Ritbhatmarathi

Search
Close this search box.

लोहगड किल्ल्याची संपूर्ण माहिती | Lohagad fort information in marathi

Lohagad fort information in marathi: छत्रपती शिवाजी राजांनी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात अनेक गड आणि किल्ले काबीज केले. त्यांचा राजकीय कारणांसाठी खूप उपयोग झाला. हे किल्ले म्हणजे आपल्या देशाची ऐतिहासिक महत्व प्राप्त झालेली संपत्ती आहे.

आपला पुणे जिल्हा हा याच किल्ल्या साठी ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाचा ठरतो. कारण यातील बरेच किल्ले हे पुणे जिल्ह्यातच येतात. त्यामुळे असाच एक शिवाजी राजांनी जिंकलेला आणि महत्त्वाचा किल्ला म्हणजे लोहगड.

लोहगड किल्ला पुणे जिल्ह्यातील लोणावळा गावाजवळ मावळ ( सह्याद्री ) डोंगररांगेवर वसलेला आहे. या किल्ल्याची उंची ३४०० फूट असून, चढायला अतिशय सोपा आहे. पुण्याहून केवळ पन्नास किमी अंतरावर हा किल्ला आहे. पावन आणि इंद्रायणी खोरे या दोन भागात लोहगड किल्ला विभागलेला आहे. नंतर तसाच पुढे विसापूर किल्ल्याला जोडला आहे. या किल्ल्यावर मराठा साम्राज्याने अनेक वर्षे राज्ये केले. छत्रपती शिवाजी राजांनी राजकीय कारणांसाठी हा किल्ला वापरला.

लोहगड किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील एक आहे. याची निर्मिती राजा सुराजमल यांनी केली. सगळ्यात उत्तम डोंगर किल्ल्यांपैकी लोहगड किल्ला एक आहे. भारत सरकारने २६ मे १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून या किल्ल्याला घोषित केले आहे.

[tablesome table_id=’11935’/]

या गडावरच्या इमारती पडलेल्या आहेत. गडाचे उत्तरेकडचे टोक निमुळते होत गेले आहे. या गडाचे वैशष्ट्य म्हणजे कड्याच्या टोकावर बांधलेली चिरेबंदी वाट. ही वाट फार कमी दुर्गावर पाहायला मिळते. या गडावर शंभर लोक झोपू शकतील एवढी गुहा आहे. या गडावर लोहगडवाडी पार केली की, सर्पाकार वाट सुरू होते, या वाटेवर एकदा का पाय ठेवला की ( टाकला ) वर येईपर्यंत माणूस पहारेकऱ्यांच्या दृष्टीआड जात नाही म्हणजे हेरला जातो.

हा किल्ला जवळपास सातशे वर्षांपूर्वीचा आहे. अतिशय मजबूत, बुलंद आणि जुना आहे. या किल्ल्याच्या जवळ भाजे आणि बेडसे अशी बौद्ध कालीन लेणी आहेत त्याच्याही आधी म्हणजे ई. स पूर्व दुसऱ्या शतकाच्या काळात या किल्ल्याची निर्मिती झाली असावी असा अंदाज आहे. म्हणूनच या किल्ल्याने सातवाहन, चालुक्य आणि यादव राजवटी पहिल्या आहेत.

लोहगड किल्ल्याचा इतिहास बघताना एक गोष्ट लक्षात येते आणि ती म्हणजे हा किल्ला बऱ्याच वेळा एकाच्या ताब्यातून दुसऱ्याकडे गेला. १४८९ मध्ये मलिक अहमदने निजामशाहीचा स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले त्यातलाच एक लोहगड किल्ला. १५६४ मध्ये अहमदनगरचा सातवा राजा दुसरा बुरहान निजाम या किल्ल्यावर कैदेत होता. त्यानंतर १६३० मध्ये हा किल्ला आदिलशाहीत आला.

१६५७ मध्ये छत्रपती शिवाजी राजांनी कल्याण आणि भिवंडी जिंकून घेतले आणि लोहगड विसापूर परिसर स्वराज्यात सामील करून घेतला. पुन्हा १६६५ मध्ये पुरंदर तहात किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला पुढे १३ मे १६७० रोजी मराठ्यांनी तो पुन्हा जिंकला. पहिल्यांदा सुरत लुटताना आणलेली सर्व संपत्ती नेताजी पालकर यांनी लोहगडावर ठेवली. १७१३ रोजी शाहू महाराजांनी लोहगड कान्होजी आंग्रे यास भेट दिला नंतर १७२० मध्ये आग्र्यांकडून पेशव्यांच्या ताब्यात आला.

१७७० मध्ये नाना फडणवीसचा सरदार जावजी बांबळे यांनी पुन्हा त्यांच्या ताब्यात घेतला. नानांनी धोंडोपंत निस्तुरेकडे किल्ल्याचा कारभार सोपवला. १७८९ रोजी या किल्ल्याचे बांधकाम मजबूत केले. सोळा कान असलेली बाव बांधली आणि तिच्या बाजूला शिलालेख कोरला. या शिलालेखचा अर्थ असा की, शके १७७१ मध्ये बाळाजी जनार्दन भानू नाना फडणवीस यांनी बाव धोंडोबल्लाळ निस्तूरे यांच्या देखरेखीखाली बाजी वटप्रभू यांच्याकडून बांधीवली.

नंतर नानांनी निस्तुरे यांचे द्रव्य गडावर आणून ठेवले. १८०० मध्ये निस्तुरे स्वर्गवासी झाले आणि १८०२ रोजी त्यांच्या पत्नी किल्ल्यावर राहिल्या. १८०३ मध्ये इंग्रजांनी किल्ला घेतला आणि दुसऱ्या बाजीरावाने तो जिंकला. ४ मार्च १८१८ मध्ये जनरल प्रॉथर हा किल्ला मिळवण्यासाठी आला तेंव्हा बाजीरावाने मराठ्यांना गड रिकामा करण्याचा हुकुम सोडला आणि मराठ्यांनी इच्छा नसाताना तो सोडला.

४.१ गणेश दरवाजा


किल्ल्याच्या डाव्या उजव्या बुरुजखाली सावळे कुटुंबाचा नरबळी देण्यात आला आणि त्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीची पाटीलकी देण्यात आली. या दरवाजाच्या आतील बाजूस शिलालेख आहेत.

४.२ नारायण दरवाजा


हा दरवाजा नाना फडणवीस यांनी बांधला. या दरवाजा खाली भुयार आहे जिथे भात आणि नाचणी साठवून ठेवली जात असे.

४.३ हनुमान दरवाजा


हा सगळ्यात जूना दरवाजा म्हणून ओळखला जातो.

४.४ महादरवाजा


हा सगळ्यात मुख्य दरवाजा आहे. या दरवाजावर हनुमान मूर्ती कोरलेली आहे. याचे काम नाना फडणवीस यांनी १ नोव्हेंबर १७९० ते ११ जून १७९४ मध्ये केले.

५.१ महादेव मंदिर

हे मंदिर दर्ग्यापासून पुढे गेल्यावर उजवीकडे आहे. हे अतिशय सुंदर मंदिर आहे.

५.२ शिवकालीन तोफा

या तोफा गणेश दरवाजामधून आत गेल्यावर रिकाम्या जागेत ठेवलेल्या आणि मोडकळीस आलेल्या तोफा आहेत

५.३ लक्ष्मी कोठी

शिवाजी महाराजांनी सुरत लुटली तेंव्हा सगळी संपत्ती इथेच ठेवली होती आणि आजही ते पाहायला मिळते.

५.४ विंचूकडा

हा कडा गडाच्या टोकावर गेल्यावर विंचूच्या आजाराचा जो कडा पाहायला मिळतो तो म्हणजे विंचू कडा.

५.५ दर्गा

हा दर्गा महादरवाजाच्या आत गेल्यावर पाहायला मिळतो.

५.६ सोळा कोणी तलाव

या तलावातील पाण्याचा वापर पिण्यासाठी आणि रोजच्या वापरासाठी केला जात असे.

५.७ गुहा

८० ते ९० लोक मावतील इतकी मोठी गुहा या गडावर आहे.

Places near Lohagad fort:

६.१ भागा गुहा

ही गुहा किल्ल्यापासून २-३ किमी अंतरावर आहे. ही गुहा पूर्वीच्या काळी बुद्ध संतांचे घर होती.

६.२ आमी घाटी

लोणावळा पासून २२-२३ किमी अंतरावर लोहगड पाहायला गेल्यावर हा किल्ला पाहू शकतो.

६.३ लोणावळा

हे शहर एक प्रसिद्ध पहाडी भाग आहे आणि किल्ल्या पासून २० किमी अंतरावर आहे.

How to reach Lohgad fort?

रेल्वे : पुणे मुंबई स्टेशन वरून लोणावळा पर्यंत रेल्वेने जाऊ शकतो. तिथून पुढे मावळ बसने किंवा स्थानिक वाहनाने किल्ल्या पर्यंत जाता येते.

बस : लोहगड किल्ला पर्यंत जाण्यासाठी थेट बस नाही. लोणावळा बस पकडुन तिथून खाजगी वहाने उपलब्ध आहेत.

विमान : लोहगड पर्यंत जाण्यासाठी थेट विमानतळ नाही. सर्वात जवळचे विमानतळ पुणे आहे. तिथून खाजगी वहाने करून किल्ल्या वर जाऊ शकतो.

लोहगड किल्ला ही एक ऐतिहासिक वास्तू आहे. आपल्या देशाची अशी ऐतिहासिक वास्तू एकदा तरी पाहायलाच हवी.

===============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *