिला मिठीत घेतो. झोप ना पाच मिनिट काय गडबड आहे असा वेळ परत मिळणार आहे का?“ते तर आहेच, असा वेळ परत मिळणारच नाही.

गायत्री मनातच विचार करते व शशांकच्या मिठीत शिरते. दोघेही सकाळच्या थंडीतील उबदार मिठी अनुभवत होते. तितक्यात चिवुने हालचाल करायला सुरवात केली. तशी गायत्री उठुन तिला परत थोपटु लागली. गायत्रीच्या थोपटण्याने ती परत झोपी गेली. आता गायत्री वेळ न घालवता आवरायला जाते. शशांक परत अंथरुणात लोळत पडतो.”“गायत्री…मध्यमवर्गीय कुंटुबातीत, शहरात वाढलेली, मनमिळावु, शांत, सगळयांना आपलस करणारी, एम.एस.सी. पर्यत शिक्षण झाल होत. तिला पुढे नोकरी करायची इच्छा होती पण घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे घरच्यांनी लगेच लग्न करुन दिल. आपले आई वडील किंवा कोणीही व्यक्ती जर आपल्यामुळे खुश होणार असेल तर तिला एखादी गोष्ट पटली नसली तरी ती होकार दयायची. समोरची व्यक्ती खुश राहीली पाहीजे हा तिचा हट्टाहास असायचा मग; त्यासाठी आपल्याला थोड मन मारुन जगाव लागल तर चालेल.

शहरात वाढलेली असुन सुध्दा गावातील वातवरणात गायत्री चांगली रुळली होती. लग्नाला २ वर्षे झाली तिला एक दीड वर्षाची गोंडस मुलगी आहे. ‘तिच्या सासु सासऱ्यांना मुलगी झालेल फारस आवडल नव्हत. त्यांना मुलगा हवा होता त्यामुळे थोडे दिवस ते नाराज होते पण दुसरा मुलगा होईल हया आशेने रुसवा कमी झाला.’घरात गायत्री, शशांक, त्यांची मुलगी चिवु, व सासु सासरे अस हे पाच जणांच कुंटुब. शशांकच्या बहिणच लग्न झाल होत.”‘गायत्री अंघोळ करुन रुममध्ये आवरायला येते. आज किती तर दिवसांनी ती स्वत:ला आरशात न्हयाहळत होती. चेहऱ्याला फक्त थोडी पावडरच लावली व चंद्रकोर टिकली लावली. भांगेत थोडस कुंकु लावलं. व ओल्या केसांना लावलेला टॉवेल काढुन केस पुसु लागली. शशांक हे बेडवर पडुन सगळ पाहत होता. गायत्रीच रुप पाहुन त्याला तिच्या जवळ जाण्याचा मोह आवरला नाही. तो बेडवरुन उठला व गायत्रीला मागुन जाऊन मिठी मारली.

’अहो काय करताय सोडा ना तुम्हाला काही वेळ काळ आहे की नाही. सोडा बर मला आवरायच आहे…..गायत्री शशांकचा हात बाजुला करत बोलते; व तेथुन जात असते. गायत्री जाताना शशांकचा चेहराच पडतो. ते पाहुन गायत्रीला वाईट वाटत ती दोन पावले मागे येवुन शशांकच्या गालावर किस करते व पळत किचनमध्ये जाते. गायत्रीने अचानक किस केल्यामुळे शशांकच्या चेहऱ्यावर हसु येत गालावर हात ठेवतच तो आवरायला जातो.‘गायत्री पटपट नाष्टा व जेवण बनवुन घेते तोपर्यत चिवु सुध्दा उठते ती उठल्यानंतर गायत्री चिवुच पण पटपट आवरुन घेते.दुपारपर्यत सगळ आवरुण होत. रविवार असल्यामुळे आज शशांक घरातच होता. तो एक कंपनीमध्ये मॅनेजर होता पगार पण चांगला मिळत होता. दोघे चिवुसोबत खेळत बसले होते. तेवढयात शशांकचे आई बाबा म्हणजेच सावत्रीबाई व रावसाहेब गावावरुन येतात.’“गायत्री चिवुला शशांकडे देते व त्यांच्यासाठी पाणी घेवुन येते. दोघेजण पाणी पितात. तेवढयात बाजुच्या घरात राहणाऱ्या सावत्रीबाईच्या जाऊबाई; म्हणजेच गायत्रीची चुलत सासु येते. आलीस का ग सावीत्री प्रवास चांगला झाला नव्ह ? पावण बर हायत काय?

सावित्रीबाई मोठया कुटुंबातील आहेत त्यांना 6 जावा आहेत सावित्रीबाईचा नंबर सातवा होता. आता सगळे वेगळे झालेत पण मोठया जाऊबाईचा धाक आहे तो आहेच.

”होय आक्का सगळे आहेत बरे….सावत्रीबाई 

“बाय सावित्री, आज तुझ्या घरातला सुर्य वेळान उगवलाय…….आज रविवारच हाय बग त्यामुळ असल वाटतं……..आक्का गायत्रीकडे तिरक्या नजरेने बघुन बोलतात.”

आक्कांच्या हया बोलण्याने सावित्रीबाईच्या लक्षात येतं.; पण त्या आक्का जायची वाट पहात होत्या.बर सावित्री मी येतो बाय; म्हणत आक्का त्यांच्या घरात जातात. त्या गेल्यावर सावित्रीबाई गायत्रीला खुप बोलतात……..काय ग… कामान खुप दमल्यास होय.आई ते मी मुद्दाम नाही केल माझे डोळेच उघडले नाहीत..गायत्री डोळयात पाणी आणत बोलते

“होय ग तु कधी मुद्दाम करतीस होय ….तुझ्या आईन काय शिकवल हाय की नाय…शाळा शिकवण्यापेक्षा जरा घरची काम शिकवली असती तर कल्याण झाल असत…सावित्रीबाई”‘माहेरच्यांना बोलल्यावर गायत्रीला खुप राग येतो. ती शशांकडे पाहते पण शशांक शांतच, शशांकच त्याच्या आई बाबांच्या पुढे काही चालायच नाही. त्यामुळे ते जे म्हणतील तेच तो करायचा.’“काही दिवसानंतर गायत्री एकमच उलटया होवु लागल्या. अगदी आशक्तपणा आला होता. महिन्याची तारीख सुध्दा पुढे गेली होती. गायत्रीने शशांकला सांगुन प्रेग्नसी किट आणला व तिने चेक केल तर गुडन्युज होती. तिने शशांकला सांगितल. शशांकला खुप आनंद झाला. दोघांनी जाऊन सावित्रीबाईला व रावसाहेबांना जाऊन सांगितल. सावित्रीबाईना पण आनंद झाला आता वंशाला दिवा मिळणार म्हणुन ते दोघेही आनंदी होते.”थोडे दिवस गेल्यानंतर सावित्रीबाईं आक्कांना सांगायला गेल्या मोठया असल्यामुळे त्यांना सगळ सांगाव लागायच.

‘आक्का गायत्रीला दिवस गेलेत दोन महिने झालेत…सावित्रीबाई आनंदात सांगतात

’काय सांगतीस हे ऐकुन लय बर वाटल बग; आता तुझ्या वंशाला वारस मिळल, पण सावित्री हयावेळी पण मुलगी झाली तर? 

आक्का काय करायच ओ, आधीच एक मुलगी पदरात आहे…..आणि दुसरी पण झाली तर काय करायच.?

‘पोरग हाय काय पोरगी ते तपासत्यात म्हण की मग ते तपासुन ये जा…आक्का’‘

पण आक्का ते करायला बंदी हाय….आणि सापडल तर शिक्षा पण करतात…सावित्रीबाई’

‘आग बाय तु तर शाळा शिकुन आडाणी हायस बग, त्या शेवंताच्या सुनच पण तपासुन आलेल तिला पण दुसरी पोरगीच होती……..आक्का

’मग काय केल त्यांनी……..सावित्रीबाई

“काय करणार पाडली की ती पोरगी दुसरी पोरगी घेऊन काय करत्या ती…अग बाय आता डॉक्टरला थोड पैक दे काम होतय. तपासुन तर ये जा…….आक्का”

बर आता दुपारी जाऊन येतो आम्ही…….सावित्रीबाई‘

सावित्रीबाई गायत्रीला घेवुन दवाखान्यात जातात. गायत्रीला चेक करायला घेवुन गेल्यानंतर त्या डॉक्टरला थोडे पैसै देवुन तपासायला सांगितलं.’“तपासल्यानंतर कळल की दुसरी पण ‘मुलगीच’ आहे. सावित्रीबाईचा चेहराच पडला त्या गायत्रीला घेवुन घरी आल्या. तुझ्या पोटात काय सगळया पोरीच हायत काय वंशाला दिवा देणार हायस काय नाही. आईच्या वळणावर गेल्या. आईला पण चार चार पोरी आता तु बी तसलीच निघालीस. सावित्रीबाई तावातावातच आक्काकडे जातात.”

‘सावित्रीबाईच्या डोळयात पाणी बघुन आक्काला थोडा अंदाज येतो……..काय ग बाय काय झाल, डोळयात पाणी का.?

आक्का आलो तपासुन परत पोरगीच आहे.आता काय करायच आक्का’

“काय करायच म्हणजी, पाडुन ये जा….एवढया पोरी घेवुन काय करतीस,  ‘किती झाल तर ते परक्याच धन’ आपल्या वंशाला दिवा पाहीजे काय नग. थोड पैक जात्यात पण पाडुन ये.”

“सावित्रीबाई घरी येतात शशांकला गर्भपात करायचा आहे म्हणुन सांगतात. शशांकला हे पटत नाही तो आईला नाही म्हणुन सांगतो.”

“तु लई शाहणा होवु नकोस कळल का, माझ ऐकल नाही तर मी काय करेन तुला माहितच आहे तिला कस तयार करायच ते तुझ तु बघ, उदया आपण गर्भपात करायला जातोय कळल.”

सावित्रीबाई व रावसाहेब शशांकला नेहमी धमकी देवुन मनावयाचे, तो पण भितीपोटी मनात नसताना सगळ मान्य करायचा. ते दोघे गायत्री व चिुवुला तुझ्यापासुन दुर करेन ही धमकी दयायचे व त्यांना हव ते काम करुन घ्यायचे. आत्ता सुध्दा तेच.शशांक गायत्रीजवळ जातो. गायत्री ते आई गर्भपात करायच म्हणत आहे.

“काय?………तुम्हाला कळत का तुम्ही काय बोलताय” 

आग ऐक अस चिडु नको, शांत हो एकदा करु फक्त नाही तर तुला व चिवुला माझ्यापासुन वेगळे करतील ग ते, मी नाही राहु शकत तुम्हा दोघीशिवाय प्लीज माझ्यासाठी तयार हो. प्लीज‘

रात्रभर समजावुन झाल्यावर गायत्रीला सुध्दा शशांकपासुन वेगळ व्हायच नव्हत त्यामुळे मनात नसताना तिने हे पाऊल उचलायच ठरवलं.

’दुसऱ्या दिवशी जाऊन गर्भपात करुन आले. गायत्री महिनाभर त्या गोष्टीचा त्रास करुन घेत होती. काही महिन्याने थोडा विसर पडल्यावर नेहमीसारखी वावरु लागली. “6 महिने गेल्यानंतर परत गायत्रीला दिवस गेले. मागच्यावेळेसारख परत सावित्रीबाईनी तपासनी करुन आल्या, आणि दुर्देव म्हणायच की काय माहीत नाही; पण ‘तिसरी पण मुलगीच होती.’ परत तोच प्रकार सावित्रीबाई परत गर्भपात करायची भाषा बोलु लागल्या. परत तेच शशांक तिला मनवु लागला. पण हयावेळी गायत्री तयार होत नव्हती तिने रुममध्ये स्वत:ला कोडुन घेतले. रुममधल्या सगळया लाईट्स बंद अंधारात गायत्री रडत होती.आणि अचानक आवाज आला.”‘आई………………आईssss………….ये आईsssssss’

गायत्री इकडे तिकडे पाहु लागली पण तिला कोणीच दिसेना……….“ये आई कोठे शोधतेयस मी इकडे आहे………एका ठिकाणी गायत्रीला प्रकाश दिसला पाहते तर तिथे एक गोंडस अशी मुलगी होती.

” तु कोण आहेस बाळ तु इथे कशी काय?, गायत्री डोळे पुसत बोलते”

“आई मी तुझी लेक आहे ग…..जी आता तुझ्या पोटात आहे. जिला आता तुम्ही मारुन टाकणार अहात. तिच्या बहिनीला मारुन टाकल तस.

”नाही बाळ अस नाही ग……….गायत्री हुंदके देत बोलत होती.

“आई मला नको ना ग मारु, मला हया जगात यायच आहे ग, तुझ्या उबदार कुशीत मला खेळायच आहे ग, बाबाच्याकडुन लाड करुन घ्यायचे आहेत. हया जगात येवुन तुझ व बाबांच नाव मोठ करायच आहे…….आई माझी काय चुक आहे ग का मला मारुन टाकताय? मी तुला व बाबाला नकोय का ग? मुलगी आहे हयात माझा काय ग दोष; का मला हया जगात येवु देत नाही अहात…..तुला पण मी नकोय का ग आई?”“मला जगायच आई, मला जगायच आहे, मला नको ना ग मारु, तु सांग ना सगळयांना समजाऊन, तु आज्जीला सांग समजाऊन, सांगशिल ना ग आई? आज्जीला सांग दादा आल्यावर जे काम करणार आहे ना ते सगळ काम मी करेन तिला हव नको ते सगळ बघेन पण मला मारु नकोस म्हणुन सांग आज्जीला……..मला नको मारु……”

“नाही मारणार बाळ……..अस बोलत गायत्री त्या प्रकाशाकडे धावते व आपल्या लेकीला मिठी मारते पण तो प्रकाश नाहीसा होतो.” 

“गायत्री मनाशी पक्क करते काही झाल तर मी माझ्या बाळाला नाही मारणार…..सकाळी तिची सासु तिला बाहेर बोलावते” गायत्री चल जायच आहे आपल्याला आवरल का……….सावित्रीबाई

गायत्री बाहेर येते. आजुन आवरली नाहीस तु……तुला एकदा सांगितलेल कळत नाही का…….जा पटकण आवरुन तयार हो……..सावित्रीबाईमी नाही येणार………गायत्री हळु आवाजात सांगते………

काय म्हणालीस……….सावित्रीबाई‘

मी नाही येणार…….आल ऐकायला………मी नाही येणार…….गायत्री जोरात बोलते’

लई आवाज वाढलाय की तुझा……….हा आवाज कमी करायला वेळ लागणार नाही मला कळल का गप्प गुमान यायच माझ्या बरोबर

“काय करणार तुम्ही, सांगा ना काय करणार, मला आणि शशांकला वेगळ करणार हो ना?  नाही तर शशांकच दुसर लग्न करणार हो ना? हेच करणार ना, आजपर्यत फक्त धमकी देत आलाय; तुम्हाला जे कारायच ते करा आता मी नाही घाबरत; पण मी गर्भपात करणार नाही.”

”तु लई तोंड सोडल्यास कळल का……….सावित्रीबाई‘

हे आधीच करायला हवं होत…..तेव्हा जर बोलले असते तर आज माझी ती पण लेक जिवंत असती माझ्या कुशीत खेळली असती. पण तुमच्यामुळे मी गप्प बसले पण आता नाही गप्प बसणार तुम्हाला जे करायच आहे ते करा.’ 

“शशांक सांग तुझ्या बायकोला………सावित्रीबाई“

कोण शशांक? कुठल्या शशांकच ऐकणार नाहीये मी, कळल का…..लाज वाटायला हवी तुम्हाला, एक स्त्री असुन ही एका स्त्रीचा जीव घेताय. जिव घेताना एकदा तर विचार करायचा होता की तुम्हाला पण एक मुलगी आहे. बाई अहात का कोण, जरा तरी दया माया दाखवावी की, त्या निष्पाप जिवाला मारताना तुमचे हात कापले कसे नाहीत……त्या लेकरावर कशी काय माया आली नाही तुम्हाला.”तुमच्या लेकीच्या बाबतीत अस केल असत तर चालल असत का?……..तिला सुध्दा असच गर्भपात करायला सांगितल असतं ?…“शशांक तुम्ही प्रत्येकवेळी आई बाबा ना घाबरुन चुकिच्या गोष्टी करत आलात आपल्या पहिल्या बाळाच्यावेळेला जर खंबीर राहिला असता तर आपली ती लेक जिवंत असती आपल्या अंगाखांदयावर खेळत असती.” “हे असले आई बाप असण्यापेक्षा नसलेले बरे…तुम्ही रहा तुमच्या आई बाबांच्या सोबत मी माझ्या मुलांना पोसायला सक्षम आहे. माझ्या आई वडिलांनी एवढ शिक्षण दिलं आहे की कुठही राबुन त्यांच पोट भरु शकते…..अस बोलुन गायत्री आपली बॅग घेवुन जात असते

”थांब गायत्री!………मला अस सोडुन नको ग जाऊ तुझ्याशिवाय मला कोण आहे. तु नको जाऊस….”

“शशांक ती वेळ निघुन गेली शशांक”……….अस बोलुन गायत्री जात असते.

‘थांब मी पण येतो तुझ्यासोबत हया आधी कधी तुझी साथ देवु शकलो नाही आता तरी मला माझ कर्तव्य पार पाडु दे”…….शशांक’

दोघ घराबाहेर जात असतात.आपला मुलगा आपल्याला सोडुन जात आहे म्हटल्यावर ‘सावित्रीबाईमधील आई जागी झाली.’ती शशांकच्यामागे जाते शशांक आम्हाला सोडुन जाऊ नकोस तुझ्याशिवाय आमच कोण आहे.आमचं चुकल आम्ही अस वागायला नको होत गायत्रीला असा त्रास दयायला नको होता. ‘गायत्री चुकल आमच पण अस आम्हाला सोडुन जाऊ नकोस. थांब पोरी मी हा गर्भपात नाही करु देणार तु तुझ्या लेकीला जन्म दे दुसरी लम्क्षी आपल्या घरी येवु दे. हव तर मी तुझ्या पाया पडते.’

“आई माझ्या पाया नका पडु मी लहान आहे तुमच्या पेक्षा तुम्हाला तुमची चुक लक्षात आली हेच खुप आहे.“

सावित्रीबाईना त्यांची चुक लक्षात आली. गायत्री व शशांक परत घरी गेले. गायत्रीला पण तिचा मान मिळाला. सगळे गुण्यागोविंदाने राहु लागले. हयावेळी मात्र सावित्रीबाईनी गायत्रीची खुप काळजी घेतली. तिला काय हव नको ते पाहील..गायत्रीला मुलगी झाली तिच नाव माऊ ठेवलं……म्हणजे घरी तिला माऊ म्हणुन लागले.”

गर्भपात करणे हा कायदयाने गुन्हा आहे. हे आपल्याला माहीत आहे पण आपल्या समाजात आज सुध्दा मुलगा मुलगी भेदभाव केला जातो. त्यामुळे डॉक्टरांना पैसे देवुन, त्यांना गयावया करुन, चोरुन गर्भपात केला जातो.हया गोष्टी बदलायला हव्यात प्रत्येकाची मानसिकता बदलायला हवी; तरच स्रीला हया जगात मान सन्मान मिळेल.

***समाप्त(ही कथा काल्पनिक आहे ह्याचा काही सबंध अढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा)हा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो….तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका…..

====================

फोटो साभार – गूगल

तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा. स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही….पाहिजे ती फक्त मजबूत शब्दांची मांडणी. तर मग विचार कसला करताय लवकरात लवकर तुम्हीही भाग घ्या.

हि स्पर्धा दि. ३ जानेवारी ते २९ जानेवारी आयोजित करण्यात येणार आहे.

विजेत्या स्पर्धकांना खाली दिल्यानुसार मानधन देण्यात येईल.

पहिला विजेता – १००१/-

दुसरा विजेता (अनुक्रमे २ विजेते काढण्यात येतील) – ५०१/- प्रत्येकी

तिसरा विजेता (अनुक्रमे ३ विजेते काढण्यात येतील) – २५१/- प्रत्येकी

बाकी सर्व सहभागी स्पर्धकांना RitBhatमराठीच्या वतीने डिजीटल प्रमाणपत्र देण्यात येईल.

स्पर्धेचे नियम जाणून घेण्यासाठी खालील ई-मेल अथवा फेसबुक मेसेंजर वर संपर्क साधा.

ई-मेल : ritbhatmarathi@gmail.com

फेसबुक पेज : https://www.facebook.com/ritbhatmarati/

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *