Ritbhatmarathi

Search
Close this search box.

निधी एक बारा वर्षाची मुलगी…मस्त दिसणारी,मोहक हसणारी अशी निधी…आपल्या घरात सगळ्यांची अगदी लाडूबाई…निधीला टीव्ही पाहण्याची भारी हौस…त्यातल्या त्यात हॉरर सिरीस असेल तर निधी टीव्ही समोरून हलता हलत नसे…

अभ्यासात निधी प्रचंड हुशार म्हणून सगळे लाड-कोड निधीचे पुरवले जात असे..आपल्या आईच्या मात्र धाकात निधी असे म्हणजेच आपली आईच निधीला वेसण घालू शके…कुठेही गेलं तरी निधी सगळ्यांना भयकथा सांगत असे…

सांगताना त्यात ती इतकी गुंगून जात होती की आजूबाजूच्या परिस्थितीच भान निधीला राहत नसे…हॉरर चित्रपटातील प्रत्येक पात्र निधी रंगवून सांगत असे…अक्षरशः टीव्हीतले पात्र जे काही बोलतायत जसे संवाद फ़ेकतायत अगदी तसेच्या तसे संवाद निधी बोलत असे…एका संध्याकाळी निधी आपली आई निशा हिच्याशी एका हॉरर फिल्मबद्दल सांगत बसली होती…

निधी – आई…मी ना एक हॉरर फिल्म पहिली…

निशा – त्या फिल्म्स तर तू नेहमीच पाहतेस…आज अशी कुठली फिल्म पहिलीस तू…

निधी – आई…’हिंदोळा’…असं नाव होत फिल्मचं…त्यात ना एका झोपाळा असतो…

निशा – फक्त झोपाळाच असतो का..? की घर…वाडा किंवा बंगला असं काही नसत का ?

निधी – हो ना…एका मोठा वाडा असतो त्यात पडवीत एका झोपाळा बांधलेला असतो…आपल्या वाडीला आहे ना अगदी तसाच झोपाळा…त्या झोपल्यावर एका म्हातारी बसलेली असते…खूप म्हातारी असते ती…हातात एका वाकडी-तिकडी काठी…अंगावर फाटलेली साडी…तिच्या अंगाची त्वचा खूप सैल झालेली…अशी निस्तेज दिसत होती…

निशा – [मधेच निधीला टोकते] निधी…अगं निस्तेजच असणार ना ती…म्हाताऱ्या निस्तेजच असतात…यात काय नवीन…

निधी – [आपल्या आईला खूप मोठ्यानं ओरडून म्हणते ] आई….का मला थांबवलंस सांगता-सांगता…माझी लिंक तुटली ना सांगताना…परत मला आता पहिल्यापासून सांगावी लागणार की…

निशा – तुला मला हॉरर कथा सांगायला कुणी सांगितलं…मी आमंत्रण दिल नव्हतं तुला…पाहिलं ते भयपट पाहणं बंद कर…

निधी – भयपट काय म्हणतेस….हॉरर फिल्म म्हण…हॉरर फिल्म…

निशा – भयपट काय… नि हॉरर फिल्म काय..? अर्थ एकचं आहे दोन्हीचा…जास्त आगाऊपणा नकोय हा…

इतक्यात आजोबा शिवहरी आजोबा बाहेरून फेरफटका मारून आल्याची चाहूल निधीला लागते…आजोबा आल्या-आल्या पटकन सोफ्यामधून उठून स्वयंपाकघरात पाणी पिण्याच्या बहाण्याने जाते…लेक आत आलीय हे पाहताच निशाताई आजोबांसाठी पाणी घेऊन येतात…आजोबानाही सगळ्या गोष्टींची चाहूल पटकन लागते…तसं आजोबा पटकन म्हणतात…

आजोबा – काय ग निशा…काय झालंय…मी आलो आणि लगेचच चक्क निधी स्वयंपाकघरात कशी गेली…तू काही बोललंयस की काय तिला ?

निशा – बाबा…तुम्ही सगळ्यांनीच लाडावून ठेवलीय तिला दुसरं काही नाही…आत्ता लहान आहे म्हणून ठीक आहे…उद्या मोठी झाली..लग्न करून दुसऱ्या घरी गेली की चांगलं जड जाईल आपल्याला…

आजोबा – निशा…अगं…पण असं केलं काय तिनं…

निशा – अहो बाबा…किती वेळा सांगितलंय तिला…भयपट पाहू नकोस म्हणून…पण ऐकेल तर शपथ…मी फक्त तीला म्हटलं…सगळ्याच म्हाताऱ्या निस्तेज असतात त्यात एवढं काय…फक्त बोलले मी तर एकदम अंगावरच भडकली माझ्या…मी तिची आई आहे एवढाही तिला कळू नये का…?

आजोबा – निशा…अगं जाऊ देत…म्हणतात ना ते तुकारामांच्या अभंगात…’बोलिले लेकुरे वेडी-वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध…’

निशा – आजोबा एवढे लाड चांगले नाहीत हो…खाण्या-पिण्याच्या बाबतीत लाड करावेत….बाकीच्या गोष्टींना लिमिट्स हवेत …एवढच माझं म्हणणं आहे…

आजोबा – ठीक आहे मग…आपण यावर्षी आपण हे निधीचं हॉरर फिल्म पाहायचं भूत काढूनच टाकुयात…समर वेकेशन कधीपासून सुरु होणारेय आता निधीचे….

निशा – बाबा…व्हेकेशन च काय आलं मधेच…परीक्षा जरी जवळ आल्या तरी पोरगी त्या तसल्या फिल्म्स पाहतेच…

आजोबा – आत्ता तिला काहीच बोलू नकोस…अजून किती लांब आहेत तिच्या परीक्षा…

निशा – बाबा…महिनाभरावर येऊन ठेपल्यात परीक्षा…

आजोबा – मी अजिंक्यला लवकर ट्रीपचं प्लांनिंग करायला सांगतो…निशा तू पिकनिक च ठिकाण निवडून ठेव…

निशा – छान…बाबा..अहो आपण आणखी खतपाणी घालतोय निधीच्या वागण्याला…

आजोबा – निशा…अगं विश्वास ठेव माझ्यावर…मी सांगतोय तेवढं कर…

निशा – ठीक आहे…मी का तुमच्या शब्दाबाहेर आहे…

त्यादिवशी निधीला न रागावता आजोबा जेवण करून झोपी जातात…निधी मात्र नेहमीप्रमाणे आपल्या मनाला आवर न घालता…मस्त भयपट पाहत बसली होती…निशाचे वडीलही तिच्यासोबत टीव्ही पाहत होते…दोघांची बोलणीही चालूच होती —

अजिंक्य – काय मग…आमचं कोकरू काय करतंय…

निशा – तुमचं कोकरू नेहमीप्रमाणे टीव्ही बघतंय…

अजिंक्य – काय ऐकतोय मी…परीक्षा आहे ना पुढच्या महिन्यात…अभ्यास करायचंय यंदा…नवीन सायकल कुणाला पाहिजे…नाहीतर जाऊ देत आपण आपल्या खंडेरावच्या मुलाला सायकल देऊन टाकू…

सायकलचे अमिश ऐकताच निधी टीव्ही बंद करून आपल्या रूममध्ये झोपायला गेली आणि लगेच पहाटेचा अलार्म लावून झोपी गेली…नेहमी आजोबांकडून ऐकत आलेली असते कि ‘ पहाटे केलेला अभ्यास लक्षात राहतो म्हणूनसायकलच्या आमिषाने पोरीने ऐकले तरी म्हणून तर टीव्ही चटकन बंद केला तीन या विचाराने अजिंक्य निशाला चिडवत होता…

अजिंक्य – निशा…तुला मुलांना कसं ट्रीट करावं हे कळतंच नाही…पहा बरं मी नुसतं अमिश दाखवलं तिला…तर चटकन गेली झोपायला…

निशा – म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचंय…मला तिच्याशी नीट वागता येत नाही ते…

अजिंक्य – अगं…पण मी असं कुठं म्हणतोय…मुलांना कसं वागवावे हे सांगतोय मी…

निशा – अरे आमच्यावर अरेरावीनं बोलली तरीही मी ऐकून घेऊ का तीच…आजची संध्याकाळ माहिती नाहीय तुम्हाला…आजोबाना माहितीय सारं…बरं…त्यांच्यावरून आठवलं…त्यांनी सांगितलंय महिनाभराने बाहेर पिकनिकला जायचंय तर…तुला विचारून सांगते असं मी बाबाना म्हटलंय…उद्या सकाळी तुम्हाला फोन करून सांगते कुठे जायचं ते…चालेन…

अजिंक्य – बाबा पण ना…पिकनिक आणि या वयात ते पण मुक्कामी…झेपणार आहे का त्यांना…?

निशा – पण तुम्ही परवानगी द्याच असं त्यांनी सांगितलंय…नक्की काहीतरी प्रयोजन असणार त्यांचं…त्याशिवाय ते सांगणार नाही तसं…

अजिंक्य – ठीक आहे…पितृहट्टापुढं कुणाचं काही चालणार आहे का माझं…उद्यापर्यंत सांग कुठे जायचं ते…!

निशा – ठीक आहे…कॉल करेल उद्या…आत्ता झोपून घ्या लवकर उठायचं आहे…

सकाळी पहाटे लवकर उठून निशाने सगळं आवरलं…निधी स्कूल मध्ये जाण्यासाठी तयार झाली…स्कूलमध्ये निधी गेली त्यानंतर आजोबांशी संगनमत करून मुक्कामी पिकनिक फिक्स केली…निशानेही लगेच अजिंक्यला कॉल करून कळवले–

निशा – हॅलो….अजिंक्य…कामात नाही आहात ना तुम्ही ?

अजिंक्य – नाही गं…बोल…ठरलं का..कुठे जायचं ते ?

निशा – हो…आपल्या कोकणातच जाऊयात…वाडाही आहे तिथं…

अजिंक्य – काय निशा…डोंगर पोखरून उंदीर काढलास की तू….हा…हा…हा…!

निशा – तुम्ही काहीही बोलताय…काहीतरी विचार करूनच बाबानी सांगितलंय याचा विचार करा पहिला…हा माझ्या एकटीचा निर्णय नाही…बाबांनीच निर्णय घेतलाय…

अजिंक्य – बरं…बरं…मी आत्ता कामात आहे…संध्याकाळी येऊन बोलूत

असे म्हणून अजिंक्यने फोन ठेऊन दिला….अजिंक्यशी फोनवर बोलून झाल्यावर आजोबा आणि निशा गावाकडे गेल्यावर काय काय करायच याचे बेत आखु लागले…

आजोबा – निशा…अगं हिंदोळा आहे ना ग वाड्यात…?

निशा – हो आहे ना…त्याच काय..?

आजोबा – काही नाही तुला शोले फिल्म मधला डायलॉग माहिती आहे ना…?

निशा – शोले फिल्म… बाप रे…किती वेळा पाहायची…काय अप्रतिम संवाद आहेत त्यात…अगदी अजूनही लक्षात आहेत सर्वांच्या…त्यातला नेमका कुठला डायलॉग बाबा ?

आजोबा – लोहा…लोहे को काटता है…अगदी याचाच वापर इथं करायचाय…

निशा – मला कळलं नाही बाबा…!

आजोबा – ते तुम्हा सगळ्यांना कोकणात गेल्यावरच कळेल…त्यामुळे थोडा धीर धरा…

महिन्याभराने निधीची परीक्षा होते…परीक्षा चालू असल्याने टीव्ही,फिल्म्स सगळं बंद त्यामुळे निधीला अभ्यासही करता आला आणि ऑनलाईन पद्धतीने परीक्षाही देता आली…मग मात्र निधीला वेड लागले ते पिकनिकचे…ते प्लॅनिंग आजोबानी आधीच करून ठेवले होते म्हणून परीक्षा संपल्यानंतर लगेच पिकनिक हा शब्द कानावर पडला म्हणून आनंदून गेली…चार-पाच दिवसांनी घरातलं सहकुटुंब आणि सहपरिवार आठ दिवसांच्या मुक्कामी सहलीसाठी गेलं…त्या दिवसांमध्ये निधीचे हॉरर फिल्म पाहणं सुरूच होत…गावी गेल्यावर निधी वाडा पाहून थक्क झाली आणि आपल्या आईला सांगू लागली…

निधी – आई….मी इतक्यात एक हॉरर फिल्म पहिली होती…अगदी असाच वाडा होता त्यात…[असे म्हणून चौफेर वाड्यावर नजर फिरवू लागली…आजोबांनी हि गोष्ट पटकन हेरली…आणि पुढचे प्लॅन आखू लागले हाताशी घरगडी गणोबालाही घेतलं मग निधीपासून थोडासा लांब गेले आणि गणोबाला काही सांगू लागले]

निशा – निधी…अगं सगळीकडे काय असेच वाडे असतात का ?

निधी – आई…तू परत माझी फिरकी घेऊ नकोस हा…    

निशा – बरं…बाई सॉरी…[इतक्यात आजोबांनी एक अनॉन्समेम्ट केली]

आजोबा – दोन दिवसांनी…निधी बाळा आम्हाला देवीचा नैवेद्य दाखवण्यासाठी मंदिरात जायचंय…त्यामुळे तुला इथे एकटीलाच थांबावे लागेल…

निधी – आजोबा…का..पण मलाही यायचं तिकडं…!

निशा – निधी…अगं…तिथे कुमारिकांना येण्यास सक्त मनाई आहे….पाण्यावरच्या देवी असतात त्या…त्यामुळे तुला तिथे येता येणार नाही…तुला इथेच थांबावं लागेल…

निधी – आई….पण मला इथं भीती वाटते…

निशा – हॉरर फिल्म्स पाहताना नाही भीती वाटत…? थांबून पहा एकटी…एन्जॉय कर…

देवीचा नैवेद्य करण्यासाठी निशा तयारीला लागली…दोन दिवसांनी जायच म्हणून आल्या-आल्या सगळे रिलॅक्स झाले होते…गणोबानी मस्त तांदळाच्या भाकऱ्या आणि फिश फ्राय केला होता…म्हणून

सगळे मन तृप्त होईपर्यंत जेवले…आजोबांचं मस्त वाडा निरीक्षण चाललं होत…त्यात गणोबाही मागे-मागे करताच होता…

आजोबा – इथं कोणी शूटिंगची माणसं आहेत की नाही आजूबाजूला…

गणोबा – हं….आहेत पण माझं काही काम नसत त्यांच्याकडं…

आजोबा – तुझं नाही ..पण माझं काम आहे आत्ता त्यांच्याकडे…

गणोबा – काय…या वयात तुम्हाला हिरो व्हायची स्वप्न पडतात की काय…हा…हा..हा ..

आजोबा – दात काढायला काय झालंय…मी आमच्या काळचा हिरोच होतो की…!….ते जाऊ देत उद्या एका शूटिंगच्या माणसाला बोलावून आण…पण कुणाला कळता काम नये…

गणोबा – आजोबा …तुम्हीही कमालच करत आहेत…इथं आलं कुणी शूटिंगचा माणूस…तर कळणार नाही का सगळ्यांना…? त्यापेक्षा असं करा…तुम्हीच चला तिकडे…मी घेऊन जाईन तुम्हाला…  

आजोबा – बरं…बरं…मी सांगितलंय ते लक्षात ठेव…त्यापेक्षा एक यादी देतो तुला…जेव्हा सांगेन तेव्हा माझ्याकडं दे ती यादी…

गणोबा – हो…चालेन…उद्याच घेऊन चलल मी शुटिंगवाल्याकडं…चालेन..

आजोबा – चालेन…

त्यादिवशी सगळेजण निवांत झोपी जातात…आजोबा मात्र मनात बेत आखत असतात असाच एक चिट्ठी लिहून ठेवतात…त्यात…खोटी दाढी,मिशी,धोतर,काठी…वेगवेगळ्या कलरचे लाईट्स…फोकस असं सगळं सामान लिहून ठेवलं…एक कोळसाही आजोबा त्या चिट्ठीसोबत पॅक करून ठेवतात आणि काळजीपूर्वक आपल्या भिंतीच्या कोनाड्यात ठेवतात…दोन दिवसांनी घरातलं सगळं काही आवरून निशा नैवेद्य दाखवायला देवळात जाणार असते म्हणून अगदी पहाटे पासूनच सगळं आवरून निघतात…

निशा – निधी…आता आम्हाला यायला रात्र होईल…सगळं जेवण करून ठेवलंय…

निधी  – [ हातात आपल्या मोबाईलवर एक फिल्म पाहत असते ] हो आई…लक्षात ठेवेल मी…गणोबा आहेच ना घरी…

निशा – छे…गं…गणोबाही येणार आहे आमच्याबरोबर…तरीही लक्ष ठेवायला सांगितलंय मी शेजारच्या ताईंना…अधूनमधून येतील त्या…

निधी – बरं…बाय…आई…लवकर या…

साधारण आठ वाजता निशा आणि अजिंक्य नैवेद्य दाखवण्यासठी बाहेर पडतात…दिवसभर निधी एकटीच असते…म्हणून कधी झोपाळ्यावर…कधी अंगणात…कधी परसदारात पपईच्या झाडापाशी इकडून तिकडे फक्त खेळत असते…जेवणही ती करून घेते…घरी कुणीही नसल्याने फक्त आपलं राज्य आहे घरात असं निधीला वाटत असत सारखं…कुणी ओरडणार नाही की…कुणी रागावणार नाही…म्हणून आपला मोबाईल फोन काढून एक भयपट पाहत नसते…त्यावेळी संध्याकाळचे ६-३० वाजलेले असतात…झोपाळ्यावरून उठून निधी माजघरात जाऊन बसते…आजूबाजूला काय आहे किंवा काय नाही याच भानही ती विसरून जाते….इतक्यात…माजघराचा दरवाजा आपोआप बंद होतो…बाहेरून कडी लावली जाते…माजघराच्या खिडकीपाशी काळा अंधार दाटू लागतो…भरीस भर म्हणून घरातली लाईट जाते… …त्यामुळे निधी थोडीशी गडबडते…तरीही काहीही फरक पडत नसल्यासारखं पुन्हा मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसते….काही वेळाने…माजघरातले पडदे वाऱ्याने हळू लागतात…इतक्यात निधी ज्या खिडकीखाली बसलेली असते…त्या खिडकीमधून चित्रविचित्र आकृत्या समोरच्या भिंतीवर पडू लागतात…हे पाहून मात्र निधीची अगदी बोबडीच वळते…घशाला कोरड पडते…दरवाजा उघडून जावं म्हंटल तर दरवाजा बाहेरून कडी लावलेली असते…घरात तर कुणीही नाही मग दरवाजा कुणी लावला…या भीतीने…निधीच्या तोंडच अगदी पाणीच पळालं होत…म्हणून खूप घाबरी घुबरी झालेली तिची अवस्था होते…तसच ते आवाज…त्या आकृत्या एकटक ती पाहत बसते…लक्ष दुसरीकडे जावं असं एकही साधन तिथे नसत…म्हणून अगदी तिची गोचीच झालेली असते…

इतक्यात काही वेळासाठी सगळं वादळ शांत होत…दरवाजा हळू-हळू उघडला जातो…म्हणून एक आशेचा किरण तिला दिसतो…ती धावत जाऊन…पडवीमधल्या हिंदोळ्यावर बसते…अगदी डोळे घट्ट मिटून बसते…निधीची चांगलीच पळता भुई झालेली असल्याने….धापा टाकत फक्त तिथे डोळे मिटून खाली मान घालून बसते…इतक्यात हिंदोळ्यावर साधारण आजोबांच्याच वयाचा माणूस बसलेला निधीला दिसतो…दाढी वाढलेली…चेहरा काळवंडलेला…डोळे लालभडक असं त्याच रूप पाहून निधी घाबरून ओरडलीच…

निधी – अअअअ….अअअ…कोण आहेस तू…आणि इथं काय करतोस…

माणूस – मी नटवरलाल घाडीगावकर….पोरी तू काय करतेस इथं….हे माझं घर आहे…[भेकस आवाजात तो माणूस तिच्याशी बोलत होता असा आवाज ऐकल्यावर निधीची मात्र बोबडीच वळते ]

निधी – हे माझं घर आहे…..ततत्त्त्त…..तू….तूउऊऊऊऊउ….जा इथून….

माणूस – मी जाणार नाही इथून….तुलाच जावं लागेल…

निधी – हे….मम्मंझ्या….अआजोबांचं….घर आहे….तूच जा…मी ऐकणार नाही तुझं…

माणूस – पोरी….जास्त आगाऊपणा करशील तर हकनाक मरशील तूला मारून मागच्याच विहिरीत टाकेन…

असे म्हणून…तो माणूस निधीच्या मागे मागे धावू लागतो…निधीही त्याच्या तावडीत सापडू नये म्हणून वाडाभर सैरावैरा पळू लागते…इतक्यात शिंक्यावर ठेवलेलं मातीच्या मडक्याला निधीचा जोरदार धक्का बसतो …मडकं निधीच्या डोक्यावर आपटत…शिंक्याची उंची फार जास्त नसल्याने…चटकन धक्का लागतो…भीतीने अंगात त्राण नसलायने निधी पटकन बेशुद्ध पडते…सगळं काही लगेच शांत होत…साधारण तासाभराने…निशा,अजिंक्य देवळामधून येतात….आजोबाही पटकन डॉक्टरला घेऊन येतात…निधीची अवस्था पाहून निधीची अवस्था पाहून निशा आणि अजिंक्य घाबरे घुबरे होतात डॉकटर ओक यांच्या दिलास्याने दोघा नवरा-बायकोचा जीव एकदाचा भांड्यात पडतो…तोपर्यंत गणोबाने सगळं माजघर व्यवस्थित आवरून ठेवलं पडदे,लाईट्स,ड्रेपरीच सामान सगळं शुटिंगवाल्यांच्या ताब्यात देण्यासाठी जात असताना ….नेमकं गणोबाला अजिंक्य टोकतोच आणि म्हणतो…

अजिंक्य – काय गणोबा….हे सगळं कशासाठी आणलं होत…बाबा आणि तू नेमकं गेले कुठं होतात….आमच्याबरोबर आलाही नव्हता तुम्ही…काय गौडबंगाल आहे हे….

आजोबा – ते नंतर सांगू आम्ही वेळ येऊ देत तशी…

अजिंक्य – बाबा…घरी निधी एकटीच होती हे माहिती असताना सुद्धा कुठे गेला होतात तुम्ही…आम्ही तिला कधीच एकटीला राहू देत नाही…खास तुमच्या विश्वासावर आम्ही निधीला इथे ठेवलं होत…पण एकटीला ठेऊन गेला होतात कुठे तुम्ही…? आणि गणोबा तुही गेला होतास तिथे…बऱ्या बोलाने सांगा मला नेमकं काय झालंय ते…

आजोबा – आज्या…तुला सांगितलं ना योग्य वेळ येऊ देत मगच सांगू…

इतक्यात निधी शुद्धीवर येते…पाणी…पाणी…असा आवाज येतो…निशा माजघरात निधीसाठी पाणी घेऊन जाते….घडलेला सगळा प्रकार निधी आपल्या आईला सांगते…डॉटरांनी दिलेल्या औषधाने निधीला झोप लागते…गणोबाने मस्त खिचडी आणि कढीचा बेत केलेला असतो…निशाला निधीच्या सांगण्यावरून शंका येऊ लागते..नंतर फक्त निशाला आजोबांच्या बोलण्याचा अर्थ कळतो…दुसऱ्याच दिवशी आजोबांच्या खोलीत चहा घेऊन जाते…मग मात्र निशा आजोबांशी बोलते –

निशा – बाबा..काय मग चहा घेताय ना…

आजोबा – काय मग…निधी काय म्हणाली काल…?

निशा – काही नाही…काल भूत पाहिलं असं म्हणाली…ते भूत तिला निघून जायला सांगत होत…घर माझं आहे असं म्हणत होत…मग निधी म्हणाली की…मी घर सोडून जाणार नाही…हे माझं घर आहे…मग काहीतरी ते भूत निधीच्या मागे लागलं…पळत असताना शिंक्यावरच मडकं फुटलं…मग पुढं काय झालं हे तिला माहिती नाही…बाबा तुम्हाला तर माहिती असेल ना…[निशा ला शंका असल्याने थेट आजोबाना विचारलं]

आजोबा – म्हणजे तुला नेमकं काय झालं हे समजलं तर…

निशा – मला समजलं नाही पण तुमच्या बोलण्याचा अर्थ आत्ता कळतोय….लोहा लोहे को काटता है…

आजोबा – मला सांग…काय चुकलं माझं…मीच भूत बनून गेलो होतो निधीसमोर…मला काहीही करून बाहेर काढायचं होत तिला या सगळ्यातून…गणोबानेही मला मदत केली…आपण इथं आल्यापासूनच मी याचा बेत आखत होतो…शेवटी तुम्हा दोघांना नैवेद्याचे निमित्त करून पाठवून दिल…मग काय गणोबा आणि मी दोघांनी मिळून सगळा प्लॅन केला आणि हा प्लॅन यशस्वी झालायं की नाही हे कळेलच लवकर…निधी उठल्यावर…निदान तू तरी मला समजून घेशील म्हणून तुलाच मी हे सगळं सांगतोय…

निशा सगळं शांतपणे ऐकून घेत होती…इतक्यात निधी खोलीजवळ आली आणि आपल्या आईला म्हणाली…

निधी – आई…मला धिरडं हवंय करून…गणू दादा देईल का बनवून मला की…तू देतेस…?

निधीला खोलीबाहेर पाहून दोघांचाही जीव एकदाचा भांड्यात पडला…कारण निधी अगदी ठणठणीत बरी झाली होती…म्हणून निशा आपल्या लेकीला म्हणाली…

निशा – बाळा…आत्ता बरं वाटतंय ना तुला…

निधी – हो…आई…

निशा – बरं…मी धिरडं करून देते…तोवर तू अंघोळ करून घे…[निधी अंघोळीला जाते

टेबल वर गरम गरम धिरडं आणि चटणी वाढून ठेवलं होत…निधी मनसोक्त न्याहारी करते…थोड्यावेळाने आपला मोबाईल घ्यायला जाते…मोबाईल हातात घेऊन एकटक त्याकडे पाहते परत ठेऊन देते….हा सगळा प्रकार निशा पाहत असते मोबाईल ठेऊन दिला याचं समाधान निशाला वाटत…नंतर जास्त वेळ झोपाळ्यावर घालवते…परसदारात जाऊन पक्षी पाहते…स्वयंपाकघरात जाऊन आपल्या आईपाशी लुडबुड करता-करता निशा आपल्या लेकीला म्हणते…

निशा – निधी…अगं…मोबाईल आन बरं इकडे मला आज हॉरर फिल्म पाहायचा मूड आलाय खूप मस्त असतात म्हणे दे ना लावून…कुठली पाहतेस तू नेहमी…असं कर अनाबेले लाव खूप चर्चा आहे म्हणे त्या फिल्मची…

निधी – [थोडीशी आपल्या आईवर ओरडते] आई…नको प्लीस नको…मला त्या फिल्म्स लावायला लाउस…नको मला त्या फिल्म्स….

स्वयंपाकघराच्या भिंतीपाशी आजोबा उभा राहून ऐकत होते…आणि गणोबाला पाहून हळूच म्हणाले…” आखिर लोहा लोहे को काटताही है…! ”