Ritbhatmarathi

Search
Close this search box.

सण एक पण विविधता अनेक : जाणून घ्या मकर संक्रांति विषयी संपूर्ण माहिती

1. मकर संक्रांती व भोगोलिक माहिती

Makar Sankranti Information in Marathi: भारतीय हा मुळातच उत्सवप्रिय आहे. आपल्या भारतात प्रत्येक ऋतुत ठराविक सण साजरे केले जातात.

असाच हा मकरसंक्रांत हा सण देशाच्या कानाकोपऱ्यांत साजरा केला जातो. हा सण जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात १४ किंवा १५ जानेवारीस साजरा करतात.

मकरसंक्रांतीआधी दिवस लहान व रात्र मोठी असते. मकरसंक्रांतीदिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या संक्रांतीस मकरसंक्रांत असे संबोधले जाते. मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्य प्रुथ्वीच्या उत्तर गोलार्धाकडे जाऊ लागतो. या दिवसांत केलेल्या दान,धर्म,तप..यांना विशेष महत्त्व असते.

मकरसंक्रांतीदिवशी लवकर उठून अंगास तीळतेल लावून स्नान केले जाते व सुर्यास अर्घ्य अर्पण करुन सूर्यदेवतेची पूजा केली जाते. डाळ,तांदूळ यांची खिचडी सूर्यदेवतेस अर्पण करतात व मनोभावे प्रार्थना करतात.

2. मकर संक्रांतीचं महत्व

हा सण हिंदू धार्मिक सूर्यदेव सूर्याला समर्पित आहे. सूर्याचे हे महत्त्व वैदिक ग्रंथांमध्ये सापडते, विशेषत: गायत्री मंत्र, हिंदू धर्माचे एक पवित्र स्तोत्र, ऋग्वेद नावाच्या ग्रंथात आढळते.

महाभारतात कुरु वंशाचे संरक्षक भीष्म हे बाणांच्या शय्येवर (शरशय्येवर) उत्तरायणाची वाट पहात पडून होते. त्यांना इच्छामरणाचे वरदान होते. ज्यामकर संक्रांतीचं प्राचीन इतिहास सांगायचा झाल्यास, महाभारतामध्ये कुरु वंशाचे संरक्षक भीष्म हे बाणांच्या शय्येवर उत्तरायणाची वाट पहात होते. भीष्मला इच्छामरणाचे वरदान होते. ज्या दिवशी उत्तरायण सुरू झाले त्यादिवशी त्यांनी प्राणत्याग केला. भारतीय परंपरेत उत्तरायणाचा काळ दक्षिणायनापेक्षा अधिक शुभ मानला जातो. त्यामुळे मकर संक्रांतीला उत्तरायण हि म्हणतात.

3. मकर संक्रांतीची भारतातील विविधता

देशाच्या विविध भागांत विविध नावांनी हा सण साजरा केला जातो. यानिमित्ताने लोक तर्हेतर्हेची पक्वान्ने बनवून खातात. एकमेकांस भेटतात,शुभेच्छा देतात.

तामिळनाडू, केरळ व आंध्रप्रदेशात पोंगल या नावाने हा सण तीन दिवस साजरा केला जातो. दूध व भातापासून मिष्टान्न बनवून खाल्ले जाते.

उत्तरप्रदेश व बिहारमध्ये याला खिचडीचा सण म्हणतात.

पंजाबात या सणास लाहोडी असे संबोधले जाते..शेतात तरारलेला ऊस व भात याची खीर या सणाला करतात.

मध्पप्रदेश,छत्तीसगढ, झारखंड येथे सक्रात या नावाने संक्रांत साजरी करतात. तीळ,गुळ यांच्या विविध मिठाया बनवल्या जातात.

पंश्चिम बंगाल,अलाहाबाद येथे या दिवसापासनं मेळे भरवले जातात.

गुजरातमधे मकरसंक्रातीदिवशी, विविध मोसमी भाज्या घालून उंधियो बनवतात व पुऱ्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खातात.

४. मकर संक्रांतीचं शास्त्रीय महत्व

मकरसंक्रांतीला जितकं आध्यात्मिक महत्त्व आहे तितकंच शास्त्रीय महत्त्व आहे. या दिवसानंतर थंडी हळूहळू कमी होत जाते.

या दिवसांत पतंग उडवणे पुर्वापार चालत आले आहे. यालाही आरोग्यदुष्ट्या महत्त्व आहे. कोवळ्या उन्हात पतंग उडवल्याने कोवळे उन्ह मुलांना मिळते. या अशा खेळांनी मुलांची एकाग्रता,सांघिक भावना वाढीस लागते.

५. मकर संक्रांती हा सण कसा साजरा करतात

महाराष्ट्रात या सणास मकरसंक्रांत असे संबोधले जाते. घराघरातून तीळ भाजले जातात. तीळ,सुके खोबरे,शेंगदाणे, गुळ एकत्र गरम करुन हाताला चटके बसून हात लाल झाले तरी मोठ्या उत्साहाने सुगरणी हे लाडू वळतात. तीळ,गुळ,खोबरे,दाणे शरीराला उष्णता प्रदान करतात. काही उत्साही सुगरणी तर हलवाही घरी बनवतात. हिरवा,केशरी,पिवळा,पांढरा अशा विविध रंगातला काटेरी हलवा बघताच जीभेवर ठेवावासा वाटतो.

संक्रांतीदिवशी सुगड पुजण्याची प्रथा आहे. वाटाणे,ओले हरभरे,गाजराचे तुकडे,ऊसाचे तुकडे,भुईमुगाच्या शेंगा..हे शेतात आलेलं सोनं मातीच्या सुगडात ठेवतात,त्यावर मातीचं झाकण लावून हे वाण देवाजवळ ठेवतात,तुळशीजवळ ठेवतात,प्रार्थना करतात..मग सवाष्णींना बोलावून सुगड देतात.

जाणून घ्या त्र्यंबकेश्वरला गंगा नदीचा उगम कसा झाला?

खंडेरायाची दंतकथा

५.१. नववधूला हलव्याचे दागिने

बऱ्याचजणी मकर संक्रांतीला बनवल्या जाणाऱ्या हलव्याचे दागिने बनवून विकतात. नवीन वधुचं कोडकौतुक करण्यासाठी मकरसंक्रांतीला तिला काळी चंद्रकळा नेसवली जाते. हार,मंगळसूत्र,बांगड्या,मुकुट,बाजुबंद अशा हलव्याच्या मनमोहक दागिन्यांनी तिला अलंक्रुत करतात..नवीन जावयासही हलव्याचे दागिने हौसेने काही ठिकाणी घालतात. जावयास भेटवस्तू देतात.

५.२. बोरन्हाण

नवीन बालकास पहिल्या संक्रांतीसमयी बोरन्हाण घातलं जातं..हा एक संस्कार आहे. यास निगडीत पौराणिक संदर्भ असा की करी नावाच्या वाईट राक्षसापासून बाळकृष्णाचे रक्षण करण्यासाठी त्यास यशोदेने बोरन्हाण घातले होते..तीच परंपरा कायम ठेवत..शिशूस बोरन्हाळ घालतात.

मकरसंक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत कोणत्याही एका दिवशी आजुबाजूच्या बाळगोपाळांना,सगेसोयऱ्यांना आमंत्रित केलं जातं..बाळाला काळे कपडे घालतात व हलव्याचे दागिने जसे की हार,मुकुट घालून त्यास पाटावर बसवतात. बाळाच्या डोक्यावरुन..ऊसाचे तुकडे,बोरं,गाजराचे तुकडे,ओले हरभरे,भुईमुगाच्या शेंगा पाडतात म्हणजेच बोरन्हाण घालतात. बाळ व जमलेले बाळगोपाळ हसतखेळत ती पडलेली बोरं,दाणे,हरभरे खातात..अशाने पौष्टिक खाऊ त्यांच्या पोटात जातो.

५.३. हळदीकुंकू

मकरसंक्रांती ते रथसप्तमी या काळात हळदीकुंकू घालण्याची प्रथा आहे. बाया नथीबथी घालून नटताथटतात, छानछान साड्या नेसतात.  हळदीकुंकवाचं आमंत्रण देतात. जमलेल्या बायांना हळदकुंकू लावतात, सौभाग्य वस्तू जसे की कुंकवाचा करंडा,कंगवा,हिरवा चुडा,मेंदीचे कोन ,आरसे ,टाल्कम पावडर,गंधाच्या बाटल्या..असं वाण देतात,फुलं देतात. फुलबाजार अष्टर,गुलाब..अशा फुलांनी सजलेला असतो. ठिकठिकाणी सार्वजनिक हळदीकुंकूही घातले जाते.

महाराष्ट्रात मकरसंक्रांतीला गुळपोळीचा मान असतो. गुळ,तीळ,बेसन याचं मिश्रण,कणकेच्या उंड्यात घालून गुळपोळी बनवतात.

आबालव्रुद्ध एकमेकांतले रुसवेफुगवे बाजूला सारुन एकमेकांना अलिंगन देतात. तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं सांगतात. असा हा मकरसंक्रांतीचा सण सर्वांना हवाहवासा,स्नेहाची स्निग्धता तनामनात जाग्रुत करणारा..

================

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *