Ritbhatmarathi

Search
Close this search box.

पॉपकॉर्न सारखेच चवीला उत्कृष्ठ आणि तितकेच आरोग्यदायी असलेले मखाने रोज खा

makhana meaning in marathi: आपली भारतीय खाद्यसंस्कृती ही खूपच संपन्न आहे. महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांमधे खूपच विविधता तर आहेच आणि सोबतच चवदार पदार्थ बघायला मिळतात. जो तो आपल्या आवडप्रमाणे पदार्थ खात असतो आणि जीभेचे चोचले पुरवत असतो. आजकाल सगळ्याच हॉटेल्समधे महाराष्ट्रीयन सोबतच चायनीज, पंजाबी, इटालियन, मेक्सिकन, थाय असे विविध प्रकार चाखायला मिळतात. पण हे सगळे पदार्थ पोषक आहेत का याचाही विचार व्हायला हवा असे मला वाटते. यातील सगळेच पदार्थ शरीरासाठी घातक असतील असे नाही पण काही पदार्थांचा शरीरावर विपरीत परीणाम दिसून येतो. त्यामुळे फक्त चव लक्षात न घेता, पोषण विचारात घ्यावे.

पोषक अन्न पदार्थात, सगळ्या प्रकारच्या डाळी, कडधान्ये, दुधाचे पदार्थ, सगळ्या भाज्या तसेच फळे यांचा समावेश तर असावाच याशिवाय अजून काही गोष्टी आहारात घेतल्या पाहिजेत आणि ते फळं म्हणजेच ड्राय फ्रूट.

आपल्याला काजू, बदाम, मनुके,खारका हे ड्राय फ्रूट माहीतच आहेत. याशिवाय ड्राय फ्रूटमधे समाविष्ट असणारा असा एक ड्रायफ्रूटचा प्रकार बघणार आहोत आणि तो म्हणजे मखाना.

मखाना म्हणजे पौष्टिक खाद्य, अगदी पॉपकोर्न सारखं. हा मखाना ज्यांना सारखी भूक लागते त्यांच्यासाठी तर खूप उपयुक्त आहे, कारण हा भूक सुद्धा भागवतो आणि शरीरावर दुष्परिणाम सुद्धा करत नाही. त्यामुळे मखाना तुम्ही जास्त खाल्लं तरी काही हरकत नाही. मखाना खाण्याचे आरोग्याला खूप काही फायदे आहेत. कारण मखाना हे अशा ड्रायफ्रुट्सपैकी एक आहे, जे आरोग्यदायी तसेच चवदार आहे. मखानामध्ये कमी कॅलरी असल्यामुळे ते वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. इतकेच नव्हेतर मखाना आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे.

हिवाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्याल?

खूप प्रयत्न करूनही सकाळी लवकर उठणं होत नाही? मग हे उपाय नक्की करून पहा

==============

मखाना खाण्याचा हा सगळ्यात मोठा फायदा, जे लोक मखाना खातात त्यांच्या शरीरात मखानाद्वारे जास्त प्रमाणात अँटीऑक्सीडेंट वाढते. हे यामुळे शक्य होते कारण एका वैज्ञानिक संशोधनानुसार असे सिद्ध झाले आहे की मखानामध्ये अँटीऑक्सीडेंटची मात्र मुबलक प्रमाणात असते. अँटीऑक्सीडेंट हा शरीराला आवश्यक असणारा अति महत्त्वाचा घटक आहे. अँटीऑक्सीडेंट मुख्यत: आपल्या शरीराची त्वचा उजळवण्यात आणि रोगप्रतिकारक शक्ती अधिक बळकट करण्यास मदत करतात. त्यामुळे मखाना आवर्जून खा आणि आपल्या शरीराला अधिक बळकट व निरोगी बनवा.

मखाना हे एक असे स्नॅक्स आहे ज्यामध्ये कोरेलेस्ट्रॉलचे प्रमाण खूपच कमी असते. यामध्ये फॅट आणि सोडियमचे प्रमाणही कमी असते. याशिवाय मखाना हे ग्लुटेन फ्री असतात. यात प्रथिनांचे आणि कार्बोहायड्रेट्चे प्रमाण अधिक असते. अशा प्रकारे बरेच पोषक्ततवे मखाना मध्ये उपलब्ध असल्याने मखाना शरीरासाठी खूपच हितकारक ठरतो.

  • जर मखाना योग्य प्रकारे आणि योग्य वेळी खाल्ले तर वजन कमी करण्यासाठी त्याचा चांगला फायदा होतो.
  • मखानामध्ये गॅलिक अॅसिड आणि क्लोरोजेनिक अॅसिड यांसारखे अँटी-ऑक्सिडंट आढळतात. हे अँटी-ऑक्सिडंट्स हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्याचे काम करतात. त्याचबरोबर हृदयाच्या रुग्णांसोबत मधुमेहाचे रुग्णही मखानाचे सेवन करू शकतात. अनेक अँटी-ऑक्सिडंट्समुळे मखना हे वृद्धत्वविरोधी चांगले अन्न आहे.
  • मखाना खाल्ल्याने स्त्रीयांच्या त्वचेला पोषणही मिळते आणि त्वचा दीर्घकाळ तरूण आणि सुंदर दिसते.
  • तुम्हाला तुमच्या वजन वाढीची काळजी वाटत असेल तर मखानाचा नाश्ता हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. हे प्रथिनांनी युक्त असल्याने शरीराला पोषण देते. एक मूठभर मखाणा खाल्ल्यानंतर शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते. यामुळे वारंवार भूक लागण्याचे प्रमाण कमी होते. परिणानी वजन वाढीवर नियंत्रण राहते. यामुळे तुमच्या कॅलरीजचे प्रमाण कमी होते. वजन कमी करण्यासाठी मखाना खाण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे रात्रभर भिजवून दुसर्‍या दिवशी सकाळी सूप किंवा सॅलडमध्ये एकत्र करुन खाणे. मखाना तुम्ही भाजूनही खाऊ शकता. कुरकुरीत राहण्यासाठी ते बॉक्समध्ये ठेवू शकता.
  • याशिवाय महिलांच्या पचनक्रियेसाठीही मखाना अतिशय योग्य पर्याय आहे.
  • मखाना मोठ्या प्रमाणावर फायबर असते, जे पचन सुरळीत करण्यासाठी आणि आतड्याची हालचाल करण्यास मदत करते. यात असणाऱ्या लोहाच्या प्रमाणामुळे हे गर्भवती महिलांनाही खाण्याचा सल्ला दिला जातो.
  • मखाना हाडे मजबूत ठेवते.
  • शरीरातील विषारी द्रव्ये साफ करण्यासाठीही मखाना खाल्ल्या जातात. मखानामध्ये आढळणारे डिटॉक्सिफायिंग घटक शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतात आणि पोट स्वच्छ ठेवण्याचे काम करतात.
  • पचनसंस्थेच्या अयोग्य कार्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते. अशा वेळी रिकाम्या पोटी मखाना खाल्ल्यास हा त्रास कमी होऊ शकतो.
  • रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करते शिवाय रक्त पातळ करण्यास मदत करते.

त्यामुळे मखाना हे खूप फायदेशीर आणि आरोग्यदायी असे आहे. त्यामुळे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मखाना खाणे आवश्यक आहे.

================

प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *